आज मी आपल्या समोर सादर करणार आहे-फुलांच्या रांगोळ्या कश्या काढाव्या? याच्या काहि व्हिडिओ क्लिपिंग्ज आणी माहिती.होतं काय,की खूपजण ह्या रांगोळ्या बघतात.त्यांना त्या अवडतात,आणी ''गुर्जी आंम्हाला पण थोडं शिकवा की टेक्निक!'' अशी विचारणा सुरू होते. मग मी असा विचार केला की इथे मिपावरपण मी माझ्या फुलांच्या रांगोळ्या दाखवल्या आहेत. https://misalpav.com/node/23831 आणी त्यातंही "रांगोळ्यांच्या" तांत्रिकतेबद्दल,अगदी माफक का होइ ना...पण,चर्चा/विचारणा झाल्या होत्याच
म्हणूनच त्याचा पुढचा टप्पा किंबहूना त्या अधिचाच टप्पा म्हणून काहि मूलभूत तंत्र आज इथे सांगत आहे.कारण या रांगोळ्या काढण्यात तंत्राशिवाय ज्या गोष्टिंची गरज असते,अश्या गोष्टी म्हणजे अंगभूत कला/आवड(हौस नव्हे!)/रंगसंगतीचं उपजत ज्ञान/संयम आणी सगळ्यात महत्वाची-चिकाटी! बास्स...,या सर्व गोष्टी ज्याच्याकडे मुळातच आहेत, त्यानी यातली तंत्र शिकली,की तो यातला माश्टर झालाच!
फुलांच्या रांगोळ्यांमधे या रांगोळ्या आकर्षक/सुबक/प्रमाणबद्ध होण्याकरिता फुलांच्या कटिंगची काहि तंत्र आहेत,त्याचप्रमाणे फुलं कुठनं?कशी?किती घ्यावीत? ही पुढे पुढे आपोआप उमजणारी तंत्र आहेत. शहरांमधे छोट्या-फुलविक्रेत्यांकडून फुलं घेऊ नयेत.ते सर्वच दृष्टिनी नुकसानकारक होतं.फुलांचं,मोठ्ठं घाऊकविक्रिचं ठिकाण शोधावं,जसे की पुण्यामधे गुलटेकडीचं-मार्केटयार्ड,म्हणजे आमची फुलांची महामंडई! https://misalpav.com/node/20666 अश्या ठिकाणी फुलं घेण्याचा फायदा म्हणजे,प्रत/विपुलता/वैविध्य(कॉलिटी/काँटिटी/व्हरायटी) या फुलांच्या रांगोळीसाठी अत्यावश्यक अशा गोष्टी या ठिकाणी मिळतात.
चला तर मग...
अता आज आपण पाहू,
फुलांच्या कटींगची २ तंत्र आणी १ रांगोळीचं छोटं प्रात्याक्षिक
दाखवणार्या व्हिडिओ क्लिप...
१)लिलिच्या फुलांची कापण्याची पद्धत...
====================================
२)झेंडुच्या पाकळ्यां काढण्याची(विशिष्ट) पद्धत...
====================================
३)लिलिचं कमळ किंवा गोलावा(प्रात्याक्षिक...)
====================================
क्रमशः
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्रमशः धन्यवाद!
धन्यवाद!
भारीच आहे..पाऊस संपल्यावर एक
भारीच आहे..पाऊस संपल्यावर एक एक ट्राय करेन..तोपर्यंत तुम्ही क्रमशः शिकवा... :)
खुपच छान.
खुपच छान.
चलचित्र अंधार.
माझ्या संगणकावर चलचित्र (व्हिडिओ) दिसत नाहीएत. कोणीतरी मदत करा की रे! पूर्वी चालायचे, आता माहित नाही काय झालय.
झालं बाबा सुरु...
In reply to चलचित्र अंधार. by प्रभाकर पेठकर
झालं सुरु एकदाचं.
श्री. पेठकर काका,
In reply to झालं बाबा सुरु... by प्रभाकर पेठकर
श्री. पेठकर काका,
तुमचा पीशी पण गुर्जींच्या फुलांनेच व्हिडीऑ दाखवतो बहुतेक. आता एक फुलांच्या रांगोळी चे चित्र कायमचे वॉलपेपर म्हणून ठेवा. व्हिडीओ कायम दिसतील. :)
गुर्जी कळली ब्वा तुमच्या कलेची पावर. ;)
अगदी खरं.
In reply to श्री. पेठकर काका, by अभ्या..
ही:..ही:..ही:.. खरं आहे.
तसंही 'इतर' व्हिडिओ पाहायचा शौक नाही. (म्हणजे आता उरला नाही).
सुन्दर
आत्माराम धन्स.
अरे वा! सुरेख! शिकवणी का?
अरे वा! सुरेख! शिकवणी का?
आम्ही मागल्या बेंचवरचे अडाणी विद्यार्थी आहोत :) शिकू शकलो नाही तरी उत्सुकतेने वाचत, बघत आहोत :)
@शिकू शकलो नाही तरी
In reply to अरे वा! सुरेख! शिकवणी का? by यशोधरा
@शिकू शकलो नाही तरी उत्सुकतेने वाचत, बघत आहोत >>> नाय नाय नाय...असं व्हनार नाय...तुम्ही व्हिडिओ क्लिप्स पहा आणी ऐका...फुलांची कटिंग करता करता त्याबद्दलचं सर्व काही सांगितलं आहे... त्यामुळे पहा व ऐका...अगदी सहज जमेल,अवड असेल त्याला-त्यात अवघड असं काहिही नाही...!!! :)
ओके नक्की प्रयत्न करुन पाहीन
In reply to @शिकू शकलो नाही तरी by अत्रुप्त आत्मा
ओके :) नक्की प्रयत्न करुन पाहीन.
अरे वा.
अरे वा.
छानच.
हा धागा तुम्ही मागे एकदा टाकलेला ना?
@हा धागा तुम्ही मागे एकदा
In reply to अरे वा. by प्रचेतस
@हा धागा तुम्ही मागे एकदा टाकलेला ना?>>> होय..पण तो मिपा-लसीकरण मोहिमेत उडाला होता! :(
तेच काल लक्षात आलं,म्हणून पुन्हा टाकला! :)
वाचनखूण साठवली आहे.
या गणपतीत नक्की प्रयत्न करणार!
(No subject)
:)
ब्येस्ट गुर्जी. अप्रतिम कला
ब्येस्ट गुर्जी. अप्रतिम कला हाये तुमच्या हातात.
बादवे तुम्ही प्रत्येक फुलांच्या रंगाच्या कात्र्या वापरता का हो? ;)
हिथे पिवळ्या फुलांना पिवळी कात्री दिसतेय.
@बादवे तुम्ही प्रत्येक
In reply to ब्येस्ट गुर्जी. अप्रतिम कला by अभ्या..
@बादवे तुम्ही प्रत्येक फुलांच्या रंगाच्या कात्र्या वापरता का हो? >>> =)) कात्रीचं उत्तर-रात्री देणार होतो,पण अत्ताच देतो. ;-) रंग कोणताही असला तरी ब्लेड तेच असतं! :P
झकास!
साला...काय कला आहे बुवा तुमच्या हातात! बेष्ट बेष्ट! :)
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर
मस्त हो बुवा.... एकदम
मस्त हो बुवा.... :) एकदम झक्क्कास...
सुंदर.
सुंदर.
झकास.
आवडली रांगोळी.
एक शंका आहे. हीच रांगोळी काढताना लिली, झेंडू किती किलो घ्यावीत? आणि एक - एक किलो घेतल्यास साधारण किती व्यासाचे कमळ तयार करता येईल?
@ हीच रांगोळी काढताना लिली,
In reply to झकास. by प्रभाकर पेठकर
@ हीच रांगोळी काढताना लिली, झेंडू किती किलो घ्यावीत? आणि एक - एक किलो घेतल्यास साधारण किती व्यासाचे कमळ तयार करता येईल?>>> पुढच्या/पुढच्या भागात हे सगळं सविस्तर येणार आहे. :)
धन्यवाद.
In reply to @ हीच रांगोळी काढताना लिली, by अत्रुप्त आत्मा
ठिक आहे. धन्यवाद.
ओ गुर्जि
ईथे हापिसात काय तु नळि दिसत नाय.....दुसरा काय तो उपाय सांगा!
(गुर्जिंचा आ धारक विद्यार्थि) हा शिंचा ‘Nya’ कसा लिहायचा?
दिपू काका
In reply to ओ गुर्जि by दिपक.कुवेत
dnya=ज्ञ
छ्या!! हे विडिओ काही दिसत
छ्या!! हे विडिओ काही दिसत नाहियेत हापिसातनं.
प्रायवेट शिकवणी लावता का हो बुवा?? ;)
@प्रायवेट शिकवणी लावता का हो
In reply to छ्या!! हे विडिओ काही दिसत by किसन शिंदे
@प्रायवेट शिकवणी लावता का हो बुवा?? smiley>>> पुण्याला आल्यास लावतो... !
मस्त!
मस्त हो बुवा!