Skip to main content

गेले ते दिवस... आता राहिल्या त्या फक्त आठवणीच

लेखक देवांग यांनी बुधवार, 14/08/2013 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
90 चा दूरदर्शन आणि आपण- 1. रविवारी सकाळी अंघोळ करून टीव्ही समोर बसायचो... . 2. "रंगोली" मधल्या जुन्या नवीन गाण्यासाठी वाट बघायची... . 3. "जंगल-बुक" बघण्यासाठी सगळे मित्र मंडळी घरी जमायची... . 4. शक्तिमान बघण्यासाठी पळत पळत येऊन टीव्ही समोर बसायचं... . 5. रामायण-महाभारत चालू होताच घरातले सगळे एकत्र जमायचे... . 6. "चंद्रकांता" पाट्या पासून शेवट पर्यंत बघायचं... . 7. चंद्रकांता चा शेवट सस्पेन्स असायचा आणि आपण आठवडाभर याचा विचार करत बसायचो... . 8. शनिवार आणि रविवार च्या पिक्चर ची वाट बघत बसायची... . 9. कोण जर नेता मेला आणि नेहमीच्या सिरीयल लागल्या नाहीत तर त्या नेत्याला मनापासून शिव्या घालायच्या... . 10. सचिन आउट झाल्यावर ब्याट-बॉल घेऊन गप बाहेर खेळायला जायच... . 11. "मूक-बधिर" समाचार लागलेकि त्यांची नक्कल करायची... . 12. हवने ऐन्टेना हलला तर त्याला छतावर जाऊन हलवत बसायचं... . . गेले ते दिवस... आता राहिल्या त्या फक्त आठवणीच..... :( :(
लेखनविषय:

वाचने 3427
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

१९८५-८६ च्या सुमारास एअर होस्टेस नावाची एक सिरियल असायची त्यात किटू गिडवानी नावाची एक सुंदर अभिनेत्री होती. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणीच.

शेकडो वाहिन्यांच्या जंजाळात सुद्धा आजही दूरदर्शन चे ते दिवस तसेच मनात कोरले गेले आहेत. (तो दूरदर्शन चा लोगो … पंडित भिमसेन जोशी आणि इतरांच्या च्या आवाजातले "मिले सूर मेरा तुम्हारा" हे गीत… रामायण ची "मै समय हु" म्हणून होणारी सुरवात…देख भाई देख, अलिफ लैला यासारख्या मालिका …. तहकिकात आणि व्योमकेश बक्षी या सारख्या रहस्य कथा… किंवा "विको टरमरिक नही कॉस्मेटीक …." ही विकोची किंवा "ट्वाई…. इंग…" म्हणत सुरु झालेली निरमा ची जाहिरात…. किती आठवणी सांगाव्यात त्या काळच्या … हं… ! गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ! जेष्ठ कवी प्रा. अरुण म्हात्रे यांच्या शब्दात सांगायचे तर … "ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची दूर ती गेली तरी तिची सावली भेटायची ! फाटके होते खिसे अन नोट ही न्हवती खरी पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची ! ते दिवस आता कुठे ?… देवांग जी…तुम्ही माझ्या जुन्या आठवणी जाग्या केल्याबद्दल तुमचे आभार !

In reply to by psajid

धाग्याचा मूळ मजकूर हा ढकलपत्राप्रमाणे वाटला - फेसबुकावर याच नावाचे पान देखील आहे हा योगायोग आहे का ते माहीत नाही... रामायण ची "मै समय हु" म्हणून होणारी सुरवात अहो ते महाभारत हो! ९५ भाग बघितल्यावर महाभारताचे रामायण केलेत का काय? ;) रामायणातील रविन्द्र जैनच्या तारसप्तकातील ताना आणि तेच तेच बाण बघून मात्र केवळ त्या संदर्भात, गेले एकदाचे ते दिवस असे म्हणावेसे वाटले.... असो.