✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बादशाही...!

अ
अत्रुप्त आत्मा यांनी
गुरुवार, 08/22/2013 - 01:44  ·  लेख
लेख
आज सांजच्याला अड्ड्यावरनं घरला निघालो,आणी गाडी सवईनी पानाच्या आमच्या आवाडत्या ठेल्यावर गेली. "बोलो साब...कितना...?" मी-"तीन बनाओ,तीनो पार्सल करो. असं म्हणालो आणी जरा कानावरचा हेडफोन दूर करुन आजूबाजुला न्याहाळायला लागलो. आमच्या सदाशिवपेठेतली ही गल्ली पूर्वी सदाशिवपेठेचा केवळ एक भाग होती आणी भरत नाट्य मंदिराचा चौक ते टिळक स्मारक मंदिराचा चौक यांना जोडणारी गल्ली.."इतकिच" नाट्यमय तिची ओळख होती.पण गेल्या १५ वर्षात या गल्लीला एक नविन ओळख मिळाली... मटण-गल्ली! हो....! हेच नाव त्या लेनला आता मिळालं आहे.म्हणजे मला वैयक्तिक रित्या ही काहि खेद-जनक अथवा शरमेची गोष्ट वगैरे वाटत नाही.पण काळाबरोबर मूल्य कशी आणी किती बदलतात,याचा हा एक गमतीशीर पुरावा. या गल्लीत पूर्वी नागपुर खानावळ ही एकच पारंपारिक नॉनव्हेज खानावळ होती.आणी त्यानंतर त्याला तात्विक शह द्यायला आलेली सात्विक-थाळी! पण हल्लीच्या रस्सास्वादवादी चळवळीच्या जनकांनी गावभर जिथेतिथे जे तांबड्या/पांढर्‍याचं व्यापक आंदोलन "सुरू" केलय त्याची पाळमुळं याच गल्लीत असावी असा माझा आपला एक अंदाज आहे. कारण एकेक म्हणता म्हणता या गल्लीत पाच/सहा हॉटेलं त्याचीच चलु झाली हळुहळू! असो..आपली मांसाहारावर प्रीतीही नाही...दुस्वासही नाही! या गल्लीतनं "हे" अवलोकन करून बाहेर पडता पडता,मनात का कोण जाणे चटकन नाव आलं ते आमच्या बादशाही'चं! लोकांना हे पुण्यातलं बादशाही(लॉजिंग/बोर्डींग) म्हणून माहित आहे,आंम्हाला हे पुण्याचं-(लॉजिंग/बोर्डींग) म्हणून माहित आहे. ;) (सदर वाक्यातील खोच ही ज्यानी बादशाही'ची लॉजिंगची "नियमावली" हे अस्सल पुणेरी प्रकरण वाचलं आहे,आणी त्यानंतर तो'ही वाचला आहे,त्यालाच कळेल ;) ) तर.... मनात आलं आज नेहमीच्या मेसला दांडी मारून आपल्या बादशाही'ला पुन्हा एकदा फेस करावं.घड्याळात पाहिलं आणी शेवटची पंगत मिळेल या अंदाजानीच आत गेलो.अंदाज फेल गेला नाही,कारण काऊंटरवरचा तो प्राचीन खानावळ संस्कृतीतला इसम माझ्याकडे त्याच चेहेर्‍यानी बघत टोकन-पावती फाडायच्या बेतात उभा होता. पैसे दिले पावती हतात आली,आणी "नंबर"चा पुकारा होई पर्यंत तिथल्या एका जुन्या श्टाइलच्या आणी खरोखर तितक्याच जुन्याकाळी-घेतलेल्या वेटिंगच्या लांबलचक आसनावर स्वस्थ झालो. https://fbcdn-sphotos-c-a.akamaihd.net/hphotos-ak-prn1/935938_500146363404988_1751480982_n.jpg वेळही भरत आलेली असल्यामुळे ५ मिनिटातच तिनशे...ती...स! असा पुकारा आला,आणी एंट्रिला उभ्या असलेल्या माणसानी,"आतल्या बाजुची कोपर्‍याची खुर्ची..!" असं म्हणत मला "आत-धाडलं" देखिल! https://fbcdn-sphotos-e-a.akamaihd.net/hphotos-ak-ash3/995471_500146383404986_388120170_n.jpg ही खास बादशाही श्टाइल आहे. मी नवि-पेठ हा सदाशिवपेठेचा वाढता भूभाग म्हणून वेगळा केलेला,माझ्या कर्मभूमीचा एरिया सोडून शिव्हगड-रोडला विस्थापित झाल्यानंतरची (म्हणजे ७/८ वर्षानंतरची! =)) ) ही माझी पहिलीच भेट होती,त्यामुळे तो आत "सोडणारा" ,श्राद्धाला पिंडांना नमस्कार करायला जे जमतात,त्या चेहेर्‍याचा आणी पेहेरावाचा'ही- नेहमीचा वयस्क मनुष्य दिसतो का? ह्या खुषीत होतो.पण आज मला एका दुसर्‍या'च माणसानी आत सोडलं.