२०५० सालातला भारत. नक्षलवादी फक्त दुर्गम भागात असायचे ते आता सर्व भारतभर पसरले होते.बहुतेक भाग त्यांनी काबीज केला होता. बरेच राजकीय नेते मारले गेले होते. उरलेले दिल्ली आणि त्याच्या जवळपासच्या भागात मिलिटरीच्या संरक्षणाखाली रहात होते. बाकीच्या देशांत त्यांचा संपर्क जवळजवळ तुटलाच होता. तरीही बाहेरच्या जगात अजून 'नक्षलीस्तान' ला मान्यता मिळाली नव्हती. शहरातल्या जनतेला अंगमेहनतीची कामे करावी लागत होती. नक्षलींनी जी शहरे काबीज केली, तेथील वस्तीत जाऊन सर्वप्रथम तिथल्या खाजगी गाड्या जाळून टाकल्या. एसयूव्ही सारखी खाजगी वाहने स्वतःच्या वापरासाठी बळजबरीने घेतली. फ्लॅटस मधे रहाणार्या सर्व लोकांना बाहेर काढून सोसायटीतल्याच मोकळ्या जागेत झोपड्या बांधून रहायला भाग पाडले. रिकाम्या फ्लॅटस मधे गरीब, आदिवासी आणि मोलमजुरी करणारे राहू लागले. जे सुशिक्षित लोक 'त्यांच्यासाठी' काम करायला तयार झाले त्यांना झोपड्यांत राहू दिले, बाकीच्यांना मारुन टाकण्यात आले. अनेक शहरांचे कॉन्सट्रेशन कँपमधे रुपांतर झाले. जे निरुपयोगी, म्हातारे, अशक्त लोक होते त्यांना खतम करण्यात येऊ लागले.
शहरातला व्यापार्,उदीम हा नक्षलींच्या बंदुकीसमोर काम करु लागला. बँकातले पैसे नवीन शस्त्रे विकत घेण्यासाठी वापरले जाऊ लागले. प्रत्येक शहरांत सर्वोच्च स्थानी देखरेख करण्यासाठी चिनी अधिकार्यांची नियुक्ती झाली. धर्म हा शब्द उच्चारायलाही बंदी झाली. बरेच सुशिक्षित भारताबाहेर पळून जाऊ शकले, पण त्यापैकी फारच थोडे युरोप वा अमेरिकेत आश्रय घेऊ शकले. बाकीचे पाकिस्तान, बांगलादेश इथल्या तुरुंगात खितपत पडले.
एरवी सगळ्या जगातल्या घडामोडीत नाक खुपसणार्या अमेरिकेने हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे म्हणून हात झटकून टाकले. कारण तोपर्यंत अमेरिकाही आर्थिक दृष्ट्या चीनची मांडलिक झाली होती. दिल्लीतल्या उरल्यासुरल्या राजकीय नेत्यांनी सर्व जगाकडे मदत मागायचा प्रयत्न केला होता पण कोणीच मदतीला धावून आले नाही. युनो तोपर्यंत चीन व रशियाची बटीक झालेली होती. बीबीसीने घेतलेली नक्षलप्रमुखाची मुलाखत जगभर दाखवण्यात आली. त्यात त्याने ठामपणे सांगितले की भारतात ब्रिटिशांपासून आदिवासींवर प्रचंड अत्याचार झाले आहेत. तथाकथित स्वातंत्र्य मिळाल्यावरही ती पिळवणुक वाढतच गेली. आमचा प्रथम उद्देश हा संपूर्ण विनाश हाच आहे. त्यानंतरच आम्ही विकासाबद्दल विचार करु. या देशातल्या सर्व उच्च्वर्णीयांमधे ही पिळवणुकीची शिकवण भिनली आहे. त्यामुळे या सर्वांना ठार मारले तरच हा देश पिळवणुकीच्या 'जीन्स' चा कचाट्यातून सुटेल. त्यांना एकदम ठार मारणे आम्हाला शक्य नाही म्हणून आम्ही त्यांना सक्तीने शिक्षक बनवले आहे. एकदा सर्व आदिवासी, मागास जमातीचे लोक शिकले की त्यांच्याच हस्ते आम्ही या पापींना जिवंत पुरणार आहोत. हिटलरने कैद्यांना जाळून टाकून चूक केली. यांना मोठ्या प्रमाणावर पुरले तर आमच्या पुढच्या पिढ्यांना त्यापासून खनिज तेल मिळेल. या दूरदृष्टीमुळे भविष्यात आमचा नक्षलीस्तान स्वयंपूर्ण होईल.
पण हा त्यांचा स्वप्नविलास फार काळ टिकला नाही, कारण शेवटी चीनने सर्व नक्षल्यांनाही गोळ्या घालून ठार मारले आणि भारत,नेपाळ,पाकिस्तान,बांगलादेश,लंका,ब्रह्मदेश यासहित संयुक्त चिनी साम्राज्य या भरतवर्षावर स्थापन झाले.
