Skip to main content

मोठीशी आरोळी

लेखक वैभव कुलकर्नि यांनी मंगळवार, 23/07/2013 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
मोठीशी आरोळी कोण मारतुया वर. यमाचा आवाज , मला कळली झालर. माझे-माझे आता कोण,सग-सगळे लांबरे. कोणीतरी म्हणेल आता नकोस जाऊरे. अंधार होताहोता,निजू लेगेल झापड. गालाचेही आता होऊ लागेल खापड. किती आले किती गेले याची यमाला कल्पना. आज मला न्यायचे ,त्याने ओकली वल्गना. रेड्यावरती स्वारी बसत, माझ्याकडे आली. रेड्याचे ते डोळे बोले , मित्रा आज तुझी पाळी. चल षडा माझ्याबरोबर,वेळ संपलाय तुझा. पाशवाच्या बंधनातील खेळ संपलाय तुझा. रडारडे होईल मुक्त हंबरडे फुटतील. हातातील हिरवे चुडे, हातात तुटतील कपाळाचे नागडेही आता विद्रूप दिसेल. काळजात खोल एक छीद्र ते घुसेल चीतेवारती वाहतील , साजूक तुपाची आहुती सुरु वजाबाकी, को-या कागदाची पावती. झाले-गेले सगळे आता, गोड-धोड थोडे करा. कावऴयापुढे ताट सारत परत मागे फिरा. कोण म्हणतंय बर झालं अरे कर्मठ तो गेला. धरणीवरचा देवाने एक भर कमी केला. असेही कोणी म्हणेल , असा कसा र तो गेला. माझ्या तहानेचा होता एकच तो पेला. फोटोपुढे हाथ जोडून ८वण माझी काढाल. दारावरची पाटी बदलून कैलासवासी जोडाल.
लेखनविषय:

वाचने 1078
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया