असहाय्य आधी, दशाही तीच आता
बालपण ते नि, पदरी वार्धक्य आता ll १ ll
न समज; स्मृती, दिस असाच सरावा
बालपणी तेच अन्, प्रकार तोच आता ll २ ll
नव्हते मुखी दात, दंतपंक्ती लुप्त आता
बालपणी तसे, फिरुनी वार्धक्यी आता ll ३ ll
पाय तेंव्हा लुकलुकते, थरथर ही आता
तोल तेंव्हा नव्हता, तोल नाही आता ll ४ ll
अन्नास होतो परावलंबी, पाहतो वाट आता
तेंव्हा माय भरवी, लेकरे देतात आता ll ५ ll
लोळणे मल-मूत्रात, त्राण नाही आता
रडणे तेंव्हाचे, कण्हत असतो आता ll ६ ll
कथा देवाच्या ऎकी, अनुभव हाती आता
केंव्हा एकदा भेट?, व्हावी सुटका आता ! ll ७ ll
- सार्थबोध
वाचने
2937
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
बालवयी खेळी रमलो
ह्म्म...
गोंधळ
शेवटी तेच होणार. मिपाची
In reply to गोंधळ by प्रभाकर पेठकर
दिशाभूल.
In reply to शेवटी तेच होणार. मिपाची by गवि
हायला !
कविता'कूट' म्हणा ना !
In reply to हायला ! by विटेकर
पाय तेंव्हा लुकलुकते,
म्हातारपण ही एन्जॉय करता येते!
In reply to पाय तेंव्हा लुकलुकते, by तिमा
सहमत. म्हातारपण एंजॉय करणारे
In reply to पाय तेंव्हा लुकलुकते, by तिमा
आपण बालपण येन्ज्वाय कर्तो.