Skip to main content

वेदना

लेखक सार्थबोध यांनी मंगळवार, 13/08/2013 13:49 या दिवशी प्रकाशित केले.

अस्त सूर्याचा पाहुनी
मी किरणांसाठी झुरतो ll १ ll

ती वेळ सुरु परतीची
थवा घरट्यास उडतो ll २ ll

सांजेचा दीप तोही
एकलाच गाभारी जळतो ll ३ ll

दिव्यास सोबत माझी
तो वातीत काजळतो ll ४ ll

भाव दाटला नयनी
अलगद गाली ओघळतो ll ५ ll

जणू सन्यस्त होऊनी
मी ओठी दु:ख थोपवतो ll ६ ll

गोठली वेदना एकांती
मी स्मृतींमागे पळतो ll ७ ll

झाकून दर्दभावना सारी
मी मलाच रे सावरतो ll ८ ll

आरशास पाहता फिरुनी
तो नकळत काही सुचवतो ll ९ ll

वाटे चेहराच मला माझा
काय असा फसवतो ll १० ll

- सार्थबोध

लेखनविषय:

वाचने 1007
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

अस्त सूर्याचा पाहुनी, मी किरणांसाठी झुरतो |
ती वेळ सुरु परतीच|, थवा घरट्यास उडतो ||

अशी करुन वाचली, अजुनच आवडली.