Skip to main content

देवांच्या निवडणुका... :)

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 16/09/2008 17:35 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1939
प्रतिक्रिया 57

प्रतिक्रिया

काही डिस्लेमर : १) जी कोणती एक शक्ति आहे जिला आपण देव मानतो त्या देवाचीच ही विविध सगुण रुपं आहेत. २) कौलाचा उद्देश - अ) तत्व एकच आहे, शक्ति एकच आहे परंतु वर उल्लेख केल्याप्रमाणे तिची सगुण रुपं अनेक आहेत. मिपाकरांना वरीलपैकी कोणतं सगुण रूप सर्वात जास्त आवडतं हे शोधण्याचा ह्या कौलाचा उद्देश आहे.. ब) विरंगुळा व मौजमजा. ३) सर्व पर्याय आवडतात हा पर्याय ठेवलेला नाही, वरीलपैकी एकच पर्याय निवडला पाहिजे अशी ह्या कौलाची अट आहे. ही मान्य नसलेल्यांना मतदानाचा आग्रह नाही... ४) जी मंडळी अशी एखादी शक्ति किंवा असं एखादं सगुण रूप मानतात, केवळ त्यांच्याकरताच हा कौल आहे. सबब, "वरीलपैकी एकालाही नाही" हा पर्याय ठेवलेला नाही! धन्यवाद... आपला, (कौलकर्ता) तात्या. बर्र का मंडळी, गणपतीबाप्पा हा आमचा अत्यंत प्रिय अन् लाडका देव. परंतु पंढरीचा विठोबा ह्याची जादू काही वेगळीच! सबब, गणपती आमचा अत्यंत लाडका असूनही आम्ही आमचे अमूल्य मत विठोबाला दिले आहे! :) सर्वांनी प्रचंड बहुमतांनी विठोबाला विजयी करावे ही विनंती... :) आपला, (विठ्ठलभक्त) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मत गणपतीला टाकलंय , पण विठोबा निवडून यावा असे वाटते. -दिलीप बिरुटे (लोकशाही प्रक्रियेत प्रतिनिधी पाठवतांना असाच गोंधळ करणारा )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

(लोकशाही प्रक्रियेत प्रतिनिधी पाठवतांना असाच गोंधळ करणारा ) हा हा हा! हे बाकी क्लासच... :) तात्या.

.

मारुतिराया... बोल बजरंगबली की जय... बिपिन.

आयला! हनुमान पण आघाडीवर आहे! :) आमच्या काळ्याचं काय?!! :)

In reply to by विसोबा खेचर

आमचं पंढरपुरचं मत आमच्या लाडक्या 'विठुरायालाच' ....
गणपतीबाप्पा हा आमचा अत्यंत प्रिय अन् लाडका देव. परंतु पंढरीचा विठोबा ह्याची जादू काही वेगळीच! सबब, गणपती आमचा अत्यंत लाडका असूनही आम्ही आमचे अमूल्य मत विठोबाला दिले आहे!
असेच म्हणतो ... आमचं मत 'विठोबामाऊलीलाच ' ... विठ्ठल विठ्ठल विठ्ठल !!! पंढरपुरकर विठुभक्त - छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

? ? ( कन्फ्युज्ड !!!! ) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मी अन्यला मत दिले आहे. मला सर्व देव सारखेच. प्रत्येक देवाची वेग वेगळी विशेषता आहे म्हणुन त्यांच्यात फरक कसा करावा ? हां पण एखाद्या ४ दिवसाच्या भुकेल्या गरिब माणसाला अन्न दिल्यावर त्याच्या चेहरयावर जी झळाळी येते ना त्यावेळी खरा खरा देव मला तिथेच भेटतो.

In reply to by श्री

मी अन्यला मत दिले आहे. आपले मत मोजले गेले आहे. अन्यला एकंदरीत ३ मते होती परंतु खुलासा फक्त आपल्या एकट्याचाच आला आहे. सबब, अन्यची दोन मते बाद! आपला, (मुख्य निवडंणुक अधिकारी) तात्या.

अन्यला मत दिलेल्यांनी "अन्यला मत दिले आहे' असा खुलासा करणारा प्रतिसाद लिहावा. तसा प्रतिसाद न आल्यास ते मत बाद ठरवले जाईल.... तात्या.

In reply to by मेघना भुस्कुटे

कोण खतरनाक? देवी की मत की प्रियाली? खुलासा पटकन करा. काळ्या यादीत नाव जाईल अन सैतान तुमच्या मागे लागतील.

In reply to by अवलिया

काळ्या यादीत नाव जाईल अन सैतान तुमच्या मागे लागतील.
खतरनाक वगैरे सर्व शब्दांनी देवी प्रसन्न होत असल्याने नाव काळ्या यादीत जाणार नाही. काळजी नको! ;) अवांतरः कोणता ब्लफमास्टर शम्मी कपूरचा की बच्चनपुत्राचा? दोन्ही पाहिले आहेत. आठवत मात्र नाहीत.

In reply to by प्रियाली

>> अवांतरः कोणता ब्लफमास्टर शम्मी कपूरचा की बच्चनपुत्राचा? दोन्ही पाहिले आहेत. आठवत मात्र नाहीत. दुसरा, बच्चनपुत्र बच्चनचा! त्यात नाना पाटेकर आरशाची पूजा करताना, उदबत्ती ओवाळताना वगैरे दाखवला आहे. खालचीच प्रतिक्रिया (http://www.misalpav.com/node/3526#comment-50059) बघ देवदत्तची, त्यांना आठवतोय तो बहुतेक >> खतरनाक वगैरे सर्व शब्दांनी देवी प्रसन्न होत असल्याने नाव काळ्या यादीत जाणार नाही. काळजी नको! देवी/ताई, आता प्रसन्न झाल्याच आहात तर काहीतरी आशीर्वादही द्या, (वर नको, तो आहे ;-) ) भक्त/छोटी अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पहिल्यांदा मला वाटले,श्रीदेवी म्हणून, पण पुढचे वाक्य वाचून अंदाज आला. :) "ब्लफमास्टर" -> चंद्रु :D

भगवंताची बाळरुपे फार आवडतात. बाळकृष्ण अन् रामलला या सगुणरुपांची सर अजुन कुणास येईल? तेव्हा त्यांस स्मरून सावळ्या विठोबास मत दिलेले आहे. :)

मी माझे मत श्री महालक्ष्मी मातेला दिले आहे. :) (अवांतर : अरे, स्त्री रुपातील एकच उमेदवार आहे वाटते)

माझे मत मी "अन्य" ला दिले कारण सर्व देव मला तितकेच भावतात आणि शेवटी हे अद्वैत आहे, त्यामुळे सर्व एकच आहेत हे ही मनापासून समजते. तरी देखील अनेक देव असण्याची संकल्पना मला आवडते. बाकी जाता जाता थोडे अवांतरः माझ्या एका सिंधी साहेबाचे त्याच्या गोर्‍या व्हि. पी. बरोबर झालेला हा संवाद: गोर्‍याने ह्या देशी माणसाला काहीतरी धर्म आणि अनेक देव असण्यावरून गंमत म्हणून उपरोधीक विचारले (त्यात खोचकपणा नव्हता). तेंव्हा आमचे सिंधीबाबा तितक्याच गंमतीत म्हणाले, "मला तुम्हा एक देव मानणार्‍यांची कीव वाटते" ह्याने विचारले, "का?" त्याला एकदम धंदेवाईक उत्तर मिळाले की, "आम्हाला एका देवाकडे मागून काही मिळाले नाही तर आम्ही दुसर्‍या देवाकडे जाता येते, पण तुमच्या बाबतीत... यू आर स्टक!" अर्थात एक लक्षात ठेवा हा गोरा साहेब व्हि पी होता, पण आमचा सिंधी बाबा सीइओ! त्यामुळे "ही वॉज डबल स्टक!"

सर्व देव सारखेच प्रिय. पण मत विठोबाला. ज्या दैवतामधे सगळा महाराष्ट्र सामावला आहे , शतकानुशतके जो भक्तांना पालवतो आहे , विचारवंतानी ज्याचे वर्णन "एक महासमन्वय" असे केले तो विठू. शतकानुशतकांच्या परकी आक्रमणांच्या छायेत ज्याच्या ठायी महाराष्ट्राची अस्मिता अभंग राहिली, "तू महाराष्ट्राचा आहेस , मराठी आहेस म्हणजे नक्की काय ?" या प्रश्नाचे उत्तर ज्या एका दैवताकडे बोट दाखवून देता येईल तो विठ्ठल.

In reply to by मुक्तसुनीत

यामुळेच आम्हीदेखील इट्टलालाच मत दिले आहे. आपला, (भक्तपुंडलिक) आजानुकर्ण

देवांना कौलाच्या पारड्यात तोलणे पटत नसल्याने मतदान करु इच्छित नाही! बाकी तुमचे चालु द्या ;)

In reply to by ब्रिटिश टिंग्या

सहमत आम्हाला सगळे सारखे

लोकशाही म्हणाल्यावर पार्टी पण आलीच (ब्रम्ह - सॄष्टी निर्मीतीत, विष्णू - पालन , शिव - संहार ) याशीवाय अ) वैष्णव - श्रीराम, श्रीकृष्ण, पंढरीचा विठोबा, महालक्ष्मी, ब) स्मार्त - शंकर, खंडोबा, क) अन्य - हि संयुक्त अघाडी सगळ्यात भारी आहे, गणपती, हनुमान, दत्तगुरू हे विष्णू अथवा शंकराचे अवतार/ नातेवाईक असले तरी लोकांना जवळचे वाटतात - खरे देव दरबारातले लोकप्रतीनीधी, ते लोकांच्या रंगात रंगतात आणि रंगही दाखवतात. आणखी ऐक गंमत म्हणजे वरील देव फक्त संचालक आहेत, खरे कार्यकारी मंडळ नवग्रह आहेत. दाते पंचागातील संवत्सर फला मधील दर वर्षी बदलणारी कार्यकारणी पहा. (मला लहान पणापसुन हे मंत्री मंडळ कसं बदलतं हे कोड आहे. जरा ज्योतीष्यांनी यात प्रकाष टाकावा. संयुक्त अघाडी चा विजय असो !!!! गणपती बप्पा मोरया ! अरे ! जिंकून जिंकून जिंकणार कोण संयुक्त अघाडी शिवाय आहेच कोण? आपला आर्य

श्रीराम, दत्तगुरू आणि खंडोबा यांनी अद्याप खाते उघडले नाही! रामाचे आणि दत्तगुरूंचे माहीत नाही, परंतु ज्या अर्थी खंडोबाला अद्याप एकही मत नाही त्या अर्थी रामोशी समाजाची मंडळी मिपावर नाहीत किंवा कमी आहेत. नायतर खंडोबालाही खूप मतं मिळाली असती. कारण खंडोबा हा रामोशी समाजाचा देव आहे... (मी मनानं कोळी जातीचा, परंतु आमच्या एकविरेला महालक्षुमीच गृहीत धरले आहे!) :) या कौलाचे स्वत:शीच केलेल्या विश्लेषणमुळे मिपाकरांचा ह्या बाबतीतला एक सर्वसाधारण चेहेरा मला दिसतो आहे! :) राम आणि दत्तगुरूंना अद्याप एकही मत नाही ह्याचे बाकी गूढच वाटते आहे. असो, तूर्तास त्याचीच विश्लेषणत्मक कारणमिमांसा स्वत:शीच करणे सुरू आहे. हे गूढ उकलण्यास कुणी मदत करेल काय?! :) त्याचप्रमाणे गणपती व विठोबाच्या तुलनेत कृष्णही मागे पडला आहे. ज्याच्या गीतेवर आणि त्यात सांगितलेल्या निरनिराळ्या योगांवर आज अनेक वर्ष भाष्य होत आहे, मोठमोठे विचारवंत गीतेचा अभ्यास करण्यात उभी हयात खर्च करतात असेही ऐकले आहे. एवढं सगळं असूनही जनमताचा कौल कृष्णापेक्षा पब्लिकमंदी फेमस असलेल्या गणपतीकडे व इतर कुठलीही आध्यात्मिक ट्यांव ट्यांव न करता संतांनी ज्याच्या रुपाकडे पाहून साधासोपा भक्तिमार्ग व नामस्मरणमार्ग सांगितला त्या विठोबाकडेच पब्लिकचा ओढा अधिक आहे हे पाहून गंमत वाटली! :) 'अन्य'ला मिळालेल्या मतांवरून मिपावरील डाव्यांची किंवा समाजवाद्यांची टक्केवारीही लक्षात येत आहे! ;) आपला, (रोकड्या भक्तिवर विश्वास असणारा एक तौलनिक विश्लेषक!) हभप तात्या.

In reply to by विसोबा खेचर

हे भय्या लोकांचे देव आहेत असं आपल्या मराठी लोकांचं मत आहे का? (नास्तिक) अदिती

In reply to by अवलिया

>> नास्तिक म्हजे काय वो अदिती तै तुमच्या "अद्वैत सिद्धांता"च्या धाग्यावर मी लिहिलं होतं, त्यात माझी व्याख्याही होती. जरा शोधून बघा, सापडेल.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

त्ये चुकलेले हाय वो म्हनुन इचारले काहि शिकले असाल तर बगाव

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कृष्ण आणि विठ्ठल हे एकाच देवाचे दोन आयडी आहेत. त्यामुळेच 'विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई' असे म्हटले आहे. आपला, (वेगवेगळ्या नावांनी संकेतस्थळांवर वावरणार्‍यांना ओळखणारा) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

>> कृष्ण आणि विठ्ठल हे एकाच देवाचे दोन आयडी आहेत. त्यामुळेच 'विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई' असे म्हटले आहे. पण मग "सर्वदेवो नमस्कारः केशवंप्रति गच्छति" असेल तर काय (आरसा सोडून?) कोणीही जिंकूदेत शेवटी केशवच (राव/सुमार/टुकार नाही) जिंकणार! (तर्कट) अदिती >> (वेगवेगळ्या नावांनी संकेतस्थळांवर वावरणार्‍यांना ओळखणारा) =)) हे भारीच!

In reply to by विसोबा खेचर

आजकालच्या जमान्यात भुताखेतांवरचा पब्लिकचा विश्वास कमी झाल्याने दत्तगुरुंचे मार्केट अंमळ डाउन झाले असावे. अन एवढी कारसेवा होउन एवढ्या आमच्या लोकांनी जीव देउनही अजुन हवे तसे राममंदीर झालेच नाही म्हणुन श्रीरामांची पावर अंमळ कमी झाली आहे असा जनसामानसात समज झाला असावा !! -आंद्या तर्खडकर

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आम्हाला त्यांचे तर्कनिष्ठ, तर्काधारीत अन तार्किक इंग्रजी शिकवणे आवडायचे. - (अजुनही टेन्स न येणारा) आंद्याडिक

आपण निवडुन यावे म्हणुन हे देव कोणाची आराधना करत असतील बरे ?? अल्लाच जाणे ..

माझा सर्वदेव समभाव आहे... 'अन्य'ला मत द्यायचे म्हणजे दुसर्‍या कोण्या देवावर श्रद्धा आहे असे मानले जाईल का? नसल्यास अन्य गृहीत धरावे.

जय श्री प्रभु रामचंद्र की जय

देवाला शरण जाण्याचा हेतू काय तर, मानसिक समाधान हेच ना? मग ते दगडाच्या मूर्तीतच मिळावे हा अट्टाहास का? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

माझं मत कृष्णाला... एकच पुर्ण मानव गुणांनी युक्त असा देव ! म्हणून मला आवडतो !
बोलो... राधे राधे !!! गोविंदमुरारी !!! राधे राधे !!!
राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

In reply to by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)

मान्सांनी केला तर तो लंपटपणा आन क्रिशनाने केल्या तर त्या लिला काय? चला जरा क्रिशनाला खुष करु. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

मान्सांनी यकाच जल्मात १६१०८ लग्ने करून निभाऊन दाखवावीत (+ गोपिकांची संख्या वेगळी) यशस्वी झाला कोणी तर आम्ही त्यालाही देव(मोद देव नव्हे राम-कृष्णासारखा खरा खरा देव) म्हणू. पुण्याचे पेशवे

मी खरेतर अक्कलकोटस्वामींना मानणारा आहे. त्यांच्यातच सर्व देवांची रुपे पाहतो म्हणोन हनुमान जयंती, रामनवमी, कालाष्टमी, दत्तजयंती, दोन्ही एकादश्या सर्व काही आनंदाने करतो. गणपती तर अर्थात असतातच. पण तुकाराम महाराजानी म्हटल्या प्रमाणे 'सद्गुरुवाचोनी सापडेना सोय'. म्हणून सद्गुरु हे सर्वोच्च देव. :) पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

ll सदगुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय ll स्वामी समर्थ तारक मंत्र" स्वामी समर्थ तारक मंत्र" "स्वामी समर्थ तारक मंत्र" नि:शंक हो | निर्भय हो मना रे | प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे || अतॅ क्य अवधूत हे स्मरण गामी | अशक्य ही शक्य करतील स्वामी ||1|| जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय | स्वयें भक्त प्रारब्ध घडवी ही माय || आज्ञे वीणा काळ ना नेई त्याला | परलोकी ही ना भीती तयाला || 2 || उगाची भीतोसी भय हे पळू दे | जवळी उभी स्वामी शक्ति कळू दे || जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्याचा | नको घाबरू तू असे बाळ त्याचा ||3|| खरा होई जागा | श्रद्धेसहित | कसा होशी त्याविणा | तू स्वामीभक्त || कितीदा दिला बोल त्यांनीच हात | नको डगमगू | स्वामी देतील साथ ||4 || विभूती, नमन, नामध्यानाधी, तीर्थ | स्वामीच या पंचप्राणामृतात || हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती | न सोडी कदा स्वामी जया घेई हाती ||5|| सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *

गणपती आणि विठ्ठल अद्याप टॉपलाच! :) अर्रे लालबागच्या राजाचा विजय असो...! :) तात्या.

आम्ही वैष्णव, पण विष्णूची ऑप्शनच नसल्यामुळे, आणि कृष्ण गीतेपुरताच बरा वाटत असल्याने नाईलाज झाला शेवटी आमचे कुन्डलीप्रमाणे कुणा कुणा ज्योतिषान्नी सान्गितल्याप्रमाणे आम्ही ठरतो शन्कराचे परमभक्त! :) तेव्हा जरी पुजा अर्चा, जपजाप्य इत्यादी करत नसलो तरी शन्कराला मत देऊन मोकळे झालो! :) आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

(सर्वप्रथम 'अन्य'मध्ये 'अल्लाह'ला मत देणार होतो, पण नंतर लक्षात आलं की सगुण रूपाची अट आहे म्हणून. ;) ) सगुण रूपांमध्येच मतदान करायचं तर आपलं गठ्ठामत कधीही आपल्याच जातभाईला! शेवटी जिथेतिथे जातीचं राजकारण आहे! - (निर्गुणरूपभक्त) टग्या (अल्लाहयारखान).

गणपती बाप्पा मोरया!!!! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

अन्य हा पर्याय निवडला आहे. 'मातृदेवो' भवो.

कधी कोणाची गरज लागेल सांगता येत नाही........त्यात ही लोकाची संख्या वाढतेय......१०० कोटी च्या वर गेलो रे ! आणि देवा ना आता ओवर टाइम करावा लागत असणार..........ते ३३ कोटी आणि आपण १०० कोटी बाप रे बाप !

पंढरीच्या विठ्ठलाला मत दिले आहे. हा कौल अंमळ उशिरानेच दिसला. (आमच्या बर्लिनवारी दरम्यान मिपावर आला असल्याने दिसला नव्हता.) कौलकर्ता हे बिरुद जोरातच ! --लिखाळ.