✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

महाबलिपुरम

म
मृत्युन्जय यांनी
Mon, 08/12/2013 - 16:18  ·  लेख
लेख
हा लेख कलादालनात टाकावा की जम मध्ये याबद्दल जरा साशंक होतो. अखेर कलादालनात टाकायचे ठरवले कारण लिहिण्यासारखे माझ्याकडे फारसे काही नाही. न मला या इतिहासाबद्दल फारशी माहिती न महाबलिपुरमच्या प्रसिद्धा वास्तुशास्त्राबद्दल. त्यामुळे लिहिण्यासारखे फारसे काही माझ्याकडे नाही. परंतु कलादालनात काही एरर येत असल्याने परत जम मध्ये धागा टाकत आहे त्याबद्दल क्षमस्व. पण ही छायाचित्रे बघण्यापुर्वी थोडी माहिती ही हवीच. म्हणुन हा शब्दप्रपंच. महाबलिपुरम किंवा ममल्लपुरम हे भारतातल्या प्राचीन बंदरांपैकी एक. प्राचीन (म्हणजे ४ शतकापासुन) ग्रीक आणि चिनी प्रवासवर्णनात महाबलिपुरम बरोबरच्या व्यापाराचा उल्लेख येतो. पुर्वी केलेल्या उत्खननात चिनी आणि रोमन चलनी नाणी देखील सापडली आहेत. महाबलिपुरमचे नाव पुराणातल्या बळी राजावरुन पडलेले आहे. असे म्हणतात की प्राचीन काळी महाबलिपुरम मध्ये सोन्याची ७ पुरे होती. त्यांची कीर्ती इतकी पसरली की महाबलिपुरम इंद्राच्या अमरावतीप्रमाणे संपन्न समजले जाऊ लागले. त्यामुळे इंद्राने सागराला महाबलिपुरम उद्ध्वस्त करण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे महाबलिपुरमचे बरेचे वैभव सागराने गिळंकृत केले. काही गोपुरे पाण्याखाली गेली. पण विष्णुने बळीला दिलेल्या अभिवचनामुळे ते शहर संपुर्ण नष्ट होउ शकले नाही. १८ व्या शतकात विल्यम चेंबर्स नावाच्या एका गोर्‍या इतिहासकाराच्या टिप्पणानुसार तांब्याचे शिखर असलेले एक गोपुर १८ व्या शतकापर्यंत नक्की शिल्लक होते. महाबलिपुरम मधील समुद्रात बुडालेली काही मंदिरे अल्पशी दिसुन येतात. MM 1 MM 2 महाबलिपुरमचे हे प्राचीन नाव ७ व्या शतकात राजा नरसिंह वर्मन च्या नावावरुन ममल्ल्पुरम असे केले गेले. नरसिंह वर्मन हा एक निष्णात योद्धा आणि कुस्तीवीर होता. त्याला महा मल्ल ही उपाधी देउन गौरवण्यात आले होते. त्याच्या या उपाधीमुळेच आधी या गावाचे नाव महा मल्ल पुरम आणि मग ममल्ल्पुरम असे पडले. सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न असे हे बंदर एके काळी पालव राजघराण्याची राजधानी देखील होते. माझ्या मर्यादित माहितीप्रमाणे पालव किंवा पल्लव राजघराण्याचे मूळ थेट महाभारतातल्या द्रोणाचार्यांपर्यंत पोचते. पालव किंवा पल्लव राजघराण्याचा मूळ पुरुष पालव हा अश्वत्थाम्याचा मुलगा. महाभारतात मात्र अश्वत्थाम्याचे लग्न झाल्याचे अथवा त्याला कुठलीही संतती असल्याचे काही उल्लेख नाहित. पालव किंवा पल्लव या शब्दाचा अर्थ असे सुचवतो की पालव राजघराणे मूळचे दक्षिण भारतातले नसुन उत्तर भारतातले होते आणि नागांशी झालेल्या विवाहसंबंधातुन पालव राजघराणे दक्षिण भारतात विसावले आणि बहरले. सातवाहनांच्या पाडावानंतर आणि चोलांच्या घसरणीच्या काळात पालव राजघराणे प्रबळ झाले आणि दक्षिण भारतातले प्रमुख राजघराणे म्हणुन उदयास आले. साधारण याच सुमारास महाबलिपुरमचा सुवर्णकाळ होता. पालव राजघराण्यातील नरसिंह वर्मन आणि जयसिंह वर्मन यांच्या कारकीर्दीत महाबलिपुरमची स्थापत्यकला आणि वास्तुकला कळसाला पोचली असावी असे मानण्यात येते. येथील वास्तुकला कुठल्याही एका शैलीशी बांधील नसुन अनेक शैलींचा सुरेख संगम आहे असे समजले जाते. जाणकार लोक अनुषंगाने भर घालतीलच. या पहिल्या भागात आपण किनार्यावरच्या मंदिराची (Shore Temple) काही छायाचित्रे बघुयात. समुद्रालगतच्या या परिसरात ७ मंदिरे होती असे मानण्यात येते. त्यापैकी हे एकमेव उरले आहेत. बाकी ६ समुद्राच्या पोटात गडप झाली. इतिहासकारांच्या मते ती ६ मंदिरे ७ व्या वा ८ व्या शतकात कधीतरी समुद्रपातळी वाढल्यामुळे समुद्राच्या उदरात गडप झाली. तर पुराणांनी यालाच इंद्राच्या रोषाला बळी पडलेली मंदिरे म्हटले आहे. एक मात्र खरे की ही ७ मंदिरे एके काळी खलाशांना खुपच उपयोगी पडली आहेत. समुद्रात दुरवरुन ही सात मंदिरे आणि त्यांचे सोन्याचे कळस दिसुन यायचे आणि चमकायचे. त्यांचा खलाशांना दिशा ठरवण्यासाठी आणि जहाजे वळवण्यासाठी उपयोग व्हायचा. आता एकच मंदिर उरलेले आहे. त्यातलादेखील काही भाग समुद्राच्या उदरात गडप झाला होता आणि २००४ च्या त्सुनामीपर्यंत तो भाग स्थानिकांना देखील ज्ञात नव्हता. २००४ च्या त्सुनामीचे पाणी मंदिरापर्यंत पोचले आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटांता पाणी आटुन परत मूळ स्थानापेक्षा थोडे सूर गेले. त्यामुळे तोवर ज्ञात नसलेले एक मंदिर पाण्याबाहेर आले: हीच ती जागा हेच ते मंदिर :) Hidden Temple 1 Hidden Temple 2 पल्लवकालीन स्थापत्यकलेची जेवढी स्तुती करावी तेवढी कमीच. त्याकाळी या मंदिरातुन कांचीपुरमपर्यंत ५० किमी लांबीचा एक गुप्त भुयारी मार्ग काढण्यात आला होता. आपत्कालीन परिस्थितीत त्याचा उपयोगही करण्यात यायचा. Bhuyar मंदिराच्या प्रांगणात पल्लव राजघराण्याची मुद्रा असलेल्या सिंहाचे एक रेखीव शिल्पदेखील आहे. या सिंहाच्या उदरात दुर्गेचे शिल्प कोरण्यात आले आहे. स्थापत्यशास्त्रात मला अजिबात गती नाही. पण या शिल्पामध्ये चिनी स्थापत्यशास्त्राची झाक वाटली हे मात्र खरे. आता हे सिंह चिन्यांनी पल्लवांकडुन चोरले की पल्लवांनी चिन्यांकडुन की असे काही नसुन हा माझा भ्रमच आहे हे मात्र नाही सांगता येणार:  Pallava Lion मंदिराच्या आवारातच अजुन एक छोटेसे शिल्प आहे. हे इतर वास्तुच्या मानाने थोड्या खालच्या बाजुला आहे. समुद्राकाठची रेती आत येउ नये म्हणुन याच्या चारी बाजुंनी भिंत बांधण्यात आली आहे. या शिल्पाच्या बाजुला एक वराह आहे जो विष्णुच्या वराह अवताराचे द्योतक आहे. हा वराह पृथ्वीला समुद्राच्या पाण्यापासुन वाचवतो आहे अशी कल्पना केलेली दिसते. वरील भुयार याच शिल्पाच्या बाजुला आहे. Miniature मुख्य मंदिराचे ३ भाग करण्यात आलेले आहेत. त्यातील २ मंदिरे शंकराची असुन एक विष्णुचे आहे. एका मंदिरात शिव पार्वतीचे शिल्प कोरलेले आहे. हेच मुख्य मंदिर. याबद्दल २ प्रवाद असे आहेत की मंदिर शिव पार्वतीचे असुन शंकराच्या खांद्यावर कार्तिकेय आणि गणेश आहेत. तर दुसर्या मतप्रवाहानुसार दोने खांद्यांवर ब्रह्मा आणि विष्णु आहेत आणि हे शिल्प त्रिमुर्ती संकल्पनेचे आहे. पहिला प्रवाद जास्त पटतो मात्र. त्यात गणेशाचे शिल्प सोड आणि गजमुखाशिवाय आहे त्यामुळे शंकेला वाव उरतो. तर दुसरा मतप्रवाह मान्य केलास पार्वतीच्या शिल्पाचा संदर्भ कळत नाही. असे असुनही दुसरा युक्तिवाद सुद्धा मान्य करावासा वाटतो कारण पार्वतीच्या मांडीवर एक मूल दाखवले आहे. जर शंकराच्या खांद्यावर कार्तिकेय आणि गणेश आहेत असे मानले तर पार्वतीच्या मांडीवर कोण आहे ते कळत नाही. शिवाय शिल्पात शंकराच्या खांद्यावर असलेल्या २ व्यक्तींपैकी एक त्रिमुखी असल्याचा भास होतो. त्यावरुन ते ब्रह्माचे शिल्प मानले पाहिजे Trimurtee Shilp आता काही मंदिराची छायाचित्रे: Mandir 1 Mandir 2 Mandir 3 ****************************************************************************************************** क्रमशः पुढच्या भागात पांडव रथ, अर्जुन शिल्प आणि इतर
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रवास
भूगोल
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
8073 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