पण श्टाइल तीच असल्यानी मला त्याच्या मागे आजही उभा असलेला तो म्हातारा दिसलाच! यही तो इधरकी खासियत है! जश्या इथल्या पाट्या अस्सल पुणेरी,तशीच या खानावळीची संस्कृतीही अस्सल पुणेरीच. https://fbcdn-sphotos-b-a.akamaihd.net/hphotos-ak-ash4/1185322_500146420071649_1518672300_n.jpg https://fbcdn-sphotos-h-a.akamaihd.net/hphotos-ak-ash3/581537_500146393404985_1978310668_n.jpg खरं म्हणजे अस्सल हा शब्द वापरायला नकोच आहे, ते थोडसं ,"हे डोक्यावरचे माझे अस्सल केस आहेत!" असं म्हटल्या सारखं होतं. इथल्या खुर्च्या/टेबलं/पाण्याचे पितळी तांबे.जेवण वाढायची/जेवणाची भांडी ही सुद्धा अजून तशीच आणी तीच आहेत. https://fbcdn-sphotos-b-a.akamaihd.net/hphotos-ak-ash3/1176350_500146240071667_1385661105_n.jpg म्हणजे या खानावळीला (इथल्या माणसांसकट) नूतनीकरण नावाची नव मार्केटिंगवादी-झळ कधिही पोहोचलेली नाही. आणी ती पोहोचण शक्यही नाही.अहो कुंडितली तुळस उपटून फ्लॉवरपॉटमधे लावली तर ती गुलाबी येत नसते.आपल्याला उगाच नविनपणा केल्याची हौस भागवल्या सारखं होतं इतकच. बादशाही मधे मिळणारं साधं मराठी भोजन हे पूर्वीही भोजनच होतं आजही भोजनच आहे.(तिथल्या कोथिंबिर लाऊन दिल्या जाणार्‍या ताकासारखं!) त्याची कधिह्ही राइसप्लेट झाली नाही आणी थाळिही! एक्स्ट्रॉ स्विटडिश पूर्विही होत्या आजही आहेत,पण त्याबरोबरच इथे खास जुन्या पुणेरी मामल्याचं-एक्स्ट्रॉ तूपंही मिळंतं. (आज शेवटच्या पंगतीला असल्यामुळं ते अदृश्य झालवतं. ;) ) इथला आमटिचा प्रकार तर एक लाजवाब प्रकार आहे.अगदी खाण्यापासून ते वाढला जाण्यापर्यंत! आपण इथे जेवत असतांना आमटिचं गरम पातेलं आणी गरमागरम आमटिचं पातेलं... असं घेऊन कुणि ना कुणी अधून मधून येरझार्‍या घालतच असतो. इथल्या आमटिचा स्वाद म्हणजे खरोखर स्वाद या शब्दाची इज्जत राखणारा स्वाद आहे. जेवताना एरवी कधीही आमटी हा प्रकार आपण पीत नाही.पण इथे आमटी ही कढी सारखी गरमागरम प्याविशी वाटते. मी ज्या वयात शाळेतल्या मास्तरांना पगार मिळण्याचं "कारण" होतो,म्हणजे ६वी ७वीत शाळेत होतो,तेंव्हा कधितरी बाबांबरोबर दुपारचा इथे पहिल्यांदा जेवायला गेलो होतो.पण पदार्थाची क्वालिटी/चव/आकार/प्रकार सर्व काहि आजही तस्से आणी तसेच आहेत.एखादी ओली भाजी,एखादी सुकी भाजी ,आमटी,भात,पोळ्या,लिंबाची एकच-फोड!,एखादी चटणी,पिठातलं डांगर,कांदा असा अत्यंत साधा आणी घरगुती मामला असतो.त्यातही महागाईच्या नावाखाली बटाट्याचा आणी गेल्या काहि वर्षातल्या सोयाबिनचा "आधार" या खानावळीनी आजही घेतलेला नाही,त्यामुळेच या खानावळीचा ताटाचा "भाव" वाढलेला असला,तरी त्याची "किंमत" पूर्वी होती, तीच आहे! जेंव्हा "सातत्य" ही बाब असते तेंव्हा "दर" ही गोष्ट गौण ठरली पाहिजे,हे चांगल्या ग्राहकाच्या मनाचं अर्थशास्त्र असेल,तर त्याला हाही दर रुचून जातो! नव्हे रुचला पाहिजे,असं मला आमच्या बादशाही'च्या बाबतीत थोड्याश्या अडेल आग्रहानी म्हणावसं वाटतं.कारण भोजनाची पूर्णता तृप्तीच्या ढेकरेनी जेव्हढी यायला हवी,तितकीच "मस्त जेवलो बुवा !" ही समाधानाची हाकही मनातून येणं आगत्याचं आहे. या दोन्ही गोष्टी इथे घडतात,किंबहुना त्या घडून याव्या असाच इथल्या अन्नाचा स्थायीभाव आहे. https://fbcdn-sphotos-f-a.akamaihd.net/hphotos-ak-prn2/1186735_500146300071661_1074214418_n.jpg आजचा जमाना हा "सर्व्हिस"चा जमाना आहे.पण त्यात फक्त सर्व्हिस'च येते आहे,सेवा देणं शून्यवत झालं आहे.तश्या जमान्यातही आपलं खरंखुरं पुणेरीपण टिकवून गिर्‍हाइकं न वाढवता गेस्टपास'ही देणारी ही जुन्या पुण्या इतकीच-जुनी खानावळ आजही थाटात उभी आहे आणी तशीच पुढे राहिलंही! https://fbcdn-sphotos-h-a.akamaihd.net/hphotos-ak-frc1/1004680_500146273404997_2091441227_n.jpg ===================================================================
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
33429 वाचन

