ही एक अतिशय सोपी व झटपट होणारी (जास्तीत जास्त १० मिनिटे) पाककृती आहे. मी अनेकवेळा मुलांना संध्याकाळी ५-६ वाजता भुकेच्या वेळी असे पोहे चटकन करून दिले आहेत.
साहित्यः- (अंदाजे २ माणसांसाठी)
२-३ मुठी कच्चे कोरडे पोहे, २-३ चमचे गोडेतेल, १ मध्यम आकाराचा कांदा, १ मध्यम आकाराचा टोमॅटो, १ चमचा साखर, चवीपुरते मीठ, १ चमचा तिखट, थोडेसे भाजलेले दाणे, थोडी चिरलेली कोथिंबिर, गरज भासल्यास थोडेसे फरसाण
कृती:- पोहे मावतील एवढे एखादे स्टीलचे पातेले पाण्याने विसळून घ्यावे. विसळल्यानंतर ते पुसु नये. त्यामुळे कच्च्या पोह्यांना किंचित ओलसरपणा मिळेल. त्यात कच्चे पोहे टाकावे. टोमॅटो बारीक चिरून लगेच पोह्यांवर पसरावा. चिरल्यानंतर उरलेला टोमॅटोचा रस सुद्धा पोह्यांवर पसरावा. पोहे कच्चे असल्यामुळे त्यात टोमॅटोमुळे थोडासा ओलावा येऊन पोहे थोडे मऊ होण्यास मदत होते. कांदा बारीक चिरून पोह्यांवर टाकावा. नंतर पोह्यांवर अंदाजाने २-३ चमचे तेल वरून टाकावे. चवीपुरते मीठ घालावे. एक चमचा साखर घालावी. नंतर थोडे भाजलेले दाणे टाकून संपूर्ण मिश्रण चमच्याने हलवून एकजीव करून घ्यावे. नंतर आवडीनुसार वरून चिरलेली कोथिंबिर किंवा थोडेसे फरसाण सुद्धा घालता येईल.
पोहे कच्चे असल्याने चावायला जरा वेळ लागतो. त्यामुळे खूप जास्त पोहे घेऊ नयेत. खूप जास्त पोहे घेऊन खाल्ले तर नंतर तोंड दुखण्याची शक्यता आहे. त्यात तेल-तिखट-कांदा असल्याने पोहे काहीसे तामसी स्वरूपाचे/तिखट लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे करताना त्यात १ चमचा साखर टाकल्यास तिखट-गोड अशी एकत्रित छान चव लागते. टोमॅटोमुळे थोडासा ओलावा येउन कच्चे पोहे काही प्रमाणात मऊ होतात. भाजके दाणे, कोथिंबिर इ. मुळे चव अजून छान लागते.
जास्तीत जास्त १० मिनिटात २ माणसांसाठी हे पोहे तयार होतात.
वाचने
14509
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
पातळ पोहेच घेतले तर छान लागेल
पातळ पोहे यापूर्वी वापरले
पातळ फव्हेच भारी लागतेत. पण
In reply to पातळ पोहे यापूर्वी वापरले by श्रीगुरुजी
आवड्ल्या गेले आहेत हे पोहे..
भांडे...
ही जरा वेगळीच कृती दिसते.
In reply to भांडे... by दिपक.कुवेत
Ekdum bhari
मी हेच पोहे असे करते.. त्याला
ओले खोबरे.
In reply to मी हेच पोहे असे करते.. त्याला by पिलीयन रायडर
अहो आम्ही देशस्थ ना...
In reply to ओले खोबरे. by राही
आवाका?
In reply to अहो आम्ही देशस्थ ना... by पिलीयन रायडर
कशाला ह्यांचा धागा हाय्जॅक
In reply to आवाका? by राही
दडपे पोहे माझ्या दृष्टीने जरा
In reply to मी हेच पोहे असे करते.. त्याला by पिलीयन रायडर
अर्धा फोडण्याची कृती.
In reply to दडपे पोहे माझ्या दृष्टीने जरा by श्रीगुरुजी
खोबर्यासाठी सोप्पी कृती
In reply to अर्धा फोडण्याची कृती. by आनंदी गोपाळ
टाकायचाच नाही ना मग ओला नारळ.
In reply to दडपे पोहे माझ्या दृष्टीने जरा by श्रीगुरुजी
१) पोहे आणखी थोडे मऊ
In reply to मी हेच पोहे असे करते.. त्याला by पिलीयन रायडर
टमाटा आवडत नाही.
ह्यामध्ये कैरीच्या बारीक फोडी
ओके ...
तेल-तिखट
तिखट कच्च्या तेलात मिसळून
In reply to तेल-तिखट by राही
यात १/२ चमचा गोडा मसाला
महाराष्ट्रात "पोहे" संस्कृती
+१११
In reply to महाराष्ट्रात "पोहे" संस्कृती by डॉ सुहास म्हात्रे
"पोहे" संस्कृती
In reply to महाराष्ट्रात "पोहे" संस्कृती by डॉ सुहास म्हात्रे
आत्ताच वाचला. पोह्यांसार्खाच
In reply to "पोहे" संस्कृती by सखी