Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by saishwari on Sat, 05/25/2013 - 13:17
नमस्कार ही माझी मिपावर नवीन सुरुवात अहे. चू. भू. सांभाळून घ्यावी. काही दिवसांपूर्वीचा "आयुर्वेदाला वैज्ञानिक ज्ञानशाखा मानावे का?" या विषयाचा धागा आणि प्रतिक्रिया पहिल्या. मिपावर या विषयाचे बरेच जाणकार आहेत हे पाहून आनंद झाला. म्हणूनच या ज्ञानाचा फायदा मला आणि सर्वाना व्हावा म्हणून हा काकू. माझ्या घरी सर्वांना (मी,बहिण, भाऊ,आई ) संप्रेरक असंतुलनाचा (hormonal imbalance)त्रास आहे असे आढळून आले आहे. याची लक्षणे आम्हा भावंडांमध्ये खूपच समान आहेत जसे कि चेहऱ्यावर पुरळ येणे,केस गळणे,केस अकाली पांढरे होणे,जाडी वाढणे,वारंवार तोंड येणे, चिडचिड होणे, कोणत्याही कामात उत्साह नसणे. सर्वाना या सगळ्याचा कमी जास्त त्रास होतो. विशेषतः बहिण (वय २६ ) आणि भाऊ (वय २८) यांच्या चेहर्य्वर वयात आल्यापासून आतापर्यंत पुरळ येतात तेही खूप जास्त प्रमाणात. यासाठी त्वचा तज्ञाचा सल्ला घेतला असता त्यांनी सांगितले कि हे संप्रेरक असंतुलन (hormonal imbalance ) मुळे होत आहे आणि यासाठी कोणतेही खास उपचार नाहीत. पुरळ सुकण्यासाठी मलम दिले होते. २-३ महिने नियमीत वापराने पुरळ गेले परंतू १) त्या मलमाचे दुष्परिणाम दिसून येऊ लागले जसे कि डोळ्यांची आग होणे २) हे मलम कायमस्वरूपी काम करणारे नाही जोपर्यंत वापरत आहात तोपर्यंत परिणाम,वापरणे बंद केले असता दुप्पट जोमाने पुरळाची उत्पत्ती सुरु. दुष्परिणाम दिसू लागल्याने मलम वापरणे बंद केले आहे. आंतरजालावर उपाय शोधले असता पूरक आहार आणि घरगुती उपाय या बद्दल वाचायला मिळाले. त्यानुसार घरगुती उपचार सुरु आहेत जसे कि तेलकट, आंबट , उष्णता वाढवणारे पदार्थ आहारातून पूर्णपणे वर्ज्य केले आहेत, फळे, पाणी, हिरव्या पालेभाजा यांचा आहारात मुबलक वापर इ. परंतु म्हणावासा परिणाम दिसून आलेला नाही. (गेल्या ३ महिन्यापासून हे उपचार सुरु आहेत) मातोश्रींना दम्यासारखा त्रास आहे. (हा त्रास संप्रेरक असंतुलनाशी निगडीत नाही. ) हवामानातील बदल अजिबात सोसत नाही. जेवणातही दही,ताक ,लिंबू, कैरी (आंबट पदार्थ ), फ्रीजमधील थंड पदार्थ, काकडी,मुळा (थंड पदार्थ), अति तेलकट (मसाल्याचे , तळलेले , काजू,बदाम, अक्रोड) असे पदार्थ एकदम वर्ज्य आहेत . गेली ४० पेक्षा जास्त वर्षांपासून ती यातील कोणत्याही पदार्थाचा यथोचित आस्वाद घेऊ शकली नाही. फक्त भात,भाकरी,वरण, रोजच्या भाज्या याव्यतिरिक्त कशाचाही आनंद घेऊ शकली नाही. ज्या ज्या वेळी वरील कोणताही पदार्थ (अगदी थोड्या प्रमाणात) आहारात आला असता ८-१० दिवसांच्या आजाराची निश्चिंती. उन्हाळ्यातही माठाचे एक ग्लास पाणी वा काकडीची एक फोड सुद्धा दगा देते. "आयुर्वेदाला वैज्ञानिक ज्ञानशाखा मानावे का?" या दुव्यामध्ये नाडी परीक्षक वैद्यन्बद्दल वाचायला मिळाले.आयुर्वेदामध्ये प्रत्येक आजारावर उपचार आहेत आणि निरोगी जीवन जगण्यासाठी आयुर्वेदाचा खूप चांगला उपयोग होतो असे आंतरजालावर वाचण्यात आले. आमच्या नातेवाईकांपैकी एकजणाने कमरेच्या दुखण्यासाठी अशाच एका नाडी परीक्षक वैदयांकडून (मु. पो. हैद्राबाद) उपचार घेणे सुरु केले आहे. त्यांचा अनुभव खूप चांगला आहे. आम्हाला हैद्राबादला जाणे शक्य नाही. पुण्यात वा आसपास कोणी निष्णात वैद्य असल्यास पत्त्यासकट माहिती द्यावी. सोबत स्वताला आलेले अनुभव दिल्यास विशेष आभारी. पुण्यातील प्रसिध्द "बालाजी तांबे" यांचे उपचार कोणी घेतले असल्यास (त्यांचे उपचार कितपत परिणाम कारक आहेत याबद्दल) मार्गदर्शन करावे. (काही चुकीचे लिहिले असल्यास दयाळू मिपाकर क्षमा करतील आणि पामराला समजून घेतील अशी आशा आहे . जाहीररीत्या लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे.)
  • Log in or register to post comments
  • 47055 views

