नमस्कार,
मराठी वाकप्रचार आणि म्हणींमध्ये बर्याच ठिकाणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्राणी वाचक उल्लेख येतात आणि दुसर्र्या बाजुची व्यक्ती आमचा प्राणी वाचक उल्लेख केला गेला आमच्या भावना दुखावल्या गेल्या असे म्हणू शकते.असे काही वेळा इतर रूपकांमुळेही होऊ शकते.दुसर्र्या बाजूस मराठी आंतरजालावरील व्यवस्थापनांना लिहिणार्या व्यक्तिच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यही सांभाळावयाचे असते.
१)"वा अबकडराव वा !!! सौ चुहे खाकर बिल्ली हज चाली ...? हळक्षज्ञराव ह्यांना उपदेश सांगण्या आगोदर आपण आत्म परीक्षण केले का ? " - हि एका तिसर्या व्यक्तीची प्रतिक्रीया ज्यावरून वाद झाला
: या उदाहरणात लेखक म्हणू इच्छितो की, तुम्हीही तेच केलत मग दुसर्र्या व्यक्तीस उपदेश का ? या वादविवादात अबकडरावांनी प्राणी वाचक उल्लेख झाला आणि मी दुखावले आहे आणि तिसर्र्या व्यक्तीचे खाते बॅनकरा अशी मागणी केली.अबकडराव माझ्या ओळखीचे गृहस्थ असून सुद्धा तो दबाव मी मान्य केला नाही.यात लिहिणार्याचा मुख्य उद्देश प्राणी वाचक नसावा त्या अर्थी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बुज राखली जावयास हवी तर मी ते खाते इतर व्यवस्थापकांचाही सल्ला घेतला आणि बॅन केले नाही. पण प्राणी वाचक उल्लेख पुढे चालून टाळावेत असा नवा संकेत बनवला
अ) उपरोक्त वाक्प्रचारातील प्राणी वाचक उल्लेख असांसदीय समजावा का ?
ब) मला माझ्या व्यवस्थापकीय निर्णयाचे तट्स्थ मुल्यांकन करून हवे आहे.
२) नंतर काही महिन्यांनंतर उपरोक्त वाद विवादातील हळक्षज्ञ रावांशी वेगळ्या कारणाने माझा विवाद झाला विवादात मी खालील वाक्य एके ठिकाणी वापरले
"::सशाची गोष्ट आहे झाडाचे पान पडले कि आभाळ कोसळले म्हणावयाची आम्ही ही आपल्या या लांडगा आला मनोवृत्ती कडे दुर्ळक्ष करतो."
:यावर वरील वाक्यात हळक्षज्ञरावांनी मी त्यांना लांडगा असा उल्लेख केला असा आक्षेप घेतला.मी त्याचे स्पष्टीकरण "पहिल्या सशाच्या गोष्टीचे रूपक पुरेसे स्पष्ट आहेच, संकट एकदम लहान असतानाही त्याला मोठे म्हणावयाचे असा त्याचा अर्थ होतो.दुसऱ्या रूपकात संकट न येताच संकट आले म्हणावयाचे असा अर्थ होतो. दुसऱ्या रूपकात 'संकट आले', म्हणणारे माझे मित्रवर्य आहेत आणि संकट किंवा शब्दाचा अर्थ ताणावयाचाच झाला तर माझी कृती किंवा मी स्वत: 'लांडगा' ठरतो.मी मला स्वत:ला लांडगा म्हटले असेल तर माझ्या मित्रवर्यांना तत्वत: आक्षेप असण्याचे कारण मला समजलेले नाही." असे दिले ( हा आक्षेप घेण्यापुर्वीही हळक्षज्ञरावांना मी संवाद साधून गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न वगैरे केले होते पण तो भाग वेगळा आहे.)
:अ) उपरोक्त रुपकांचे उपयोग असांसदीय स्वरूपाचे आहेत का ?
:ब) मी संबंधीत सदस्याची समजूत कशी काढावी ? कि मी स्वतः यात खरोखर चुकलो आहे जे मला अद्याप समजे नाही ?
