Skip to main content

रुणझुणू रुणझुणू रे भ्रमरा (चार)

लेखक संजय क्षीरसागर यांनी शनिवार, 10/08/2013 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
महाराज अधिक देखणे तरी निरंतर पाहणे योगिराज विनवणें मन आले ॐ मयी । (श्री ज्ञानेश्वर महाराज) फक्त समोर पाहण्यानं तुम्ही मनाच्या चकव्यातनं बाहेर पडू शकता! ____________________________________ ज्ञानेश्वर महाराजांच्या चित्तदशेशी एकात्मता साधून, अत्यंत शांतपणे; त्यांनी वर्णन केलेली ही काव्यात्मक प्रक्रिया समजावून घेऊ. मनाची तीन प्रमुख अंग आहेत : दृक, वाक आणि श्राव्य. या अभंगात महाराज दृक प्रक्रियेविषयी सांगतायत. ही एक प्रक्रिया साधल्यावर, मनाच्या इतर दोन प्रक्रिया तुमच्या काह्यात येतात... 'मन आले ॐ मयी' हा तुमचा अनुभव होतो... महाराजांच्या चित्तदशेशी आपण समरूप होतो. ______________________________ पाहणं आपल्या जाणिवेचा जवळजवळ ऐंशी ते पंचाऐंशी प्रतिशत भाग व्यापून आहे. नजर आपल्या आकलनाचं सर्वात प्रमुख साधन आहे. त्यामुळे मेंदूचा अत्यंत मोठा प्रभाग दृक स्मृतींनी व्यापला आहे. आपल्याला वाटतं पाहतो तर आपण सदैव आहोतच, 'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' यानं विशेष काय साधणार आहे? पण मजा म्हणजे आपण 'फक्त पाहत' नाही, पाहताना विचार करतो... आपण सक्रिय झालेल्या मनानं पाहतो. त्यामुळे : चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला तैसा म्यां देखिला निराकार ॐ मयी । हा आपला अनुभव होत नाही. आपली नजर सतत प्रकट जगावर राहते, व्यक्त गोष्टींवर राहते, आकार पाहते; सर्वव्यापी 'निराकार ' आपल्याला दिसत नाही. _______________________ ट्राय टू अंडरस्टँड धिस, एखाद्या निवांत वेळी पाहण्याच्या प्रक्रियेचं आकलन करून घेण्याचा प्रयत्न करा. समोरची वस्तू दिसते, मग स्मृतीतल्या आकाराशी वेरिफाय करून मन आपल्याला ती काय आहे याचं 'नांव' सांगतं. तो आकार आणि नांव स्मृतीत मॅच झालं की आपल्याला कळतं, 'सफरचंद'. पण गाडी तिथे थांबत नाही, कारण स्मृती सक्रिय झालेली असते. मग सफरचंदावरनं अ‍ॅडम, इव्ह किंवा न्यूटन> गुरुत्वाकर्षण> बाग > मग सखी बरोबर आपण गेलो होतो ती बाग डोळ्यासमोर तरळते > मग तिच्या समवेत हनीमून >त्यानंतर झालेले वादंग स्मरतात.. आणि असं होताहोता समोरचं सफरचंद दिसेनासं होतं. थोडक्यात आपण 'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' असं पाहत नाही. आपलं पाहणं आणि विचार करणं सायमल्टेनिअसली चालू असतं. आणि हे एकदा-दोनदा नाही तर नेहमी, सतत, निरंतर चालू असतं. जागेपणी आपण त्याला विचार म्हणतो आणि निद्रेत स्वप्नं, इतकाच काय तो फरक! ________________________ झेन संप्रदायात झाझेन (Zazen ) नांवाची ध्यानप्रणाली आहे. भिंती समोर साधारण दोन फूट अंतरावर बसायचं आणि शांतपणे समोरच्या रिकाम्या भिंतीकडे पाहत राहायचं. तुमच्या लक्षात येईल मनाचा प्रोजेक्टर भिंतीवर विविध प्रतिमा प्रोजेक्ट करायला लागतो आणि आतमध्ये संवाद सुरू होतो. साधना मजेशीर आहे. दहा मिनिटं जर आपण बसलो तर केवळ काही सेकंद समोरची भिंत दिसते आणि आजूबाजूला काय चाललंय ते ऐकू येतं. त्या काही सेकंदभरापुरते आपण मनाच्या चकव्यातून बाहेर पडलेलो असतो. 'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' म्हणजे समोरची भिंत अधिकाधिक वेळ दिसणं आणि त्या वेळी आजूबाजूला चाललेलं स्पष्टपणे ऐकू येणं. असे निर्विकल्प क्षण जितके दीर्घकालीन