प्रतिक्रिया

Submitted by रेवती on Wed, 05/29/2013 - 08:08

Permalink

कळवते व्य.नि. मधून.

कळवते व्य.नि. मधून.
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Wed, 07/03/2013 - 00:34

Permalink

चिमण्या गणपतीशेजारी

वैद्य उदय सुतार. ह्या माणसावर खरेतर एक धागा काढता येण्यासारखा आहे. रोज न चुकता कितीही उशीर झाला तरी पुण्यातलं दवाखान्याचं काम उरकलं की दुचाकीवरून आळंदी गाठायची. देवळात पटकन दर्शन घ्यायचं आणि तिथे डॉक्टरांची वाट पहात असलेल्या सर्व रुग्णांची मोफत तपासणी करायची. मग अकरा वाजोत की बारा. कित्येकदा देवळाची दारे बंद झालेली असतात. मग बाहेरच पायरीवर बसायचं. पेशंट तपासायचे. पण कुणालाही विन्मुख पाठवायचं नाही. असोत. पहा वाटल्यास जाऊन. भ्रमणध्वनी क्रमांक व्यनितून कळवेन. आंतरजालावर देत नाही, कारण ते आलेल्या सर्व कॉलना उत्तर देतात. नाही जमलं फोन उचलायला तर स्वतःहून कॉल करतील. कुठल्या पेशंटचा इमर्जन्सी फोन असेल तर, यासाठी.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Tue, 07/09/2013 - 12:55

Permalink

किडनी स्टोन साठी कुणी चांगला

किडनी स्टोन साठी कुणी चांगला वैद्य सुचवु शकेल काय? नगर ला जाताना स्माईल स्टोन जवळ कुणी एक शेतकरी आहे म्हणे जो मुळव्याध आणि मुतखडा ह्यावर औषध देतो. जे बरेच उपयोगी आहे असे ऐकले आहे. कुणी घेतले आहे का ते?
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 07/11/2013 - 09:52