३) मराठी विकिवर सदस्यांच्या आपापसातील विवादांनंतर प्राण्यांना लावली जाणारी विशेषणे चर्चेत वापरली गेल्यास काही सदस्य गट दुखवाले जाऊ शकतात हे लक्षात घेऊन "पाळीव प्राण्यांना लावली जाणारी विशेषणे सदस्यांबद्दल वापरली जाऊ नयेत" हा संकेत तत्वतः स्विकारला आणि सरळ प्राणि विषयक उल्लेखांवर बंधने घातली आहेतच पण मराठीतील नेमके कोणते वाक्प्रचार आणि म्हणी अप्रत्यक्षरीत्या प्राणीवाचक उल्लेख ठरून असांसदीय ठरतात आणि नेमके कोणते वाक्प्रचार आणि म्हणींना कठोर टिका करता यावी म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण प्राप्त व्हावयास हवे.खाली मला माहीत असलेल्या म्हणीची यादी देत आहे
:यादी :"मला कुठे गं नेशी"," गेले तीर्था"," अडला हरी पाय धरी","अती शहाणा ","म्हणे माझी धार काढा"," एका कानावर पगडी","ऋषीपंचमीचा","बसायला आणि फांदी मोडायला","द्राक्षे आंबट","शापाने गाय मरत नाही"," दांत शोधण्यासारखे","काकडीला राजी","...भारी उड्या मारी","गुळाची चव काय?"," लाथांचा सुकाळ","वाचली गीता", "कालचा गोंधळ बरा होता",गोगल गाय पोटात पाय","व्याह्यांनी धाडलं","सन्याश्याला फाशी","....उलट्या बोंबा"," मनात चांदणे"," लढाई आणि नुसती बडाई"," दुध देईल काय?","जावयाचं पोर","नाही लंगोटी आणि मला म्हणा दिपुटी"," तुला न मला घाल .."," दाम करी काम"," न डाग पखालीला","अन कोल्हं उसात"," धरलं तर चावतंय","सोडलं तर पळतंय"," गेला आणि हिवाने मेला","उठुन बघायचं"," नको तिथं बोटं घालू नये"," घातलेच तर वास घेत बसू नये",""शेण खायला","घातला पाला गार लागला अजून घाला"," नेशीण तर पैठणी"," पाण्यात ..... वर मोल","पिंडीवर बसला म्हणून ... गय","गेला अन् झोपा केला", "फुटले झाड तो म्हणतो मला सावली झाली"," हात पाय पसरी","भरवशाच्या ........ टोणगा"," भीक नको पण .... आवर","वाळले कि पडायचेच","मला नं तुला","माझीच लाल","हातात कोलीथ","दाढी हातभर","सटवीला नव्हता नवरा","रिकामा सुतार","आमंत्रण जेवल्याबिगर खोटे","लोका सांगे ब्रम्हज्ञान","वराती मागून","बिऱ्हाड पाठीवर","धाव कुंपणापर्यंत","पाठ मऊ","शेपूट वाकडे|राहिलं"
उपरोक्त यादीत शक्य तिथे म्हणीचा एक भाग टाळला आहे.पूर्ण म्हणी मराठी विकिक्वोटच्या या धाग्यावर उपलब्ध आहेत.
अ)कोणते वाक्प्रचार आणि म्हणी अप्रत्यक्षरीत्या प्राणीवाचक उल्लेख ठरून असांसदीय ठरतात
ब) नेमके कोणते वाक्प्रचार आणि म्हणींना कठोर टिका करता यावी म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण प्राप्त व्हावयास हवे.
यातील ज्या म्हणींचे उपयोग असांसादीय ठरवले जातील त्यांच्या उपयोगावर बंदी घालणे सोपे जाइल.
कणखर मराठी मित्राचा प्रतिसाद मराठमोळे पणाची चुणूक दाखवतानाच आंतरजालावरील संसदीय सभ्यतेच्या परिघाच्या अपेक्षा कशा सांभाळायच्या हा मराठी आंतरजालावरील व्यवस्थापनांपुढचा हा प्रश्नांच्या अनुषंगाने "कठोर टीकात्मक लेखन", सभ्यतेच्या (संसदीय) मर्यादेत पुर्णतः राहून आणि व्यक्तिगत रोख टाळून कसे करावे ? अशी एक चर्चा मिपावर सहाएक महिन्यांपुर्वी केली आहे आणि आपणा सर्व मिपाकरांचा चर्चेस चांगला मनःपुर्वक प्रतिसाद मिळाला होता त्या बद्दल धन्यवाद.