सुंदर चित्रे आणि माहिती...

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 08/12/2013 - 16:36 नवीन
सुंदर चित्रे आणि माहिती... जाणकारांनी या माहितीत अजून भर घातली तर अजून मजा येईल. कॉलिंग वल्लीसाहेब !
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो..

सौंदाळा
Mon, 08/12/2013 - 16:55 नवीन
हेच म्हणतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

दुसर्‍या छायाचित्रातला समुद्र

आदूबाळ
Mon, 08/12/2013 - 16:37 नवीन
दुसर्‍या छायाचित्रातला समुद्र फारच मोहक आलाय :)
  • Log in or register to post comments

मंदिर फार देखणे आहे. आवडलं.

बॅटमॅन
Mon, 08/12/2013 - 17:14 नवीन
मंदिर फार देखणे आहे. आवडलं.
  • Log in or register to post comments

मी 8वी असताना गेले होते, मस्त

त्रिवेणी
Mon, 08/12/2013 - 17:53 नवीन
मी 8वी असताना गेले होते, मस्त मंदिरे आहेत तिथे. तिथे अजुन राम आणि बंधु यांनी पण काही मंदिर निर्माण केले आहेत ना, त्या मंदिराचे पण फोटो असतील तर द्या ना प्लीज. माझ्या माहेरच्या घरी ते फोटो आहेत,पण आता हे वाचून त्या मंदिराची आठवण आली.
  • Log in or register to post comments

तिथे पांडव रथ आहेत पण राम

मृत्युन्जय
Tue, 08/13/2013 - 11:39 नवीन
तिथे पांडव रथ आहेत पण राम आणी बंधुंनी किंवा पांडवांनी बांधलेली मंदिरे पाहण्यात नाही आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी

सॉरी माझी काही तरी चूक होते

त्रिवेणी
Mon, 08/12/2013 - 17:54 नवीन
सॉरी माझी काही तरी चूक होते आहे. राम की अर्जुन बंधु? प्लीज जाणकारानी प्रकाश टाकावा.
  • Log in or register to post comments

सुंदर!