Permalink

आगाऊ सल्ला

पि रा ताई, एक वैयक्तिक अनुभव म्हणून लिहित आहे. मी गेल्या २२ वर्षाच्या वैद्यकीय व्यवसायात एकही रुग्णाचा मुतखडा आयुर्वेदिक व होमियोपाथीच्या औषधाने गेलेला पहिला नाही.( मुतखडा ६ ते ७ मिमी किंवा लहान असेल तर बर्याच वेळा स्वतःहून लघवि वाटे पडून जातो मग तुम्ही कोणतेही औषध घ्या व घेऊ नका) कारण मी एक क्ष किरण तज्ञ असल्याने खडे सर्व प्रथम माझ्या शाखेच्या तज्ञानाच दिसतात( एक्स रे किंवा सोनोग्राफीमध्ये). आणि असे मी हजारानी रुग्ण पाहिले आहेत. यापैकी एकही रुग्णाचा खद गेलेला मी पाहिलेला नाही. शिवाय साधारण साठ रुग्णांना मी वरील ( आयुर्वेदिक किंवा होमियोपाथीच्या) चिकित्सा योजनेनंतर तीन वर्षेपर्यंत तपासले आहे( कमांड रुग्णालय पुणे). या साठ रुग्णांच्या पैकी एकाचाही एकही खडा गेलेला नव्हता. या चिकित्सा पुण्यातील नामांकित वैद्य (प य खडीवाले, वेणी माधव शास्त्री जोशी, चंद्रशेखर/ अजित जोशी) आणि होमेओपथिचे डॉक्टर हबू यांच्या उपचारानंतर होत्या. त्यामुळे वैयक्तिक रित्या या उपचाराचा काही गुण येतो असे मला वाटत नाही. आपण काय उपचार करावे हा सर्वस्वी आपला वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु मला आपल्याला एक सल्ला द्यावासा वाटतो कि मुतखडा हा तुमची लघवी संतृप्त( concentrated) झाल्याने होतो त्यामुळे आपण आपले मुत्र जितके पातळ ठेवाल तितकी आपली खडा होण्याची शक्यता कमी होते.तेंव्हा रोज आपण कमीत कमी ३.५ ते ४ लिटर पाणी प्यायले पाहिजे जेणे करून आपली लघवी अतिशय विरळ(dilute) राहील आणि खडा हळूहळू ( १ ते २ वर्षांनी) विरघळून जाईल. बाकी इतर उपचार आपणास योग्य वाटतील तसे करावेत. असेही आपण रोज ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे कारण जर आपल्याला एक खडा झाला असेल तर खडा होणे हि आपली प्रवृत्ती आहे आणि परत मुतखडा होऊ नये यासाठी आपण आयुष्यभर औषध घेऊ शकत नाही तेंव्हा जीवन पद्धती बदलणे हे श्रेयस्कर आहे असे मला वाटते. हा सल्ला आगाऊ पणाचा( uncalled) आहे हे मला मान्य आहे पण तरीही राहवत नाही म्हणून दिला आहे. जर आपणास गैर वाटले तर क्षमा असावी आणि सोडून द्यावे
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on गुरुवार, 07/11/2013 - 10:34

In reply to आगाऊ सल्ला by सुबोध खरे

Permalink

तुम्ही उत्तर अन्य कोणालातरी

तुम्ही उत्तर अन्य कोणालातरी दिलं असलं तरी माझं मत लिहीतो: एका तज्ञ डॉक्टरने स्वतःहून सल्ला देणं, आणि तोही कोणताही व्यावसायिक फायदा नसताना, हा एक लाभ आहे. त्याबद्दल उलट सर्वांनी तुमचे आभारच मानले पाहिजेत तेव्हा क्षमा वगैरेचा विचारही मनात आणू नये अशी व्यक्तिगत विनंती. याउपर शक्य असेल तर होमिओपथीसारख्या नॉन्-मेडिकल किंवा नॉन-एक्झिस्टंट उपचारपद्धतीविषयी लोकांना फॅक्ट्स काय आहेत ते सांगणं हे एक मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टर म्हणून सर्वच डॉक्टर्सनी चालू ठेवलं पाहिजे. त्याचा उपयोग झाल्याच्या अनेक कहाण्या असल्या तरी त्यामागे मूलभूत चुकीची गृहीतकं आहेत आणि औषध अस्तित्वातच नसतं या गोष्टींमुळे होमिओपथीसारख्या पद्धतीतल्या घोडत्रुटी एखाद्या अपायकारक अंधश्रद्धेप्रमाणे लोकांच्या नजरेला आणून देणं हे एकप्रकारे वैद्यकीय शास्त्राच्या कर्तव्याला पूरकच आहे. त्याचप्रमाणे चुंबकचिकित्सा, बाराक्षार, पुष्पौषधी, जलचिकित्सा, संगीतोपचार, इलेक्ट्रोपथी किंवा तत्सम पथींचा उपयोग नेमका किती आणि कुठपर्यंत मर्यादित आहे हेही कोणा एका मध्यवर्ती ऑथॉरिटीने ठरवून त्यातले जे काही फ्रॉड आहे ते बंद केलं पाहिजेच.
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on गुरुवार, 07/11/2013 - 12:35

