Skip to main content

बाल्य - वार्धक्य

लेखक सार्थबोध यांनी बुधवार, 07/08/2013 या दिवशी प्रकाशित केले.
असहाय्य आधी, दशाही तीच आता बालपण ते नि, पदरी वार्धक्य आता ll १ ll न समज; स्मृती, दिस असाच सरावा बालपणी तेच अन्, प्रकार तोच आता ll २ ll नव्हते मुखी दात, दंतपंक्ती लुप्त आता बालपणी तसे, फिरुनी वार्धक्यी आता ll ३ ll पाय तेंव्हा लुकलुकते, थरथर ही आता तोल तेंव्हा नव्हता, तोल नाही आता ll ४ ll अन्नास होतो परावलंबी, पाहतो वाट आता तेंव्हा माय भरवी, लेकरे देतात आता ll ५ ll लोळणे मल-मूत्रात, त्राण नाही आता रडणे तेंव्हाचे, कण्हत असतो आता ll ६ ll कथा देवाच्या ऎकी, अनुभव हाती आता केंव्हा एकदा भेट?, व्हावी सुटका आता ! ll ७ ll - सार्थबोध

वाचने 2937
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

बालवयी खेळी रमलो तारूण्य नासले वृद्धपणी देवा आता दिसे पैलतीर ! असा काहीसा हताश सूर जाणवला कवितेत. पण वृद्धत्व नेहमीच इतकं केविलवाणं नसतं .

मुख्य फलकावर ह्या धाग्याच्या शीर्षका शेजारी (डाव्या बाजूला) 'काथ्याकुट' असे का दिसते आहे?

काथ्याकूट म्हनून उघड्ला तर कविताबाई ! आणि त्यावर कूट !

पाय तेंव्हा लुकलुकते, लहान मुलांच्या अडखळत चालण्याला 'लुकलुकते' हे डोळ्यांना खटकले. त्याऐवजी लटपटते, दुडदुडते असे काहीतरी योग्य वाटले असते. लुकलुकते,हे जनरली डोळ्यांना किंवा तार्‍यांना उद्देशून वाचले आहे. कविता फारच निराश वाटली. म्हातारपण ही एन्जॉय करता येते.

In reply to by तिमा

एंजॉय करायला सुरुवातीपासूनच मजेत जगायला हवं. निदान तारुण्यापासनं तरी. एकदा शरीराकडे पाहायचा दृष्टीकोन चुकला की शेवटापर्यंत छ्ळ (आणि मग अश्या कविता!)

In reply to by तिमा

सहमत. म्हातारपण एंजॉय करणारे लोक पाहिल्याने कविता तशी निराश वाटली. आणि लुकलुकणे हा शब्दही तसा औटॉफ प्लेस वाटतोय.

आपण बालपण येन्ज्वाय कर्तो. त्रुन्पन यन्ज्वाय कर्तो. मंग म्हथार्पन यन्ज्वाय कर्याला कै हर्कत है? कन्हत कुंथत जगायचै की रमत गमत यन्ज्वाय करत तुम्मीच ठर्वा रौ.