💬 प्रतिसाद (124)

प्रतिक्रिया

वाह गवि काय आठवण काढलीत,

सौंदाळा
गुरुवार, 08/22/2013 - 14:30 नवीन
वाह गवि काय आठवण काढलीत, खवय्या, खाद्य समीक्षक असावं तर तुमच्यासारखं :) शाकाहारी जेवणाच्या अशा काही सुंदर जागा आहेत या की इकडे गेल्यावर नेहमी जिभल्या चाटत खाणारे चिकन, मासे पण खाल्ले जाणार नाहीत माझ्याकडुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

+ २

मेघवेडा
गुरुवार, 08/22/2013 - 18:15 नवीन
आणखी वझे @ मालवण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

बादशाही

अनिरुद्ध प
गुरुवार, 08/22/2013 - 14:37 नवीन
सहा महिन्यापुर्वी कामासाठी पुण्याला आलो होतो,जोडीदाराने उदरभरणासाठी बाद्शाहीत जाण्याचा आग्रह धरला,म्हणुन गेलो,मग कळले की थाळी अनलिमिटेड आहे,जेवण उत्क्रुष्ठ होते,गवी यान्नी सान्गितल्याप्रमाणे,गल्ल्याजवळ गर्दि सुद्धा होति,पण लवकरच नाव पुकारले गेले,ताक आमटी उत्क्रुष्ठ तसेच पोळ्यासुद्धा गरमागरम्,आत्मारामजी,धन्स आठ्वणी जाग्या केल्या बद्दल.
  • Log in or register to post comments

आत्मारामजी,धन्स मज्जा मज्जा

सौंदाळा
गुरुवार, 08/22/2013 - 14:39 नवीन
आत्मारामजी,धन्स
मज्जा मज्जा ;)
  • Log in or register to post comments

मला समजले नाही

अनिरुद्ध प
गुरुवार, 08/22/2013 - 16:10 नवीन
यात मज्जा मज्जा smiley असे वाटण्यासारखे काय आहे,जरा मलातरी कळुदेकी मी काय मोठा विनोद केला आहे म्हणजे मला सुद्धा मज्जा मज्जा करता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

५-६ वर्षांपुर्वी तिथले वाढपी

यसवायजी
गुरुवार, 08/22/2013 - 14:43 नवीन
५-६ वर्षांपुर्वी तिथले वाढपी खाकी चड्ड्या घालायचे. आता प्रमोशन झालंय, पँट घालतात. पहिल्यांदा गेलो होतो तेंव्हा इतर खानावळीतील सवई प्रमाणे 'राईस' मागीतला.. त्या चड्डीवाल्या माणसाने इथे राईस मिळत नाही असं सांगीतलं, अन निघुन गेला. थोड्या वेळाने त्याने मला 'भात' वाढला.. :D अजुनही पाटी-पेन्सिल वापरायची पद्द्त आहे. हात धुवायच्या बेसिनच्या नळातुन सदाशीव पेठेला शोभेल अशी बचत करणारी बारिक धार येते. बाकी जेवण १ लंबर.. लै बेस..
  • Log in or register to post comments

अगदी अगदी...

गवि
गुरुवार, 08/22/2013 - 14:50 नवीन
अगदी अगदी... नळाची बारीक धार हे अत्यंत खास आणि अचूक निरीक्षण. सदाशिव पेठ वगैरे वादात पडायचं नाहीये पण बादशाहीतल्या बेसिनच्या नळाची ही सूक्ष्म धार हाही तिथल्या वैशिष्ट्याचा अव्वल नमुना आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

>>सदाशिव पेठ वगैरे वादात

यसवायजी
गुरुवार, 08/22/2013 - 15:04 नवीन
>>सदाशिव पेठ वगैरे वादात पडायचं नाहीय>>>. स्वारी हां गवी भाऊ.. आमचं तोंड म्हणजे बघा x x x.. -- अजुन एक न आवडलेली गोष्ट- एका (आकाराने) मोठ्या मित्राला घेउन गेलो होतो. त्याच्या शेजारी बसलेल्या मुलाने सीट बदलुन घेतली, म्हणाला अडचण होतीय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

??

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 08/22/2013 - 16:59 नवीन
एका (आकाराने) मोठ्या मित्राला घेउन गेलो होतो. त्याच्या शेजारी बसलेल्या मुलाने सीट बदलुन घेतली, म्हणाला अडचण होतीय..
हा किस्सा खास गविंना सांगण्यामागील प्रयोजन काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

मी गवींना कधी भेटलो नाही.

यसवायजी
गुरुवार, 08/22/2013 - 17:13 नवीन
मी गवींना कधी भेटलो नाही. काही खास प्रयोजन नव्हतं. पण तसं काही असेल तर पुन्ह्यांदा माफी करा गवी भाऊ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

व्वा ! फर्मास लेख

विटेकर
गुरुवार, 08/22/2013 - 14:48 नवीन
आवडेश ! या खुमास्दार लेखाबद्दल श्री. अतृप्त आत्मा यांना त्यांचा आत्मा तृप्त करण्यासाठी बादशाही मध्ये एका थाळीचे जाहीर आमंत्रण ! सोबत येणार्याने आप-आपले कूपन घ्यावे .
  • Log in or register to post comments

@या खुमास्दार लेखाबद्दल श्री.

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 08/22/2013 - 16:03 नवीन
@या खुमास्दार लेखाबद्दल श्री. अतृप्त आत्मा यांना त्यांचा आत्मा तृप्त करण्यासाठी बादशाही मध्ये एका थाळीचे जाहीर आमंत्रण ! >>> आमंत्रण स्विकारण्यात आले आहे! :) @सोबत येणार्याने आप-आपले कूपन घ्यावे. >>> =)) खादाड कंपूच्या सणमाणणीय सदश्यांण्णो...आपापले ८० रुपये घेऊन या रे! =)) चला... एक कट्टा बादशाहीला ! नावनोंदणी करा. कट्टा दिनांक-श्रावण संपून उतार्‍याचा एक दिवस गेल्यानंतरचा..! Image removed. - ७ सप्टेंबर...! (आणी शनिवार असल्यामुळे सगळ्यांना जमेलसे वाटते.) अभ्यागत--- १) विटेकर काका आणी मी...! ;) २) ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

अभ्यागत---

पक पक पक
गुरुवार, 08/22/2013 - 18:22 नवीन
अभ्यागत--- १) विटेकर काका आणी मी...! २) धन्या अन वल्लिचे कुपन घेउन त्यांच्यासकट मि देखिल.... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

अभ्यागत म्हणजे माझ्यासारखे

अभ्या..
गुरुवार, 08/22/2013 - 21:02 नवीन
अभ्यागत म्हणजे माझ्यासारखे काय ?;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

आयला अगदी अस्स्स्स्साच पीजे

बॅटमॅन
गुरुवार, 08/22/2013 - 21:56 नवीन
आयला अगदी अस्स्स्स्साच पीजे सुचला होता बघ बे मला ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

ठरलं तर !

विटेकर
Fri, 08/23/2013 - 11:28 नवीन
आम्हाला वेळ मंजूर आहे.. आता वल्लीशेट येत आहेत तर मस्त कट्टा करु या का ? "पर्वती सफर"याला जोडून घेता येईल का ? नै , जेवण अन लिमिटेड आहे . . जरा तयारीनेच जाऊ या की ! कस्से ? ( डोळा बारिक केल्याची स्मायली ...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

@आता वल्लीशेट येत आहेत तर

अत्रुप्त आत्मा
Fri, 08/23/2013 - 19:55 नवीन
@आता वल्लीशेट येत आहेत तर मस्त कट्टा करु या का ? >>> तेच ना...! मी सिरियसली'च म्हणत होतो... पण कुणीच नावनोंदणी करैत नाहीत. :-/ सगळे जण दु...दु... आहेत. :-/ तिथे आमच्या मधुची गाडीपण जवळच आहे,सकाळी जमू..तिथे नाष्टा हाणू. Image removed. नंतर उंडारू, Image removed. आणी मग बादशाही...........! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

सप्टेंबर....