पैसा
Mon, 08/12/2013 - 18:04 नवीन
फोटो अप्रतिम आहेतच! माहिती सुद्धा बरीच नवीन आहे. द्वारकेप्रमाणे समुद्रात गडप झालेली मंदिरे शोधायचा कोणी प्रयत्न केला नाही का?
  • Log in or register to post comments

नाही नाही

मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 08/12/2013 - 18:14 नवीन
नाही नाही म्हणता म्हणता बरीच माहिती दिलीत कि तुम्ही... ;) असो. पण खुप सुंदर छायाचित्रे. येऊ दया पुढचे भाग.
  • Log in or register to post comments

पांडवरथांचे आणि अर्जुन/भगिरथ

कंजूस
Mon, 08/12/2013 - 19:01 नवीन
पांडवरथांचे आणि अर्जुन/भगिरथ तपश्ऱचर्याचे फोटो खुपदा पाहिले आहेत .तुम्ही काढलेले नवीन न पाहिलेले आहेत .माहितीपण छान आणि पुरेशी आहे .
  • Log in or register to post comments

छान माहिती. मंदिर सुरेख असणार

यशोधरा
Mon, 08/12/2013 - 20:08 नवीन
छान माहिती. मंदिर सुरेख असणार.
  • Log in or register to post comments

खूप छान लिहिलंय रे.

प्रचेतस
Mon, 08/12/2013 - 21:14 नवीन
खूप छान लिहिलंय रे. ही महाबलीपुरमची मंदिरे भारतातील बहुधा सर्वात जुनी मंदिरे आहेत. वेरूळचे अद्वितीय कैलास लेणे बांधतांना निर्मात्यांपुढे महाबलिपुरमच्या मंदिरांचाच आदर्श होता असे म्हणतात म्हणूनच ह्या दोन मंदिरांमध्ये कमालीचे साध्यर्म दिसून येते. टिपिकल द्राविड शैली. कळसाचे बांधकाम सुद्धा महायान बौद्ध स्तूपांच्या छत्रांतून उत्क्रांत झाल्यासारखे दिसते. ते शिवपार्वतीचे शिल्प म्हणतोस त्या मूर्तीला 'सोमास्कंद शिव मूर्ती' म्हणतात. म्हणजेच उमा आणि स्कंदासहित शिव. पार्वती शेजारी बसलेली असून तिच्या मांडीवर लहानगा स्कंद आहे. पाठीमागे ब्रह्मा आणि विष्णू उभे आहेत (ते शिवाच्या खांद्यावर नाहीत) चतुर्मुखी ब्रह्मा (ह्याची नेहमी तीनच मुखे दृश्यमान असतात) आणि हातात गदा आणि शंख धारण केलेला विष्णू अगदी सहजच ओळखू येतोय. बाकी पुढचा भाग लवकर येऊ देत.
  • Log in or register to post comments

मस्त..

प्रशांत
Tue, 08/13/2013 - 10:48 नवीन
खरच खुपच देखणे मंदिर आहे मागच्या महिन्यातच येथे जाऊन आलो. पण मंदिराबद्द्ल काहि विशेष माहित नव्हते. पुढचे भाग लवकर येवु द्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ही महाबलीपुरमची मंदिरे

बॅटमॅन
Tue, 08/13/2013 - 14:00 नवीन
ही महाबलीपुरमची मंदिरे भारतातील बहुधा सर्वात जुनी मंदिरे आहेत.
माझ्या माहितीनुसार फ्री-स्टँडिंग प्रकारातली भारतातली सर्वांत जुनी मंदिरे बदामी, पट्टदकल आणि ऐहोळे येथील आहेत इ.स. ६३४ च्या आसपासची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

रोचक आहे.

प्रचेतस
Wed, 08/14/2013 - 08:28 नवीन
रोचक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सुंदर!

धमाल मुलगा
Mon, 08/12/2013 - 21:43 नवीन
भलतंच सुंदर आहे हे! पुढच्या भागांची वाट पाहतोय. -(अडाणी) धम्या.
  • Log in or register to post comments

इथे एक बाळकृष्णाचे शिल्प आहे.

विजुभाऊ
Tue, 08/13/2013 - 00:40 नवीन
इथे एक बाळकृष्णाचे शिल्प आहे. दक्षीणेत अभावाने आढळणारा कृष्ण इथे आढळतो
  • Log in or register to post comments

सुरेख आहे लेख अन माहीती.

