Skip to main content

आम्हां घरी धन... (२)

लेखक मोदक यांनी शनिवार, 15/06/2013 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
आम्हा घरी धन... ---------------- पहिल्या धाग्याला उदंड प्रतिसाद मिळाला. अनेक उत्तमोत्तम उतारे, कविता सर्वांना वाचायला मिळाले. पण आता तिथे नव्या प्रतिक्रिया, नवे उतारे शोधणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे या धाग्याचा पुढचा भाग सुरू करत आहे. चला.. आपल्याला आवडलेल्या कविता, ओळी, छोटेखानी लेख, वन लाईनर्स, टॅन्जंट्स, सुभाषिते.. अगदी जे जे आवडले आहे ते येथे एकत्र करूया. लेखक आणि पुस्तकाचे नाव द्याच परंतु आवडलेला मजकूर 'का आवडला?' हे ही शक्य असेल तर द्या.

वाचने 79618
प्रतिक्रिया 160

प्रतिक्रिया

वह अपने अकेलेपनसे भी पैदा हुई हैं और कविता की जाई भी हैं उसका अकेलापन उसकी परवरिश करता हैं और कविता उसको पढती भी हैं पढाती भी हैं अकेली होकर भी वो कभी अकेली नहीं हुईं कविता उसके अंदर भी हैं और बाहर भी कविता उसकी जमीन भी हैं और कविता उसका आसमान भी हैं हालात रुकावटें बनतेही रहे हैं पर वह दरिया की तरह कोई रुकावट कुबूल नहीं करती चुपचाप सब पार कर लेती हैं वह सब फिक्रोंमें भी बेफिक्र होकर चुपचाप मनचाहा लिखती आ रही हैं और मनचाहा जीती भी आ रहीं हैं जिंदगी कभी दूर खडी कभी पास खडी उसको देख- देख कभी आँखे पौंछती हैं और कभी गर्वसे भर जाती नजर आती हैं.. - इमरोज

तुझे पांगलेले मन सांग सांग कसे बांधू? माझे भंगलेले मन सांग सांग कसे सांधू? आले गगन भरुन तसे मन आसवांनी तुझ्यासाठी परी अडे असे पापण्यांत पाणी पक्षी भाळला आभाळा, वाट मागची विसरे मौन तुझे तीरसे गे मात्र काळजात शिरे सांग सांग कशी तुला पुन्हा बोलकी गे करु? कसे पिसावले चित्त आता मुठीत आवरु? - बा भ बोरकर

विश्रब्ध मनाच्या कातरवेळी, एखाद्या प्राणाची दिवेलागण सरल्या नभाची सूर्यास्तछाया, एखाद्या प्राणांत बुडून पूर्ण एखाद्या प्राणाच्या दर्पणी खोल, विलग पंखांचे मिटते मन एखाद्या प्राणाचे विजनपण, एखाद्या फुलाचे फेडीत ऋण गीतांत न्हालेल्या निर्मळ ओठां, प्रजक्तचुंबन एखादा प्राण तुडुंब जन्मांचे सावळेपण, एखाद्या प्राणाची मल्हार धून एखाद्या प्राणाचे सनईसूर, एखाद्या मनाचे कोवळे ऊन निर्जन प्राणाचा व्रतस्थ दिवा एखाद्या सरणा अहेवपण. - आरती प्रभू

आकाशतळी फुललेली मातीतील एक कहाणी क्षण मावळतीचा येता डोळ्यांत कशाला पाणी? तो प्रवास सुंदर होता आधार गतीला धरती तेजोमय ऩक्षत्रांचे आश्वासन माथ्यावरती सुख आम्रासम मोहरले भवताल सुगंधित झाले नि:शब्द वेदनांमधूनी गीतांचे गेंद उदेले पथ कुसुमित होते काही रिमझिमत चांदणे होते वणव्याच्या ओटीवरती केधवा नांदण होते त्या विराट शून्यामधली ती एक वसहत होती शून्यात प्रसवली शून्ये शून्यांची रंगीत नाती त्या शून्यामधली यात्रा वार्‍यातील एक विराणी गगनात विसर्जित होता डोळ्यांत कशाला पाणी? - कुसुमाग्रज

अरे लिहा की इथे! कोणी लिहित का नाही आवडते उतारे/ कविता वगैरे! :(

डुमडुमत डमरु ये, खण्‌खणत शूल ये, शंख फुंकीत ये, येइ रुद्रा ! प्रलयघनभैरवा, करित कर्कश रवा क्रूर विक्राळ घे क्रुद्ध मुद्रा ! ध्रु० कडकडा फोड नभ, उडव उडुमक्षिका, खडबडवि दिग्गजां, तुडव रविमालिका, मांड वादळ, उधळ गिरि जशी मृत्तिका खवळवीं चहुंकडे या समुद्रां ! १ पाड सिंहासनें दुष्ट हीं पालथीं, ओढ हत्तीवरुनि मत्त नृप खालती, मुकुट रंकास दे करटि भूपाप्रती, झाड खट्‌खट् तुझें खड्‌ग क्षुद्रां ! २ जळ तडागं सडे, बुडबुडे, तडतडे 'शांति ही !' बापुडे बडबडति जन-किडे ! धडधडा फोड तट ! रुद्र, ये चहुंकडे, धगधगित अग्निमंधि उजळ भद्रा ! ३ पूर्विं नरसिंह तूं प्रगटुनी फाडिले दुष्ट जयिं अन्य गृहिं दरवडे पाडिले, बनुनि नृप, तापुनी चंड, जन नाडिले दे जयांचें तयां वीरभद्रा ! ४ --भा.रा.तांबे--

त्या दिसा वडाकडेन गडद तिन्साना मंद मंद वाजत आय्लीं तुजी गो पायजणां मौन पडले सगळ्या राना, शिरशिरुन थाम्ली पाना कवळी जाग आय्ली तणा झेम्ता झेम्ताना मंद मंद वाजत आय्लीं...... पय्सुल्यान वाजली घांट , दाट्लो न्हय्चो कंठ काठ सावळ्यानी घमघमाट सुटलो त्या खिणा मंद मंद वाजत आय्लीं....... फुलल्यो वयर चंद्रज्योती रंध्रांनी लागल्यो वाती' नवलाची जांवक सांगली शकुन लक्षणां मंद मंद वाजत आय्लीं...... गळ्या सुखां दोळ्यां दुखां लकलकली जावन थिका नकळ्ताना एक जाली आमी दोघांजाणा मंद मंद वाजत आय्लीं..... कान्सुलांनी भोवती भोवर , आंगार दाट फुलता चवर पड्टी केन्ना सपना, तीच घडटी जागरणा मंद मंद वाजत आय्लीं...... बाकीबाब!

