ही एक अतिशय सोपी व झटपट होणारी (जास्तीत जास्त १० मिनिटे) पाककृती आहे. मी अनेकवेळा मुलांना संध्याकाळी ५-६ वाजता भुकेच्या वेळी असे पोहे चटकन करून दिले आहेत.
साहित्यः- (अंदाजे २ माणसांसाठी)
२-३ मुठी कच्चे कोरडे पोहे, २-३ चमचे गोडेतेल, १ मध्यम आकाराचा कांदा, १ मध्यम आकाराचा टोमॅटो, १ चमचा साखर, चवीपुरते मीठ, १ चमचा तिखट, थोडेसे भाजलेले दाणे, थोडी चिरलेली कोथिंबिर, गरज भासल्यास थोडेसे फरसाण
कृती:- पोहे मावतील एवढे एखादे स्टीलचे पातेले पाण्याने विसळून घ्यावे. विसळल्यानंतर ते पुसु नये. त्यामुळे कच्च्या पोह्यांना किंचित ओलसरपणा मिळेल. त्यात कच्चे पोहे टाकावे. टोमॅटो बारीक चिरून लगेच पोह्यांवर पसरावा. चिरल्यानंतर उरलेला टोमॅटोचा रस सुद्धा पोह्यांवर पसरावा. पोहे कच्चे असल्यामुळे त्यात टोमॅटोमुळे थोडासा ओलावा येऊन पोहे थोडे मऊ होण्यास मदत होते. कांदा बारीक चिरून पोह्यांवर टाकावा. नंतर पोह्यांवर अंदाजाने २-३ चमचे तेल वरून टाकावे. चवीपुरते मीठ घालावे. एक चमचा साखर घालावी. नंतर थोडे भाजलेले दाणे टाकून संपूर्ण मिश्रण चमच्याने हलवून एकजीव करून घ्यावे. नंतर आवडीनुसार वरून चिरलेली कोथिंबिर किंवा थोडेसे फरसाण सुद्धा घालता येईल.
पोहे कच्चे असल्याने चावायला जरा वेळ लागतो. त्यामुळे खूप जास्त पोहे घेऊ नयेत. खूप जास्त पोहे घेऊन खाल्ले तर नंतर तोंड दुखण्याची शक्यता आहे. त्यात तेल-तिखट-कांदा असल्याने पोहे काहीसे तामसी स्वरूपाचे/तिखट लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे करताना त्यात १ चमचा साखर टाकल्यास तिखट-गोड अशी एकत्रित छान चव लागते. टोमॅटोमुळे थोडासा ओलावा येउन कच्चे पोहे काही प्रमाणात मऊ होतात. भाजके दाणे, कोथिंबिर इ. मुळे चव अजून छान लागते.
जास्तीत जास्त १० मिनिटात २ माणसांसाठी हे पोहे तयार होतात.
वाचने
14773
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
पातळ पोहेच घेतले तर छान लागेल
पातळ पोहे यापूर्वी वापरले
पातळ फव्हेच भारी लागतेत. पण
In reply to पातळ पोहे यापूर्वी वापरले by श्रीगुरुजी
आवड्ल्या गेले आहेत हे पोहे..
भांडे...
ही जरा वेगळीच कृती दिसते.
In reply to भांडे... by दिपक.कुवेत
Ekdum bhari
मी हेच पोहे असे करते.. त्याला
ओले खोबरे.
In reply to मी हेच पोहे असे करते.. त्याला by पिलीयन रायडर
अहो आम्ही देशस्थ ना...
In reply to ओले खोबरे. by राही
आवाका?
In reply to अहो आम्ही देशस्थ ना... by पिलीयन रायडर
कशाला ह्यांचा धागा हाय्जॅक
In reply to आवाका? by राही
दडपे पोहे माझ्या दृष्टीने जरा
In reply to मी हेच पोहे असे करते.. त्याला by पिलीयन रायडर
अर्धा फोडण्याची कृती.
In reply to दडपे पोहे माझ्या दृष्टीने जरा by श्रीगुरुजी
खोबर्यासाठी सोप्पी कृती
In reply to अर्धा फोडण्याची कृती. by आनंदी गोपाळ
टाकायचाच नाही ना मग ओला नारळ.
In reply to दडपे पोहे माझ्या दृष्टीने जरा by श्रीगुरुजी
१) पोहे आणखी थोडे मऊ
In reply to मी हेच पोहे असे करते.. त्याला by पिलीयन रायडर
टमाटा आवडत नाही.
ह्यामध्ये कैरीच्या बारीक फोडी
ओके ...
तेल-तिखट
तिखट कच्च्या तेलात मिसळून
In reply to तेल-तिखट by राही
यात १/२ चमचा गोडा मसाला
महाराष्ट्रात "पोहे" संस्कृती
+१११
In reply to महाराष्ट्रात "पोहे" संस्कृती by डॉ सुहास म्हात्रे
"पोहे" संस्कृती
In reply to महाराष्ट्रात "पोहे" संस्कृती by डॉ सुहास म्हात्रे
आत्ताच वाचला. पोह्यांसार्खाच
In reply to "पोहे" संस्कृती by सखी
+१
+१
जुने लेखन असे +१ मारून वर…
जुने लेखन असे +१ मारून वर आणण्यात काय मतलब आता तरी ! जुन्या मातब्बर लोकांचे लेखन असे दणकन वर आले की जीव धसकतो! एकदम वाटले आता गुरुजी निघाले का काय म्हणले चंबू गवाळे आवरून, धागा उघडल्यावर जीवात जीव आला खरा. 🙏🏾😇
पाकृ व चर्चा आवडली.
पाकृ व चर्चा आवडली. श्रीगुरुजी सहसा क्रिकेट व राजकारण सोडून इतर काही लिहिताना दिसत नाहीत, पण त्यांनी बल्लवाचार्याचे रूप घेतलेले पाहून आश्चर्य वाटले. @श्रीगुरुजी, अजून येऊ द्या.
बाकी, आमचे आवडते पोहे -
- (पोह्यांसोबत हवे असलेले) कांदा लिंबू
हा धागा शोधून वर का आणला…
In reply to पाकृ व चर्चा आवडली. by कांदा लिंबू
हा धागा शोधून वर का आणला याची कल्पना नाही. हा लेख केव्हाच माझ्या विस्मरणात गेला आहे.
मी ७-८ नाटकांचे परीक्षण व एका चित्रपटाच्या परीक्षणाचे स्वतंत्र लेख लिहिले होते. १-२ कवितांची विडंबने लिहिली होती. ज्योतिष विषयावर एक खेळकर लेख लिहिला होता. क्रिकेटवर १०+ धागे काढले होते. ऑलिम्पिक व इतर खेळांच्या धाग्यात प्रतिसाद मी नेहमीच देतो. पाऊट करून स्वयंचित्र टिपणे यावर एक मजेशीर लेख लिहिला होता. राजकारण या विषयावर बरेच धागे काढले आहेत. वॉटरगेट प्रकरण व लिंकन-केनेडी हत्या यावर दोन स्वतंत्र लेखमाला लिहिल्या आहेत. एकदोन शतशब्दकथा लिहिल्या आहेत.
परंतु राजकारण वगळता इतर धाग्यांना खूप कमी प्रतिसाद आले. अजून अनेक राजकारणविरहीत विषय डोक्यात आहेत. मराठी भाषेचा इतिहास, व्याकरण, वृत्ते या विषयावर लेखमालेची जुळवाजुळव करण्यास प्रारंभ केला होता.
परंतु आता तितकासा उत्साह राहिला नाही.
परंतु आता तितकासा उत्साह राहिला नाही.
In reply to हा धागा शोधून वर का आणला… by श्रीगुरुजी
असे करू नका, राजकारणा पलीकडचे गुरुजी पहायला नक्की आवडेल, मनावर घ्या अन् लेखणी मोकळी सोडा.
धन्यवाद! प्रयत्न करतो.
In reply to परंतु आता तितकासा उत्साह राहिला नाही. by वृषभ खोंडे
धन्यवाद! प्रयत्न करतो.