होतील तितकी तुमच्या जीवनात शांतता येईल. पुढेपुढे ती शांतता भिंत समोर नसताना देखिल तुम्ही अनुभवाल. कारण प्रश्न भिंतीचा नाही, मनाची अविरत प्रक्रिया थांबण्याचा आहे. _________________________________ देहबळी देऊनी साधिली म्यां साधनी तेणे समाधान मज जोडले ॐ मयी । त्या निर्वेध क्षणात तुम्हाला कळेल की पाहणारा देहापेक्षा वेगळा आहे. देह बसलाय आणि आपल्याला कळतंय. मग दैहिक विवंचनांतून तुम्ही हळूहळू मोकळे व्हायला लागाल. वय, वजन, व्याधी, वार्धक्य शरीराला आहे, आपल्याला नाही, हा उलगडा तुम्हाला होईल. त्या समाधानातून मनाची प्रक्रिया आणखी शांत व्हायला लागेल. ___________________________ अनंगपण फिटले मायाछंदा साठविले सकळ देखिले आत्मस्वरूप ॐ मयी । असा निवांतपणा सघन होत गेल्यावर एक दिवस अचानक तुम्हाला, भिंत आणि शरीरामध्ये असलेलं 'अंतर' दिसेल. तुमची नजर केवळ भिंत न पाहता, शरीर आणि भिंत यातली स्पेस पाहू लागेल. त्या स्पेसवर, निराकारावर, नजर स्थिर होईल. ज्या क्षणी तुम्हाला निराकार दिसेल त्या क्षणी समोर पाहणार्‍या नजरेचं रिवर्सल होईल. तुमची नजर दुहेरी होईल. भिंत आणि शरीर या दोन्ही गोष्टी ती एकावेळी पाहू लागेल. तुम्ही समरसतेनं प्रक्रिया केली तर तुमच्या लक्षात येईल की हा निराकार फक्त समोर नाही. तो आत-बाहेर, इथे-तिथे, सर्व व्यापून आहे; सकळ आहे. प्रत्येक आकार अंतर-बाह्य व्यापून आहे. तो सकळांचं आत्मस्वरुप आहे. तुम्हाला बुद्धाची अलौकिक बुद्धिमत्ता कळेल... 'कुणाच्याही आत कुणीही नाही'. जग माया आहे म्हणजे `ते नाही' असं नाही. तो भास नाही. स्वच्छंद आहे. तुमचं जगणं उत्स्फूर्त होईल, आनंदाच होईल. __________________________ पुरे पुरे आता प्रपंच पाहणे निजानंदी राहणे स्वरुपी ॐ मयी । हा निराकार दिसणं तुम्हाला तरल करेल. त्या तरलतेला निजानंद म्हटलंय. तुम्ही प्रपंच कराल पण त्याचं ओझं राहणार नाही. ________________________________ ऐसा ज्ञानसागरु रखुमादेविवरु विठ्ठलु निर्धारु म्यां देखिला ॐ मयी । हा निराकार सर्व ज्ञानाचा स्रोत आहे. ओशो म्हणतात : ज्ञानी सर्वज्ञ होता है इसका मतलब ये नही की वो पंक्चर निकाल लेगा या बिना सिखे हवाई जहाज उडा लेगा. ज्ञानी जाननेकी क्षमताको उपलब्ध होता है. जिस चिज़मे वह रस लेगा उसे समग्रतासे जान लेगा (अष्टावक्र महागीता) असा हा निराकार निर्धारानं, सदासर्वकाळ, तुमच्या समोर उभा आहे. त्याला कोणत्याही आधाराची गरज नाही. तुम्ही फक्त 'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' इतकंच करायचंय. तो आकार नाही, स्थिती आहे. आणि तुम्ही त्यापासून वेगळे नाही. तुम्ही आणि तो एकरूप आहात. केवळ मनाच्या अविरत प्रक्रियेनं तुम्हाला त्याचं दर्शन दुर्लभ झालंय. __________________________ या काव्यपंक्ती प्रक्रिया आणि परिणाम दोन्ही सांगतात. 'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' ही प्रक्रिया आहे आणि 'मन आले ॐ मयी' हा मनाच्या 'वाक' भागावर तिचा होणारा परिणाम आहे. 'मन आले ॐ मयी' ही तितकीच रम्य स्थिती आहे. वैखरी>मध्यमा>परा>पश्यंती या प्रक्रियेतनं आपण ध्वनिशास्त्र काय आहे ते जाणून घेणार आहोत. स्वरमाधुर्य कशानं निर्माण होतं याचा वेध घेणार आहोत . त्या प्रक्रियेनं आपण वैश्विक शांतीशी एकरूप होतो. 'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' यावरचे प्रतिसाद आणि अनुभव तुम्ही लिहीलेत, की त्याविषयी पुन्हा केव्हा तरी.
लेखनविषय:

वाचने 37926
प्रतिक्रिया 153

प्रतिक्रिया

In reply to by उन्मेष दिक्षीत

मीही त्यांचे लेख वाचतो. आणि ज्या काही शंका असतील त्या विचारतो. त्यांना ते उत्तरे देत नाहीत. तुम्हाला फायदा झाला, तुमच्यासाठी ही वाक्य मोलाची आहेत, मान्य. मी वर लिहील्याप्रमाणे संक्षींच्या पद्धतींचा/ अनुभवाचा/ गायडन्सचा फायदा होणारच नाही असा दावा कुठेच केलेला नाही. तुम्हाला बहुधा त्या वेळेस/ अजूनही त्याची गरज होती/ आहे इतर पद्धती तुमच्यासाठी उपयोगी पडत नव्हत्या/ नाहीयेत म्हणून तुम्ही अनुभवण्याचा प्रयत्न केला. बाकीच्यांन गरज नसेल तर/ त्यांच्यासाठी इतर पद्धती उपयोगी पडत असतील तर माझीच पद्धत श्रेष्ठ हा दावा का? किंवा एखाद्याने जर त्याच्या पद्धतीचे उदाहरण दिले तर त्याला मूर्खात काढायची गरज काय? एक विचारतो, तुम्हाला तुम्ही सत्य आहात हे कळले आहे तर मग आजही त्यांचा गायडन्स कशाला लागतो? लेखावरून तर असे वाटते की एकदा तुम्ही सत्य आहात हे कळले की सर्व प्रॉब्लेम्स संपतात आणि आयुष्याची मजा येते.

In reply to by उन्मेष दिक्षीत

मी स्वतः २०१० पासुन सरांचे सगळे लेख वाचलेत > सेम पिंच. त्यांचे मनोगतावरचे सगळे ६०-६५ लेख मीदेखिल वाचलेत.पण गम्मत अशी आहे की त्यांचे इतर संस्थळांवरचे देखिल वाचलेत. शिवाय त्यांच्या सगळ्या प्रतिक्रियादेखिल वाचल्या आहेत. तुमचा अभ्यास कमी पडतोय की काय अशी शंका आहे. त्यांच्या लेखांशिवाय इतर पुष्कळ ओरिजिनल वाचन केलेले आणि आयुष्याचा खोलवर अनुभव घेतलेले अनेक आयडी इथे आहेत. पण ते असं प्रत्येक गोष्टीला तुच्छ लेखण्याचे प्रकार करत नाहीत. आपला अनुभव मांडून मोकळे होतात. आक्षेप घेतला जातो लिहिण्याचा टोन आणि केलेले दावे याला. एक सुचवणी: तुम्हीच का लिहित नाही लेख तुमच्या अनुभवावर? तुमचा लिहिण्याचा टोन फार सभ्य आहे. बरं वाटतय वाचायला.