प्रभाकर पेठकर
Fri, 08/23/2013 - 23:06 नवीन
ए! सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ठेवा न! किंवा निदान तेंव्हा पुन्हा दुसरा कट्टा ठरवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

बाकी काही म्हणा, उंडारण्याची

बॅटमॅन
Sat, 08/24/2013 - 00:56 नवीन
बाकी काही म्हणा, उंडारण्याची स्मायली लैच जबरी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

बादशाही मेस मधे अगदी कधीतरी

विजुभाऊ
गुरुवार, 08/22/2013 - 15:28 नवीन
बादशाही मेस मधे अगदी कधीतरी दहा बारा वर्षांपूर्वी जेवलोहोतो. इकडे साउथ अफ्रीकेत येण्यापूर्वी पुन्हा एकदा बादशाहीत जेवायला गेलो. तिथले आजोबा ( कै तवकर ) हे कालवश झालेत मात्र बादशाही मेस ची शिस्त आणि अन्नाची चव अबाधीत आहेत. "क्वालीटी इज अल्टिमेट कस्टमर डिलाईट" हे वाक्य इथूनच घेतल्यासारखे वाटते. कस्टमर सॅटिस्फिकेशन च्या भलत्या कल्पनाना इथे थारा नाही. मात्र अन्नाची चव / क्वालीटी हे कित्येक वर्षात त्यानी राखलेली आहे. पोटभर आणि घरगुती अन्न जेवायच्या ज्या अपेक्षेने आपण बादशाहीत जातो त्या अपेक्षा तेथे नक्की पूर्ण होतात.
  • Log in or register to post comments

पुणे यादी.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 08/22/2013 - 17:03 नवीन
रामदरा, पुलं उद्यान आणि आता बादशाही थाळी....... भारतभेटीत पुण्यातील अतिआवश्यक गोष्टींची यादी वाढते आहे.
  • Log in or register to post comments

आणि गोवन थाळी विसरु नका बरं

सौंदाळा
गुरुवार, 08/22/2013 - 17:10 नवीन
आणि गोवन थाळी विसरु नका बरं का पेठकरकाका :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

जरूर.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 08/22/2013 - 17:18 नवीन
हा: हा: हा: नाही विसरणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

मी गेलो तेंव्हा

चौकटराजा
गुरुवार, 08/22/2013 - 17:15 नवीन
Image removed. बुवांचा धागा वाचून मी जेवायला गेलो. मला वरील पाटी वाचावयास मिळाली . अर्थात मी ही चोरूनच फोटो घेतला. आता बुवांना आत घातले तर पंचाईत.गणपती जवळ आलेत. त्यात चातुर्मासाच सीझन सुरू. अरे बापरे मी चोरूनच फोटो घेतलाय ! बुवा मला बी घेउनशान जातात काय?
  • Log in or register to post comments

ऑ.. ? हे नवीनच दिसतंय.

गवि
गुरुवार, 08/22/2013 - 17:29 नवीन
ऑ.. ? हे नवीनच दिसतंय. पाट्यांचे फोटो काढण्याबद्दल कायदेशीर कारवाई? अरेरे.. आणि अपमान करण्याबद्दल यांना काय आकर्षण आहे कोण जाणे. कित्येक पाट्यांवर अपमानाची भीती घालतात. बुवा. ते पहा बुवा.. कायदेशीर मनाई असेल तर पाट्या काढाव्या लागतील. तिथून नव्हे, इथून..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

फोटोशॉप

आदिजोशी
गुरुवार, 08/22/2013 - 19:29 नवीन
हे खरी पाटी नव्हे. खर्‍या पाटीवर फोटोशॉप वापरून बनवण्यात आलेली पाटी आहे. ज्यांचे हे रोजचे काम आहे त्यांना एका फटक्यात कळेल. नीट बघितल्यास फोटोशॉपींगच्या काही ठळक चुका लक्षात येतील. अनअनुभवी माणसाने केलेले अत्यंत खराब रिटचींग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

आदी हुश्शार झाला ब्वा.

अभ्या..
गुरुवार, 08/22/2013 - 20:58 नवीन
आदी हुश्शार झाला ब्वा. आता पीएम या पाटीचे:) मालमत्ता ला एक काना एक्स्ट्रा झालाय. पेंटर लोकांची अलैंमेंट शक्यतो अशी नसते. असा फॉण्ट पेंटर वापरत नाहीत. ब्याक्ग्राउण्डाला कलर असा फासत नाहीत. अक्षरांचे पर्स्स्पेक्तिव्ह गंडले आहे. सबब हे फोटोशॉप चे कलाकारी काम बादशाहीला शोभत नाही. धन्यवाद:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

अभ्या...

चौकटराजा
गुरुवार, 08/22/2013 - 21:20 नवीन
लेका, धागा बुवाचा आहे ! तिथे पंच महत्वाचा ! तो काय चुकला आहे का तो बोल ! हे रसग्रहण काय चाल्ल्या आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

पंच असले की पंच नामा होणारच.

अभ्या..
गुरुवार, 08/22/2013 - 21:28 नवीन
पंच असले की पंच नामा होणारच. बुवाना खाण्यातले कळते आमाला फोटोशॉप मधले कळते. तरीबी आता तुमी म्हन्ताव म्हनुन, गुरजी लिव्हा हो तुम्ही. कीपीटप :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

एकदम बरोबर..