स्पंदना
Tue, 08/13/2013 - 05:28 नवीन
सुरेख आहे लेख अन माहीती. मला तेथील दगडात कोरलेला साखळदंड पहायचा आहे.
  • Log in or register to post comments

फोटो खूप सुंदर आले आहे.

जॅक डनियल्स
Tue, 08/13/2013 - 05:35 नवीन
फोटो खूप सुंदर आले आहे. मंदिराचे फोटो बघून थोडी गूढता वाटली,४ आणि ५ फोटो बघून पृथ्वीवर माणूस उपराच आठवले.;)
  • Log in or register to post comments

ज्यांना थोडी आणखी उस्तुकता असेल त्यांच्यासाठी

खबो जाप
Tue, 08/13/2013 - 11:16 नवीन
ज्यांना थोडी आणखी उस्तुकता असेल त्यांच्यासाठी https://plus.google.com/u/0/photos/104090404741416186438/albums/5911464995858903409 मागच्या महिन्यात गेलो होतो तेव्हा काढलेले फोटो.
  • Log in or register to post comments

तुमच्या कडचे ही फोटो ही मस्तच

त्रिवेणी
Tue, 08/13/2013 - 14:47 नवीन
तुमच्या कडचे ही फोटो ही मस्तच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खबो जाप

मस्त ! पुढच्या भागाची वाट

मदनबाण
Tue, 08/13/2013 - 12:57 नवीन
मस्त ! पुढच्या भागाची वाट पाहतो आहे.
  • Log in or register to post comments

लेख आवडला.

कानडाऊ योगेशु
Tue, 08/13/2013 - 15:31 नवीन
महाबलिपुरला जाण्याची सोय्,इटिनिअरी,राहण्याखाण्याची सोय ह्याबद्दलही माहीती मिळू शकेल काय? स्वतःच्या वाहनाने जायचे असल्यास कुठल्या रस्त्याने जावे? साधारण किती वेळ/दिवस महाबलिपुरमला द्यावी लागतील? आजुबाजुला अन्य पाहण्याची ठिकाणे आहेत काय?
  • Log in or register to post comments

शक्यतो पुढच्या अथवा शेवटच्या

मृत्युन्जय
Tue, 08/13/2013 - 15:41 नवीन
शक्यतो पुढच्या अथवा शेवटच्या भागात सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

पुभाप्र..

मुक्त विहारि
Tue, 08/13/2013 - 17:55 नवीन
पुभाप्र..
  • Log in or register to post comments

मंदिर फारच सुरेख दिसतंय.

किसन शिंदे
Tue, 08/13/2013 - 18:53 नवीन
मंदिर फारच सुरेख दिसतंय. पुढच्या भागाची वाट पाहतोय रे
  • Log in or register to post comments

मस्तच आहे महाबलीपुरम.

विलासराव
Wed, 08/14/2013 - 00:03 नवीन
मस्तच आहे महाबलीपुरम. १५ जुलैला भेट दिलीय. पण तुमचा लेख वाचुन बरीच माहिती समजली. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

महाबलीपुरम् ही एक

दशानन
Wed, 08/14/2013 - 09:50 नवीन
महाबलीपुरम् ही एक स्वप्नसृष्टी आहे. अभ्यासकाला भरपूर खाद्य आणि रसिकाला अविस्मरणीय अशी मेजवानी - म.श्री. माटे
  • Log in or register to post comments

खूप मस्त रे .आणखी येऊ दे!

प्यारे१
Wed, 08/14/2013 - 18:49 नवीन
खूप मस्त रे .आणखी येऊ दे!
  • Log in or register to post comments

मस्तच !

स्वतन्त्र
Wed, 08/14/2013 - 22:41 नवीन
मस्तच !
  • Log in or register to post comments

छान

प्रमोद्_पुणे
Wed, 08/21/2013 - 11:59 नवीन
माहिती आणि फोटो :)
  • Log in or register to post comments

सुन्दर

बेकार तरुण
गुरुवार, 08/22/2013 - 20:08 नवीन
सुन्दर फोटो आहेत. आवडले.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा