झालंया सगळ येगळ आता ... रगात भी घालतंया घोळ
आप -आपल्यात मीसळतानाभी वाचतया रक्तगटाची ओळ
सगळं झालया तुटक-तुटक .. नात्याला कृत्रीमतेची ओल
बोलणं फकस्त जवळ आलंया .. शब्द राहिल्याती अबोल
भाऊ नाही मनात कुणी ... रडतीया चंद्राची ती कोर
भाकरीनभी ओ ळ्ख बदललीया .. नग म्हणतीया चूल
पिसेच वहित ठेवत नाही कुणी .. झालाय दु:खी तिकडे मोर
पाया पडून मूर्ती चोरतुया ...इतका नास्तिक झालाय चोर
आंब्याच भी बालपण गेलया ...आणलाया लहानपणीच मोहोर
शब्दाच भी वय वाढलया .. लावत्याती कुणाच्याभी जीवाला घोर
दुष्टाची ती चक्र रंगवुनी , पिवळ पिकलया ते ऊर
पंख फुटलेकी कि पक्षी उडतुया , नग म्हनतुया घर
झालंया सगळ येगळ आता ... रगात भी घालतंया घोळ
आप -आपल्यात मीसळतानाभी वाचताया रक्तगटाची ओळ
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1206
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
भन्नाट , सुन्न करणारी कविता
हि दोन कडवी खूपच आवड्लि.
In reply to भन्नाट , सुन्न करणारी कविता by निनाव
हॅट्स ऑफ !!!!
सुंदर काव्य