किसन शिंदे
गुरुवार, 08/22/2013 - 20:59 नवीन
फोटोशॉप केल्याचं सरळ सरळ दिसतंय. या अ‍ॅड्याची नजर लय बारीक ब्वा! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी

लेख उत्तम आहे

सुबोध खरे
गुरुवार, 08/22/2013 - 18:17 नवीन
लेख उत्तम आहे पण बादशाहीचे जेवण तेवढे भावले नाही. पुण्यात प्रथम १९८३ साली गेलो. काका स प ला होते त्यामुळे वडिलांच्या चकरा तेथे होत. वडिलांच्या तोंडून बादशाहीचे नाव ऐकले होते म्हणून एकदा गेलो. पुणेरी भाषेत सडेतोड (मुंबईच्या भाषेत उर्मट) वागणे होते. जेवण "भरपूर" होते पण चव एवढी आवडली नाही. साधारण कोणत्याही खानावळीत असावी तशीच होती. आम्ही खाण्यात जेमतेमच असल्यामुळे भरपूर हा दर्जाच्या निकष नाही. कदाचित मूळ पुण्याचा नसल्याने एखाद्या गोष्टीचा जसा जाज्वल्य अभिमान असतो तसा नव्हता किंवा जास्त अपेक्षेने गेलो म्हणूनही असेल.कदाचित मुंबईच्या गुजराती/ मारवाडी थाळी देणार्यांचे अगत्य तेथे नव्हते म्हणूनही असेल. वर्णन यथातथ्य आहे यात वाद नाही आणि तेथील लोकांचे वागणे परत डोळ्यासमोर उभे राहिले.
  • Log in or register to post comments

बाकी खाद्य भ्रमंती वरील

पक पक पक
गुरुवार, 08/22/2013 - 18:25 नवीन
बाकी खाद्य भ्रमंती वरील लेखांची बुवांची बादशाहत या लेखात देखील त्यांनी सिद्ध केली आहे.. :)
  • Log in or register to post comments

बुवा.. लेख नेहमीप्रमाणे भारी!

मोदक
गुरुवार, 08/22/2013 - 18:41 नवीन
बुवा.. लेख नेहमीप्रमाणे भारी!!! फुलस्केप कागदावरती सूचनांचा भडीमार असणारी; हस्ताक्षरात लिहिलेली, प्लॅस्टीक पेपर स्टेपल केलेली पाटी आता नाहिये का..? "सुजाण आणि सुसंकृत नागरिक जेवताना मोबाईल वर बोलत नाहीत" "कृपया आपल्या आवडीची भाजी आहे का याची चौकशी करून टोकन घ्यावे" (बादशाही पेक्षा "जनसेवा" ची थाळी आवडणारा) मोदक
  • Log in or register to post comments

बुवा लेख फर्मासच!

किसन शिंदे
गुरुवार, 08/22/2013 - 21:04 नवीन
बुवा लेख फर्मासच! एक काम का नाही करत, पुण्यातल्या खाण्याच्या ठिकाणांबद्दल एक लेखमलिकाच सुरू करा ना. तुमची लिहण्याची शैली एकदम खुसखूशीत आहे. त्या मेल्या धन्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा, त्याला सवयच आहे कुचकट बोलायची. ;)
  • Log in or register to post comments

खिक्क.

प्रचेतस
गुरुवार, 08/22/2013 - 21:08 नवीन
खिक्क. देवगिरी, धन्या आणि संतापलेले किसनदेव. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

ऊत्तम!!

धमाल मुलगा
गुरुवार, 08/22/2013 - 21:23 नवीन
बादशाहीला जाण्याचा योग कधी आलाच नाही. म्हणजे, तशी फार हौसही कधी वाटली नाही, अन 'उपाशी मरेन पण फालतु कारणासाठी अपमान करुन घेणार नाही!' असा बाणा ही जास्त महत्वाची कारणं असावीत. बादशाहीपेक्षा आमची उपस्थिती (कधीमधी) पुना बोर्डिंगला असायची. बरं, दोस्तांच्या आग्रहाला बळी पडून जावं म्हणावं, तर आमच्यासारख्या तामसी माणसाचं मित्रमंडळ आणि काय वेगळं असणार? बादशाहीसदृश ठिकाणी जेवण्यापेक्षा आम्ही पडीक असायचो ते 'आवारे खानावळीत' :) आवारेमध्ये मेस लावणार्‍या काही होपलेस केसेसपैकी आम्हीही एक. सकाळी मटण, रात्री चिकन असा दणकून बेत....रोजचा! शेवटी डॉक्टरनं शिव्या घातल्यावर आवारेच्या वार्‍या थांबल्या. तर ते असोच. बादशाहीचं बहुत कौतुक ऐकलं आहे, पुढेही ऐकत राहूच. पण प्रामाणिकपणे सांगायचं तर त्या ठिकाणचं आकर्षण असं कधी वाटलंच नाही.
  • Log in or register to post comments

गुरूवारची ..

