भ्रष्टाचाराचा उड्डानपुल
आज लोकसत्तेत आलेल्या बातमीने माझे लक्ष वेधुन घेतले...
ती बातमी पुढील प्रमाणे आहे :-
कमकुवत ‘सांध्यां’मुळे ठाण्यातील उड्डाणपूल धोक्यात
माझ्या लहानपणी मी या पुलाची प्रस्तावीत उड्डानपुल अशी शासकिय पाटी वाचल्याचे स्मरते ! त्या पुलाचे बांधकाम २००८ साली सुरु होणार होते. तो पुल अजुन पूर्ण होउ शकला नाही त्यातच या आजच्या बातमीची भर पडली !
२००९ साली 'एमएमआरडीए'च्या निधीतून ठाणे शहरात कापूरबावडी फ्लायओव्हर, घोडबंदर रोडवरील तीन फ्लायओव्हर आणि शहरातील तीन फ्लायओव्हर बांधण्यात येणार आहेत. ते काम एमएसआरडीसीला देण्यात आले आहे. घोडबंदर रोडवरील वाहतूक सुरळीत सुरू झाली असली तरी गोल्डन डाइज नाका ते माजिवडा नाका येथील टॅॅफिक जॅममुळे वाहनांचा बराच काळ खोळंबा होतो. या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी भिवंडी फ्लायओव्हरला जोडून वंडरमॉलकडे जाणारा फ्लायओव्हर असावा, अशी मागणी होती. विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, आमदार जीतेंद आव्हाड आणि आमदार एकनाथ शिंदे यांनी हा प्रश्ान् चचेर्त आणला होता. प्रथम हे काम महापालिकेने करावे किंवा त्याचे पैसे द्यावेत अशी भूमिका एमएसआरडीसीने घेतली होती. त्यावर एमएमआरडीएने निधी देण्याचा तोडगा काढण्यात आला.शेवटी कापूरबावडी फ्लायओव्हरला अखेर मुहूर्त मिळाला.
ठाण्यातील कापूरबावडी जंक्शनसह शहरातल्या पाच फ्लायओव्हर्सचं काम डिसेंबर २००८ मध्ये सुरू होईल आणि पुढील दोन वर्षांत ते पूर्ण होईल, असं आश्वासन तत्कालीन सार्वजनिक उपक्रम मंत्री अनिल देशमुख यांनी ठाणेकरांना दिलं होतं,पण ते सुरु न झाल्याने सेनेने आंदोलन केलं.
कापूरबावडी फ्लायओव्हरचे काम एनसीसी आणि जे. कुमार यांना देण्यात आले आहे. त्यासाठी सुमारे १३१ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे असे २००९ मधे कळले.
२०१० साली या संदर्भात मिपावर मी एक प्रतिसाद दिल्याचेही मला स्मरते !
घोडबंदर रोडवरील वाघबीळ,पातलीपाडा आणि मानपाडा येथील फ्लायओव्हर बांधुन झाले तरी माजिवड्याचा उड्डानपुल काही पूर्ण होईना.
२०१२ मधे ट्रॅफिक कोंडीमुळे हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला पण पुल पूर्ण होण्याची काही चिन्हे दिसत नव्हती !
बरीच आंदोलने झाली मध्यंतरी यापुलाच्या कॉन्ट्रॅक्टरला याच पुलाच्या खांबाला बांधण्याचे आंदोलन झाले नंतर
ठाणे शहरातील कापूरबावडी येथील फ्लायओव्हरचे काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करावे. तसेच शिळफाटा महापे रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी त्या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम तातडीने हाती घ्यावे, असे निर्देश ठाण्याचे पालकमंत्री या नात्याने राज्य उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
तरी काही हा पुल बांधुन पूर्ण झाला नाही, आज तर या पुलाच्या बेअरिंग्ज (दाबनियंत्रक) निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आल्याची बातमी वाचली आणि हताश झालो... :(
भ्रष्टाचार किती करावा याचे गणित सामान्य नागरिकांच्या आयुष्याशी निगडीत झाले आहे हे आज मला कळुन चुकले !
सध्या या भागातल्या रस्त्याची अवस्था अतीशय दारुण असुन, येथुन वाहने चालवणे म्हणजे मॄत्युशी सामना करणे आहे असे म्हंटले तरी ती अतीशयोक्ती ठरु नये !
{त्रस्त ठाणेकर}
वर्गीकरण
प्रतिक्रिया
जमवा चार माणस. जा कलेक्टरच्या
जा कलेक्टरच्या ऑफीसवर. मोठ्या
त्याच्या डोळ्यासमोर होइल.
आणखी एक.
पूल पडण्यासाठीच असतो
मुळात यांचे प्लानिंग कोण करते
अश्या प्रोजेक्ट्स ना टाईम
यानुश्न्गाने मनमोहन यांची प्रधान मंत्री ग्राम सडक योजना तुलनेने
जेथे रस्ता बनवला तेथेच
शिवाय डीझाईन, मटेरिअल आणि
जाने भी दो यारों
खरे तर तुमच्या चित्रपटाबाबतच्या अभिरुचि बद्दल घनदाट शंका आहे