Skip to main content

हिन्दू धर्म म्हणजे काय ?

लेखक विटेकर यांनी मंगळवार, 23/07/2013 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात श्री. विजुभौ च्या वारीच्या धाग्यासंदर्भात हा विषय आलेला होता पण सांगोपांग चर्चा झाली नाही. म्ह्णून तिथे टंकलेलेच इथे पुन्हा लिहित आहे. मिपाकर जरुरीप्रमाणे भर घालतील. माझ्या मते खालील बाबी हिंदू धर्माची वैशिष्ट्ये म्हणून सांगता येतील. १. कर्माचा सिद्धांत २. पुनर्जन्म ३. अन्तिम सत्य एकच आहे . ( GOD IS ONE and not GOD ARE ONE ) या प्रत्येक मुद्द्याचा ऊहापोह करता येईल पण तो अनेक्वेळा येथे झाला आहे. हे सारे मुद्दे परस्परपूरक आणि एकमेकांत कमालीचे गुंतलेले आहेत. या वरील तीन बाबींना केन्द्रीभूत ठेऊन उभी राहीलेली सर्वंकष जीवन पद्धती म्हणजे हिंदू जीवन पद्धती ! म्हणजे Hinduness (and NOT Hinduism, Hindu is not"ism" , it's way of life) वरील तीन गोष्टी अनिवार्य तर पुढील काही गोष्टी पुष्टयर्थ: १. चार वेद २. चार पुरुषार्थ ३. चार आश्रम ४. चार वर्ण या आणि अशाच संलग्न बाबींवर हिंदू समाज बेतलेला आहे. त्यामध्ये कमालीची विविधता आणि टोकाची लवचिकता आहे. अन्य उपासना पंथांप्रमाणे हिंदू जीवन पध्दतीमध्ये आचरणाचे काहीही नियम सांगितले नाहीत.हिंदूचे जे अनेक पंथ आहेत त्यामधील काही पंथांमध्ये काही नियम सांगितले आहेत पण ते सर्वच पंथात काटेकोरपणे पाळले जातात असे नाही. आणि सर्वात महत्वाचे म्ह्णजे, हे नियम पाळले नाहीत म्हणून तुमच्या हिंदुपणावर गंडांतर येत नाही. तसेच एखाद्या विशिष्ट ग्रंथाचा अथवा वेदांचा अभ्यास अथवा पठण करण्याची आवश्यकता नाही . बहुतेक संतानी तो केलेला नाही. हिंदू मान्यतेप्रमाणे, मोक्ष मिळवणे हेच नरदेहाचे अंतिम ध्येय आहे. तोच ४ था आणि अंतिम पुरुषार्थ आहे.आणि त्यासाठी वेद अभ्यासण्याची अजिबात गरज नाही. वेदांचे सार चार महावाक्यात सांगितळे आहे. त्याचे मला समजलेले सार असे की, सर्वांभूती एकच अंतरात्मा वास करत आहे आणि ही सारी मायिक सॄष्टी ही त्या परमात्म्याची लीला आहे. हे ध्यानात घेऊन केलेले व्यवहार त्या मोक्षाप्रत नेतात. ( म्हणजे नेत असावेत , मला अजून अनुभव यायचा आहे पण माझी तशी श्रद्धा आहे.) धर्माच्या चौकटीत राहून अर्थ आणि कामाचा विवेकी उपभोग ( म्हणजे अभाव ही नव्हे आणि प्रभाव ही नव्हे ) मोक्षाप्रत नेतो अशी हिंदू मान्यता आहे. या चौकटीत राहण्यासाठी म्हणून चारी आश्रम (1. व्रह्मचर्य आश्रम 2. ग्रहस्थ आश्रम 3. वानप्रस्थ आश्रम 4. संन्यास आश्रम) आणि चार वर्ण ! कालौघात या मूलभूत संकल्पना जर विवेकाने अंगिकारल्या नाहीत तर केवळ कर्मकांडाच्या बजबजपुरीलाच धर्म म्हणले जाते, मूल संकल्पनेला मालीन्य येते, आणि मग सगळा गोंधळ होतो. ( हे ही भगवंताला माहीत आहे म्हणून तोच म्हणतो ..यदा यदा ही धर्मस्य.. आणि येथे धर्माला ग्लानि येते असे म्ह्तले आहे , धर्म कधीच "नाश " पावत नाही) धर्म शब्दाची व्याख्याच मुळी " जे धारण करतो ते" अशी असल्याने हा सारा आचरणाचा आणि अंगिकारण्याचा विषय आहे.

वाचने 57433
प्रतिक्रिया 119

प्रतिक्रिया

"राममंदिरापेक्षा रोजीरोटी महत्त्वाची" असे उद्गार अलिकडेच ऐकले एका महानुभावांचे. रामंदिरात रोजीरोटी अंतर्भूत नसते का ? मला उत्तर हवय (नि वा स्टाईल)

हिंदू धर्म म्हणजे काय याचे उत्तर देणे अवघड आहे. पण हिंदू समाज म्हणजे काय हे सांगता येइल. हिंदू समाज म्हणजे निद्रिस्त ज्वालामुखी.

In reply to by आशु जोग

@हिंदू समाज म्हणजे निद्रिस्त ज्वालामुखी.>>>निद्रिस्त ज्वालामुखी'च्या ऐवजी,प्रत्येक हिंदूच्या मुखी निद्रिस्त ज्वाला! असे म्हणा..ते जास्त अन्वर्थक होइल. :)

हिंसेने दु:खी होतो तो हिंदू असा 'हिंदू' या लघुरूपाचा व्यापक मानवतावादी अर्थ आचार्य विनोबा भावे यांनी एके काळी मांडला होता.

In reply to by मदनबाण

हिंदू शब्दाची व्याख्या आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका । पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: ॥ - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ७५) सिंधुस्थान ही ज्याची केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे तो हिंदू. - (१९२३ हिं., स.सा.वा. ६ : ७४) स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

विटेकर काका आता यावर आप्लि प्रतिक्रिया अपेक्शित आहे,कारण आप्ल्या म्हणण्यानुसार हिन्दु धर्मात हिन्सेला मान्यता आहे.

अहो, दु:ख होते ना हिंसा केल्यावर ! साधा डास मारल्यावर देखील मला वाईट वाटते . आणि मोदिंना तर गाडीखाली कुत्रे आल्यावर देखील वाईट्ट वाटते ! विचारा की मेडियावाल्यांना.

हिंदू हा शब्द अपमानजनक आहे व हिंदू धर्म म्हणजे गुलामांचा / पराजितांचा धर्म आहे. थोडे हिंदू शब्दाबद्दलचे मत पाहू. हिंदू शब्द जर सिंधू शब्दाचा अपभ्रंश असेल तर सिंधू नदीच्या खोऱ्यात राहणारे व्यक्ती पंजाबी अथवा सिंधी असे म्हटले जातात, त्यांना हिंदू हे नाव का प्राप्त झालेले नाही? पर्शियन लोकांना सिंधू उच्चारण्यात अडचण येत होती हे प्रमेय आधारहीन व हास्यास्पद आहे. उदा. पर्शियन जे शिया मुस्लिम आहेत ते शिया, सुन्नी व शरियत हे शब्द कसे उच्चारतात? पंजाबी भाषेत बरेच पर्शियन शब्द आहेत ते ज्यांची सुरुवात 'स' किंवा 'श' पासून होते. उदा. सरदार, शहीद, शेर इ. पंजाब हा शब्द सुद्धा पर्शियन शब्द पांच आणि आबा (पाच पाणी) पासून तयार झाला आहे. याच बाबीचा पुनरुच्चार मुद्रारक्षक यांनी धर्मग्रंथोन्का पुनर्रपाठ या ग्रंथात याप्रकारे केला, "इतिहासकारोंने कहा की चूंकि फारस के लोग 'स' को 'ह' बोलते थे, इसलिये उन्होंने सिंधू को हिंदू कहा और यहां रहने वालोंको हिंदू कहना सुरू कर दिया. यह विचित्र तर्क था. ईराण के लोग अपनी भाषा को फारसी कहते रहे, फारही कभी नहीं कहा, सुलतान बोलते थे हुलतान नहीं, पर सिंध को उच्चारित नहीं कर शकते थे, यह अविश्वसनीय हैं. विजेता अक्सर विजित समुदाय को निंदनीय मानता हैं और घोषित करता हैं. मुसलमान ने भी भारत को जीतकर यही किया. हर विजेता की तरह वह भी भारत के विजित लोगों को हेच समजता और बताता था. उसने भारत में रहने वालों को इसीलिये हिंदू कहा. फारसी में हिंदू का अर्थ अच्छा नहीं हैं. हिंदू शब्द का अर्थ है गुलाम, काला, लूटेरे, चोर. ये अर्थ फीरोजुल्लगात नामक विख्यात शब्दकोश में हैं. पर यह विचित्र इत्तफाक है और ऐसा शायद ही किसी दूसरी संस्कृति में हुआ हो कि पराजित कौम ने अपने लिये विजेताओ दवारा प्रयुक्त की गई एक अपमानजनक संज्ञा को गौरव के साथ स्वीकार कर लिया हो. भारत में यह हो गया."