चौकटराजा
गुरुवार, 08/22/2013 - 21:27 नवीन
गुरूवारची पुना बोरर्डिंगाची मुगाच्या डाळीची खिचडी व वाटीतले दही ! वा ! वा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

:)

धमाल मुलगा
गुरुवार, 08/22/2013 - 21:40 नवीन
डाळिंब्यांची उसळ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

मस्त लेख!

पैसा
Fri, 08/23/2013 - 00:07 नवीन
आणि धन्याने केलेले रसग्रहण सुद्धा भारी आहे! का कोण जाणे आज सकाळीच धन्याने केलेले एक रसग्रहण आठवले होते! =))
  • Log in or register to post comments

नावातच सर्व आहे

शशिकांत ओक
Fri, 08/23/2013 - 00:17 नवीन
'नाम में क्या लिखा है' म्हणतात पण बाद शाही या नामामधे 'शाही' म्हणजे रॉयल असे विशेषण आहे ते पुर्णपणे 'बाद' म्हणजे खारिज़ आहे असे सुचवून त्यातील पितळी तांब्या-भांडी व ठोकळेबाज बाकडी व खुर्च्या 'टोकनधारी इसमांना 'चला आटपा लवकर' असे नकळत सुचवत, चोरटेपणाने फोटो काढायची बाजीगरी करणाऱ्या अतृप्तांना कायदेशीर धमकावणी इमाने इतबारे पार पाडत आहेत.
  • Log in or register to post comments

@चोरटेपणाने फोटो काढायची

अत्रुप्त आत्मा
Fri, 08/23/2013 - 00:20 नवीन
@चोरटेपणाने फोटो काढायची बाजीगरी करणाऱ्या अतृप्तांना कायदेशीर धमकावणी इमाने इतबारे पार पाडत आहेत.>>> =)) अत्यंत खोचक... आपलं ते हे... रोचक प्रतिसाद! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक

क्या बात..

उपास
Fri, 08/23/2013 - 00:44 नवीन
बादशाहीचे वर्णन, फोटॉ आणि गवि तसेच इतरांचे प्रतिसाद पाहून एकदम नॉस्टेल्जिक वाटलो. एक काळ असा होता की आम्ही सदाशिव पेठेत रुमवर राहाणारे मित्र चार ठिकाणी चार जण जाऊन बघत असू कुठे काय आहे ते आणि मग बरेचदा बादशाही मध्येच जाणं होत असे. मी जायचो तेव्हा गविंनी लिहिलय तसं आजोबा असायचे गल्ल्यावर.. (माझ्याशी मात्र एक दोनदा चक्क गप्पा झाल्याचं आठवतय, मी मुंबईचा म्हटल्यावर!) वामनराव पांढरा शर्ट, पाढरा लेंगा असे उभे असायचे दारात, हातात पाटी-पेन्सिल. नेहमीचं असल्याने लांबून फक्त हाताच्या बोटाने सांगायचं दोन्,तीन्,चार काय ते.. निवांत पेपर वाचत किंवा कधी नुसती धावपळ बघत बसायचं. नंबर आला की वामनराव ओरडून सांगणार, कधी मूड मध्ये असले की जवळ येऊन आत घेऊन जाणार.. भात, तूप, आमटी ह्या गोष्टींबरोबर आवडणारी गोष्ट म्हणजे तिथलं ताक! गेल्यावर्षी अगदी आवर्जून गेलो बादशाहीत, एक फरक म्हणजे आता टेबलावर चकल्या वगैरेंची पाकीटं विकायला आली होती. काळी टोपी घालणारे अबोल आजोबा फोटोत गेले होते आणि वामनरावसुद्धा :( नकळतच नमस्कार केला त्यांना तसाच.. कुठे कुणाचे त्रुणानुबंध असतात! माणसांना जोडण्याच अजब तंत्र बादशाही मधल्या जेवणात, साधेपणात आणि आपलेपणात तेव्हा होतंच होतं.. आत्ताही असेलच! अवांतर : सात्विक थाळी कधी मधी जायचो पण 'व्हॅल्यू फॉर मनी' म्हणजे बादशाहीचं. पेरुगेटचं पूना बोर्डिंग हाऊस फक्त रविवारी स्काळी. म्हणजे कार्यक्रम ठरलेला.. सकाळी चाराला उठावं.. टिळक रोडवर अंबिका कडे अमृततुल्य चहा मारावा.. पलिकडच्या गल्लित प्राजक्ताचं एक झाडं होतं, त्याचा सडा ओंजळीत घेत वास भरून घ्यावा आणि बाईक वरुन थेट सिंहगडाचा पायथा.. वरती चढताना छान सूर्योदय बघावा, लिंबू सरबत घेऊन रमत गमत साडे सातापर्यंत खाली.. येताना वाडेश्वर.. थालिपीठ खाऊन थोडी कॉफी. रुम वर जाऊन आंघोळ, पेपर वाचन आणि मग बाराच्या आसपास पूना बोर्डींग हाऊस. तिथे पूर्वी एक आजोबा असायचे.. बादशाहीच्या आजोबांच्या मानाने तरूण आणि स्वभावाने विरुद्ध.. कायम बोलत असायचे.. असो तर मसाले भाग, श्रिखंड आणि अळूची भाजी.. पोट भरलं तरी जिभ तृप्त होत नसे.. खाली येऊन गल्लीत पान खावं आणि तीन-चार तास रुम वर झोकून द्यावं.. संध्याकाळी उद्य विहारच्या समोर टपरी वर चहा.. सुखाचा रविवार असायचा तो असा! ह्या लेखाच्या निमित्ताने सगळं आठवलं!
  • Log in or register to post comments

वा वा!