आंतरजालावरील संसदीय सभ्यतेच्या परिघाच्या अपेक्षा कशा सांभाळाव्यात ह्या मराठी आंतरजालावरील व्यवस्थापनांपुढच्या प्रश्नांच्या मालिकेतील अजून काही वेगळे प्रश्न मी आपणा सर्वांचे मत जाणून घेण्या करता सादर केले आहेत.
आपण मराठी माणसं वैचारिक, आणि बुद्धीवादी वगैरे चर्चा करण्यात एकदम पटाईत असतो. सबब, निरनिराळ्या विषयांवरील चर्चाप्रस्तावांचे इथे स्वागत आहे. येथे होणार्या चर्चामंथनातून आणि विचारांच्या देवाणघेवाणीतून एकमेकाना मौलिक माहिती मिळावी व वैचारिक धन मिळावे अशी इच्छा आहे!
चर्चेत सहभागाबद्दल आणि विषयांतर टाळण्यात सहकार्याबद्दल सदस्य आणि मॉडरेटर मिपा व्यवस्थापन सर्वांचे आभार.शुद्धलेखन चिकित्साकरण्यास वेळ देऊ शकलो नाही या बद्दल क्षमस्व.
प्रतिक्रिया
माझी काही उत्तरे
अभ्यासपूर्ण मनमोकळ्या प्रतिसाद करता धन्यवाद
संवेदनशीलता
मनमोकळ्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद
तोलून मापून शब्दप्रयोग.
अभ्यासपूर्ण मनममोकळ्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद
स्वतःची योग्य बाजू मांडताना
प्रतिसाद आवडला
हा लेख गम्मत म्हणून आहे कि
नियम बनवणे नव्हे,नियमा बनवण्याकरता लागणार्या सामुग्रीचा अभ्यास
प्रतिसाद दुरूस्ती, प्रतिसादाचा भाग उडाला
@हा लेख गम्मत म्हणून आहे कि
काही म्हणी
*अवांतर : 'सौ चूहे खा के..'
म्हणी आणि वाक्प्रचार हे
सहमत
हायला !
आचार ओवळा झाला की विचार अधिक सोवळे होतातछातीत ठोका चुकला बरं का एकदा ! " सत्य" असे भिडते की..........आचार ओवळा....
वाह......आचार ओवळा झाला की
...आचार ओवळा झाला की विचार अधिक सोवळे होतात हा अनुभव तर नेहमीचाच आहे...@आचार ओवळा झाला की विचार अधिक
माहिती आणि सहकार्यपूर्ण प्रतिसादाकरता धन्यवाद
हो.. एक सांगायचं राहिलं. ह्या
नक्की मिळवून वाचेन + एक आठवण
मला वाटते...
अर्थातच, अट्टाहास ठीक नव्हेच.
अन्नेसेसरिली
अर्थातच. असे नमुने दोन्हीकडे
मनमोकळ्या प्रतिसादाकरीता धन्यवाद
+१
ती भाषा आज प्रचारात आणावी
माझ्या मते प्रश्न म्हणी आणि
काही वेळा अगदी 'सांसदीय'
बरोबर आहे
ह्म्म....
सार्वजनिक ठिकाणी सभ्यतेचे जे संकेत आहेत ते किमान पाळावेतहे आणि एव्ढेच खरे , बाकी फार विचार करु नये नाहीतर ".... खतरें में है " म्हणून आपल्या देशात फाजील लाड आणि लांगूलचालन चालू आहे तेच होईल . मूठ्भर लोकांसाठी सारे जण वेठीस धरण्यात काय हशील ? कोणालाही दिवाणखान्यात मोठ्ठ्यांदा वाचताना संकोच होऊ नये इतपत तत्व प्रत्येकाने जबाबदारीने पाळावे. अन काय सांसदीय धरून बसलात ? उप मुख्यमंत्रीमहोदयांचे उद्गार आठवा .. त्यापूर्वी एक मुख्यमंत्री म्हणाले . या तीन क्ष़़़़ बाया आहेत !! आता बोला ? तेव्हा तर्री वाढ्वा मालक .. मजा येईल , जे आपल्याबरोबर येतील ते आपले , जे ठसका लागतो म्हणतील , ते आपसूकच थांबतील. मिपावर न येण्याचा प्रत्येकाचा अधिकार अबाधित आहे ! काय हे शिंचे .. हल्ली चांगले धागेच निघत नाहीत !साधारण १ -१/२
मला वाटते, मनातिल तगमग व्यक्त