वाचने
10145
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
खरंच असं होऊ शकेल?
horrible¬
हं..अशक्य नाही.
होऊ शकते असे सुद्धा.
(No subject)
हा लेख फार महत्वाचा आणि गंभीर
एरवी सगळ्या जगातल्या घडामोडीत
कल्पनाविस्तार जमलाय
complacency
In reply to कल्पनाविस्तार जमलाय by श्रीरंग_जोशी
+१
In reply to complacency by क्लिंटन
:-)
In reply to complacency by क्लिंटन
शायद उनका आखरी हो यह सीतम हर सीतम यह सोचके हम सह गये
In reply to :-) by श्रीरंग_जोशी
ट्रिगर
In reply to शायद उनका आखरी हो यह सीतम हर सीतम यह सोचके हम सह गये by क्लिंटन
ट्रिगर
In reply to ट्रिगर by राही
सुधारणा
In reply to ट्रिगर by क्लिंटन
पूर्वी आणि नंतर
In reply to सुधारणा by क्लिंटन
नाही हो
In reply to पूर्वी आणि नंतर by राही
अतिशय अभ्यासपुर्ण माहिती. पण
In reply to नाही हो by क्लिंटन
गेलेल्या माणसांविषयी वाईट
In reply to अतिशय अभ्यासपुर्ण माहिती. पण by अमोल खरे
माझे विचार
In reply to शायद उनका आखरी हो यह सीतम हर सीतम यह सोचके हम सह गये by क्लिंटन
+१
In reply to माझे विचार by श्रीरंग_जोशी
>>> बरेच लोक उदारमतवादाला,
In reply to कल्पनाविस्तार जमलाय by श्रीरंग_जोशी
चीन दिसतो तेवढा बळकट आहे का?
+१
In reply to चीन दिसतो तेवढा बळकट आहे का? by दशानन
>>> चीन दिसतो तेवढा बळकट आहे
In reply to चीन दिसतो तेवढा बळकट आहे का? by दशानन
भीषण चित्र आहे.
आणि जगातली सगळी युद्धं बंद
In reply to भीषण चित्र आहे. by आतिवास
.
फ्लॅटस मधे रहाणार्या सर्व लोकांना बाहेर काढून सोसायटीतल्याच मोकळ्या जागेत झोपड्या बांधून रहायला भाग पाडले. रिकाम्या फ्लॅटस मधे गरीब, आदिवासी आणि मोलमजुरी करणारे राहू लागलेएक शंका आहे. गरीब लोक फ्लॅटमधे आल्यावर श्रीमंत होतील. मग पुन्हा त्यांना हूसकावून लावावे लागेल. फ्लॅटमधे आणण्यासाठी नव्याने गरीब लोक शोधावे लागतील वगैरे वगैरे... हे लोक श्रीमंतांना लूटून संपत्ती गरीबांमधे वाटणार, समानता आणणार हे चित्रपटातच शक्य आहे. सध्या जे प्रकार चालू आहेत त्यात काही तत्त्व, वाद, इझम, समाजवाद, कम्युनिझम शोधू नये. इतर दहशतवादांसारखाच तो एक दहशतवाद आहे. पाकच्या मदतीने चालतो तो हिरवा दहशतवाद. चीनच्या मदतीने चालणारा तो लाल दहशतवाद. पण तो दहशतवादच. या लोकांना गरीबांची कणव वगैरे आहे असे मानणे अगदी चूक आहे. गरीबीतून केलेली चोरी आणि देशद्रोह यात फरक आहे.मुस्लिमांचा प्रश्न
अगदी काहीही ....कल्पना विलास
कृपया कथा विनोदी वाटली अस
In reply to अगदी काहीही ....कल्पना विलास by माझीही शॅम्पेन
चीन असे काही करेल असे वाटत
गेल्या १-२ दिवसांत चीनने
गेल्या १-२ दिवसांत चीनने
In reply to गेल्या १-२ दिवसांत चीनने by श्रीगुरुजी
झकास जमलाय कल्पनाविलास!!
शक्यता..
In reply to झकास जमलाय कल्पनाविलास!! by बाळ सप्रे
मला हे कळत नाही की चीन सरळ
जोवर बूडाखाली जळत नाही तोवर
In reply to मला हे कळत नाही की चीन सरळ by श्रीगुरुजी
ताजा कलम...
चिनी सैनिक नियमितपणे भारतीय
११ ऑगस्टला पीएलए{{ People's
याच जागी आपल्याऐवजी चिनी
In reply to ११ ऑगस्टला पीएलए{{ People's by मदनबाण
पद्धतशीर कट
चीनने गेल्या वर्षात अनेकवेळा
मी तर ह्या चीनी साम्राजाची