मराठी भाषेचा इतिहासयावर लिहा…
In reply to हा धागा शोधून वर का आणला… by श्रीगुरुजी
यावर लिहा, मलाही यात थोडी भर घालायला आवडेल.
धन्यवाद! लेखमालेतील पहिले…
In reply to मराठी भाषेचा इतिहासयावर लिहा… by प्रचेतस
धन्यवाद! लेखमालेतील पहिले दोन भाग लिहून ठेवले होते. परंतु नंतर उत्साह टिकला नाही. तुमच्यासारखे अभ्यासू नवीन भर टाकणार असतील तर ती मालिका लिहायला आवडेल.
भाग टाकायला सुरुवात करा.
In reply to धन्यवाद! लेखमालेतील पहिले… by श्रीगुरुजी
भाग टाकायला सुरुवात करा.
पातळ पोहे घेऊन त्याला गरम…
पातळ पोहे घेऊन त्याला गरम मसाला , मीठ शेंगदाणे आणो थोडा तेलाचा हात लावून मिश्रण केले तरी धमाल होते
सोबतीला लिंबू कोथिंबीर…
In reply to पातळ पोहे घेऊन त्याला गरम… by विजुभाऊ
सोबतीला लिंबू कोथिंबीर असल्यास आणखी चविष्ट लागतात.
अरे वा! लेख आवडला, ह्या…
अरे वा! लेख आवडला, ह्या पोह्यांवर बोंबलाचे चूर्ण/भुकटी / पावडे चिमूटभर घेऊन थोडी भुरभुरावी. आणखी चविष्ट लागतील.
नॉनवेज प्रेमींसाठी चांगला…
In reply to अरे वा! लेख आवडला, ह्या… by अमरेंद्र बाहुबली
नॉनवेज प्रेमींसाठी चांगला पर्याय आहे
श्रीगुरुजी, लिहीत रहा.
पोहे मस्त. एकदोन दिवसात करून बघीन.
तुम्ही लिहीत रहा. पुष्कळसे जुने जाणते मिपाकर आता मिपावर लिहीत नाहीत, त्यांची उणीव जाणवते. मोठ्या मेहनतीने, खूप वेळ खर्च करून चांगला लेख लिहावा, त्याला अगदी थोडे प्रतिसाद मिळून तो लवकरच रसातळाला जावा, याउलट राजकारण वगैरेंचे लेख, त्यातले आकसाने लिहीलेले प्रतिसाद वगैरेंमुळे ते नेहमी वर रहावेत, यामुळे चांगले लेखक हतोत्साहित होऊन लेखनसंन्यास घेतात, असे दिसते. तरी नेटाने लिहीत राहिले पाहिजे, असे वाटते.
सहमत आहे.
In reply to श्रीगुरुजी, लिहीत रहा. by चित्रगुप्त
सहमत आहे.
जे न देखे रवी वाल्यांना तर…
In reply to श्रीगुरुजी, लिहीत रहा. by चित्रगुप्त
जे न देखे रवी वाल्यांना तर जे रवी पाहणार नाही ते आम्हीही पाहणार नाही टाईप्स कधीकधी एकही प्रतिसाद येत नाही, तरी बिचारे नेटाने लिहीत राहतात.
ताई
In reply to जे न देखे रवी वाल्यांना तर… by श्वेता व्यास
गिल्टी ॲज चार्ज, मला मुळात यमक सुद्धा लग्नातील मंगलाष्टके सोडून ऐकिवात येत नाहीत. त्यात शेरोशायरी सोबत जन्मजात वाकडे. गझल म्हणले की थोरले गुलाम अली, गुलाम अली अन् जगजीत सिंह सोडून संबंध नाही, त्यात पण होश वालो को खबर क्या सोडून ऐकणे नाही, त्यामुळे वृत्त, अलंकार, प्रास इत्यादी टोटल एलियन आम्हाला. मी कवितेवर बोलणे म्हणजे बहिऱ्या माणसाने लता मंगेशकरच्या नोट्स करेक्ट करणे, त्यामुळे मी तरी त्या वाटेला जात नाही कधीच.
सेम प्रॉब्लेम 🫣😶
In reply to ताई by वृषभ खोंडे
सेम प्रॉब्लेम 🫣😶