लयवेल्हाळ किती उंचावरून-पानाफुलांमधून आकाशातून...बकुळीचे हे ओघळणे किती लडिवाळ, लोभसवाणे! झुंझुक मुंझुक वार्‍याच्या अलवार लयीवर हिचे हळुवार हिनकळणे...की कुणाच्या मनोमनीचे मंद्रसुवासी सरगमणे...! पिवळ्या पिसोळीने अलगद सोनकीवर उतरावे तसे हिने तळीच्या गवतपात्यावर हलकेच समेवर यावे! किंचित रेलून...त्या हिरव्या-निळ्या कोवळ्या उन्हात या गौरांग कवडुसलीने किती म्हणून लाडके दिसावे...! हे बकुळीच्या त्या अधुर्‍या अवतरणाचे लयवेल्हाळ मंत्रमोहन...की मेघदूताला सुखी भ्रमणाचा आशीर्वाद देताना यक्षाच्या कमळाक्षात लहरलेले रंगबावरे मनभावन...! इंदिरा संत

या नदीच्या पार वेड्या यौवनाचे झाड आहे अमृताचा चंद्र त्याच्या पालवीच्या आड आहे! मेदिनीच्या रोमरोमी रेशमी उन्मेश आहे केशरी त्याला उषेचा कस्तुरी आशीष आहे! मख्मली प्रत्येक पुष्पी अंबराचे बिंब आहे चुंबुनी त्याला हवेचा जीव ओला चिंब आहे! धुंद तेथे रे परेच्या पारव्यांचा वृंद आहे नाचर्या आनंदमोरा घुंगुरांचा छंद आहे! तेथल्या पाण्यात वीणा रागिणीची ओढ आहे सावल्यांना कांचनाच्या नागिणीची मोड आहे! तेथ जाया वेगवेडी पारजाची वाट आहे शांतवाया ताप अंती गोकुळीचा माठ आहे! बाकीबाब!

In reply to by मोदक

या नदीच्या पार वेड्या यौवनाचे झाड आहे अमृताचा चंद्र त्याच्या पालवीच्या आड आहे मेदिनीच्या रोमरोमी रेशमी उन्मेश आहे केशरी त्याला उषेचा कस्तुरी आशीष आहे मख्मली प्रत्येक पुष्पी अंबराचे बिंब आहे चुंबुनी त्याला हवेचा जीव ओला चिंब आहे धुंद तेथे रे परेच्या पारव्यांचा वृंद आहे नाचर्या आनंदमोरा घुंगुरांचा छंद आहे तेथल्या पाण्यात वीणा रागिणीची ओढ आहे सावल्यांना कांचनाच्या नागिणीची मोड आहे तेथ जाया वेगवेडी पारजाची* वाट आहे शांतवाया ताप अंती गोकुळीचा माठ आहे वृक्षशाखेला युगांच्या मंगलाची घांट* आहे बुद्धदेवाच्या तळाशी हस्तीदंती पाट आहे सत्यवानाच्या सखीच्या अंतरीचा दीप आहे ख्रिस्त-मीरा-मोहनाच्या जीवनाचा धूप आहे ज्ञानीयाच्या माऊलीची नित्य ओवी एक आहे कान्हयाच्या गाऊलीचा दुग्धगंगा सेक* आहे कोवळ्यां ज्वाळादळांचे भारताचें फूल आहे हांसरे तेथें उद्याच्या मानवाचें मूल आहे त्याजल्या मी चुंबिल्याने आंतही ते झाड आहे अमृताचा चंद्र माझ्या पालवीच्या आड आहे बाकीबाब! * पारजाची = पार्‍याची घांट = घंटा सेक = शिडकाव

ती - किती उशीर? तो - उशीर? मी वेळेवरच आलोय. माझ्या वेळेवर. ती - मग तुझी वेळ सांगायची की मला. मीही त्याच वेळेवर आले असते. तो - बरं. ती - फक्त बरं? तो - आता बरं म्हटलं तरी प्रॉब्लेम? मी जर सांगितलं असतं की ट्रॅफिक खूप होता, किंवा बस उशिरा आली, किंवा बॉसने सोडलाच नाही, तरीही तुला पटलं नसतं. हो की नाही? म्हणून बरं म्हणालो. ती - कसला अनरोमँटिक आहेस रे तू? तो - म्हणजे कसा? ती - माझ्या मैत्रिणीचा बॉय फ़्रेंड उशीरा आला ना पाच मिनिटं जरी तरी तिच्यासाठी चॉकलेट्स आणि फुलं आणतो. तो - डोकं फिरलंय त्याचं? ती - त्याचं की तुझं? तो - त्याचंच. चॉकलेटं खाऊन दात खराब होतात इतकी साधी गोष्ट कळू नये त्याला? ती - हो रे बाबा. चॉकलेटं खाऊन दात खराब होतात आणि फुलं देऊन काय खराब होतं? तो - नाही. ती - मग? दोन वर्ष झाली आपण भेटतोय, पण तू मला एकदाही फुलं देऊ नयेस? अगदीच हा आहेस तू. तो - हा? मी? अरे चांगला फुलांचा गुच्छ घ्यायचा तर किमान पंचवीस रुपये लागणार. ती - इ.... असा कसा रे तू? पंचवीस रुपयात हल्ली एखादं फुल येतं, गुच्छ नाही. तो - हो का? मी सकाळी देवाची फुलांची पुडी आणायला जातो ती पांच रुपयांना पडते. म्हटलं गुच्छ साधारण पांच पट असेल म्हणजे पंचवीस रुपये. ती - अरे देवा तो - आणि मी तुला फुलं देणार त्याचा तू दोन मिनिटं वास घेणार, जमलंच तर एखादं फूल डोक्यात घालणार आणि मग त्यांचं आयुष्य संपणार. म्हणजे सगळे पैसे फुकट. त्यापेक्षा आपण एखाद्या हॉटेलात जाऊ, एक साधा डोसा अर्धा अर्धा खाऊ. तेवढाच आपल्या डेव्हलपमेंटला हातभार. ती - बरं तो - असं काय गं चिऊ. चिडतेस काय? ती - मग काय? मलाही असं वाटतं की माझ्या बॉयफ्रेंडने रोमँटिक वागावं. तो - अगं मला जमत नाही ना. तू मला सांग, पार्काला पंचवीस फेऱ्या मार, मारीन. सिंहगड दिवसात दोन वेळ चढून उतर. उतरीन. पण हे फुलं बिलं मला सांगू नकोस हां. ती - बरं जा पार्काला पंचवीस फेऱ्या मार. तो - आता? ती - हं आता. तो - बरं जातो. ती - ए काऊ थांब रे. तो - एकदा म्हणते फेऱ्या मार एकदा म्हणते थांब. ती - हं. तू ना गाढव आहेस. मी गंमत गेली रे. तो - बरं तू गाढवी आहेस. अशी गाढवासारखी गंमत कशी केलीस. मला वाटलं आता खरंच पंचवीस फेऱ्या. ती - काऊ तू मला खूप आवडतोस. तो - मला माहितेय. ती - काव्या! तुला किती वेळा सांगितलं, मी तू मला आवडतोस असं म्हटलं की तूही तसंच म्हणायचं. तो - बरं. ती - अरे आता म्हण. तो - चिऊ तू मला खूप..... शी! हे असं कृत्रिम वाटतं. असं काय सतत आवडतेस आवडतेस करायचं? तुला माहितेय की तूच मला आवडतेस आणि आणखी कुणी नाही, मग पुन्हा पुन्हा का बोलायला लावतेस. ती - असं काय रे काऊ. म्हण ना रे. तो - बरं. ती - ... तो - चिऊ तू मला खूप खूप आवडतेस. इतकी की मला ते तुला कसं सांगावं हेच सुचत नाही. म्हणून मी तुला पुन्हा पुन्हा हे सांगत नाही. आता सुचलंच आहे तर ऐकून घे. ती - ऐकलं. काऊ, तूही मला खूप आवडतोस. तो - चल आता फुलांचे पंचवीस रुपये वाचले त्याचा डोसा खाऊया. ती - चल. :-) -- निलेश गद्रे http://nileshgadre.blogspot.in/2008/09/blog-post.html

पुलं गेल्यानंतर आलेल्या त्यांच्या एका वाढदिवशी सुनीताबाईंनी जागवलेल्या या पुलंच्या आठवणी. (महाराष्ट्र टाइम्स) **************************************** ..तुला सार्वजनिक 'आपण' प्रिय, तर वैयक्तिक 'मी' ची ताकद ज्याने त्याने आजमावायला हवी हा मा‌‌‍‍झा अट्टाहास. ही ताकद तुझ्यात प्रचंड प्रमाणात आहे, याचा प्रत्यय मला सतत येत राही, तर नेमकं त्याच गोष्टीचं विस्मरण तुला सतत होत राही. अशा अनेक बाबतीत तू आणि मी एकमेकांपासून ख़ुप दूर होतो. जणू 'दोन धृवांवर दोघे आपण'. सदैव माणसात रमणारा तू, तर माणसांपेक्षा मानवतेवर जीवसृष्टी वनस्पतीसृष्टी मला अधिक प्रिय. तूही जर इतर चारचौघांसारख़ाच 'एख़ादा कुणी' असतास ना, तर मग निर्मितीची, साहित्य-संगीतादी कलागुणांची कितीही श्रीमंती तुझ्यापाशी असती, तरी मी त्या कशानेही आकर्षिले गेले नसते, हीच शक्यता अधिक आहे. मला भावली ती तुझ्यातली निरागसता. तुझा 'मुल' पणा. तुझी लबाडीही पटकन उघड व्हायची. कोणत्याही गोष्टीचा विचार करावा, त्यात तरबेज व्हावं, त्यासाठी मेहनत करावी, हे तुझ्या स्वभावातच नव्हतं. व्याख़्यानांत, लिख़ाणात, तू असल्या गुणांची प्रशंसा करायचास. पण प्रत्यक्षात त्यापेक्षा गप्पा माराव्या, लोळत पडावं, गाणं ऐकावं, फार तर पुस्तकं वाचावी, चाळावी हे तुला अधिक प्रिय. निर्मितीक्षम कलाकाराची साधना सतत डोक्यातच कुठेतरी मूकपणे चालूच असते का ? कवी ग्रेसच्या ओळी आहेत, 'क्षितीज जसे दिसते, तशी म्हणावी गाणी। देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी ॥ गाय जशी हंबरते, तसेच व्याकुळ व्हावे। बुडता बुडता सांजप्रवाही, अलगद भरुनी यावे'. तुझं व्यक्तिमत्व असं विचारपूर्वक संस्कारीत होत गेलेलं नव्हतं. तू पिंडाचाच सुसंस्कृत होतास. जन्मजात कलावंत होतास, तसाच विचारवंही जन्मजातच होतास. ती तुझी श्रीमंतीही होती आणि मर्यादाही होती. आपली संस्कृतीच पुरुषप्रधान आहे, त्याच पाळामुळातून तुझं पोषण होत गेलं आणि अंगभूत कृतज्ञताबुध्दीने आपल्या परीने तीच संस्कृती तू जपलीस. ती तुझी सहज प्रवृत्तीच होती, प्रकृती होती. मराठी 'विश्वकोषा' त किंवा 'हूज हू' मध्ये तुझ्या नावाची नोंद कलावंत म्हणून होईल. तशीच 'विचारवंत' हे ही विशेषण तुझ्यामागे लावलं जाईल. पण आपण उभयतांच्या जीवनकोशात माझ्यासमोर ठाकलास तो त्या पुरुषप्रधान संस्कृतीचा आधारस्तंभच जसा! प्रज्ञेअभावी नवे, तर निव्वळ आळसापोटी तू विचार करण्याचं टाळत आलास. जे सहज आयते मिळतात, त्यासाठी बुद्धी कशाला शिणवावी? मनात विचार घोळवण्यापेक्षा सूर घोळवणं हे केव्हाही अधिक आनंददायी, स्वत:लाही आणि भोवतालच्यांनाही. ही लबाडी म्हण किंवा पळवाट म्हण, मला कळायची पण त्याची तुला चिंता नव्हती. मी का कोणी परकी होते? हक्काची बायकोच ना तुझी! तुझ्यासाठी मी काय केलं? तुझ्या तहानभूकेचं वेळापत्रक सांभाळलं, माझ्या परिने नवी-जुनी खेळणी पुरवली, अंगण सारवून स्वच्छ ठेवत गेले त्यात फ़ारतर क्वचित कधी एखादं स्वस्तिक रेखलं. चित्रांची रांगोळी काढायला मला येतच कुठे होती? कलावंत 'तू' होतास. शब्द कळेची गर्भश्रीमंतीही, 'तुला' लाभली होती. येतांना कंठात आणि बोटात सूर घेऊनच तू जणू जन्माला आलास. अंतर्बाह्य आनंद सोबतीला आणलास. तू गेलास तरी तुझा तो दिर्घायुषी सोबती अजून बराच काळ मागे रहाणार आहे. तू गेलास उद्या मीही नाहीशी होणार पण आपल्या मायबोलीचा एक कंठमणी झालेला तुझा शब्द मराठी भाषा जिवंत असेपर्यंत स्वत:च्या तेजाने चमकतच राहील ना? थोडीथोडकी नव्हे अखंड ५४ वर्षांची ही वाटचाल. प्रवास म्हटला की, सहाजिकच चढ उतार आले. पण आज या घटकेला कशाचाही शीण जाणवत नाही. थकवा येतो तो सतत येत रहाणाऱ्या या आठवणींचा. थकल्याभागल्या मनावर असं अधिपत्य गाजवू नये, एवढाही पोच त्यांना नसतो. तू या सगळ्यातून सुटलास. माझ्या मनाच्या एका बंदिस्त कोपऱ्यात कायम वास्तव्याला आलास. शांतपणे इतर सर्वांच्या नकळत माझ्या सोबतीला येऊन राहिलास. जसा खळखळ पण निर्धास्त जगलास, तसाच निर्धास्तपणे चिरकाल विसाव्याला येऊन राहिलास. मला तरी आता करण्यासारखं राहिलंच आहे काय? तसा व्याप खूप आहे पसारा बराच आवरायचा आहे. तुझ्या दोन-तीन नव्या पुस्तकांचं कामही व्हायचं आहे. म्हटलं तर काम भरपूर आहे, पण ते ओझं मीच डोक्यावर घेतलं पाहिजे, असं थोडंच आहे? मदतीला धावून येणारे खूप स्नेही सोबती आहेत. सगळं निभावून न्यायला ते समर्थ आहेत. मी स्वत: काय त्यांच्या मदतीने काय आणि उरलेलं सारं काही त्यांच्यावरच सोपवून काय हळूहळू सगळं काम पुरं होईल आणि त्यातलं काहीही झालं नाही तरी कितीसा फरक पडणार आहे? या संदर्भात सत्य एकच आहे, ते म्हणजे या घरांत खेळण्याऱ्या हवेतून श्वास घ्यायला माझ्या जोडीला आता तू नसणार. अशा वेळी काय करावं? (मंगेश पाडगांवकरांचं नाव घेऊन) सुकलेल्या झाडाला न बोलता पाणी घालवं इतकंच. -सुनीता देशपांडे.

In reply to by मोदक

या संदर्भात सत्य एकच आहे, ते म्हणजे या घरांत खेळण्याऱ्या हवेतून श्वास घ्यायला माझ्या जोडीला आता तू नसणार. अशा वेळी काय करावं?
:(

In reply to by मोदक

मी पु.ल. नाहि, पण आमची सौ. बरीचशी सुनीताबाईंसारखी आहे. तिच्या भरवश्यावर उडाणाटप्पु जींदगी एंजोय करणं हाच माझ्या लाईफचा एकमेव अजेंडा... आता तर ज्यु. अर्धवटराव देखील माझ्याच पाऊलावर पाऊल ठेऊन चालणार असे लक्षण आहे. डब्बल परिक्षा आमच्या सौ. ची. अर्धवटराव

पहिल्या धाग्यावर आधीच ही कविता दिली गेली असल्यास क्षमस्व. पारवा भिंत खचली कलथून खांब गेला जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाला तिच्या कौलारी बसुनी पारवा तो खिन्न नीरस एकांतगीत गातो सूर्य मध्यान्ही उभा राहे घार मंडळ त्याभवती घालताहे पक्षी पानांच्या शांत सावल्यांत सुखे साखरझोपेत पेंगतात. तुला नाही परि हौस उडायाची गोड हिरव्या झुबक्यात दडायाची उष्ण झळ्या बाहेर तापतात गीतनिद्रा तव आंत अखंडित चित्त किंवा तव कोवळ्या विखारे दुखतेखुपते का सांग सांग बा रे तुला काही जगतात नको मान गोड गावे मग भान हे कुठून झोप सौख्यानंदात मानवाची पुरी क्षणही कोठून टिकायाची दुःखनिद्रे निद्रिस्त बुध्दराज करूणगीते घुमवीत जगी आज. दुःखनिद्रा ती आज तुला लागे तुझे जगही निद्रिस्त तुझ्या संगे फिरे माझ्या जगतात उष्ण वारे तुला त्याचे भानही नसे बा रे. कवी - बालकवी

जगाचा गल्बला जगात सोडुन प्रेमाची मृणाल- बंधने तोडून- होता तो भ्रमिष्ट भ्रमत एकला नादात अगम्य टाकीत पावला वर्तले नवल डोंगर-कपारी गवसे प्रतिमा संगमरवरी ! हर्षाचा उन्माद आला त्या वेड्याला घेऊन मूर्ति ती बेहोष चालला, आढळे पुढती पहाड उभार वेड्याच्या मनात काही ये विचार थांबवी आपुला निरर्थ प्रवास दिवसामागून उलटे दिवस- आणिक अखेरी राबून अखण्ड वेड्याने खोदले मंदिर प्रचंड चढवी कळस घडवी आसन, जाहली मंदिरी मूर्त ती स्थापन ! नंतर सुरू हो वेड्याचे पूजन घुमते कड्यात नर्तन गायन रान अन् भोतीचे स्फुंदते सकाळी ठेवी हा वेलींना ना फूल, ना कळी ! विचारी आश्चर्ये तृणाला ओहळ कोण हा हिरावी रोजला ओंजळ ? परन्तु मूर्त ती बोलेना, हलेना, वेड्याचे कौतुक काहीही करीना ! सरले गायन सरले नर्तन चालले अखेरी भीषण क्रंदन पडून तिच्या त्या सुन्दर पायाशी ओरडे रडे तो उपाशी तापाशी ! खुळाच ! कळे न पाषाणापासून अपेक्षा कशाची उपेक्षेवाचून ! वैतागे, संतापे, अखेरी क्रोधाने मूर्तीच्या ठिकर्‍या केल्या त्या भक्ताने ! रित्या त्या मंदिरी आता तो दाराशी बसतो शोधत काहीसे आकाशी. वाटेचे प्रवासी मंदिरी येतात आणिक शिल्पाची थोरवी गातात. पाहून परंतू मोकळा गाभारा पाषाणखंडांचा आतला पसारा- त्वेषाने बोलती जाताना रसिक असेल चांडाळ हा मूर्तिभंजक ! ------------ कुसुमाग्रज

ही युगायुगांची आहे अक्षर यात्रा एकदाच भरते स्मशानातली जत्रा खांद्यावर घेऊनी शव फिरतो जन्म राखेत अश्रूला फुटला हिरवा कोंब नंतर लिहिते बाकीचे..

या वळवाच्या सरीपरी तू आलीस माझ्या दारी गं झाकळले नभ होय मोकळे गळे तयातून ऊन कोवळे हे धन असले कधी न दिखले रवीच्या विभवागारी गं या वळवाच्या सरीपरी तू आलीस माझ्या दारी गं मळल्या राया न्हाऊनी नटल्या निजलेल्या स्वरलहरी उठल्या रुळवीत चरणी चपल लाजर्‍या सोनकिनारी भारी गं मृद्गंधाच्या चवर्‍या ढाळीत नाचत नाचत आले मारुत कणाकणातून घुमवत मादक मदनाची ललकारी गं थरारली बघ कमळे सगळी मकरंदाला फुटली उकळी जलदाची पिचकारी बसली निळ्या निळ्या कासारी गं तृणातृणातून उठली तृष्णा आवरसी मग का तव करुणा खुले करी हे जीवन अडले वरुणाच्या भांडारी गं या वळवाच्या सरीपरी तू आलीस माझ्या दारी गं बाकीबाब!

विचारसी परोपरी मला 'आणखीन काय'? शब्द मावळती सारे माझा होई निरुपाय बोलायचें खूप खूप मनी येतो मी योजून तुला पाहतां पाहतां जातो परी विसरून कांचनाचीं निरांजनें तसे तुझे गडे डोळें त्यांत कापरासारखा माझा जीव जळे, पोळे खट्याळ त्या ओठांतून तोंच गुलाबाचें पाणी गार गार सुगंधात माझे पंचप्राण न्हाणी क्षणोक्षणीं ओलांडितो असे जीवन-मरण जन्मताना मरताना कुणा शब्दांचें स्मरण? असें मुकाट्याने वाटे तुला आजन्म पहावें उदकात विस्तवात न्हात जळत रहावें आणि तूंही विचारावें मला 'आणखीन काय?' शब्दवैभव असून माझा व्हावा निरुपाय! - बा. भ. बोरकर

आकाश निळे तो हरी अन एक चांदणी राधा बावरी युगानुयुगीची मन-बाधा विस्तीर्ण भुई गोविंद अन क्षेत्र साळीचे राधा संसिद्ध युगानुयुगीची प्रियंवदा जलवाहिनी निश्चल कृष्ण वन झुकले काठी राधा विप्रश्न युगानुयुगीची चिरतंद्रा -- पु. शि. रेगे

मस्त! :)

घाल घाल पिंगा वार्‍या, माझ्या परसात माहरी जा, सुवासाची कर बरसात ! "सुखी आहे पोर"- सांग आईच्या कानात "आई, भाऊसाठी परी मन खंतावतं ! विसरली का ग, भादव्यात वर्स झाल, माहरीच्या सुखाला ग, मन आचवल. फिरुन-फिरुन सय येई, जीव वेडावतो चंद्रकळेचा ग, शेव, ओलाचिंब होतो. काळया कपिलेची नंदा खोडकर फार, हुंगहुंगुनिया करी कशी ग, बेजार ! परसात पारिजातकाचा सडा पडे, कधी फुलं वेचायला नेशील तू गडे ? कपिलेचया दुधावर मऊ दाट साय माया माझ्यावर दाट जशी तुझी, माय ... !" आले भरन डोळे पुन्हा गळा नि दाटला माउलीचया भेटीसाठी जीव व्याकूळला !

क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे, उडे बापडी, चुके पथहि, येउनी स्तिमित दृष्टिला झापडी. किती घळघळा गळे रुधिर कोमलांगातुनी, तशीच निजकोटरा परत पातली पक्षिणी. म्हणे निजशिशूंप्रती, अधिक बोलवेना मला, तुम्हांस अजि अंतीचा कवळ एक मी आणला, करा मधुर हा! चला, भरविते तुम्हा एकदा, करी जतन यापुढे प्रभु पिता अनाथां सदा! अहा! मधुर गाउनी रमविले सकाळी जना, कृतघ्न मज मारतील नच ही मनी कल्पना, तुम्हांस्तव मुखी सुखे धरुन घांस झाडावरी क्षणैक बसले तो शिरे बाण माझ्या उरीं निघुन नरजातिला रमविण्यांत गेले वय, म्हणून वधिले मला! किती दया! कसा हा नय! उदार बहु शूर हा नर खरोखरी जाहला वधुनी मज पाखरा निरपराध की दुर्बला! म्हणाल, भुलली जगा, विसरली प्रियां लेकरां म्हणून अतिसंकटे उडत पातले मी घरा, नसे लवहि उष्णता, नच कुशीत माझ्या शिरा, स्मरा मजबरोबरी परि दयाघना खरा. असो, रुधिर वाहुनी नच भिजो सुशय्या तरी म्हणून तरुच्या तळी निजलि ती द्विजा भूवरी. जिवंत बहु बोलकें किति सुरम्य ते उत्पल, नरे धरुन नाशिले, खचित थोर बुध्दिबल. मातीत ते पसरिले अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडुर निष्कलंक, चंचू तशीच उघडी पद लांबवीले, निष्प्राण देह पडला! श्रमही निमाले!

मरतेसमयी स्वामीचं झाडाच्या कोंबाशी संभाषण... ======================================= तू असाच वर जा अंधार्‍या सांदरीतून निघालेले तुझे आयुष्य न चिरडल्या जाणार्‍या ईर्ष्येने वर वर जाऊन एका तृप्त क्षणी सुर्यप्रकाशाला भेट दे तुला जर फ़ुले येतील- आणि तुला सोन्याच्या लहान पेल्यांसारखी फ़ुले यावीत आणि त्यांच्या स्पर्शाने पराग सांडून बोटांची टोके पिवळी सुगंधी व्हावीत. तुला जर फ़ुले येतील, तर अशा सहस्त्र फ़ुलांना घेऊन तू तुझ्यावर वाकलेल्या आभाळाला सामोरे जा व त्याच्या निळ्या साक्षीने तू त्यांच्यात सूर्यप्रकाश साठवून घे. तुला जर फ़ळे येतील- आणि तुला दर पानाआड लहानसे लाल फ़ळ यावे व ते इतके रसरशीत असावे की त्या प्रत्येकाच्या लाल रंगात सुर्यप्रकाशाचा एक एक कण सुखाने नांदावा. तुला जर फ़ळे येतील , तर त्यांच्यासह तू क्षितिजाकडे पहा. कारण अशा अंधारातून त्याचाच शोध घेत त्याच्याकडे आला आहेस. मग तुझ्या बीजाची फ़ळे सर्वत्र विखरून त्या तुझ्या विजयाच्या खुणा सर्वत्र रुजू देत. जर कणा एवढ्या प्रकाशाचा काजवा तुला कधी दिसला तर तू त्याचे स्वागत कर. त्या कणाच्या अभिमानाने त्याने रात्रीच्या अमर्याद अंधाराला आव्हान देऊन त्याचा एक कण जिंकून प्रकाशित केला आहे. आभाळात एखादे लहान पाखरू दिसले तर त्याला आतिथ्य दाखव. कारण दोन कोवळ्या पंखांच्या आत्मविश्वासाने ते आभाळाला किंचित मागे रेटत आहे. जर कधी एखाद्या मुलाने तुझे एक रसरशीत पान घेऊन दुमडून ते पुन्हा आडवे उघडले, व पानाचा आरसा केला, किंवा कधी तुझे पिवळे फ़ूल तोडून बोटे पिवळ्या धुळीने माखुन घेतली, अगर तुझे एक लाल फ़ुल खुडुन ते दोन बोटांत चेंगरत रसाचा लाल धागा काढला , तर तू त्याच्यावर क्रुद्ध होऊ नकोस. कारण, कुणास ठाउक, अब्जांमध्येच एक असे आढळणारे ते मूल असेल, ते देखील भोवतालच्या अंधार्‍या अजस्त्र भिंती फ़ोडून सूर्यप्रकाशाकडे येण्याची कधीतरी धडपड करणार असेल. आणि तसे असेल तर ते तुझ्या रक्तानात्याचेच आहे. म्हणून तू त्याच्यावर क्रुद्ध होऊ नकोस. एक पान गेल्याने तुला दारिद्र्य येणार नाही. एक फ़ूल गेल्याने तुझे सौंदर्य उणॆ भासणार नाही. एक फ़ळ गेल्याने तुझ्या आयुष्यात नैराश्य येणार नाही. इतके तुला वैभव आहे. इतके तुला वैभव मिळो ! या सार्‍यात मला विशेष सुख आहे, कारण तुझे एकेक पान म्हणजे माझाच एकेक श्वास आहे. म्हणुन तु म्हणजे मीच स्वतः आहे. मी संपलो नाही तर मी केवळ बदललो आहे. तू आपले सारे सामर्थ्य घेऊन आभाळाखाली सूर्यप्रकाशात वर आला आहेस एवढे इतरांना समजू दे. मी अंधारात लाल प्रकाशात दडपून चिरडला गेलो नाही, तर मीच हिरव्या कारंजाप्रमाणे वर आलो आहे, हे देखिल इतरांना कळू दे. म्हणून तू असाच वर जा....कथा : स्वामी :: कथासंग्रह: पिंगळावेळ

भूमीपरी तुझी माया मुकी साठुनिया पोटी वृक्षापरी आणि माझ्या फुले बोलकी ही ओठी हवेपरी तुझी माया वेढूनीही निराकार माझ्या श्वासाउच्छवासात एक तिचा अविष्कार नभापरी तुझी माया नित्य आणि निरंजन घाली सौंदर्याचे निळे माझ्या डोळ्यांत अंजन ऐसी गडे तुझी माया न ये पहाया मापाया जग विसरुन देवा लागे भक्ताच्याच पायां.. - बा भ बोरकर

तुझ्या दु:खा वाणी आहे माझे मात्र दु:ख मुके तुझ्या उरी ज्वाला तरी माझ्यांत फक्त धूर-धुकें सराव तुला, पुलावरुन भरल्या पुरात घेतलीस झेप घाबरे माझे पाण्यात प्राण भोवली अशी पहिलीच खेप भोवर्‍यांच्या या बंडाळीत तूच आता दे रे हात तडीपार झाल्ये तर दिली तशीच देईन साथ - बा भ बोरकर

तेव्हांची ती फुलं.. सगळं संपलं असं समजून उभे होतो एकमेकांसमोरः आणि एकमेकांपलिकडे पानगळतीच्या ओंजळीत होती साठवलेली आपण एकमेकांना दिलेली तेव्हांची ती फुलं.. फुलणं ही जशी फुलाची भाषा असते तशीच असते कोमेजणं ही फुलांचीच भाषा कितीही कोमेजलेली फुलं जरी असली तरी एकदा ती फुलली होती हे नाही विसरता येत.. न बोलता उभे होतो एकमेकांसमोर यापुढे भेटलो तरी आपण परके असणार कोमेजलेली फुलं पुन्हा फुलत नाहीत हे ज्यांना क्ळलं ते फुलणंसुद्धा सोसतात.. - मंगेश पाडगांवकर

आठवणीतून लिहितो आहे, चुकलं असेल तर क्षमस्व! --------- कुणी घर देता का घर? एका तुफानाला कुणी घर देता का घर? एक तुफान भिंतीवाचून, छपरावाचून, माणसाच्या मायेवाचून, देवाच्या दयेवाचून जंगला-जंगलात हिंडतंय, जिथून कुणी उठवणार नाही अशी एक जागा धुंडतंय. कुणी घर देता का घर? खरं सांगतो बाबांनो, तुफान आता थकून गेलंय, झाडाझुडपात, डोंगरदर्‍यांत अर्धं अधिक तुटून गेलंय. समुद्राच्या लाटांवरती, जंगलातल्या झुडुपांवरती झेप- झुंजा घेवून घेवून तुफान आता खचून गेलंय. जळके तुटके पंख पालवीत खुरडत खुरडत उडतंय, खरं सांगतोय बाबांनो, तुफानाला तुफानपणच नडतंय. कुणी… घर देता का घर? तुफानाला महाल नको, राजवाड्याचा सेट नको, पदवी नको, हार नको, थैलीमधली भेट नको एक हवंय लहान घर पंख मिटून पडण्यासाठी, आणि एक हवीय आरामखुर्ची तुफानाला बसण्यासाठी. आणि एक विसरू नका बाबांनो, एक तुळशी वृंदावन हवं मागल्या अंगणात... सरकारसाठी.

ही आधीच कुणी टाकली असल्यास क्षमस्व.. माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे कडे-कपारीमधोनी घट फुटती दुधाचे माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा पावसात दारापुढे सोन्याचांदीच्या रे धारा माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा ओलावल्या लोचनांनी भेटे आकाश सागरा माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या साळीचा रे भात वाढी आईच्या मायेने सोनकेवड्याचा हात माझ्या गोव्याच्या भूमीत लाल माती, निळे पाणी खोल आरक्त घावांत शुद्ध वेदनांची गाणी

In reply to by पिशी अबोली

पहिल्या भागातही असली तरी अपूर्ण असेल. :-) समग्र बोरकर खंड १ किंवा २ मध्ये संपूर्ण कविता आहे. टंकतो आजच!

माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कड्या-कपाऱ्यां मधुन घट फुटती दुधाचे माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्या-फणसाची रास, फुली फळांचे पाझर कळी फुलांचे सुवास माझ्या गोव्याच्या भूमीत वनश्रीची कारागिरी, पाना-फुलांची कुसर पशु-पक्ष्यांच्या किनारी माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा, पावसात दारापुढे सोन्याचांदीच्या रे धारा माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा, ओलावल्या लोचनांनी भेटे आकाश सागरा माझ्या गोव्याच्या भूमीत चाफा पानाविण फुले, भोळा भाबडा शालीन भाव शब्दाविण बोले माझ्या गोव्याच्या भूमीत गडे साळीचा रे भात, वाढी आईच्या मायेने सोन-केवड्याचा हात माझ्या गोव्याच्या भूमीत सागरात खेळे चांदी, आतिथ्याची, अगत्याची साऱ्या षडरसांची नांदी - बा. भ. बोरकर

In reply to by बहुगुणी

माझ्या गोव्याच्या भूमींत गड्या नारळ मधाचे, कड्याकपारी मधोनी घट फुटती दुधाचे माझ्या गोव्याच्या भूमींत आंब्या-फणसाची रास, फुली फळांचे पाझर फळी फुलांचे सुवास माझ्या गोव्याच्या भूमींत वनश्रीची कारागिरी, पाना-फुलांची कुसर पशु-पक्ष्यांच्या किनारी माझ्या गोव्याच्या भूमींत उन्हाळ्यात खारा वारा, पावसात दारापुढे सोन्याचांदीच्या रे धारा माझ्या गोव्याच्या भूमींत येते चांदणे माहेरा, ओलावल्या लोचनांनी भेटे आकाश सागरा माझ्या गोव्याच्या भूमींत चाफा पानाविण फुले, भोळा भाबडा शालीन भाव शब्दाविण बोले माझ्या गोव्याच्या भूमींत गडे साळीचा रे भात, वाढी आईच्या मायेने सोन-केवड्याचा हात माझ्या गोव्याच्या भूमींत सागरात खेळे चांदी, आतिथ्याची, अगत्याची साऱ्या षडरसांची नांदी माझ्या गोव्याच्या भूमींत जिव्या सुपारीचा विडा अग्निदिव्यातुन हसे पाचपोवळ्यांचा चुडा माझ्या गोव्याच्या भूमींत काळे काजळाचे डोळे त्यांत सावित्रीची माया जन्मजन्मांतरीं जळें माझ्या गोव्याच्या भूमींत लाल माती, निळे पाणी खोल आरक्त घावांत शुद्ध वेदनांची गाणी माझ्या गोव्याच्या भूमींत खड्गा जडावाची मूठ वीर शृंगाराच्या भाळी साजे वैराग्याची तीट माझ्या गोव्याच्या भूमींत उंच धूड देवळांचे ताजमहाल भक्तीच्या अश्रूतल्या चांदण्यांचे माझ्या गोव्याच्या भूमींत तृणी सुमनांचे गेंद सिद्ध कुणब्यांच्या तोंडी शुद्ध सौंदर्याचे वेद माझ्या गोव्याच्या भूमींत सुखाहून गोड व्यथा रामायणाहून थोर मूक उर्मिलेची कथा माझ्या गोव्याच्या भूमींत सारा जीव माझा जडे पुरा माझ्या कवनांचा गंध तेथे उलगडे - बा. भ. बोरकर

खलिल जिब्रानच्या मरणोत्तर सभेत एक विख्यात अमेरिकन साहित्यिक म्हणाला: "जिब्रानच्या प्रेमजीवनाविषयी मला काहीही ठाउक नाही." यावर बार्बराचे भाष्य मोठे कुतूहलजनक आहे. म्हणते: "कसं ठाउक असणार? कारण राजस वृत्ती कुणाशी संयोग पावून विश्रांत होते याची ती स्वतः वाच्यता करीत नाही की प्रदर्शन करीत नाही. जीवनातील सौंदर्याचा आणि वेदनेचा सर्वांगाने आस्वाद घ्यावा हे तर जिब्रानचं ब्रीद होतं, अशी खातरजमा ज्याला आहे तो जिब्रान केवढे संपन्न जीवन जगला याविषयी कधीच संशय येणार नाही." आपण त्याच्या संपूर्ण आंतरिक जीवनवैभवाचे निकटवर्ती मूक साक्षी आहोत, हेच अशा उद्गारातून बार्बरा सुचवते. तिला खोडून काढता येईल असे वाटत नाही. शिवाय तिचे शब्द किती आत्मविश्वासपूर्ण, मुलायम आणि पडदानशीन आहेत! आणखी पुढे ती धीराने सांगते: "कोणाही विरागी ब्रह्मचारी पुरूषाने जीवनाचा मधुमास सखोल अनुभवलेला असत नाही आणि कोणीही जातिवंत प्रेमिक, सेवन केलेल्या दैवी माधुर्याविषयी बोलघेवडा होत नाही. एवढंच म्हणेन की ते माधुर्य त्याच्या संगतीनं सेवन करणारी व्यक्तीही त्याच्या इतकीच मौनमग्न असणार." एका प्रतिभाशाली पुरूषाच्या खासगी जीवनशैलीविषयी इतक्या समजदारीने आणि औदार्याने त्याच्या सहवासात काही वर्षे काढलेल्या सचिव - सखीने असे लिहावे, हा चरित्रदर्शनाचा एक हृदयस्पर्शी विष्कंभक आहे असे मला वाटते. जिब्रानचे वर्तन नेहमीच प्रेममाधुर्याने फुलून आलेले असे. त्याच्या मायदेशाच्या संस्कृतीला व आदबशीर चालीरीतींना अनुसरून सख्याचा जिव्हाळा त्याच्या नसानसातून वाहता असायचा. पण असा मुक्तपणा, अशी श्रीमंती वेगळ्या अर्थाने घेण्याची चतुराई, त्याच्या संगतीचा लाभ घेणार्‍या स्त्रिया करीत. हेही बार्बरा नमूद करते. म्हणते की, "याचा अर्थ समजून घेणारे घेतील. शब्दांनी फार सांगता येत नाही. माझ्यापुरतं म्हणाल तर या माणसाचं वादळी आयुष्य नितांत एकाकी होतं आणि ते सनातन आणि सर्वव्यापी स्त्रीसुखासाठी आसुसलेलं होतं, हे मी पाहिलं, आणि ईश्वरी कृपेनं त्याच्या अंतःकरणाला प्रतिसाद मिळाला हे मी अनुभवलं!." याहून शालीन तरी पारदर्शक उद्गार असू शकत नाही असे मला वाटते. (कै. त्र्यं. वि. सरदेशमुख यांच्या 'स्फटिकदिवे' पुस्तकातून ..)

मी मुक्त म्हणे हा वृक्षावरचा पक्षी आभाळ एकटे आहे त्याला साक्षी पण कुणी दिले हे आभाळाला पंख शाश्वतास बसला अशाश्वताचा डंख.. ** ऋण नक्षत्रांचे असते आकाशाला ऋण फळाफुलांचे असते ह्या धरतीला ऋण फेडायाचे राहून माझे गेले ऋण फेडायाला पुन्हा पाहिजे मेले.. - - रॉय किणीकर

"बेंबटया, ब्रह्मदेवान एवढी सृष्टी निर्माण केली, पण त्याचा आवडता प्राणी गाढव ! म्हणून मनुष्यप्राण्यातदेखील त्याने गाढवाचा अंश घातलाय. जगात कुंभार थोडे, गाढवेच फार ! तस्मात कुंभारांची चलती आहे. कुंभार हो, गाढवास तोटा नाही !" पु ल देशपांडे असा मी असा मी

कवितांची नावे मला ठाऊक नाहीयेत. कोणाला माहिती असल्यास सांगा प्लीज. ही माझी प्रीत निराळी संध्येचे शामल पाणी दु:खाच्या दंतकथेला डोहातून बुडवून आणी हाताने दान कराया पोकळीत भरला रंग तृष्णेचे तीर्थ उचलतो रतीरंगातील नि:संग शपथेवर मज आवडती गाईचे डोळे व्याकूळ घनगंभीर जलधीचेही असणार कुठेतरी मूळ आकाश भाकिते माझी नक्षत्र ओळ ही दंग देठास तोडतानाही रडले न फुलांचे अंग *** दुःख घराला आले अंधार असा घनभारी चन्द्रातुन चन्द्र बुडले स्मरणाचा उत्सव जागून जणू दुःख घराला आले दाराशी मी बसलेला दुःखावर डोळे पसरुन क्षितिज जसे धरणीला श्वासांनी धरते उचलून विश्रब्ध किनारे दूर जाऊन कुठे मिळताती जणू हृदयामागून माझ्या झाडांची पाने गळती नाहीच कुणी अपुले रे प्राणांवर नभ धरणारे दिक्काल धुक्याच्या वेळी हृदयाला स्पंदविणारे - ग्रेस

........माझ्या क्रांतीच्या कल्पनेत रक्त, मुडदे, बंदुकीच्या गोळ्या, आगी लावणे, वगैरे बसत नाही. "कुर्यात् सदा मंगलम्" हा क्रांतीचा खरा मंत्र आहे. मनुष्यप्राण्यांतल्या "मनुष्या"ला मंगल घडावे आणि घडवावे ही ओढ असते. पण त्यांच्यातला प्राणी 'बलवत्तर' झाला की मग रक्त, मुडदे, जाळपोळ ही भाषा सुरू होते. दुर्दैवाने गोष्ट हीच आहे, की अजून मनुष्यप्राण्यातला प्राण्याला लवकर जागवता येते. द्वेषाच्या झेंड्याखाली माणसे फार लवकर जमतात. एरवीचा सौम्य माणूस कुणाचातरी 'मुर्दाबाद' करीत निघाला, की फुत्कारणार्‍या विराट सर्पासारख्या मोर्चात विषारी सापाचाच अंश होवून चालतो. असल्या ह्या प्राण्याच्या हातून जेंव्हा मंगल कृत्ये होतात तिथे मला क्रांतीचे दर्शन घडते. थोड्या वेळेपुरता असेल, पण त्याच्यातल्या प्राण्यावर मनुष्यत्वाने विजय मिळवलेला असतो. काशीची गंगा तृषार्त गाढवाच्या मुखी जेंव्हा एकनाथ महाराजांच्या हातून जाते, तेंव्हा तिथे मला क्रांती दिसते. आदिवासी घरट्यातून जेंव्हा बालआवाजीत वाचलेला धडा माझ्या कानी पडतो, तो क्रांतीचा मंजुळ सूर मला आवडतो. कॉलेजातील फॅशनेबल तरूण बसस्टॉपवर अनोळखी म्हातारीला हात देवून बसमध्ये चढवतो आणि क्यू मधला स्वत:चा नंबर खुषीने गमावतो हे दृष्य मला मोठ्या शहरात दिसते, तेंव्हा मला क्रांतीचे स्मित पहायला मिळते. आजारी मोलकरणीला जेंव्हा एखादी मालकीण, "तू चार दिवस विश्रांती घे; मी भांडी घासीन" असे सांगताना मला आढळते, तेंव्हा गोपद्मासारखी क्रांतीची पावले तिच्या दारी उमटलेली मला दिसतात. क्रांतीचा आदि, मध्य आणि अंत माणसाने माणसाला जवळ घेण्याच्या क्रियेतून झाला पाहिजे असे मला वाटते. असल्या क्रांतीचे संपूर्ण दर्शन जावूद्या, पण कुठे अंधुक दर्शन घडले, कुठे जराशी पावले दिसली, तरीसुद्धा "सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला" असे होऊन जाते. - पुलं. "गुण गाईन आवडी" मधून. आनंदवनामध्ये एकदा कुष्टरोग्यांच्या लग्नामध्ये मंगलाक्षता म्हटल्यानंतर.. __/\__

माझी सर्वात आवडती कविता... सत्कार पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार उरि जेव्हा ज्वालरस झेलुन धरतीने तप केले दारुण सुकता सुकता नद्या म्हणाल्या हाच विश्वसंहार पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार. त्या काळी धरणीच्या पोटी या इवल्या बीजाच्या ओठी थरथरली स्फुरली हो होती श्रद्धेची ललकार! पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार. कवच भूमीचे आणि अचानक भेदून आले हिरवे कौतुक नचिकेताचे स्वप्नंच अथवा, अवचित हो साकार पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार. मातीची ही मात मृत्युवर मृत्युंजय श्रद्धेचा अंकुर हा सृजनाचा विजयध्वज, हा जीवन साक्षात्कार पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार. म्हटले स्वागतगीत खगांनी केला मुजरा लवून ढगांनी लाल मातीचा गुलाल उधळीत, पवन करी संचार पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार कोसळली सर दक्षिण उत्तर घमघमले मातीतून अत्तर अष्टदिशांतून अभिष्टचिंतन, घुमला जयजयकार पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार कवी :- मंगेश पाडगावकर कवितासंग्रहः- जिप्सी.

In reply to by आनन्दिता

लै दिवसांनी वाचली ही कविता, शेअर केल्याबद्दल बहुत धन्यवाद! :) अभ्यासात कधीतरी होती असे वाटतेय, पण यत्ता आठवत नाहीये.

In reply to by चौकटराजा

म्हातारा तर आहेच- किती वर्षांचा तेवढं फक्त विचारू नका ;) (जन्मल्यापासून दिसामासाने "म्हातारा" होणारा) बॅटमॅन.

In reply to by बॅटमॅन

@बॅट्मॅन... ही कविता मला अभ्यासक्रमात असल्याचे आठवत नाहीय... हा पण असलीच एक दुसरी कविता होती.. 'मी फुल त्रुणातील इवले'! तिला मस्त चाल बसायची त्यामुळे लक्षात आहे अजुन.

आज हयात असते रामदास । तर भोवती बघून हरामदास । अंतरी जाले असते उदास । लागोन चिंता ॥ १ ॥ समर्थाचिया सेवका वक्र पाहे । ऐसा गल्लीगल्लीत गुंड आहे । त्यांचेवरी संरक्षण छत्र आहे । पोलीस पुढाऱ्यांचे ॥ २ ॥ या सत्याचा लागता शोध । कुठून सुचता असता दासबोध ? लिहिला असता उदासबोध । श्रीसमर्थांनी ॥ ३ ॥ भ्रष्टाचारे पोखरला देश । दीन जनांसी अपार क्लेश । दुर्जनां यश । सज्जना अपेश सर्वत्र दिसे ॥ ४ ॥ नीतीचा डोळा काणा । प्रत्येक माणूस दीनवाणा । सर्व फ़ोलपटे नाही दाणा । पीक ऐसे ॥ ५ ॥ देवतांसी उचलून धरती । वेडेविद्रे नाच करती । भसाड ओसाड आरती । झोकून दारू ॥ ६ ॥ कबीर सांगे अल्लाची महती । मुंगीच्या पायी घुंगुर वाजती । तरी ते अल्लाशी ऐकु येती । ऐसे म्हणे ॥ ७ ॥ येथे अल्लासी बहिरा मानती । ठणाणा ध्वनीक्षेपक आणती । त्यातून कर्कश बांग हाणती। अल्लासाठी ॥ ८ ॥ कंडम बरगड्यांच्या जनतेवरी । बिल्डर, स्मगलर, गुंड राज्य करी । प्रत्येक नेता खिसे भरी । हाती धरून तयांसी ॥ ९ ॥ दुष्काळ खणी, भुई फाटे । शोष पडून विहीर आटे । काळा कटू गहिवर दाटे । गळ्यात भविष्याच्या ॥ १० ॥ सत्या सामोरे पहाण्यासाठी । त्राण असावे लागे गाठी । भेकड पळपुट्याचे पाठी । हिजडा लागे ॥ ११ ॥ ग्रंथ नाम उदासबोध । कवी जनतेचा संवाद । काळा कडू आतला विषाद । हलका केला। ॥ १२ ॥

In reply to by पैसा

सहमत. ******************************************** तसेच खालील गीत, चित्रपटाची कथा आणि चित्रपटामध्ये त्या काळी मांडलेले प्रश्न आजही लागू आहेत. ******************************************** उषःकाल होता होता, काळरात्र झाली अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली ॥धृ.॥ आम्ही चार किरणांची ही आस का धरावी जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली ॥१॥ तेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कट्यारी तेच दंश करिती आम्हा साप हे विषारी अम्ही मात्र ऐकत असतो आमुची खुषाली ! ॥२॥ तिजोर्‍यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती आम्हावरी संसाराची उडे धूळ माती आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेत ही ना वाली ॥३॥ अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी असा कसा जो तो येथे होतसे खरेदी ह्या अपार दु:खाचीही चालली दलाली ! ॥४॥ उभा देश झाला आता एक बंदीशाला जिथे देवकीचा पान्हा दूधाने जळाला कसे पुण्य दुर्देवी अन पाप भाग्यशाली ॥५॥ धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली ॥६॥ गीत : सुरेश भट संगीत : पं. हृदयनाथ मंगेशकर स्वर : आशा भोसले चित्रपट : सिंहासन [१९७९]

In reply to by मोदक

धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे
संपूर्ण कवितेतल्या या सर्वात प्रभावी ओळी

असू दे जीवन | गेले कोळपून | त्यात मी ओतीन | संजीवनी || पहाटेचा तारा | नाही आला घरा | तरीही मी धरा | जगवीन || सागराचा पेला | नाही मुखी गेला | बाष्प आभाळाला | देववीन || ऋतूराज सहा | नाही आले गेहा | तरी मी ह्या देहा | फुलवीन | आवर्ताचे धुके | धूर क्षुब्ध ओके | चुकलेली टोके | मेळवीन || सारे हलाहल | उग्र कोलाहल | घोर दावानल | आचमीन || अश्रूंच्या थेंबांत | पेटवीन वात | उजळीन पथ | जीवनाचा || माझी खरी शक्ती | आहे जनभक्ती | तेथेच गा मुक्ती | चिरंतन ||