काही डिस्लेमर :
१) जी कोणती एक शक्ति आहे जिला आपण देव मानतो त्या देवाचीच ही विविध सगुण रुपं आहेत.
२) कौलाचा उद्देश -
अ) तत्व एकच आहे, शक्ति एकच आहे परंतु वर उल्लेख केल्याप्रमाणे तिची सगुण रुपं अनेक आहेत. मिपाकरांना वरीलपैकी कोणतं सगुण रूप सर्वात जास्त आवडतं हे शोधण्याचा ह्या कौलाचा उद्देश आहे..
ब) विरंगुळा व मौजमजा.
३) सर्व पर्याय आवडतात हा पर्याय ठेवलेला नाही, वरीलपैकी एकच पर्याय निवडला पाहिजे अशी ह्या कौलाची अट आहे. ही मान्य नसलेल्यांना मतदानाचा आग्रह नाही...
४) जी मंडळी अशी एखादी शक्ति किंवा असं एखादं सगुण रूप मानतात, केवळ त्यांच्याकरताच हा कौल आहे. सबब, "वरीलपैकी एकालाही नाही" हा पर्याय ठेवलेला नाही!
धन्यवाद...
आपला,
(कौलकर्ता) तात्या.
बर्र का मंडळी,
गणपतीबाप्पा हा आमचा अत्यंत प्रिय अन् लाडका देव. परंतु पंढरीचा विठोबा ह्याची जादू काही वेगळीच! सबब, गणपती आमचा अत्यंत लाडका असूनही आम्ही आमचे अमूल्य मत विठोबाला दिले आहे! :)
सर्वांनी प्रचंड बहुमतांनी विठोबाला विजयी करावे ही विनंती... :)
आपला,
(विठ्ठलभक्त) तात्या.
आमचं पंढरपुरचं मत आमच्या लाडक्या 'विठुरायालाच' ....
गणपतीबाप्पा हा आमचा अत्यंत प्रिय अन् लाडका देव. परंतु पंढरीचा विठोबा ह्याची जादू काही वेगळीच! सबब, गणपती आमचा अत्यंत लाडका असूनही आम्ही आमचे अमूल्य मत विठोबाला दिले आहे!
असेच म्हणतो ...
आमचं मत 'विठोबामाऊलीलाच ' ...
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल !!!
पंढरपुरकर विठुभक्त - छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
मी अन्यला मत दिले आहे.
मला सर्व देव सारखेच. प्रत्येक देवाची वेग वेगळी विशेषता आहे म्हणुन त्यांच्यात फरक कसा करावा ? हां पण एखाद्या ४ दिवसाच्या भुकेल्या गरिब माणसाला अन्न दिल्यावर त्याच्या चेहरयावर जी झळाळी येते ना त्यावेळी खरा खरा देव मला तिथेच भेटतो.
मी अन्यला मत दिले आहे.
आपले मत मोजले गेले आहे. अन्यला एकंदरीत ३ मते होती परंतु खुलासा फक्त आपल्या एकट्याचाच आला आहे. सबब, अन्यची दोन मते बाद!
आपला,
(मुख्य निवडंणुक अधिकारी) तात्या.
काळ्या यादीत नाव जाईल अन सैतान तुमच्या मागे लागतील.
खतरनाक वगैरे सर्व शब्दांनी देवी प्रसन्न होत असल्याने नाव काळ्या यादीत जाणार नाही. काळजी नको! ;)
अवांतरः कोणता ब्लफमास्टर शम्मी कपूरचा की बच्चनपुत्राचा? दोन्ही पाहिले आहेत. आठवत मात्र नाहीत.
>> अवांतरः कोणता ब्लफमास्टर शम्मी कपूरचा की बच्चनपुत्राचा? दोन्ही पाहिले आहेत. आठवत मात्र नाहीत.
दुसरा, बच्चनपुत्र बच्चनचा! त्यात नाना पाटेकर आरशाची पूजा करताना, उदबत्ती ओवाळताना वगैरे दाखवला आहे.
खालचीच प्रतिक्रिया (http://www.misalpav.com/node/3526#comment-50059) बघ देवदत्तची, त्यांना आठवतोय तो बहुतेक
>> खतरनाक वगैरे सर्व शब्दांनी देवी प्रसन्न होत असल्याने नाव काळ्या यादीत जाणार नाही. काळजी नको!
देवी/ताई, आता प्रसन्न झाल्याच आहात तर काहीतरी आशीर्वादही द्या, (वर नको, तो आहे ;-) )
भक्त/छोटी अदिती
माझे मत मी "अन्य" ला दिले कारण सर्व देव मला तितकेच भावतात आणि शेवटी हे अद्वैत आहे, त्यामुळे सर्व एकच आहेत हे ही मनापासून समजते. तरी देखील अनेक देव असण्याची संकल्पना मला आवडते.
बाकी जाता जाता थोडे अवांतरः माझ्या एका सिंधी साहेबाचे त्याच्या गोर्या व्हि. पी. बरोबर झालेला हा संवाद: गोर्याने ह्या देशी माणसाला काहीतरी धर्म आणि अनेक देव असण्यावरून गंमत म्हणून उपरोधीक विचारले (त्यात खोचकपणा नव्हता). तेंव्हा आमचे सिंधीबाबा तितक्याच गंमतीत म्हणाले, "मला तुम्हा एक देव मानणार्यांची कीव वाटते" ह्याने विचारले, "का?" त्याला एकदम धंदेवाईक उत्तर मिळाले की, "आम्हाला एका देवाकडे मागून काही मिळाले नाही तर आम्ही दुसर्या देवाकडे जाता येते, पण तुमच्या बाबतीत... यू आर स्टक!" अर्थात एक लक्षात ठेवा हा गोरा साहेब व्हि पी होता, पण आमचा सिंधी बाबा सीइओ! त्यामुळे "ही वॉज डबल स्टक!"
सर्व देव सारखेच प्रिय. पण मत विठोबाला. ज्या दैवतामधे सगळा महाराष्ट्र सामावला आहे , शतकानुशतके जो भक्तांना पालवतो आहे , विचारवंतानी ज्याचे वर्णन "एक महासमन्वय" असे केले तो विठू. शतकानुशतकांच्या परकी आक्रमणांच्या छायेत ज्याच्या ठायी महाराष्ट्राची अस्मिता अभंग राहिली, "तू महाराष्ट्राचा आहेस , मराठी आहेस म्हणजे नक्की काय ?" या प्रश्नाचे उत्तर ज्या एका दैवताकडे बोट दाखवून देता येईल तो विठ्ठल.
लोकशाही म्हणाल्यावर पार्टी पण आलीच (ब्रम्ह - सॄष्टी निर्मीतीत, विष्णू - पालन , शिव - संहार ) याशीवाय
अ) वैष्णव - श्रीराम, श्रीकृष्ण, पंढरीचा विठोबा, महालक्ष्मी,
ब) स्मार्त - शंकर, खंडोबा,
क) अन्य - हि संयुक्त अघाडी सगळ्यात भारी आहे, गणपती, हनुमान, दत्तगुरू हे विष्णू अथवा शंकराचे अवतार/ नातेवाईक असले तरी लोकांना जवळचे वाटतात - खरे देव दरबारातले लोकप्रतीनीधी, ते लोकांच्या रंगात रंगतात आणि रंगही दाखवतात.
आणखी ऐक गंमत म्हणजे वरील देव फक्त संचालक आहेत, खरे कार्यकारी मंडळ नवग्रह आहेत. दाते पंचागातील संवत्सर फला मधील दर वर्षी बदलणारी कार्यकारणी पहा. (मला लहान पणापसुन हे मंत्री मंडळ कसं बदलतं हे कोड आहे. जरा ज्योतीष्यांनी यात प्रकाष टाकावा.
संयुक्त अघाडी चा विजय असो !!!! गणपती बप्पा मोरया !
अरे ! जिंकून जिंकून जिंकणार कोण संयुक्त अघाडी शिवाय आहेच कोण?
आपला
आर्य
श्रीराम, दत्तगुरू आणि खंडोबा यांनी अद्याप खाते उघडले नाही!
रामाचे आणि दत्तगुरूंचे माहीत नाही, परंतु ज्या अर्थी खंडोबाला अद्याप एकही मत नाही त्या अर्थी रामोशी समाजाची मंडळी मिपावर नाहीत किंवा कमी आहेत. नायतर खंडोबालाही खूप मतं मिळाली असती. कारण खंडोबा हा रामोशी समाजाचा देव आहे...
(मी मनानं कोळी जातीचा, परंतु आमच्या एकविरेला महालक्षुमीच गृहीत धरले आहे!) :)
या कौलाचे स्वत:शीच केलेल्या विश्लेषणमुळे मिपाकरांचा ह्या बाबतीतला एक सर्वसाधारण चेहेरा मला दिसतो आहे! :)
राम आणि दत्तगुरूंना अद्याप एकही मत नाही ह्याचे बाकी गूढच वाटते आहे. असो, तूर्तास त्याचीच विश्लेषणत्मक कारणमिमांसा स्वत:शीच करणे सुरू आहे. हे गूढ उकलण्यास कुणी मदत करेल काय?! :)
त्याचप्रमाणे गणपती व विठोबाच्या तुलनेत कृष्णही मागे पडला आहे. ज्याच्या गीतेवर आणि त्यात सांगितलेल्या निरनिराळ्या योगांवर आज अनेक वर्ष भाष्य होत आहे, मोठमोठे विचारवंत गीतेचा अभ्यास करण्यात उभी हयात खर्च करतात असेही ऐकले आहे. एवढं सगळं असूनही जनमताचा कौल कृष्णापेक्षा पब्लिकमंदी फेमस असलेल्या गणपतीकडे व इतर कुठलीही आध्यात्मिक ट्यांव ट्यांव न करता संतांनी ज्याच्या रुपाकडे पाहून साधासोपा भक्तिमार्ग व नामस्मरणमार्ग सांगितला त्या विठोबाकडेच पब्लिकचा ओढा अधिक आहे हे पाहून गंमत वाटली! :)
'अन्य'ला मिळालेल्या मतांवरून मिपावरील डाव्यांची किंवा समाजवाद्यांची टक्केवारीही लक्षात येत आहे! ;)
आपला,
(रोकड्या भक्तिवर विश्वास असणारा एक तौलनिक विश्लेषक!) हभप तात्या.
कृष्ण आणि विठ्ठल हे एकाच देवाचे दोन आयडी आहेत. त्यामुळेच 'विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई' असे म्हटले आहे.
आपला,
(वेगवेगळ्या नावांनी संकेतस्थळांवर वावरणार्यांना ओळखणारा) आजानुकर्ण
>> कृष्ण आणि विठ्ठल हे एकाच देवाचे दोन आयडी आहेत. त्यामुळेच 'विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई' असे म्हटले आहे.
पण मग "सर्वदेवो नमस्कारः केशवंप्रति गच्छति" असेल तर काय (आरसा सोडून?) कोणीही जिंकूदेत शेवटी केशवच (राव/सुमार/टुकार नाही) जिंकणार!
(तर्कट) अदिती
>> (वेगवेगळ्या नावांनी संकेतस्थळांवर वावरणार्यांना ओळखणारा)
=)) हे भारीच!
आजकालच्या जमान्यात भुताखेतांवरचा पब्लिकचा विश्वास कमी झाल्याने दत्तगुरुंचे मार्केट अंमळ डाउन झाले असावे.
अन
एवढी कारसेवा होउन एवढ्या आमच्या लोकांनी जीव देउनही अजुन हवे तसे राममंदीर झालेच नाही म्हणुन श्रीरामांची पावर अंमळ कमी झाली आहे असा जनसामानसात समज झाला असावा !!
-आंद्या तर्खडकर
देवाला शरण जाण्याचा हेतू काय तर, मानसिक समाधान हेच ना? मग ते दगडाच्या मूर्तीतच मिळावे हा अट्टाहास का?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
मान्सांनी यकाच जल्मात १६१०८ लग्ने करून निभाऊन दाखवावीत (+ गोपिकांची संख्या वेगळी) यशस्वी झाला कोणी तर आम्ही त्यालाही देव(मोद देव नव्हे राम-कृष्णासारखा खरा खरा देव) म्हणू.
पुण्याचे पेशवे
मी खरेतर अक्कलकोटस्वामींना मानणारा आहे. त्यांच्यातच सर्व देवांची रुपे पाहतो म्हणोन हनुमान जयंती, रामनवमी, कालाष्टमी, दत्तजयंती, दोन्ही एकादश्या सर्व काही आनंदाने करतो. गणपती तर अर्थात असतातच. पण तुकाराम महाराजानी म्हटल्या प्रमाणे 'सद्गुरुवाचोनी सापडेना सोय'. म्हणून सद्गुरु हे सर्वोच्च देव. :)
पुण्याचे पेशवे
ll सदगुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय ll
स्वामी समर्थ तारक मंत्र"
स्वामी समर्थ तारक मंत्र"
"स्वामी समर्थ तारक मंत्र"
नि:शंक हो | निर्भय हो मना रे |
प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे ||
अतॅ क्य अवधूत हे स्मरण गामी |
अशक्य ही शक्य करतील स्वामी ||1||
जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय |
स्वयें भक्त प्रारब्ध घडवी ही माय ||
आज्ञे वीणा काळ ना नेई त्याला |
परलोकी ही ना भीती तयाला || 2 ||
उगाची भीतोसी भय हे पळू दे |
जवळी उभी स्वामी शक्ति कळू दे ||
जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्याचा |
नको घाबरू तू असे बाळ त्याचा ||3||
खरा होई जागा | श्रद्धेसहित |
कसा होशी त्याविणा | तू स्वामीभक्त ||
कितीदा दिला बोल त्यांनीच हात |
नको डगमगू | स्वामी देतील साथ ||4 ||
विभूती, नमन, नामध्यानाधी, तीर्थ |
स्वामीच या पंचप्राणामृतात ||
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती |
न सोडी कदा स्वामी जया घेई हाती ||5||
सुर तेच छेडीता......
* * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *
आम्ही वैष्णव, पण विष्णूची ऑप्शनच नसल्यामुळे, आणि कृष्ण गीतेपुरताच बरा वाटत असल्याने नाईलाज झाला
शेवटी आमचे कुन्डलीप्रमाणे कुणा कुणा ज्योतिषान्नी सान्गितल्याप्रमाणे आम्ही ठरतो शन्कराचे परमभक्त! :)
तेव्हा जरी पुजा अर्चा, जपजाप्य इत्यादी करत नसलो तरी शन्कराला मत देऊन मोकळे झालो! :)
आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P
टग्या (verified= न पडताळणी केलेला)बुधवार, 17/09/2008 20:19
(सर्वप्रथम 'अन्य'मध्ये 'अल्लाह'ला मत देणार होतो, पण नंतर लक्षात आलं की सगुण रूपाची अट आहे म्हणून. ;) )
सगुण रूपांमध्येच मतदान करायचं तर आपलं गठ्ठामत कधीही आपल्याच जातभाईला! शेवटी जिथेतिथे जातीचं राजकारण आहे!
- (निर्गुणरूपभक्त) टग्या (अल्लाहयारखान).
कधी कोणाची गरज लागेल सांगता येत नाही........त्यात ही लोकाची संख्या वाढतेय......१०० कोटी च्या वर गेलो रे !
आणि देवा ना आता ओवर टाइम करावा लागत असणार..........ते ३३ कोटी आणि आपण १०० कोटी बाप रे बाप !
पंढरीच्या विठ्ठलाला मत दिले आहे.
हा कौल अंमळ उशिरानेच दिसला. (आमच्या बर्लिनवारी दरम्यान मिपावर आला असल्याने दिसला नव्हता.)
कौलकर्ता हे बिरुद जोरातच !
--लिखाळ.
प्रतिक्रिया
काही डिस्लेमर :
मतदान
In reply to काही डिस्लेमर : by विसोबा खेचर
(लोकशाही
In reply to मतदान by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
.
मारुतिराय
आयला!
तात्या, पर्वा नको ...
In reply to आयला! by विसोबा खेचर
असंच..
In reply to तात्या, पर्वा नको ... by छोटा डॉन
? ? (
.
मी अन्यला
In reply to . by श्री
अन्य..
मी अन्यला मत दिले
In reply to अन्य.. by विसोबा खेचर
खतरनाक!
In reply to मी अन्यला मत दिले by प्रियाली
कोण
In reply to खतरनाक! by मेघना भुस्कुटे
देवी प्रसन्न
In reply to कोण by अवलिया
>> अवांतरः
In reply to देवी प्रसन्न by प्रियाली
खतरनाकच! प्
In reply to मी अन्यला मत दिले by प्रियाली
पहिल्यांद
In reply to खतरनाकच! प् by ३_१४ विक्षिप्त अदिती
भगवंताची
श्री महालक्ष्मी
सगळ्या देवांना एक एक मत द्या
माझे मत
अन्य अष्ठभ
आपले मत
माझे मत...
विठोबा
सहमत आहे
In reply to विठोबा by मुक्तसुनीत
:(
सहमत आम्हा
In reply to :( by ब्रिटिश टिंग्या
लोकशाही
एक विश्लेषण...
राम आणि कृष्ण
In reply to एक विश्लेषण... by विसोबा खेचर
नास्तिक
In reply to राम आणि कृष्ण by ३_१४ विक्षिप्त अदिती
>> नास्तिक
In reply to नास्तिक by अवलिया
त्ये
In reply to >> नास्तिक by ३_१४ विक्षिप्त अदिती
कृष्ण
In reply to राम आणि कृष्ण by ३_१४ विक्षिप्त अदिती
>> कृष्ण आणि
In reply to कृष्ण by आजानुकर्ण
दत्तगुरुंबद्दल अन श्रीरामांबद्दल
In reply to एक विश्लेषण... by विसोबा खेचर
आंद्या, तर्
In reply to दत्तगुरुंबद्दल अन श्रीरामांबद्दल by आनंदयात्री
आम्हाला
In reply to आंद्या, तर् by ३_१४ विक्षिप्त अदिती
आयल्ला
माझा
जय श्री
अन्य
श्री कृष्ण !!!!
आपला बी कृष्न
In reply to श्री कृष्ण !!!! by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
लीला
In reply to आपला बी कृष्न by प्रकाश घाटपांडे
वरीलपैकी कोणत्याही एका देवाला मत देणे अशक्य आहे.
ll सदगुरु
In reply to वरीलपैकी कोणत्याही एका देवाला मत देणे अशक्य आहे. by llपुण्याचे पेशवेll
गणपती आणि
आम्ही वैष्णव
हनुमान!
गणपती
अन्य...
तेहतीस कोटी देवा ना मत बाबा ....!
विठ्ठल