In reply to आगाऊ सल्ला by सुबोध खरे

Permalink

एक तर तुम्ही क्षमा मागायचा

एक तर तुम्ही क्षमा मागायचा प्रश्नच नाहीये.. मी आधी तुमचे आभार मानते! तुमचा अनुभव दांडगा आहे ह्यात वाद नाही आणि तुमचे निरीक्षण ही मला पटले आहे. माझ्या मते शरीर स्वतःहुन तो खडा बाहेर टाकायला मदत करेल जर मी पाण्याचे प्रमाण वाढवले. त्या साठी मला औषधाची गरज नाही. पण जी प्रव्रुत्ती तयार झाली आहे शरीरामध्ये, ती आयुर्वेदाने जाऊ शकेल असे मला वाटत होते. आणि तुम्ही वर नावे लिहीलेल्यां पैकीच कुणाकडे तरी जाण्याचा माझा विचार होता. एकंदरीत मी सुद्धा कोणतेही औषध न घेतल्याने माझे स्वतः विषयी एक निरिक्षण आहे.. मी काहीही खाल्ले (जे मला खायचेच नाही म्हणुन सांगितले आहे, उदा कोबी, पालक इ.) तरी मला त्रास असा होत नाही. पण माझे पाणी पिण्याचे प्रमाण कमी झाले की मात्र मला ताबडतोब त्रास होतो. मला बर्‍याच लोकांनी असेही ऐकवले आहे की खडा कुठेतरी जाऊन अडकला तर तो त्रास देतो. एरवी नाही. त्यामुळे असे वाटले जरी की आप्ल्याला काही त्रास नाहीये तरी खडा हा आत मध्ये मोठा होत असतो. माझ्या मते हे सगळ्यात जास्त पाण्याच्या प्रमाणावर अवलंबुन आहे. थोडा फार टोमॅटो, पालक खाल्ला तरी ठिक.. होमीओपॅथी चा मला काडीचाही फायदा झालेला नाही (मी १ वर्ष भर एका वेगळ्या त्रासा साठी उपचार घेतले) पण त्यासाठी आयुर्वेदाचा मात्र फायदा झाला (अर्थात त्या काळात माझ्या आयुष्यात इतर ही अनेक गोष्टी बदलल्या, जसे की जेवण,रुटिन, लग्न झाले, मुल झाले..) ह्या सगळयाचा ही नक्कीच प्रभाव पडला असणार.. त्यामुळे आयुर्वेद प्रव्रुत्ती नष्ट करायला मदत करेल असे मला पुर्वानुभवा वरुन वाटत होते.. पण आता विचार करावा लागेल ! तुमच्या सल्ल्या साठी धन्यवाद..!!
  • Log in or register to post comments

Submitted by बाबा पाटील on Tue, 08/20/2013 - 20:51

In reply to आगाऊ सल्ला by सुबोध खरे

Permalink

सुबोध सर्, आयुर्वेदाने मुत्राश्मरी पडतात...

