त्या काळ्या मनीचे मज लागले पिसे ग
न कळे मनास आता कोठे शोधू त्यास ग
येते ऐकण्यास जेंव्हा गोड म्याव-म्याव
चोही कडे बघे मी, पकडण्यास घेते धाव ग
हलते शेपटी ही लडीवाळ करते चाळा
दुध पिउन तट्ट ती, माझ्यावर फिस्करी ग
खुपते मनास माझ्या ती मटण खाई शेजारी
डोळ्यात दिसते मग तिच्या, मलाच फितुरी ग
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1128
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान आहे बालकविता.
चांगली आहे.