धमाल मुलगा
Fri, 08/23/2013 - 02:33 नवीन
क्या बात है...क्या बात है! नुसतं वाचूनच दिल खुश झाला यार. जियो! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपास

छान हो बुवा! लेख आवडला.

रेवती
Fri, 08/23/2013 - 01:29 नवीन
छान हो बुवा! लेख आवडला. प्रतिक्रिया वाचल्या नाहीत, नंतर सवडीन नक्की वाचणार. तिथे कधी जेवले नाहीये पण तुम्ही म्हणताय तसच काहीसं ऐकून आहे.
  • Log in or register to post comments

बादशाही बद्दल अमाप कौतुक

मृत्युन्जय
Fri, 08/23/2013 - 11:50 नवीन
बादशाही बद्दल अमाप कौतुक ऐकुन आहे. गेल्या १६ -१७ वर्षात एकदाही तिकडे खाणे झाले नाही. नाही म्हणता एकदा गेलो होतो. त्यादिवशीच्या जेवणात भेंडीची पातळ भाजी होती. ते ऐकुन जे निघालो ते थेट पून गेस्ट हाउस ला जाउनच थांबलो. सुग्रास जेवण हो तिथले पण. आता एवढे कौतुक बघुन एकदा जाइनच म्हणतो.
  • Log in or register to post comments

बाकी ही ठिकाणे पारंपारिक

प्रचेतस
Fri, 08/23/2013 - 12:02 नवीन
बाकी ही ठिकाणे पारंपारिक असल्याने नॉस्टेल्जिक म्हणूनच जास्त प्रसिद्ध झालीत असे मला वाटते. जसे अप्पाची खिचडी (खडूस अप्पा अगदी सकाळी ९ वाजता गेलं तरी संपली आहे असेच म्हणतो त्यामुळे खायचा योग आला नाही कधी. श्री मिसळ (ही तर अगदी अलीकडेच खाल्ली, जितकी तारीफ ऐकली होती त्यामानाने फुसकीच निघाली), महानाझचे समोसे (हे आता ताबूत स्ट्रीटला स्थलांतरीत झालेय. अगदी मूळची चव नसली तरी अजूनही बर्‍यापैकी आब राखून आहेत.) वाडीया कॉलेजमागची अण्णाची टपरी ( ही अजूनही लै भारीच होती. गरमागरम वाफाळते सांबार, वडा, चटणी तर जबरदस्तच. अगदी हल्लीच रस्तारूंदीकरणात बंद पडली असे वाश्याकडून समजते.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

महानाझ

निमिष ध.
Fri, 08/30/2013 - 02:17 नवीन
मगच्या वेळेस महानाझ बन्द झाले म्हणून हळहळलो होतो. पण समोसे अजुन मिळतात हे ऐकुन बरे वाटले. अता पुढच्या खेपेला सगळीकडे जाणे आलेच. कोलेजच्या दिवसात बादशाही आणि बाकी सगळ्या ठिकाणी वार लगल्यासारखे जाणे व्हायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

श्री मिसळ (ही तर अगदी अलीकडेच

मालोजीराव
Fri, 08/30/2013 - 17:24 नवीन
श्री मिसळ (ही तर अगदी अलीकडेच खाल्ली, जितकी तारीफ ऐकली होती त्यामानाने फुसकीच निघाली)
खरंच फेल आहे, हल्ली घाटापलीकडे जास्त चांगल्या मिसळी देऊ लागलेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मृत्युन्जय भेंडीची पातळ भाजी

सौंदाळा
Fri, 08/23/2013 - 17:11 नवीन
मृत्युन्जय भेंडीची पातळ भाजी आवडत नाही तुम्हाला? असो आवड आपली आपली. :) मला मात्र भेंडीची चिंच, गुळ, ओले खोबरं घालुन केलेली पातळ भाजी खुप आवडते. बादशाहीत कशी असते ते माहीत नाही पण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

बादशाही- शाही आहे एकदम.

सार्थबोध
Fri, 08/23/2013 - 12:09 नवीन
परगावच्या लोकांना घरचे सुखाचे घास खाल्य्याचा आनंद इथे मिळतो. बादशाही शाही आहे एकदम. छान लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा