आधी आपण वाळूवर घर बांधले
खेळता खेळता,
तू मोडून टाकलेस !
नंतर आपण हवेत स्वप्न बांधले
तू हलकेच फुंकर टाकलीस;
पत्त्यासारखे कोसळले !
आता
तुझ्या माझ्या आकाशाच्या मध्यभागी
आपण एक कडेकोट भिंत बांधू !
- डॉ. सुनील अहिरराव
https://aaskmed2.blogspot.in/2013/07/blog-post_1956.html
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1037
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदरच.
सुंदरच. खूप आवडले
हे :
नंतर आपण हवेत स्वप्न बांधले
तू हलकेच फुंकर टाकलीस;
पत्त्यासारखे कोसळले!
खूपच सही सुचले आहे ।पुन्ह पुन्हा वाचली कविता :)
@निनाव, मनापासून आभार !
In reply to सुंदरच. by निनाव
@निनाव, मनापासून आभार !