@लंबूटांग
एक विचारतो, तुम्हाला तुम्ही सत्य आहात हे कळले आहे तर मग आजही त्यांचा गायडन्स कशाला लागतो?
>> मी मला सत्य समजलंय असा दावा केलेला नाही. @लीमाउजेट थँक्स फॉर धीस :) -
तुमचा लिहिण्याचा टोन फार सभ्य आहे. बरं वाटतय वाचायला.
>> मला काही लिहिता आलं असतं तर लीहिलं असतं आत्तापर्यंत. आणि मला काय अनुभव आलेत किंवा नाही हे मला क्लेम नाही करायचंय इथं. माझा उद्देश हे सांगणं होता , मला एखादा लेख जर कळाला, पटला, (अगदी संपुर्ण नाही तरी) तर लेखाच्या अनुशंगाने मला प्रश्न विचारता येतील. जर मला अगदी पुर्णच नाही कळाला किंवा पटला आणि लेख हा जर लेखकाचा अनुभव आहे पण मला याच्याबद्दल डाउट आहे तरीही मी लेख / लेखकावर टीका करुन माझं दुसरं मत अगदी हीरिरीने मांडलं तरीही कुणाला काय उपयोग त्याचा ? बर, माझ्या पद्धती या लेखातल्या पेक्षा वेगळ्या असतील (टेक फॉर इन्स्टन्स नामस्मरण) आणि माझ्यासाठी जर ती वर्क होत असेल तर वेल अँड गुड. इन दॅट केस आय डोन्ट नीड टु डिफेंड एनीथींग हीअर. माझी पद्धत तुच्छ लेखली गेली आहे असं मला वाटायचा प्रश्नच येणार नाही. मी मग लेखातल्या पद्धती एक तर काहीतरी नवीन आहे म्हणून ट्राय करुन वेरिफाय करू शकतो, किंवा मी माझ्या सध्याच्या पद्धतीने कधीही कंटीन्यु करुच शकतो, इथं कुणाला काय कंपल्शन आहे ? प्रत्येक जण ठरवू शकतोच की काय करायच काय नाही. पण जर माझ्याकडे नुसती माहीती आहे दोन्ही पद्धतींबद्दल आणि दोन्हीही मी करून नाहीत बघीतल्या (भलेही कुणीही सांगीतल्या असल्या तरीही )तर मग मी कसं ठरवु शकतो कि ही पद्धत चांगली कि ती ? अशावेळी लेख पटणं किंवा न पटणं याचासुद्धा प्रश्न रहात नाही. मग मला काय पर्याय उरतो ?

In reply to by उन्मेष दिक्षीत

आता याचा विचार करून पहा. "मला एखादा लेख जर कळाला, पटला, (अगदी संपुर्ण नाही तरी) तर लेखाच्या अनुशंगाने मला प्रश्न विचारता येतील." जर लेखक प्रत्येक प्रश्नाला सरळ उत्तर न देता तुमच्या आकलनक्षमतेविषयी शंका उपस्थित करत असेल मीच किती मोठा हे दाखविण्याचा प्रयत्न करत असेल आणि अडचणीचे प्रश्न सरळ कबुली न देता टाळत असेल तर? "मी लेख / लेखकावर टीका करुन माझं दुसरं मत अगदी हीरिरीने मांडलं तरीही कुणाला काय उपयोग त्याचा " हाच न्याय लेखाला लावला तर लेख लिहिण्याचे प्रयोजनही उरत नाही हे पटतं काय? "माझी पद्धत तुच्छ लेखली गेली आहे असं मला वाटायचा प्रश्नच येणार नाही" प्रत्येक वेळी आपली रेषा मोठी आहे असं भासविण्यासाठी दुसरी लहान आहे हे पुनःपुनः ठळकपणे सांगण्याची गरज असते का? "इथं कुणाला काय कंपल्शन आहे " प्रत्येक वेळी लेखकाकडून अशी जबरदस्तीचीच भूमिका घेतली जात असेल तर? (उदा. तुम्ही नामस्मरण करता मग तुम्ही वेळ व्यर्थ घालवत आहात) याचे पुरावे लेखकाच्या सगळ्या प्रतिसादात आढळतील. ते शोधून दुवे देण्यात वेळ घालवणे शक्य नाही. असो... माझ्या समजुतीप्रमाणे इथे लेखाला किंवा लेखातील विचारांना विरोध होण्यापेक्षा त्याचा मांडणीला जास्त विरोध होत आहे. लेखक लेखात आणि प्रतिसादात जी भाषा वापरतो त्याला विरोध आहे. "मी काहीही लिहीन कुणालाही काहीही बोलेन पण कुणीही प्रतिवाद करायचा नाही की विरोधी शब्द काढायचा नाही. सगळे माझ्यासमोर तुच्छ आहेत" या वॄत्तीला विरोध आहे. बघा पटतंय का...

कोणते प्रतिसाद सर्वात जास्त करमणूकीय आहेत याची यादी द्यारे कोणीतरी. साला इतक्या प्रतिसादात शोधायचं म्हणजे अवघड आहे!

सार्‍या आंतरजालीय दुनियेत मला प्रत्यक्ष (आणि ते सुद्धा फक्त एकदाच) भेटलेला, केवळ एक माणूस आहे - उन्मेष दिक्षीत! अँड आय एम रियली थ्रील्ड! वॉट अ ट्रान्सफॉर्मेशन! इतक्या प्रत्यक्ष पुराव्याची मी कधी कल्पना देखील केली नव्हती. बाय द वे, उन्मेष; इथे माझ्यावर मुख्य आरोप इतरांना तुच्छ लेखणं असा आहे. इंटरनेट असं माध्यम आहे की जिथे सगळं तारीख, वार आणि घटनाक्रमानं उपलब्ध असतं. मी फक्त तीन उदाहरणं देतो म्हणजे नक्की काय प्रकार आहे ते तुझ्या लक्षात येईल. पहिले सदगृहस्थ (इतकेच नाही तर तरंगणे कसे मूर्खपणाचे आहे हे अतिशय हीन पद्धतीने सांगतायत) वाले, किती विनम्रपणे वागतात हे पहिल्या लेखावरच्या, त्यांच्या पहिल्याच प्रतिसादात बघण्यासारखं आहे :
मला तुमच्या लेखनावर काहीही प्रतिक्रीया देणे म्हणजे वेळ वाया घालवणे हे माहित आहे....जर काही लोकांच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स अथवा काय मानसिक ताण वगैरे वगैरे असतील त्या सर्वांवर त्यांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने उपाय शोधू देत की
दुसर्‍या मॅम (आक्षेप घेतला जातो लिहिण्याचा टोन आणि केलेले दावे याला) म्हणणार्‍या, किती सुरेख टोनमधे गर्भित अर्थ विचारतात हे देखिल वाचनीय आहे : निराकार ही जाणीवेचीच स्थिर अवस्था आहे >... म्हणजे कोमा का? तिसरे सर का कावलेत ते तुला, माझा पैसा हा लेख वाचला की लगेच लक्षात येईल. प्रश्न माझ्या लेखनाचा किंवा प्रतिसादांचा नाही कारण कोणताही व्यक्तिगत, किंवा एखाद्या सदस्याला तुच्छ लेखणारा प्रतिसाद इथे प्रकाशितच होऊ शकत नाही. त्यामुळे त्या म्हणण्याला काहीही अर्थ नाही. शिवाय इंटरनेटवर कुणीकुणाचं ऐकून घेत नाही. लोकांच्या धारणा फार लवचिक आहेत आणि लेखन त्या प्रश्नांकित करतं, ही वस्तुस्थिती आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

मग एक वेगळा लेखच लिहावा लागेल. उदाहरणादाखल खालील प्रतिसाद पहा.
`देव दिसणं' म्हणजे संपूर्ण भ्रमिष्ट झाल्याच लक्षण आहे
तुम्ही वर ज्या प्रतिसादाची लिंक दिलीये त्यालाच तुमचा प्रतिसाद
माझ्या लेखनात रस असणारे आणि मी पाहून घेऊ. तुम्ही मधे पडण्याची आवश्यकता नाही.
हा प्रतिसाद, विषयाचं संपूर्ण अज्ञान दर्शवतो. ... ... ... तुम्ही व्याख्येतच पराभूत झालात त्यामुळे पुढचा सर्व प्रतिसाद व्यर्थ आहे. अर्थात तुमचे आभार मानायलाच हवेत कारण `नामसाधनेचा' संपूर्ण भोंगळपणा तुम्ही (स्वतःच्या आकलनासहित) सविस्तर उलगडून दाखवला आहे.
तुम्ही आता विनोदी लिहायला लागलात! ... ... नका फंदात पडू दुरूस्तीच्या, तिथे दुरूस्ती लागतच नाही
हे सर्व तुमचे प्रतिसाद फक्त पहिल्या धाग्यावरच्या प्रतिसादातून वेचून काढले आहेत. बाकीचे ३ धागे शोधलेत तर एक लेख नक्कीच होईल.

In reply to by लंबूटांग

`देव दिसणं' म्हणजे संपूर्ण भ्रमिष्ट झाल्याच लक्षण आहे
ही वस्तुस्थिती आहे आणि त्यात व्यक्तिगत रोख (खरं तर, तुमच्यावर) नाही. तस्मात, उदाहरण रद्द.
माझ्या लेखनात रस असणारे आणि मी पाहून घेऊ. तुम्ही मधे पडण्याची आवश्यकता नाही.
हे तुमच्या उपहासाला उत्तर आहे.
हा प्रतिसाद, विषयाचं संपूर्ण अज्ञान दर्शवतो.
यात खरं तर तुमचा काहीही सबंध नाही. पण जे लिहीलंय ते मुद्देसूद आहे.
तुम्ही आता विनोदी लिहायला लागलात!
इथेही तुमचा संबंध नाही पण सोयिस्करपणे, ज्या प्रतिसादाला ते उत्तर आहे त्यातला उपहास तुम्ही वगळला आहे. (त्यांचे स्वतःचे विपश्यनेवरचे लेख इथे प्रकाशित आहेत, त्यामुळे त्यांना अध्यात्मिक टर्म्सची पुरेशी कल्पना आहे. त्या स्वतः संपादिका आहेत त्यामुळे `गर्भित अर्थ' त्या बरोब्बर नियमात बसवतात. या गोष्टी लक्षात घेऊन ते प्रतिसाद वाचले तर नेमका अर्थ कळेल.) मला वाटतं `आता सुरूवात कोण करतं' हे एकदम स्वच्छ आहे. त्याविषयावर परत चर्चा करण्यात अर्थ नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

तरीही लहान तोंडी मोठा घास घेऊन म्हणावेसे वाटते मोठे व्हा. हे सुरूवात कोण करते आणि शेवट कोण करते वगैरे मी लहानपणी करायचो चुलत मामे बहिणींच्या तक्रारी करताना. पहिली गोष्ट म्हणजे ही पब्लिक फोरम आहे. तुम्ही लेख सर्वांसाठी लिहीलेत. प्रतिसादही सर्वच वाचतात. ओपन फोरमवर प्रश्न विचारण्याचा आणि प्रतिसाद देण्याचा मुद्दाच हा असतो की पब्लिक ला उपयोग व्हावा. त्यामुळे मला प्रतिसाद दिलेत का अजून कोणाला हा मुद्दा नाही. मी वर केवळ उदाहरणादाखल काही प्रतिसाद उद्धृत केले. तुम्ही तर मला प्रतिसादच देणे बंद केले आहेत. मधेच एकदा येऊन मला दिलगीरी वगैरेही व्यक्त करायला लावली आहेत. कशाबद्दल ते मलाच माहिती नाही. मनःपूर्वक विचारले तर तुम्ही उत्तरही दिले नाही. त्यामुळे मलाच दिलेले प्रतिसाद कसे लिहीणार. मुद्दा तुम्ही मला कोणते प्रतिसाद दिले आणि का दिलेत हा नाही, तुम्ही जे सो कॉल्ड प्रूफ दिलेत ना, तर तसेच प्रूफ तुमच्या स्वतःच्या प्रतिसादांत अनेक ठिकाणी आहेत ते दाखवून दिले. इतकेच. मला तेवढे खोद्काम करत बसायला वेळ नव्हता काल. हापिसात ह्याप्पी अवर असल्याने फुकटचे अ‍ॅपटायझर्स आणि बीअर ढोसायला पळायचे होते नाहीतर इतरही ठिकाणचे प्रूफ शोधून दिले असते. पण एकंदरीत आयडीया आली असेल. ते आमचे हापिसवाले स्वच्छंद जगतच नाहीत हो. फक्त ४:३० ते ६:३० या वेळातच या सांगतात. (शेवटची २ वाक्ये ही उपहासात्मक आहेत. कृपया उपहासाचे उदाहरण देण्याशिवाय इतर कसलाही प्रूफ म्हणून कुठेही quote करू नयेत.) तुमचे जे दावे आहेत ना, की असे वैयक्तिक रोख असलेले प्रतिसाद प्रदर्शितच होऊ शकणार नाहीत, ते मनोगतावर बरोबर आहेत. तिथे प्रदर्शित होण्याआधी फिल्टर केले जातात माझ्या माहितीप्रमाणे. सद्ध्या बदल झाला असल्यास माहिती नाही. पण मिपावर तरी सर्व काही प्रकाशित होते आणि नंतर संपादक फिल्टर करतात. तसे तुमचे कैक प्रतिसाद आणि लेखही उडालेही आहेत. तुम्ही जो मला inferiority complex आहे असा लिहीलेला प्रतिसाद देखील उडाला आहे बहुतेक. असो. आता माझ्या लिंकवलेल्या प्रतिसादाबद्दल २ गोष्टी.
  1. तिथे लिहीले आहे की तो तुमचे सर्व लेखन आणि प्रतिसाद बॅक ट्रॅक करून दिलेला आहे. फक्त त्याच लेखाला/ प्रतिसादाला नाही.
  2. मी जे वेळ वाया घालवणे लिहीले आहे तेही ह्या बॅक ट्रॅक करून आलेल्या अनुभुतीतून लिहीले आहे. तुम्ही माझ्या प्रश्नांना उत्तरे नं देऊन त्याला पुष्टीच दिलीत. "प्रूफ" हवा असेल तर हा घ्या. consolidated प्रूफ.
बादवे. हा आणि इतर सर्व प्रतिसाद म्हणजे त्या पहिल्या लेखातच लिहील्याप्रमाणे सध्या हातात प्रचंड मोकळा वेळ आहे ह्याचा प्रूफ समजावा. अवांतर: तुमची दुसर्‍या कोमा वाल्या प्रतिसादाची लिंक चुकली आहे. माझ्याच प्रतिसादाला जातेय.

आत्मैव आत्मनो बंधू आत्मैव रिपुरात्म्ना I आत्मैव आत्मनो बंधू आत्मैव रिपुरात्म्ना I आध्यात्माच्या क्षेत्रात पाऊल टाकताना पहिला धडा असतो Let it go. ज्याला ज्ञान मिळविण्याची आस आहे तो योग्यते प्रमाणे गुरु शोधतो गुरु शिष्याला शोधून हे ज्ञान घे, हेच ज्ञान घे असे नाही सांगत.