अंदाजे ३०० ते ४०० रुग्नांचा तरी आयुर्वेदि़क औषधांनी मुतखडे पडल्याचा डाटा माझ्या फाइल्स मध्ये आहे सगळ्यात मोठा १२.५ मिमी चा आहे जो एका निष्णात आर्थोपेडीक सर्जनचा आहे.माझ्या माहितीतले जवळपास ८० टक्के अ‍ॅलोपॅथी डॉक्टर मुतखड्याकरिता आयुर्वेदीक औषधे लिहितात. १२-१३ मिमी च्या पुढे जर खडा असेल तर आम्हीच सांगतो बाबा रे लिथोटॉप्सी करुन घे मग नंतर माझ्याकडे जे काही शिल्लक असेल ते मी बाहेर काढतो.कारण प्रत्येक शास्त्राची एक मर्यादा असते,ती ओळखुन डोळे उघडे ठेउन काम केले,की काम चांगले होते. खोटे वाटेल पण सुरुवातीच्या प्रॅक्टीस मध्ये,असाच एक १७ वर्षाच्या मुलाला घेउन त्याचे वडील आले होते, मुत्राश्मरीच्या तिव्र वेदना,रुग्न अक्षरशः गडबडा लोळत होता,वडिलांच्या हातात सकाळीच केलेला सोनोग्राफीचा रिपोर्ट होता. उजव्या किडनीच्या लोअर पोल मध्ये ७.५ मिमीचा खडा होता. त्याच्या वडिलांची या अगोदर स्वतःची दोन वेळा पुन्यातील नामांकित रुग्नालयात या गोष्टीसाठीच ऑपरेश्नस झाली होती,त्यामुले वेदना काय असतात हे त्या बापाला चांगलेच माहिती होते,ते म्हणाले डॉक्टर तुम्हाला जे करता येईल ते करा,गरज लागली तर मी त्याला इमर्जन्सी हॉस्पिटलला न्यायला तयार आहे. यावर त्याम्चे संमती पत्र घेउन काही नाही,माझ्या शास्त्रानुसार फक्त १०० मिली चा एक नारायण तेलाचा बस्ती(एनिमा)त्यानंतर पुर्ण एक लिटर चा मुत्रल द्रव्यांचा निरुह(काढ्याचा एनिमा)बस्ती दिला दुसर्‍या बस्ती नंतर पोरग अक्षरश: हसत बाहेर आले होते, वेदनेला पुर्णतः उपशय्,आणी संध्याकाळच्या ओपीडीला पोराचा बाप लघवी वाटे पडलेला तो खडा घेउन आला होता.शास्र्तात जे वाचल त्याची ती परिपुर्ण अनुभुती होती. मी म्हणत नाही की प्रत्येक वेळेला हेच शक्य होइल ,प्रत्येक रुग्न वेगळा अनुभव देतो,जिथे आयुर्वेदाला मर्यादा आहेत्,तिथे निष्णात डॉक्टरांची मदत घेण्यात मला कधीच कमीपणा वाटत नाही, इतकेच नाही माझ्या शेजारी असणारे चेस्ट फिजिशियन त्यांच्या कॉक्सच्या पेशंट साठी,लिव्हरसाठी सपोर्टीव्ह ट्रीटमेंटं म्हणुन माझ्याकडे पाठवतात्,कारण अ‍ॅन्टी ट्युबरकिलन ड्र्ग्ज लिव्हर डॅमेज करतात तिथे आयुर्वेद चांगल काम करत.त्यामुळे या दोन्ही शास्त्रांचा एकत्रीत उपयोग केला तर तो रुग्नांसाठी खुपच फायदेशिर ठरते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Wed, 08/21/2013 - 00:49

In reply to सुबोध सर्, आयुर्वेदाने मुत्राश्मरी पडतात... by बाबा पाटील

Permalink

३mm

3 mmच्या खड्यासाठी मला तर होमिओपॅथीच्या औषधाचाही फायदा झाला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 08/21/2013 - 09:20

In reply to ३mm by प्रभाकर पेठकर

Permalink

वर लिहिले आहेच

मुतखडा ६ ते ७ मिमी किंवा लहान असेल तर बर्याच वेळा स्वतःहून लघवि वाटे पडून जातो मग तुम्ही कोणतेही औषध घ्या व घेऊ नका)अशा परिस्थितीत आपण शंख किंवा बिब्ब्याचे चूर्ण घेतले तरी खडा पडेलच. मग तो औषधाने पडला असे कसे म्हणता येईल?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Wed, 08/21/2013 - 10:21

In reply to वर लिहिले आहेच by सुबोध खरे

Permalink

माझा अनुभव.

होय. वर आपल्या प्रतिसादात लिहीलेले वाचूनच, माझ्या प्रतिसादात, खड्याचा आकार मी मुद्दाम उद्घृत केला होता. जवळ जवळ आठवडाभर मला त्रास झाला आणि औषध घेतल्याच्या दुसर्‍याच दिवशी खडा पडून गेला. साहजिकच हा औषधाचाच पारिणाम असावा असं माझं मत बनलं आहे. तुमच्या ज्ञानाला आणि अनुभवांना मी आव्हान देत नसून माझा अनुभव मांडला आहे. गैरसमज नसावा.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 08/21/2013 - 09:34

In reply to सुबोध सर्, आयुर्वेदाने मुत्राश्मरी पडतात... by बाबा पाटील

Permalink

डॉक्टर बाबा साहेब,

डॉक्टर बाबा साहेब, आमच्या बालरोग तज्ञाला मूत खडा झाला होता मी त्याला गमतीने म्हटले कि माझा एक रुग्ण सांगत होता कि भेंडीची भाजी खा मूत खडा पडून जातो आणि काय आश्चर्य दुसर्या दिवशी तो माझ्याकडे आला आणि मला पडलेला खडा दाखवून म्हणाला कि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी भेंडीची भाजी खाल्ली आणि हा खडा पडला. पण दुर्दैवाने त्याच बालरोग तज्ञाला पुढच्या वेळेला खडा खाली उतरत असताना भेंडीची भाजी खाउन काहीही उपयोग झाला नाही. त्याने भेंडी कच्ची आणि परतून पण खाऊन पाहिली पण काहीही उपयोग झाला नाही.असेच इतर रुग्णाच्या बाबतीत झाले. मला एवढेच म्हणायचे आहे कि जोवर एखादे औषध ( कोणत्याही पाथीचे) जोवर हजारो रुग्णावर DOUBLE BLIND RANDOMISED CONTROLLED TRIALS (http://en.wikipedia.org/wiki/Randomized_controlled_trial) करून सिद्ध होत नाही तोवर त्याचा नक्की फायदा होतो हे सांगता येणार नाही. (या चाचण्या संख्याशास्त्राच्या कसोट्या असून त्या आधुनिक वैद्यकाची बटिक असल्याचा आव मात्र इतर पथी चे लोक करताना आढळतात.) प्रत्येक डॉक्टर कडे असे चमत्काराचे स्वानुभव असतात पण हे पुढच्या रुग्णावर उपयुक्त ठरतात असे नाही. दुर्दैवाने आयुर्वेदीक किंवा होमियोपथिक कौन्सिल मधील दुद्धाचार्य यातले काहीही न करता स्वार्थासाठी त्या पदांचा वापर करताना दिसतात त्यामुळे या प्राचीन/नवीन उपचारपद्धतीचा भविष्यकाळ फारसा आशादायक दिसत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by बाबा पाटील on Wed, 08/21/2013 - 19:44

In reply to डॉक्टर बाबा साहेब, by सुबोध खरे

Permalink

४-५ मिमी साठी औषधे द्यायची गरजच नसते हो.

मी कधीच ५ मिमी च्या खालच्या रुग्नांना औषधे देतच नाही,कारण साधा उसाचा रस ३-४ ग्लास पिला की पुढच्या काही तासात तो खडा मुत्रोत्सर्जन वाढुन पडतो,त्याला कशाचीच गरज नसते,दुसर भेंडीच्या भाजीने खड्याचा त्रास वाढतो,कमी होत नाही,तिसरी गोष्ट माझ्या ओपिडीत कंपल्सरी औष्धे देण्यापुर्वी आनी त्यानंतर एक महिन्याने औषध बंद करण्यासाठी सोनोग्राफी केली जाते,आयुर्वेद फक्त उपचार पद्धती नाहीये ती जिवनपद्धती आहे,यात आहार विहार्,आजार होन्याची कारणे या सगळ्याच गोष्टींचा विचार केला जातो,कारण एकदा खडे तयार झाले की बर्‍याच रुग्नांच्या किडनी मध्ये ते परत परत तयार होण्याची प्रवृती वाढीस लागते, यातुन काही वर्षांनी तिचे कार्य बिघडते,हे घडु न देन्यासाठी आयुर्वेद काम निच्छित करतो.कारन मी माझ्या आईलाच मागची १२ वर्ष फक्त आयुर्वेदीक औषधांवर जगवतोय्,कारण माझ्या जन्मापुवीच ३२ वर्षापुर्वी तिची एक किडनी एका ऑपरेशन मध्ये काढली गेली होती, त्यानंतर एक दोन वेळा तिचे क्रिएटीन वाढले होते,पण एकही अ‍ॅलोपॅथी ड्रग न वापरता ती ठणठणीत बरी आहे,त्यात कधीच मॉर्डन मेडीसिन वापरली गेली नाहीत्. एक गोष्ट मान्य आहे की मायक्रो लेव्हल किंवा सेल लेव्हलला जाउन आयुर्वेदात संशोधन झाले नाही,पण आयुर्वेदाचा ढाचाच वेगळा आहे,हजारो वर्ष ही उपचार पद्धती चालु आहे,म्हणून ती टाकाउ आहे का ? बर्‍याच आजारांसाठी अ‍ॅलोपॅथी अलर्जीच नाव देते,प्रत्यक्षात ते आयुर्वेदात सहज साध्य आहेत,सोरियासिसचा कसलाही रुग्न माझ्याकडे पाठवा,जिथे माझ्या शेजारचा ससुन(बी.जे.मेडीकलचा)चा स्किनचा स्पेश्यालिस्ट दम टाकतो. मी त्याला बरा करुन दाखवतो.नाही जमले तर गावाकडे जाउन नांगर पकडतो.तेच शितपित्त मध्ये काही केसेस मध्ये नाही रिझ्लट मिळत. मी प्रथम पासुन एकच गोष्ट मांडतो आहे,पॅथी कुठलीच चांगली किंवा टाकावु नसते,फक्त तिच्या मर्यादा पाळुन काम करा,डॉक्टरचा खिसा भरण्यासाठी नाही पण रुग्नाच्या आयुष्यासाठी ते हितकर ठरेल.
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on गुरुवार, 08/22/2013 - 16:31

In reply to ४-५ मिमी साठी औषधे द्यायची गरजच नसते हो. by बाबा पाटील

Permalink

मी प्रथम पासुन एकच गोष्ट

मी प्रथम पासुन एकच गोष्ट मांडतो आहे,पॅथी कुठलीच चांगली किंवा टाकावु नसते,फक्त तिच्या मर्यादा पाळुन काम करा,डॉक्टरचा खिसा भरण्यासाठी नाही पण रुग्नाच्या आयुष्यासाठी ते हितकर ठरेल.
छान प्रतिसाद...
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on गुरुवार, 08/22/2013 - 17:00

In reply to मी प्रथम पासुन एकच गोष्ट by अनुप ढेरे

Permalink

+१

पॅथी कुठलीच चांगली किंवा टाकावु नसते,फक्त तिच्या मर्यादा पाळुन काम करा,
सहमत. फक्त काहिंची मर्यादा सुरू होण्याआधिच संपते. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेशसहस्त्रबुद्धे on गुरुवार, 07/04/2019 - 09:46

In reply to ४-५ मिमी साठी औषधे द्यायची गरजच नसते हो. by बाबा पाटील

Permalink

मुतखडा निवारणासाठी

तुमचा पत्ता मिळेल का?
  • Log in or register to post comments

Submitted by म्हैस on Tue, 08/20/2013 - 14:30

Permalink

मझि माहिति

खडीवाले वैद्य आणि ते बालाजी तांबे तर अजिबात नको. खडीवाले आधी चांगले होते पण आता त्यांची मुले तो व्यवसाय सांभाळतात. त्यांना आयुर्वेदातला काही कलता कि नाही कोण जाने. आणि हा पिचू फेम म्हातारा तर एका बाजूला १००% नफा कमावतो आणि दुसरीकडे गीता निरुपण सांगतो. ताम्बेंची सगळीच पुस्तके अर्थहिन आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by दत्ता काळे on Wed, 08/21/2013 - 09:40

Permalink

२.५ mm च्या किडनी स्टोनवरील

२.५ mm च्या किडनी स्टोनवरील उपचारासाठी मला होमिओपॅथी उपचारांचा चांगलाच फायदा झाला.
  • Log in or register to post comments

Submitted by गुरुचरण on गुरुवार, 08/22/2013 - 16:10

Permalink

निष्णात वैद्य

झेलम पाषाणकर, सदाशिव पेठ- सुजाता मस्तानी दुकान जवळ- अतिशय निष्णात वैद्य आहेत
  • Log in or register to post comments

Submitted by चिनार on गुरुवार, 07/04/2019 - 13:32

Permalink

वैद्य खासगीवाले, बाजीराव रोड

वैद्य खासगीवाले, बाजीराव रोड,पुणे खूण : बाजीराव रोडवर आठवले डेअरी आहे आणि त्याबाजूला आयुर्वेदिक औषधांचे दुकान आहे. ह्याच्या विरुद्ध बाजूला एक छोटासा बस स्टॉप आहे. त्याशेजारी एक जुनाट घर दिसते. तेच घर ! वैद्य बुधवारी आणि शनिवारी (दुपार ३ ते रात्री पर्यंत) प्रॅक्टिस करतात. बोलण्यात अतिशय स्पष्टवक्ते. जास्त प्रश्न विचारलेले चालत नाहीत. कुरकुर न करता चार-पाच तास बसण्याची तयारी असेल तरच जावे.
  • Log in or register to post comments

Submitted by जालिम लोशन on गुरुवार, 07/04/2019 - 14:21

In reply to वैद्य खासगीवाले, बाजीराव रोड by चिनार

Permalink

तारीख तपासावी.

इतक्या ऊशिरा सांगुन ऊपयोग नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on गुरुवार, 07/04/2019 - 14:44

In reply to तारीख तपासावी. by जालिम लोशन

Permalink

लिहू देत. कोणालातरी उपयोग

लिहू देत. कोणालातरी उपयोग होईल. लिहिल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com