In reply to by व्ही. डी. सी.

"फारसी में हिंदू का अर्थ अच्छा नहीं हैं. हिंदू शब्द का अर्थ है गुलाम, काला, लूटेरे, चोर." इथे हे चेकवले. तर हे सत्य निघाले. हिंदु शब्द फारसी मध्ये هندو लिहीतात हे गुगल वरुन समजले. हाच शब्द टाइप करुन पाहिला असता खालील उत्तर मिळाले. # English Farsi 1 Hindu or Hindoo , a black slave , a mole , a mother's mark , Indian , black هندو खर काय? हिंदु अशा नावाचा कुठलाच धर्म मुस्लीम आक्रमणापुर्वी कधीच नव्हता काय ?

In reply to by रांचो

http://www.farsidic.com/en/lang/FaFa ۱- اهل هند. ۲- سیاه از هر چیز. ۳- بنده، غلام. ۴- نگهبان. ۵- مجازاً به معنای: خال، زلف، کفر، کافر، دزد. 1- भारतातील 2. संपूर्ण काळा. 3- दास, नोकर. 4. रक्षक 5- याचा अर्थ म्हणजे तीळ, केस, निंदा, अविश्वास, अविश्वासू, चोर.

मी हिंदू आहे! असे सांगण्यापूर्वी खालील गोष्टींचा विचार व्हायला नको का? १. सर्वच धर्मांना संथापक आहेत, तर हिंदू धर्माचा संस्थापक कोण? २. ज्याला हिंदुधर्म म्हणतात तो खरेच धर्म आहे काय? ३. कोणत्याही तथाकथित धर्मग्रंथात हिंदू हा शब्द आलेला नाही, असे का झाले असावे? ४. कोणत्याही संत वचनांमद्धे हिंदू या शब्दाचा वापर का करण्यात आलेला नाही? ५. वैदिक, ब्राह्मणी, सनातन या नावाने प्रचलित असणाऱ्या संस्कृतीला धर्म म्हणता येईल काय? ६. हिंदू या तिरस्कार दर्शक शब्दाला आपण आपला धर्म का बरे म्हणावे? ७. वेद हे आपले धर्मग्रंथ असतील तर ते याच धर्मातील इतर लोकांना वाचण्यास आणि ऐकण्यास बंदी का होती? ८. ब्रिटीश काळात जनगणनेच्या वेळी आपण हिंदू आहोत, असे नोंद करून घेण्यास खूप जातींनी विरोध का केला होता? ९. आदिवाशी लोक स्वतःला हिंदू का बरे म्हणून घेत नव्हते? १०. तथाकथित ब्राह्मण लोक हिंदू आहेत काय? ११. ब्राह्मण लोक मरीआई, वेताळ, जोतीबा, बिरोबा, म्हसोबा या देवतांची पूजा का करीत नसावेत? १२. कागदोपत्री धर्म लिहिणे अनिवार्य असेल तेथे हिंदू असे लिहिणे गरजेचे आहे काय? बघा विचार करून!

धर्मग्रंथात हिंदू हा शब्दच नाही..... हिंदू धर्मग्रंथांच्या यादीत ४ वेद, १८ पुराणे, ६ शास्त्रे, ६४ कला यांचा समावेश करण्याची हौस हिंदूत्ववादी लेखकांना आहे. पण यापैकी एकाही ग्रंथात हिंदू हा शब्द आढळत नाही. हिंदू हा जर धर्म असेल, तर हा शब्द कुठल्या तरी धर्मग्रंथात असायला हवा होता. पण तो नाही. इतकेच काय अगदी अलीकडील काळातील वैष्णव, शैव, चैतन्य, नाथ आदी सांप्रदायांच्या वाङ्मयातही हिंदू हा शब्द आढळत नाही. असे का? याचे उत्तर कोणाकडेही नाही. याउलट आर्य आणि ब्राह्मण यांचे उल्लेख मात्र जागोजाग सापडतात. वैष्णव, शैव, चैतन्य, नाथ आदी हे सांप्रदाय वेद प्रणीत हिंदू पंथ नाहीत. त्यांचे नंतर हिंदुकरण झाले आहे. हिंदू हा शब्द इस्लामची देण..... लिखित स्वरूपात हिंदू शब्द पहिल्यांदा येतो शीखांचे आद्य गुरू गुरूनानक यांच्या लिखाणात. हिंदू धर्मातील भेद आणि विशेषाधिकार दूर करण्यासाठी नानकदेवांनी स्वतंत्र धर्मच स्थापन केल्याचे सर्वविदित आहेच. गुरूनानकांचा काळ हा इस्लामी आगमनाचा काळ होय. त्यावरून हिंदू हा शब्द इस्लामी राजवटीतच रुढ झाला, असे दिसते. भारतातील हजारो जातींची नावे, लक्षात ठेवणे नव्या इस्लामी राज्यकत्र्यांना शक्यच नव्हते. त्यामुळे त्यांनी सर्र्वासाठी सरसकट एक संज्ञा रुढ केली. भारतात हजारो जाती असल्या तरी इस्लामी राज्यकत्र्यांच्या दृष्टीने मुस्लिम लोक आणि एतद्देशीय बिगर मुस्लिम भारतीय असे दोनच भेद होते. त्यामुळे त्यांनी एतद्देशियांसाठी हिंदू ही संकल्पना रूढ केली. या काळात हिंदू शब्दाचा आणि विशिष्ट धार्मिक विचारधारेचा कोणताही संबंध नव्हता. एतद्देशीय लोकांसाठी वापरली जाणारी ती समूहवाचक संज्ञा होती. हिंदू ही पूर्णत: राजकीय होती, धार्मिक नव्हे. हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपण आजच्या काळाचे उदाहरण घेऊ या. आपल्या राज्यकत्र्यांनी ठराविक जाती समूहांचे गट करून एससी, एसटी, ओबीसी, ओपन अशा संज्ञा तयार केल्या आहेत. या संज्ञांना धार्मिक अधिष्ठान नाही. या सर्व संज्ञा राजकीय आहेत. तसाच हिंदू हा शब्द आहे. इस्लामी राजवटीच्या प्रारंभकाळी वापरात आला. त्यातून धर्म नव्हे, तर राजकीय अर्थ स्पष्ट होतो. इंग्रजी राजवटीत हिंदू शब्दाचे धार्मिकीकरण....... पुढे हजारभर वर्षे हिंदू हा शब्द हेटाळणीच्या स्वरूपातच वापरला जात होता. इंग्रजी राजवटीत इस्लाम आणि हिंदू हे समूह घटक प्रकर्षाने समोर आले. इंग्रजी राजवटीत या देशात कायद्याचे राज्य अस्तित्वात आले. त्यामुळे धर्माची अधिकृत नोंद करणे अनिवार्य ठरले. तेव्हा हिंदू हा शब्द अधिकृतरित्या धर्म म्हणून कागदोपत्री नोंद होऊ लागला. शीख, जैन धर्मांनी आपल्याला हिंदू म्हणवून घेण्यास विरोध केला. त्यामुळे त्यांचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले. तसे ते आधीपासूनच होते. जगभरात पसरलेला बौद्ध धर्मही आधीपासूनच स्वतंत्र होता. परंतु त्याचे अस्तित्व लेह-लदाख, आणि इशान्यभारतापुरते मर्यादित होते.

मी हिंदू का? हे कसे समजावे? भारत हा अनेक जातीजामातींचा, संमिश्र समाजाचा देश आहे. त्यात पारशी आहेत, ख्रिश्चन आहेत, मुसलमान आहेत, हिंदू आहेत. या जतिव्यवस्थेचा पाया 'वंश ' नसून 'धर्म' आहे. पण हा वरवरचा उथळ विचार आहे. पारशी हा पारशी का, ख्रिश्चन हा ख्रिश्चन का, मुसलमान हा मुसलमान कसा, आणि हिंदू हा हिंदू कसा हे जाणून घेणे मनोरंजक ठरेल. पारशी, ख्रिश्चन, मुसलमान यांबाबत हे सांगणे सोपे आहे. एखाद्या पारशाला विचार "तू स्वतःला पारशी का म्हणवतोस?" या प्रश्नाचे उत्तर पारशाला देणे अवघड वाटत नाही. मी पारशी आहे कारण मी झोरास्टरचा उपासक आहे". आता हाच प्रश्न मुसलमानाला विचारा. त्यालाही उत्तराला विलंब होणार नाही. तो लगेच सांगेल "मी इस्लामचा उपासक आहे म्हणून मी मुसलमान आहे". आता हाच प्रश्न हिंदूला विचारा. तो गोंधळून जाईल. काय उत्तर द्यावं ते त्याला समजणार नाही. हिंदू जमात ज्या देवांची उपासना करते त्या देवांची उपासना मी करतो म्हणून मी हिंदू आहे" असं उत्तर त्याने दिलं तर ते तितकंसं खरं नाही. सर्व हिंदू एकाच देवाची उपासना करीत नाहीत. काही लोक एकाच देव मानणारे, काही लोक अनेक देवांची उपासना करणारे तर काही लोक ईश्वर आणि सृष्टी एकच आहेत असे मानणारे आहेत. जे एकेश्वरवादी आहेत ते सर्व हिंदू एकाच देवाचे उपासना करतात असेही नाही. कुणी विष्णू, कुणी राम, कुणी शिव, कुणी कृष्ण यांची उपासना करतात. काही हिंदू पुरुष देवतांना न मानणारे आहेत. ते स्त्रीदेवतांचे उपासक, देवी उपासक असतात आणि असे असूनही ते एकाच देवीचे उपासक असतात असेही नाही. कुणी कालीचे उपासक, कुणी पार्वतीचे पूजक, तर कुणी लक्ष्मीचे भक्त.

काही लोक अनेक देवांची उपासना करतात. विष्णू आणि शिव, राम आणि कृष्ण यांची एकाच वेळी उपासना करणारे लोक आहेत. तेच लोक काली, पार्वती, लक्ष्मी यांचीही पूजा करतात. शिवरात्रीच्या दिवशी शिवोपासना म्हणून उपवास करणारा हिंदू एकादशीच्या दिवशी विष्णूची उपासना म्हणूनही उपवास करील. शंकरासाठी तो बेलाचे झाड लावील तर विष्णूसाठी तुळशीला पाणी घालेल. काही हिंदूंची उपासना हिंदू देवातांपुरतीच मर्यादित नसते. ते मुसलमानी पीर किंवा ख्रिश्चन देवता यांचीही पूजा करतात. अनेच किंदू पिराची पूजा करतात, उरूस असेल तिथं जातात.काही ठिकाणी पीराचे पूजक वंशपरंपरेने ब्राह्मणाच आहेत. ते मुसलमानी वेश परिधान करतात. मुंबई जवळील मत माउली या ख्रिश्चन देवीचे उपासक कितीतरी हिंदू आहेत. ख्रिश्चन किंवा मुस्लिम दैवतांची पूजा ही प्रासंगिक असते. पण कधीकाळी साऱ्या धर्मनिष्ठाच हिंदूंनी कायम स्वरुपात बदललेल्या आहेत असे दिसून येते. असे अनेक तथाकथित हिंदू आहेत की, ज्यांच्या धर्मात अनेक मुसलमानी तत्वांचा समावेश झाला आहे. पंचपीरीय प्रणाली हा एक हिंदू धर्मपंथ आहे. तो मानणारे हिंदू पाच मुसलमानी फाकीरांची पूजा करतात. दफ़ालि फकीर हा केवळ याच कामासाठी असतो. या पंथाचे हिंदू लोक या पंचपीरांना कोंबडे देतात. भारतात अनेक हिंदू मुसलमानी धर्माच्या पवित्र स्थानांचा तीर्थयात्रा करतात. पंजाबात सखी सरवार या नावाचं एक असं ठिकाण आहे. मलकानांविषयी लिहिताना श्री ब्लंट यांनी लिहून ठेवलय की मथुरा, इटाह आणि मैनपुरी या आग्रा परिसरात अनेक हिंदूंनी, त्यातील विविध जातींनी, धर्मांतर केलं, आणि हे लोक मुसलमान झाले. त्यापैकी अनेक लोक राजपूत, जाट, आणि बनिया होते. आपण मुसलमान आहोत हे सांगत नाहीत. ते सामान्यतः आपली मुलाची जातच सांगतात. त्यांची नावं हिंदू नावंच आहेत. ते मंदिरात जातात, ते राम राम करतात, त्यांच्यात विवाह फक्त जातीतच होतात. हे एका बाजूला, पण कधीतरी ते मशिदीत जातात. सुंता करतात आणि प्रेतांचे दफन करतात. आपल्या मुसलमान मित्रांसोबत ते पंगतीला बसतात.

गुजरात मध्ये अशा प्रकारच्या अनेक जाती आहेत. मटिया कुणबी ही त्यातलीच एक जमात. आपल्या घराच्या महत्वाच्या धार्मिक प्रसंगी हे कुणबी लोक ब्राह्मनालाच बोलावतात पण ते इमामशाह आणि त्यांचे वंशज यांचे अनुयायी आहेत. ते दफन करतात. आणखी एका जमातीत विवाहप्रसंगी हिंदू भटजी आणि मुस्लिम मौलालवी या दोघांनाही आमंत्रित करतात. मोमन नावाच्या जमातीत सुंता आहे. गुजराती कुराण वाचण्याचा परिपाठ आहे. दफन आहे. मात्र एवढ्या तीन गोष्टींव्यतिरिक्त बाकी सर्व बाबतीत मोमन लोक हिंदू रीतिरिवाज पाळतात. "मी हिंदू आहे कारण मी हिंदू धर्मशास्त्राचे पालन करतो " असे तो म्हणत असला तरी ती वस्तुस्थिती नाही. कारण हिंदुत्वाचा कुठलाच एक संप्रदाय नाही. ख्रिश्चन आणि मुसलमान यांच्या धर्मश्रद्धांची तुलना करता हिंदू लोकांच्या एकमेकांच्या धर्मश्रद्धांमध्ये खूपच फरक आढळतो. मुख्य आणि महत्वाच्या धर्म श्राद्धांबाबत हिंदूंमध्ये एकवाक्यता आढळत नाही. काही म्हणतात की हिंदूंचे सर्व पवित्र ग्रंथ स्वीकार्य आहेत; काही लोक तंत्र मानत नाहीत. काही लोक वेदांचेच महत्व मानतात. काहीजण कर्म सिद्धांतावरच विश्वास ठेवणारे आहेत. अनेक संप्रदायांची आणि तत्वांची संमिश्र असलेली सरमिसळ म्हणजे हिंदुत्व होय. या हिंदुत्वाच्या प्रवेशद्वारात एकेश्वरवादी, अनेकेश्वरवादी सर्वांना प्रवेश आहे; शिव आणि विष्णू यांचे पूजक; पार्वती आणि लक्ष्मी यांचे उपासक; आदिमाता किंवा ग्रामदेवता यांचे उपासक; रक्तविधीने आपल्या देवतेची कृपा संपादन करून घेणारे लोक; पूर्ण अहिंसावादी, सध्या जीवजंतूंना मारणे तर राहोच पण हिंसेचे शब्दसुद्धा ज्यांना व्यर्थ आहेत असे लोक; ज्यांच्या धर्म्विधीत केवळ प्रार्थना आणि स्तोत्रे आहेत असे लोक; धर्माच्या नावाखाली मद्द्यसेवनाने उपचार अवलंबिणारे लोक; आणि अशा प्रचलित मतांविरुद्ध असलेला पण संख्येने खूप मोठा असलेला समाज, ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व न मानणारा समाज ज्यांचे धार्मिक नेते अब्राह्मण आहेत असा समाज.....हे हिंदू समाजाचे चित्र आहे.

"मी हिंदू आहे कारण इतर अनेक हिंदू जे रीतीरिवाज पाळतात तेच मी पाळतो" असे एखादा हिंदू म्हणेल तर ते खरे नाही. कारण सर्व हिंदू सारे रीतीरीवास सर्वत्र पाळतात असे नाही. उत्तरेत निकटच्या नातेवाईकांत विवाह होत नाहीत. पण दक्षिणेत चुलत-मामे भाऊ-बहिण यांची लागणे होतात. याहूनही अधिक निकटच्या नात्यातील लग्नांना मान्यता मिळते. नियम म्हणून स्त्रीची शुद्धता, पावित्र्य यांना खूप महत्व दिले जाते. पण अनेकवेळा ही शुद्धता विवाहापूर्वीच नष्ट केली जाते आणि अनेक मुलींना "भाविणी" करण्यात समाज धन्य मानतो. या देशाच्या काही भागात स्त्रियांना मुक्तपणे वावरण्याची मुभा आहे तर काही भागात त्यांना बंदी आहे.काही ठिकाणी स्त्रिया स्कर्ट वापरतात तर काही ठिकाणी पुरुषांप्रमाणेही वेष परिधान करतात. आता आणखी एक मुद्दा. एखादा हिंदू म्हणू लागला की मी हिंदू आहे कारण मी जातीव्यवस्था मानतो..... तर हेही खरे नाही. एक खरे की, कोणत्याही हिंदू माणसाला आपल्या शेजाऱ्याचे रीतिरिवाज कोणते याच्याशी कर्तव्य नाही. पण आपण त्याच्याबरोबर बसून खावे का नाही, त्याच्या हातून पाणी प्यावे की नाही याचा तो अवश्य विचार करेल. याचाच अर्थ असा की, जातीव्यवस्था हे हिंदुत्वाचे आवश्यक अंग आहे. आणि अर्थातच जो माणूस कोणत्याही मान्य हिंदू जातीचा नाही तो हिंदू नसतो. हे खरे असले तरी हिंदुत्वाबाबत जातीव्यवस्था पाळणे एवघेच पुरेशे नसते. मुसलमान व ख्रिश्चन या धर्मात रोटी-व्यवहारात नसली तरी बेटी व्यवहारात जात पाहिली जातेच. पण एवढ्याने त्यांना हिंदू म्हणता येणार नाही. आवश्यकता दोन गोष्टींची असते. हिंदू हा हिंदूच असला पाहिजे आणि तो जातिव्यवस्था मानत असला पाहिजे. यातूनच पूर्वीचा प्रश्न उपस्थित होतो........हिंदू कोणाला म्हाणावे? प्रत्येक हिंदू माणसाला आपण हिंदू का आहोत याचे उत्तर देता यायला पाहिजे. ते पारशाला देता येते, मुसलमानाला देता येते, ते ख्रिश्चनाला देता येते. पण .......हिंदू माणसाला देता येत नाही. यामागची कारणे कोणती, हा धार्मिक गोंधळ नेमका काय आहे याची जाणीवपूर्वक उत्तरे शोधण्याची वेळ आलेली आहे. ............................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................................

मुळात धर्म म्हणजे काय ? धर्म कसे निर्माण झाले ? जंगलात राहणाऱ्या जंगली मानव प्राणी धर्मात कसा अडकला? विविध प्रकारचे धर्म निर्माण होण्याचं कारण काय? धर्माची तुम्ही जी thobhal व्याख्या दिली आहे ती खरी का मानवी तुम्ही सांगता म्हणून की काही प्राचीन पुरावे आहेत . पहिले ह्या सर्वाची उत्तर शोधून काढावी नंतर विशिष्ट धर्मावर चर्चा करावी . जे लवचिक धोरण ठेवून वेळेनुसार बदलतात ते चांगले की परस्थिती मध्ये अमुलाग्र बदल होवून सुधा खूप जुन्या जंगली नियमाचे पालन करतात ते श्रेष्ठ हे पहिले ठरवावं . आता तर माणूस aivdha प्रगत झाला आहे की धर्म हा फक्त मनःशांती मिळावी म्हणूनच पाळावा .मग ती शांती प्रत्येकाला वेगवेगळी मिळू शकते . हाच धर्म हा धर्मच नाही असल्या binkamachi आणि निघणारा निष्कर्ष कधीच सर्वमान्य होणार नाही अशी vazonti चर्चा म्हणजे वेळेचा दुरुपयोग आहे

धर्म म्‍हणजे काय? आणि त्‍याची आवश्‍यकता काय? याविषयी स्‍वामी विवेकानंदांनी अतिशय व्‍यावहारिक स्‍पष्‍टीकरण शंभर वर्षांपूर्वीच केले आहे. आणि ते आजही अगदी तंतोतंत लागू पडते. … केवळ उपयुक्‍तावादाचा आदर्श वाळगून पूर्णपणे निकोप, नीतिमान आणि चांगले झालेले कितीतरी थोर पुरूष ह्या आपल्‍या जगात होऊन गेले आहेत. परंतु जग हलवून सोडणा-या, जगात जणू एका प्रचंड आकर्षणशक्‍तीचा प्रादुर्भाव करणा-या, शेकडो हजारो लोकांवर प्रभाव पाडून त्‍यांना कार्यास प्रवृत्‍त करणा-या, आपल्‍या जीवनाने इतरांमधे आध्‍यात्मिकतेचा वन्‍ही चेतवून देणा-या व्‍यक्‍तींची पार्श्‍वभूमी मात्र आध्‍यात्मिकच असल्‍याचे आपल्‍याला नेहमी आढळून येईल. त्‍यांच्‍या ठायीच्‍या प्रचंड प्रेरणा धर्मातूनच निर्माण झालेल्‍या असतात. जिच्‍यावर मानवाचा जन्‍मसिध्‍द अधिकार आहे आणि जी मानवाच्‍या ठायी स्‍वरूपतःच वसत असते त्‍या अनंत शक्‍तीचा साक्षात्‍कार करून घेण्‍यासाठी जर मानवाला कुणी सर्वात जास्‍त प्रेरणा देत असेल तर तो धर्मच होय. चारित्र्य बनविण्‍यासाठी, जे काही चांगले आहे आणि थोर आहे ते घडविण्‍यासाठी, लोकांच्‍या जीवनात आणि स्‍वतःच्‍या अंतरात्‍म्‍याची प्रेरणा देणारी सर्वात मोठी शक्‍ती म्हणजे धर्म होय, आणि म्‍हणून त्‍या दृष्‍टीने त्‍याचे अध्‍ययन व्‍हावयासच हवे. धर्माचे अध्‍ययन-अनुशीलन आता पूर्वीपेक्षा विशाल दृष्टिकोनातून झाले पाहिजे. धर्मासंबंधीच्‍या सर्व संकुचित, मर्यादित, कलहप्रसू, आक्रमक कल्‍पना आता लयास जावयास हव्‍यात. धर्माविषयीच्‍या सा-या पंथनिष्‍ठ, जमातनिष्‍ठ, राष्‍ट्रनिष्‍ठ कल्‍पना टाकून द्यावयास हव्यात. प्रत्‍येक जाती-जमातीचा फक्‍त स्‍वतःचा असा एकेक विशिष्‍ट देव असावा आणि स्‍वतःखेरीज इतर सगळ्यांचा देव खोटा आहे असे प्रत्‍येकाने मानीत असावे ही भ्रामक, वेडगळ समजूत आता भूतकाळात जमा व्‍हावयास हवी. असल्‍या सगळ्या कल्‍पनांचा सपशेल त्‍याग करावयास हवा…. …. एक धर्म खरा ठरला तर सर्व धर्म खरे ठरतात आणि एक खोटा ठरला तर सगळे खोटे ठरतात हे जाणून निरनिराळ्या प्रकारच्‍या धर्मांमधे आपसात मैत्रीची भावना बळावणे आवश्‍यक आहे….. ….. धर्म आणि आधुनिक विज्ञान यामधे मिलाफ घडून यावयास हवा….. (स्‍वामी विवेकानंद ग्रंथावली 3, पृष्‍ठ 77-78)

In reply to by व्ही. डी. सी.

आपली स्वता:ची विचारसरणीच कशी बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी स्वामी विवेकानंदांच्या साहित्यातील फक्त एका परिच्छेदाचा संदर्भ (जो आपण समजता की आपल्या विचारसरणीशी मिळताजुळता आहे तो ) देऊन इतरांची दिशाभूल करू नये ही आपणास विनंती. आपल्या सारख्यांच्या माहिती साठी. Life of Swami Vivekananda by Eastern and Western Disciples, Chapter : In Madras and Hydrabad, Page 268 In that same meeting, when a Westernised Hindu spoke in a belittling manner of the "meaningless teachings" of the Vedic Seers, the Swami fell upon him with a thunderbolt vehemence, crying out, "How dare you criticise your venerable forefathers in such a fashion! A little learning has muddled your brain. Have you tested the science of the Rishis Have you even as much as read the Vedas? There is the challenge thrown by the Rishis! If you dare oppose them, take it up."

In reply to by मामाजी

त्यात विशेष असे काहीच नाही! तुम्ही काय सिद्ध करू पाहत आहात? तुम्हाला काय सुचवायचे आहे? वेद वाचायला? वेदांची, ऋषींची समीक्षा करायला तुमचा विरोध आहे काय?

हिंदू, मुस्लिम, ख्रिश्‍चन, बौध्‍द, जैन ही धर्माची केवळ बाह्यांगे आहेत. या प्रत्‍येक विचारसरणीच्‍या मूळाशी जाऊन अभ्‍यास केल्‍यास असे दिसून येते की, हे सर्व एकाच सत्‍याचे अनुसरण करीत आहेत. धर्म – जे धारण केले जाते तो धर्म ! प्रत्‍येक व्‍यक्‍तीचा धर्म वेगळा आहे आणि त्‍यात इतर कुणीही ढवळाढवळ करता कामा नये. आमचा धर्म, तुमचा धर्म, श्रेष्‍ठ धर्म, कनिष्‍ट धर्म, सनातन धर्म, पुरोगामी धर्म अशी गोष्‍टच वास्‍‍तविक अस्तित्‍वात नाही. प्रत्‍येकाने स्‍वतःचा धर्म ओळखून त्‍याचे प्रामाणिकपणे आचारण केले तरी या मानवजातीचा उध्‍दार होईल. इंजिनिअरचा धर्म तांत्रिक शाखेत अधिकाधिक प्रगती साधणे, डॉक्‍टरचा धर्म आपल्‍याकडे येणा-या प्रत्‍येक रोग्‍याचे रोगनिवारण, एक भारतीय म्‍हणून आपला धर्म या राष्‍ट्राच्‍या हितार्थ प्रयत्‍न करणे, एक माणूस म्‍हणून आपला धर्म आपल्‍या हिताबरोबरच इतरांचेही हित साधणे. आज आपण आपलाच धर्म विसरलो आहोत. त्‍यामुळेच इतरांचा धर्म चुकीचा, कनिष्‍ट, आणि आपलाच धर्म श्रेष्‍ठ अशी ओरड केली जाते. आणि याचा फायदा सत्‍तापिपासू, संपत्‍तीलोलूप स्‍वार्थी माणसे घेतात. स्‍वार्थपरायणता म्‍हणजे अधर्म आणि जिथे निःस्‍वार्थ भाव तिथेच धर्म. आपल्‍या देशात देशभक्‍तांची काही कमी नाही. पण त्‍यांच्‍यासमोर कुठलाही आदर्श नाही. इतिहासातील आदर्श समारे ठेऊन वाटचाल करावी तर त्‍या आदर्शांचीही चिरफाड करून त्‍यांची लक्‍तरे वेशीवर टांगली जातात. तथापि कोणताही आदर्श परीपूर्ण असूच शकत नाही. म्‍हणून आपला आदर्श श्रेष्‍ठ आणि इतरांचा आदर्श निकृष्‍ट, खोटा हे आपण ठरवू नये. आपण आपल्‍या आदर्शांवर ठाम असावे, इतरांना भलेही त्‍यांच्‍या आदर्शांचे अनुसरण करू द्या. धर्म, इश्‍वर, संस्‍कृती यांवर तर्कटे लढवून आपला अमूल्‍य वेळ वाया दवडवण्‍यापेक्षा काहीतरी कार्य करण्‍याची वेळ आली आहे. जुनी थडगी उकरून काय साध्‍य होणार ? आपल्‍यासमोर वर्तमान भारत आणि त्‍यातील समस्‍या उभ्‍या आहेत. प्रचंड कार्य उभे आहे. त्‍यासाठी आपला वेळ आणि शक्‍ती कारणी लावण्‍याची नितांत आवश्‍यकता आहे. “शंभर विचारांपेक्षा एक आचार श्रेष्‍ठ !”

प्रत्‍येकाने सर्वस्‍वाचा त्‍याग करून प्राणांची आहूती द्यावी, अशी अपेक्षा मुळीच नाही. परंतु प्रत्‍येकाने आपला धर्म जाणून तो जरी प्रामाणिकपणे निभावला तरी खूप काही होण्‍यासारखे आहे. धावण्‍याच्‍या शर्यतीत प्रत्‍येक धावपटू वेगवेगळ्या ट्रॅकवर उभा असतो, पण प्रत्‍येकाला समान अंतर आणि समान लक्ष्‍य गाठायचे असते. असे असताना प्रत्‍येक जण इतरांचे गुण अवगुण काढून एकमेकांचे पाय ओढू लागला, इतरांच्‍या मार्गात अडथळा निर्माण करू लागला तर ती शर्यत निरर्थक ठरेल आणि कुणीही लक्ष्‍य गाठू शकणार नाही. म्‍हणूनच इतरांच्‍या मार्गांवर, श्रध्‍दांवर, मतांवर चिखलफेक करण्‍यापेक्षा इतरांना त्‍यांच्‍या वाटेने जाऊ द्या. आपण आपले मार्गक्रमण करीत रहावे. पण एखाद्याला काहीच करावयाचे नसेल तर …… तर मग ही कुरघोडी चालूच राहणार. अंतर्गत वादविवादांनीच या देशाचे वाटोळे झाले आहे. चर्चिलच्‍या “या गाढवांना (भारतीयांना) स्‍वातंत्र्य देऊ नका. त्‍यांची ती लायकी नाही. ते देश चालवू शकत नाहीत.” या उद्गारांची प्रचिती येऊ लागली आहे. तरूणपिढीने आपली ऊर्जा विरोध, वाद यांच्‍यावर खर्च न करता त्‍याचा उपयोग राष्‍ट्रहितार्थ विधायक कामासाठी करावा, अन्‍यथा आणखीही दुरावस्‍था अटळ आहे. आपल्‍यासमोर भरपूर कार्य पडले आहे. केवळ शासनावर अवलंबून न राहता वैयक्तिक स्‍तरावर हे कार्य करीत राहिले पाहिजे. आज भारताला स्‍वामी विवेकानंदांच्‍या विचारांची नितांत आवश्‍यकता आहे. प्रत्‍येक व्‍यक्‍तीत ईश्‍वर पाहा, म्‍हणजे वादविवाद उरणार नाहीत. माणसासाठी धर्म आहे, धर्मासाठी माणूस नाही. मानवधर्म हाच श्रेष्‍ठ धर्म आहे. ईश्‍वराच्‍या साक्षात्‍कारासाठीच धर्मांची उत्‍पत्‍ती झाली आहे आणि राष्‍ट्रसेवा हीच ईश्‍वरसेवा, शिवभावे जीवसेवा. या सेवेतूनच ईश्‍वरसाक्षात्‍काराप्रत पोहोचणे शक्‍य आहे. अन्‍यथा कीड्यामुंग्‍याप्रमाणे आपापसात निरर्थक भांडून, लढून मरून जा. असल्‍या मरण्‍यांतून काहीही साध्‍य होत नसते. कसे मरावे हे ज्‍याचे त्‍याने ठरवावे.

ह्या सृष्टी मध्ये सर्वच प्राणी संघर्ष करत आसतात जगण्यासाठी त्यात ऐकपेशीय पासून मानव सारखं प्रगत प्राणी सुधा संघर्ष करत आसतात . पोटपानी आणि निवारा हे दोन प्रश्न सुटले की वर्चस्वाची लडाई चालू होते ती aikte पने लढली जात नाही ती सामूहिक रित्या लढावी लागते त्यासाठी समूह आसने गरजेचं आणि आताच्या पॅरिस धर्म म्हणजेच विशिष्ट समूह मतभेद श्रेष्ठ कनिष्ठ हा जो प्रकार आहे ते म्हणजे वर्चस्व स्थापन करण्यासाठी चाललेली धडपड बस आणि काही नाही . प्रत्येक समूह (धर्म) आशि भीती वाटते की आपला समूह हरला तर आपले अस्तित्व च संपेल . आणि तीच भीती विविध समूहात ( धर्मात) युद्ध घडवून आणते किंवा दंगली घडवून आणते किंवा द्वेष निर्माण करते .. त्या मुळे शहाण्या सारखं वागा आणि धर्म घरातच ठेवा हयात च हित आहे

व्ही. डी. सी., तुमचा इथला संदेश वाचला. 'मी हिंदू आहे' असे सांगण्यापूर्वी खालील गोष्टींचा विचार करायची मलातरी गरज वाटंत नाही. पण कुतूहल शमावं म्हणून उत्तरं देत आहे. १. सर्वच धर्मांना संथापक आहेत, तर हिंदू धर्माचा संस्थापक कोण? उत्तर : परमेश्वर. धर्मं तु साक्षात् भगवत्प्रणितम् अशी भागवतात उक्ती आहे. २. ज्याला हिंदुधर्म म्हणतात तो खरेच धर्म आहे काय? उत्तर : हो. कारण जो धारणा करतो तो धर्म. निव्वळ जन्म घेऊन कोणी हिंदू होत नसतो. त्यासाठी साधना करावी लागते. ३. कोणत्याही तथाकथित धर्मग्रंथात हिंदू हा शब्द आलेला नाही, असे का झाले असावे? उत्तर : कारण की हिंदू धर्माचं स्वनाम (= self addressing) सनातन धर्म आहे. ४. कोणत्याही संत वचनांमद्धे हिंदू या शब्दाचा वापर का करण्यात आलेला नाही? उत्तर : कारण की हिंदू धर्माचं स्वनाम (= self addressing) सनातन धर्म आहे. ५. वैदिक, ब्राह्मणी, सनातन या नावाने प्रचलित असणाऱ्या संस्कृतीला धर्म म्हणता येईल काय? उत्तर : हो. ६. हिंदू या तिरस्कार दर्शक शब्दाला आपण आपला धर्म का बरे म्हणावे? उत्तर : मूर्ख लोकांनी तिरस्काराने भारतातल्या सनातनधर्मीयांना हिंदू असं संबोधून त्यांच्या कत्तली केल्या. तसंच वित्तहानी देखील केली. त्यामुळे अशा आक्रमकांच्या विरुद्ध एकजूट करणं सोपं जावं म्हणून सनातन धर्मीयांनी हिंदू हीच प्रचलित संज्ञा वापरणं चालू ठेवलं. उदा. : शिवाजीमहाराजांनी हिंदुपदपातशाहीचा पुरस्कार केला. ७. वेद हे आपले धर्मग्रंथ असतील तर ते याच धर्मातील इतर लोकांना वाचण्यास आणि ऐकण्यास बंदी का होती? उत्तर : वेद ऐकायची कोणालाही कसलीही बंदी कधीही नव्हती. खरंतर वेदघोष सर्वत्र पसरायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. ८. ब्रिटीश काळात जनगणनेच्या वेळी आपण हिंदू आहोत, असे नोंद करून घेण्यास खूप जातींनी विरोध का केला होता? उत्तर : माहित नाही. बहुधा पैसे वा इतर सवलतींच्या लोभाने या जाती स्वत:स अहिंदू म्हणवून घेत असाव्यात. ९. आदिवाशी लोक स्वतःला हिंदू का बरे म्हणून घेत नव्हते? उत्तर : बहुधा अज्ञानामुळे वनवासी लोक स्वतःला हिंदू म्हणवून घेत नसावेत. १०. तथाकथित ब्राह्मण लोक हिंदू आहेत काय? उत्तर : हो. ११. ब्राह्मण लोक मरीआई, वेताळ, जोतीबा, बिरोबा, म्हसोबा या देवतांची पूजा का करीत नसावेत? उत्तर : माहित नाही. पण हिंदू धर्मीयांत कोणीही कोणत्याही देवाची पूजा करू शकतो. १२. कागदोपत्री धर्म लिहिणे अनिवार्य असेल तेथे हिंदू असे लिहिणे गरजेचे आहे काय? उत्तर : हो. कारण की हिंदूंची संख्या कमी असल्याचं कारण देऊन भारतातून पाकिस्तान ओरबाडून काढला गेला. त्यामुळे शक्य तिथे सनातनधर्मीयांनी स्वत:स हिंदू म्हणून घोषित करावं या मताचा मी आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by व्ही. डी. सी.

व्ही.डी.सी., मोघम उत्तरांनी तुमचं काय घोडं मारलंय हो? उत्तरं मोघम असली तरी अचूक आहेत. मला फापटपसारा आवडंत नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी, वैज्ञानिक दृष्टी स्वीकारलेल्या कोणासही न पटणारी तर्कटे !

In reply to by व्ही. डी. सी.

हायला हे बुबुडविपुमाधवि आहेत असं दिसतंय

In reply to by व्ही. डी. सी.

वी.डी.सी., तुम्हांस माझा युक्तिवाद पटंत नसल्यास वस्तुस्थितीच्या आधारावर खोडून काढा. आ.न., -गा.पै.

In reply to by व्ही. डी. सी.

व्ही.सी.डी., उगीच विशेषणे चिकटवण्यापेक्षा माझा युक्तिवाद सप्रमाण खोडून दाखवा. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मानवता हाच धर्म मानून विवेकशील बुद्धीने विचार केल्यास खालील प्रश्नांना खालीलप्रमाणे उत्तरे देता येतील! १. सर्वच धर्मांना संथापक आहेत, तर हिंदू धर्माचा संस्थापक कोण? उत्तर : परमेश्वर. धर्मं तु साक्षात् भगवत्प्रणितम् अशी भागवतात उक्ती आहे.------------ साफ चूक! परमेश्वर हा धर्म किंवा माणसाचा निर्माता नसून माणसानेच परमेश्वर व धर्माची निर्मिती केलेली आहे! २. ज्याला हिंदुधर्म म्हणतात तो खरेच धर्म आहे काय? उत्तर : हो. कारण जो धारणा करतो तो धर्म. निव्वळ जन्म घेऊन कोणी हिंदू होत नसतो. त्यासाठी साधना करावी लागते.--------------मुळीच नाही! हिंदू नावाचा कोणताच धर्म या धरतीवर अस्तित्वात नाही! तथाकथित धर्माचे ठेकेदार त्यांचा वैदिक धर्म हिंदू शब्दाच्या आडून चालवीत आहेत! ३. कोणत्याही तथाकथित धर्मग्रंथात हिंदू हा शब्द आलेला नाही, असे का झाले असावे? उत्तर : कारण की हिंदू धर्माचं स्वनाम (= self addressing) सनातन धर्म आहे.------------- हा शब्दच भारतीय नाही! पारशी शब्द ज्याचा अर्थ आहे काळा, गुलाम, चोर, लुटेरा! विजेत्यांनी पराजितांसाठी दिलेली हि एक राजकीय सज्ञा आहे! हा शब्द १००० वर्षांपेक्षा जास्त जुना नाही! ४. कोणत्याही संत वचनांमद्धे हिंदू या शब्दाचा वापर का करण्यात आलेला नाही? उत्तर : कारण की हिंदू धर्माचं स्वनाम (= self addressing) सनातन धर्म आहे.--------------- जो शब्दच भारतीय नव्हता तो शब्द संत वचनांमध्ये येणे अशक्य होते! त्या काळी तो शब्द प्रचलित नसल्यामुळेच हे घडलेले असावे, नाही काय?

In reply to by व्ही. डी. सी.

५. वैदिक, ब्राह्मणी, सनातन या नावाने प्रचलित असणाऱ्या संस्कृतीला धर्म म्हणता येईल काय? उत्तर : हो.----------------- खरे पहिले तर, नाही! तिला आदिम संस्कृतीच म्हणणे योग्य होईल! ६. हिंदू या तिरस्कार दर्शक शब्दाला आपण आपला धर्म का बरे म्हणावे? उत्तर : मूर्ख लोकांनी तिरस्काराने भारतातल्या सनातनधर्मीयांना हिंदू असं संबोधून त्यांच्या कत्तली केल्या. तसंच वित्तहानी देखील केली. त्यामुळे अशा आक्रमकांच्या विरुद्ध एकजूट करणं सोपं जावं म्हणून सनातन धर्मीयांनी हिंदू हीच प्रचलित संज्ञा वापरणं चालू ठेवलं. उदा. : शिवाजीमहाराजांनी हिंदुपदपातशाहीचा पुरस्कार केला. ---------------- 'हिंदवी स्वराज्य' हिंदुपदपातशाही नव्हे! हिंदवी या शब्दाचा अर्थ भारतीय (प्रदेश वाचक) असा होतो! हा तिरस्कार दर्शक शब्द धर्माला जोडणे योग्य नव्हे! ७. वेद हे आपले धर्मग्रंथ असतील तर ते याच धर्मातील इतर लोकांना वाचण्यास आणि ऐकण्यास बंदी का होती? उत्तर : वेद ऐकायची कोणालाही कसलीही बंदी कधीही नव्हती. खरंतर वेदघोष सर्वत्र पसरायला पाहिजे अशी अपेक्षा आहे.------- साफ खोटे! मनुस्मृतीत (मानवशास्त्र) शुद्राने वेद मंत्र ऐकले तर त्याच्या कानात गरम शिसे अथवा उकळते तेल अथवा गरम लाख ओतण्याची आज्ञा आहे! ८. ब्रिटीश काळात जनगणनेच्या वेळी आपण हिंदू आहोत, असे नोंद करून घेण्यास खूप जातींनी विरोध का केला होता? उत्तर : माहित नाही. बहुधा पैसे वा इतर सवलतींच्या लोभाने या जाती स्वत:स अहिंदू म्हणवून घेत असाव्यात.--------------- हिंदू या शब्दाचा आणि त्यांचा दूर-दूर कोठेच संबंध नसू शकतो, जुलमी वैदिक लोकांचा हा बेगडी धर्म बनला आहे, हिंदू शब्दा आडून हे लोक ब्राह्मणी फास आपल्या गळ्याभोवती आवळत आहेत, हे त्यांनी पक्के हेरले असेल!

In reply to by व्ही. डी. सी.

९. आदिवाशी लोक स्वतःला हिंदू का बरे म्हणून घेत नव्हते? उत्तर : बहुधा अज्ञानामुळे वनवासी लोक स्वतःला हिंदू म्हणवून घेत नसावेत.-------------- त्यांना तथाकथित ब्राह्मणांचे वर्चस्व अमान्य असणार, हे उघड आहे! १०. तथाकथित ब्राह्मण लोक हिंदू आहेत काय? उत्तर : हो.------------- मुळीच नाही! त्यांचा धर्म (संस्कृती) आर्य / सनातन / ब्राह्मणी / वैदिक. त्यांचे देव वेदातले, इतर देवांचा व त्यांचा दुरान्वे संबंध नाही! ११. ब्राह्मण लोक मरीआई, वेताळ, जोतीबा, बिरोबा, म्हसोबा या देवतांची पूजा का करीत नसावेत? उत्तर : माहित नाही. पण हिंदू धर्मीयांत कोणीही कोणत्याही देवाची पूजा करू शकतो.------------- ब्राहमण लोक त्या अनार्य देवांना देव मानत नाहीत, हे उघड आहे. १२. कागदोपत्री धर्म लिहिणे अनिवार्य असेल तेथे हिंदू असे लिहिणे गरजेचे आहे काय? उत्तर : हो. कारण की हिंदूंची संख्या कमी असल्याचं कारण देऊन भारतातून पाकिस्तान ओरबाडून काढला गेला. त्यामुळे शक्य तिथे सनातनधर्मीयांनी स्वत:स हिंदू म्हणून घोषित करावं या मताचा मी आहे.------------- अजिबात नाही! धर्माच्या रकान्यात आपण भारतीय सुद्धा लिहू शकतो!

आसे विज्ञानवादी ,बुधीप्रमण्या वादी,विवेक वादी ऐक तरी kutumbh भारतात आसेल का . खरोखर प्रत्येक घराचा सर्व्ह केला आणि ते रोजच जीवन कसं जगतात ह्याची माहिती घेतली तर भारतात ऐक सुधा kutumbh वरील सर्व गुण आसलेल्या सापडणार नाही . बोलायला फक्त ठीक बरे नशीब हे शब्द मराठी पुराण काळापासून आहेत नाही तर वर्णन करायल शब्द पण नसते मिळाले .हेच सत्य आहे .डोळे उघडे ठेवून फक्त सर्वधर्मीय समाज बघा मग पटेल

स्वतःच्या घरातील वातावरण बघून पूर्ण भारताबद्दल निष्कर्ष काढणे योग्य नव्हे! भारतात असंख्य कुटुंबे बुद्धिवादी, विवेकवादी, विज्ञानवादी विचारांचे आहेत, हे जर माहीत नसेल तर खूपच अवघड आहे!

जगात तसे महत्वाचे चार धर्म ख्रिश्चन ,मुस्लिम , बुद्ध,आणि हिंदू . लोकसंख्या हा पाया आसेल तर जगात हिंदू लोकसंख्या 70 ते 80 करोड पेक्षा जास्त आसेल म्हणजे कित्येक लहान धर्मा पेक्षा जास्त (जैन वैगेरे) त्यात मुस्लिम ,ख्रिश्चन हे दोन्ही धर्म भारता बाहेरचे आणि बुद्ध आणि हिंदू हे दोन धर्म भारतीय उपखंडातील . ज्यांना हिंदू हा धर्म आहे का प्रश्न पडतो त्यांनी पाहिले धर्माची व्याख्या . हिंदू सोडून (कारण हिंदू हा धर्म नाही आस प्रश्न कर्त्याला शंका आहे ) नंतर हिंदू सोडून बाकी तिन्ही धर्म किती वर्षा पूर्वी स्थापन झाले आणि का स्थापित झाले ह्याच सविस्तर उत्तर द्यावे . हे सर्व धर्म लोकांनी स्वतः स्वीकारले की तलवार आणि हिंसा करून अनुयायी वाढवले व विचार जबरदस्ती लादले. तो इतिहास सांगणे . कर्मकांडाचे विविध प्रकार जे खरे धर्म आहेत त्यांच्यात आहे का ह्याची पण माहिती द्या फक्त ह्याच पॉइंट वर चर्चा करून नंतर tharvuya हिंदू धर्म आहे का . पहिले धर्म म्हणजे काय हे तर सर्वांना समजावं

व्ही.सी.डी. तुमचे वरील प्रतिसाद वाचले. पहिल्याप्रथम माझ्याकडून प्रतिसादास उशीर झाल्याबद्दल क्षमा मागतो. आता माझी मतं सांगतो. १.
साफ चूक! परमेश्वर हा धर्म किंवा माणसाचा निर्माता नसून माणसानेच परमेश्वर व धर्माची निर्मिती केलेली आहे!
माणूस म्हणजे नक्की काय? देह तर सतत बदलंत असतो. देह मेला तरी त्यातली चेतना मरंत नाही. ती पुनर्जन्म घेते. म्हणून परमेश्वराने माणूस उत्पन्न केला हेच सत्य आहे. २.
हिंदू नावाचा कोणताच धर्म या धरतीवर अस्तित्वात नाही! तथाकथित धर्माचे ठेकेदार त्यांचा वैदिक धर्म हिंदू शब्दाच्या आडून चालवीत आहेत!
हिंदू धर्म म्हणजेच वैदिक परंपरा हे तुमचं नितीक्षण अगदी अचूक आहे. मात्र त्यासाठी धर्माचा ठेकाबिका घ्यायची काय गरज आहे? ज्याप्रमाणे विज्ञानाचा ठेका घेता येत नसतो त्याप्रमाणेच वैदिक परंपरेचाही कोणी ठेका घेऊच शकंत नाही. ३.
हा शब्दच भारतीय नाही!
मी सनातन या शब्दाबद्दल म्हणंत होतो. ४.
हा शब्द १००० वर्षांपेक्षा जास्त जुना नाही!
हिंदू हा शब्द इ.स.पू. ५०० पासनं म्हणजे गेले २५००+ वर्षं अस्तित्वात आहे. संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Hinduism#Etymology ५.
त्या काळी तो शब्द प्रचलित नसल्यामुळेच हे घडलेले असावे, नाही काय?
असू शकतं. ६.
तिला आदिम संस्कृतीच म्हणणे योग्य होईल!
मान्य. ७.
हिंदवी या शब्दाचा अर्थ भारतीय (प्रदेश वाचक) असा होतो! हा तिरस्कार दर्शक शब्द धर्माला जोडणे योग्य नव्हे!
तिरस्कार करणारे कशाचाही तिरस्कार करतात. मारणाऱ्याचा हात धरता येतो, पण बोलणाऱ्याचं तोंड नाही पकडता येत. ८.
मनुस्मृतीत (मानवशास्त्र) शुद्राने वेद मंत्र ऐकले तर त्याच्या कानात गरम शिसे अथवा उकळते तेल अथवा गरम लाख ओतण्याची आज्ञा आहे!
हे धडधडीत खोटं आहे. कुठल्याही श्लोकात ही आज्ञा नाही. इथे मनुस्मृती मराठीतनं उपलब्ध आहे : http://ebooks.netbhet.com/2016/12/manusmruti.html त्यातूनही तुम्हाला कानांत वितळतं शिसं हवं असेल तर ते इथे मिळेल : http://www.islamhelpline.net/node/4392 कृपया वाळवंटी प्रथांच्या धोंडी हिंदूंच्या गळ्यात बांधू नयेत. ९.
जुलमी वैदिक लोकांचा हा बेगडी धर्म बनला आहे,
वैदिकांनी या जातींवर नक्की काय जुलूम केले त्याची यादी मिळेल काय? १०.
त्यांना तथाकथित ब्राह्मणांचे वर्चस्व अमान्य असणार, हे उघड आहे!
कुठल्या ब्राह्मणांनी वनवासी विभागांत जाऊन आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे? काही विदा उपलब्ध आहे काय? वनवासी क्षेत्रांत ख्रिस्ती मिशनऱ्यांची बाटवाबाटवी जोरात चालते. तर मग वनवाशांना ख्रिस्त्यांचं वर्चस्व मान्य असतं असा अर्थ काढायचा का ? ११.
त्यांचा धर्म (संस्कृती) आर्य / सनातन / ब्राह्मणी / वैदिक. त्यांचे देव वेदातले, इतर देवांचा व त्यांचा दुरान्वे संबंध नाही!
हे तुम्हांस कोणी सांगितलं? शिवाय, समजा जर संबंध प्रस्थापित करायचा असेल तर रोखणारे कोण आहे? १२.
ब्राहमण लोक त्या अनार्य देवांना देव मानत नाहीत, हे उघड आहे.
नसले किंवा असले तरी त्यामुळे काय मोठं आकाश कोसळून पडणार आहे? १३.
अजिबात नाही! धर्माच्या रकान्यात आपण भारतीय सुद्धा लिहू शकतो!
हिंदूंची संख्या कमी असल्याचं कारण देऊन भारतातून पाकिस्तान ओरबाडून काढला गेला. हा प्रकार पूर्वी घटना अस्तित्वात नसतांना झालेला आहे. आता धर्माच्या रकान्यात भारतीय लिहिता येतं कारण घटना अस्तित्वात आहे. मात्र 'घटनादत्त अल्पसंख्याक' या नावाखाली मुस्लिमांचं लांगूलचालन होत असल्याने परत दुसरी फाळणी होऊ शकते. ती टाळण्यासाठी हिंदू ही ओळख आवश्यक आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

((कारण की हिंदू धर्माचं स्वनाम (= self addressing) सनातन धर्म आहे.)) ==)) हे नाही रुचले. याबद्दल कृपया थोडे विस्तृत लिहा. === तुमच्या बाकी दाव्यांबद्दल अजून निश्कर्षापर्यंत पोहचलो नाही. त्यामुळे तुर्तास हिंदू धर्मावरील वाद-संवादाचा आनंद घेत आहे.

विशुमित,
हे नाही रुचले. याबद्दल कृपया थोडे विस्तृत लिहा.
यांत न रुचण्यासारखं काय आहे? हिंदू धर्मग्रंथांत हिंदूधर्माचा उल्लेख सनातनधर्म असा आला आहे. सनातन याचा अर्थ नित्यनूतन. आता हिंदू विरोधकांनी सनातनी या शब्दाचा अर्थ मागासलेला असा बरोब्बर विरुद्ध लावलेला आहे, त्याला आपण काहीच करू शकंत नाही. आ.न., -गा.पै.

बहुधा अज्ञानामुळे वनवासी लोक स्वतःला हिंदू म्हणवून घेत नसावेत. {{ सगळ्या दुनियेचे ज्ञानी आपणच.. आदिवासी ला आदिवासी न म्हणता वनवासी म्हणायचे. आदिवासी म्हटले तर आपण उपरे ठरतो आक्रमणकारी ठरतो ही भिती. वनवासी म्हणता अज्ञानी म्हणायचं. एकुन काय आम्हीच श्रेष्ठ.

In reply to by अर्वाच्य

अर्वाच्य, केलीत ना नावाप्रमाणे अर्वाच्य चूक! मेकॉलेछाप शिक्षणातनं बुद्धी कशी भरकटते त्याचं उत्तम उदाहरण आहे तुमचा प्रतिसाद. जंगलातले बांधव जसे आदिवासी आहेत अगदी तस्सेच हिंदूसुद्धा भारताचे आदिवासीच आहे. हिंदूंचे बापजादे अनादि अनंत काळापासून भारतात वास्तव्यास आहेत. हिंदूंस कोण्या कनिंगह्यामाच्या वा मोक्षमूलशास्त्र्याच्या प्रमाणपत्रांची गरज नाही. तुमच्या मेकॉलेछाप शिक्षणात शिकवतात की आर्य भारतात बाहेरून आले, मात्र पुराव्याच्या नावाने पार बोंबाबोंब असते. मग जंगली बांधवांचा नेमका उल्लेख करण्यासाठी वनवासी हीच संज्ञा उपयुक्त नव्हे काय? आ.न., -गा.पै.

हिंदू धर्माचे 90 कोटी पर्यंत अनुयायी असतील त्यानं हिंदू धर्म म्हणजे काय हा प्रश्न पडला नाही . त्यांना सर्व सविस्तर माहिती आहे बाकी धर्म म्हणजे काय आहेत ते सुधा माहीत आहे जास्त योग्य धर्म म्हणून खूप मोठी लोकसंख्या हा धर्म jopaste आहे आणि किती ही आकड तांडव केले ,कितीही खोटे दाखले दिले तरी हिंदू आपल्या धर्मा वरच प्रेम् kartil उगाच शक्ती नका वाया घालवू त्या पेक्षा स्वधर्म सुधारा