सुप्रीम कोर्टाने मुंबई हाय कोर्टाचा डान्स बार पुन्हा सुरु करण्याचा निर्णय योग्य ठरविला आहे. जर राज्य सरकारची पुनर्विचार याचिका पण फेटाळली गेली(अजून केलेली नाही)तर ही छमछम officially पुन्हा सुरु होईल.
नवी मुंबईत बरेच परिवार घरातील कर्त्या पुरुषाच्या या सवयींमुळे अक्षरश: रस्त्यावर आले होते आणि अश्या बर्याच केसेस दिसून आल्या होत्या म्हणून आबांनी डान्स बारवर बंदी घातली होती. आणि कधी नव्हे ते त्याला सर्वपक्षीय पाठींबा देखील मिळाला होता. मात्र हि बंदी आल्यावर बर्याच सामाजिक (?) संघटनानी आरडाओऱड केली होती. जसे - या नाचणाऱ्या नुली आता देह विक्रयाच्या व्यवसायात उतरतील, आत्महत्या करतील, वैगेरे .आज निकाल लागल्यावर या संघटनांनी आणि बार असोशियन चे अध्यक्ष मनजित सेठी यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तर अब बहोत सारे परिवार बस जायेंगे.
तर या निर्णयाने होणारे सामाजिक परिणाम,डान्स बारच्या मुद्द्याला असणारे इतर पैलू (जसे नर्तीकांचे याच व्यवसायात पुनर्वसन,गुन्हेगारीला चालना आणि असे ईतर बरेच) याविषयी मिपाकरांची मते वाचायला आवडतील.
धन्यवाद.
मिसळपाव
प्रतिक्रिया
अच्चा असं झालं तर
अच्चा
असं झालं तर
बुलेटीन वर बुलेटीन काढणार्या
In reply to अच्चा असं झालं तर by स्पा
बुलेटीन वर बुलेटीन काढणार्या म्हाळसाकर पोंगुर्पेकरांची आठवण झाली काय रे स्पांडू. ;)
डान्स बार विशेषांक !!
In reply to बुलेटीन वर बुलेटीन काढणार्या by गणपा
डान्स बार विशेषांक !!
आम्ही नाही त्यातले..
In reply to बुलेटीन वर बुलेटीन काढणार्या by गणपा
आम्ही नाही हो बुलेटीन वर बुलेटीन काढत गणपाशेठ.
चाळ साप्ताहिकाचा गच्ची
In reply to बुलेटीन वर बुलेटीन काढणार्या by गणपा
चाळ साप्ताहिकाचा गच्ची विशेषांक आठवला एकदम =)) =)) =))
डोंबिवलीकर स्पंपू ;)
म्हाळसाकर पोंगुर्पेकरांची ?
In reply to बुलेटीन वर बुलेटीन काढणार्या by गणपा
'म्हाळसाकांत पोंबुर्पेकर'म्हणायचंय का गणपाभौ?
चला..
मिपाचा पुढचा कट्टा कुठे भरवायचा हा प्रश्र्ण मिटला.
=))
In reply to चला.. by ज्ञानोबाचे पैजार
.
आरा रा
आबांचे अनेक बाबतीत हसे झाले आहेच त्यात हा मुद्दा आणखी. असेच हसे गुटखा बंदीचे होणार काय ? मी मागेच मिपावर व मिपाकरांच्याशी प्रत्यक्ष गप्पा मारताना म्हटले ही होते की पोलीसांच्या ठराविक प्रायॉरिटीज असतात , वेश्या व्यवसाय, डान्स बार, रेव्ह पार्टी, बनावट सीडी धाडी ई. कारण या व्यवसायात शक्यतो राजकारणी पडत नाहीत. होटेल, बांधकाम व्यवसाय येथेही अनेक बेकायदेशीर गोष्टी होत असतील पण त्या क्षेत्रात नगरसेवक, आमदार यांचा वावर असल्याने तिकडे पोलीस कशाला फिरकतील? मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे लॉटरी, शेअर बाजार यांच्या सारख्या सभ्य जुगारांबरोबर कॅसिनो ही येणारच , दारू व्यवस्था येणारच . पान खाऊन पचापचा थुंकलेले चालते मग गुटखा खाल्ला तर काय बिघडले? मुळात पान, दारू. गुटखा , डान्स, जुगार,वेश्यागमन, वायदे बाजार या गोष्टी इतक्या प्रचंड कराखाली दबल्या गेल्या पाहिजेत की त्यात गुंतवणूक करणाराच मुळात जेरीला आला पाहिजे. मग शौकिन पनवेलला जायचे तर सोडाच !
+१
In reply to आरा रा by चौकटराजा
अत्यंत सहमत.
सरकारने लास वेगास च्या
सरकारने लास वेगास च्या धर्तीवर एखादा तसाच भाग तयार केला तर ?
चांगली कल्पना
In reply to सरकारने लास वेगास च्या by मालोजीराव
परंतु या 'इलाक्याबाहेर' हे उद्योग (कि धंदे) ;) फैलावणार नाहीत याची सरकारने काळजी घेतली पहिजे. आणि भारतात हे next to impossible वाटतेय.
अश्या भागातच डान्स बार,गेमिंग
In reply to चांगली कल्पना by सचिन कुलकर्णी
अश्या भागातच डान्स बार,गेमिंग,कसिनो,थीम पार्क्स उभे राहतील, कारण अश्या शहरांमध्ये गुंतवणुकीसाठी कोणतीही अट नसते असे ऐकले आहे, म्हणजे कुणी पैसा गुंतवला,पैसा कुठून आला अशी चौकशी होत नाही आणि कितीही पैसा गुंतवू शकतो… काळा पैसा उधळपट्टी साठी देशाबाहेर जाऊ नये (बँकॉक,दुबई वगैरे ) , असाही एक यामागे विचार असू शकतो.
इलाक्याबाहेर गुंतवणुकीच्या आणि कायद्याच्या मर्यादा असतील त्यामुळे त्याबाहेर कोणी हे करणार नाही असे वाटते.
लास वेगास च्या धर्तीवर एखादा
In reply to सरकारने लास वेगास च्या by मालोजीराव
लास वेगास च्या धर्तीवर एखादा तसाच भाग महाराष्ट्रात (किंवा भारतात)कुठे असावा यावर मिपाकरांची मते जाणुन घ्यायला आवडेल...:)
वेगमर्यादा.....
In reply to लास वेगास च्या धर्तीवर एखादा by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
त्याने महाराष्ट्रातील नैतिक आणि सामाजिक अध:पतन अधिक 'वेगास' येईल. (असे आपले माझे मत).
त्याने महाराष्ट्रातील नैतिक
In reply to वेगमर्यादा..... by प्रभाकर पेठकर
त्याने महाराष्ट्रातील नैतिक आणि सामाजिक अध:पतन अधिक 'वेगास' येईल.म्हणजे नक्की काय होईल..?
गोव्याचा लास वेगास होऊ शकतो
In reply to लास वेगास च्या धर्तीवर एखादा by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
गोव्याचा लास वेगास होऊ शकतो…सध्या रशियन आणि उझबेक लोकांनी गोव्याची हालत फार वाईट करून ठेवलीये…रात्री टीटोझ च्या बाहेर काही वेळ उभा राहिलं कि स्पष्ट जाणवतं हे
अतिशय अभिनंदनीय निकाल
मुळातच डान्सबार बंद करणे हे तथाकथित पांढरपेशा लोकांची झुंडशाही आणि इतरांच्या लिबर्टी आणि पर्स्युट ऑफ हॅप्पीनेस वर घाला होता !
असला मुर्ख नियम काढणार्या शासनाचा तेव्हाही धिक्कारच केला होता आम्ही !!
सर्वोच्च कोर्टाचे अभिनंदन व आभार !!
+१
In reply to अतिशय अभिनंदनीय निकाल by प्रसाद गोडबोले
कोर्टाने देखील कलम ३३ चा आधार घेऊनच हा निकाल दिला आहे.
हे कलम ३३ काय आहे..
In reply to +१ by सचिन कुलकर्णी
हे कलम ३३ काय आहे...विस्ताराने सांगा.
क्षमस्व..
In reply to हे कलम ३३ काय आहे.. by किचेन
कलम ३३ नव्हे तर कलम १९ चा आधार घेऊन सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. कलम १९ नुसार कोणत्याही व्यक्तीचा उपजीविकेचा मार्ग हिरावून घेता येणार नाही. येथे कोर्टाने बारबालांचे हे म्हणणे देखील मान्य केले कि - उपजीविकेसाठी त्यांना दुसरी कोणतीही कला अथवा कौशल्य अवगत नाही.
पोलिसांनी कलम १४ चा आधार घेऊन हि बंदी घातली होती परंतु फक्त ३ तारांकित पेक्षा खालच्या आस्थापनांमध्ये हि बंदी लागू होती. कोर्टाने यावर देखील बोट ठेवून समानतेचा हक्क या मूल्याची पायमल्ली झाली आहे असे म्हंटले आहे.
या निमित्ताने
या निमित्ताने मुंबईतील, तसेच अमेरिका, थायलंड वगैरेतील बार, बारबाला, इ. बद्दल कुणाला सांगोपांग माहिती असल्यास द्यावी, असे सुचवतो.
हो ना.
In reply to या निमित्ताने by चित्रगुप्त
'कुणाचाही रोजगार हिरावून घेण्याचा सरकारला अधिकार नाही' हा संघटनेचा युक्तीवाद जसा कोर्टाला मान्य आहे तसा आम्हालाही मान्य आहे, बाकी, जगभरातील डान्सबार, बारबाला याबद्दलची सांगोपांग माहिती कोणी दिली तर समजून घ्यायला आवडेल. विकिपिडिया म्हणतो- Dance bar is a term used in India to refer to....
-दिलीप बिरुटे
व्याख्या
In reply to या निमित्ताने by चित्रगुप्त
जिथे डान्स बघायला व 'मूड' जमला की करायला बार बार जावेसे वाटते तो डान्स बार !
जिथे बारी बारी ने होता डान्स खिसा रिकामा होतो खास .
@ चित्रगुप्तजी, " अहो,,,,,,,, ते पॅरिसचे डान्स म्हणजे त्यात बिलकुल काहीही अश्लील वाटत नाही बरं का हे विशेष !" इति- गेल्या वर्षी युरोपला जाउन आलेली आमची एक नातेवाईक .
पॅरिसचे डान्स
In reply to व्याख्या by चौकटराजा
@चौरा...ते पॅरिसचे डान्स म्हणजे...गेल्या वर्षी युरोपला जाउन आलेली आमची एक नातेवाईक....
यावरून आठवले, की आमच्या परिचयातील एक महिला (वय सत्तर) केसरी की कोणत्यातरी टुरातून युरोप फिरून आल्या, पैकी पॅरिसला दीड दिवस होत्या. मला त्यांनी ३ प्रश्न विचारले:
१.नदीतून बोटीने फिरला का? २. अत्तराचा कारखाना बघितला का? ३. दहा हजार तिकिटाचा डान्स बघितला का?
या तिन्ही प्रश्नांचे माझ्याकडे एकच उत्तर होते, "नाही"
" ईईईई...मी जे दीड दिवसात बघितले, ते तुम्ही वर्षभर राहूनही बघितलेले नाही"...
" ईईईई...मी जे दीड दिवसात
In reply to पॅरिसचे डान्स by चित्रगुप्त
:))
एक दिवसात अॅम्स्टरडॅम "केलेल्या" एका काकाने माझी परवा अशीच संभावना केली!
जर्मनीत..
In reply to या निमित्ताने by चित्रगुप्त
जर्मनीत डान्स बार मध्ये प्रवेश फी ५ युरो आहे. बीयर ६ युरोला मिळते. १ सम्पली की दुसरी घ्यावीच लागते. सगळं लिगल असल्याने कसलीच भिती नाही.. (सध्या १ युरो = ८० रुपये)
नवी मुंबईत बरेच परिवार घरातील
सहमत
परिणाम निश्चीतच चांगले होणार नाहीत
याऊलट, डान्सबार बंद झाल्यावर
In reply to नवी मुंबईत बरेच परिवार घरातील by मराठी_माणूस
याऊलट, डान्सबार बंद झाल्यावर त्यातून वाचलेल्या पैशांनी दोन-दोन गाडया (मोटारी) घेतलेले नमुने पाहण्यात आले आहेत.
नाचणा-यांचा दोष काय! जाणा
नाचणा-यांचा दोष काय! जाणा-यांचा दोष काय! परवानगी दिली म्हणून काय, आणि नाही दिली म्हणून काय! करायचं ते करतातच; व्हायचं ते होतंच. आनंद आहे.
तीव्र निषेध....निर्णय ऐकुन
तीव्र निषेध....निर्णय ऐकुन भयंकर धक्का बसला.
अवांतरः गुटख्यच्या पुड्या आता परत मिळायला लगल्यात.शटर थोड खलि घेतल असेल तर समजाव ह्य टपरिवाल्याकडे गुतखा मिळतो.
निषेध का बों
In reply to तीव्र निषेध....निर्णय ऐकुन by किचेन
डांसबार सुरु झाले तर असं काय घडणार आहे ?
-दिलीप बिरुटे
पनवेलमध्ये थांबता येईल
In reply to निषेध का बों by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पनवेलमध्ये थांबता येईल :))
+१
In reply to निषेध का बों by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शेवटी कंट्रोल आपल्या (पक्षी: ज्याच्या त्याच्या ;) ) हातातच आहे.
अर्थात संयम हीच सुखी जीवनाची गुरुकिल्ली. ;) - सचिनबाबा मिपाकर
बार गर्ल मजबुत कमाई करतात...
बार गर्ल मजबुत कमाई करतात... जर चांगलं गबरु गिर्हाईक असेल आणि आयटम पण रापचिक असेल तर अशी छमिया महिन्याला ५० हजारा पर्यंत कमाई आरामात करु शकते असा डान्सबारचा महिमा आहे. ;)

अब्दुल करिम तेलगी ग्रांट रोडच्या टोपाझ बार मधे जात असे, तसेच त्याने तरन्नुम खान नावाच्या बार बालेवर एका रात्रीत ९३ लाख उडवल्याची बातमी त्यावेळी जोरात होती.
तसेच तरन्नुम खान म्हणुन जालावर त्यावेळी दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया हिचे फोटो वार्या सारखे पसरवले जात होते, यामुळे त्या अभिनेत्रीला बराच त्रास झाला... पण यामुळेच तीला बरीच प्रसिद्धी मिळाली.
हा वरील आणि असे अनेक फोटो या अभिनेत्रीचे तरन्नुम खान म्हणुन त्यावेळी जालावर वेगाने पसरले होते.
संदर्भ :-
https://www.mangalorean.com/printarticle.php?arttype=localnews&newsid=1…
https://alturl.com/3akmt
तरन्नुम खान
In reply to बार गर्ल मजबुत कमाई करतात... by मदनबाण
आमच्या माहितीप्रमाणे तरन्नुम दीपा बार मध्ये नाचायची आणि श्रीलंकन क्रिकेटपटू मुथैय्या मुरलीधरन देखील तिचा मोठा पंखा होता म्हणे. तो रेग्युलरली इथे 'विजीट' करायचा. नन्तर क्रिकेट बेटिंग प्रकरणात देखील तरन्नुमची चौकशी झाली होती. तिच्या बाबत बर्याच सुरस कथा होत्या. जसे कि ती मर्सिडीज मधून येते आणि अंधेरी सात बंगला येथे बंगल्यात राहते (सात बंगला एरियात राहायची सत्य होते),वैगेरे.
डान्सबार चालतात तर मग टॉपलेस
डान्सबार चालतात तर मग टॉपलेस बार अधिकृतरीत्या का चालु नयेत. स्विंगर क्लब्स का चालु नयेत? काही व्यक्ती अश्याही असतील की ज्यांना वासनासुधाक्षमना व्यतिरिक्त काहिही करता येत नसेल. त्यांच्यासाठी वरील अगळे धंदे अधिकृत करुन घटनेचा मान राखणे उचित नाही का?
तसेच काही लोकांना केवळ दारु तयार करता येते आणि काही लोकांना केवळ गुटखा. मग अश्या परिस्थितीत काही राज्यांनी या दोन उत्पादनांवर घातलेली बंदी अवैध आणि घटनाबाह्य नाही काय?
अन्याय.
In reply to डान्सबार चालतात तर मग टॉपलेस by मृत्युन्जय
ज्यांना फक्त भ्रष्टाचारच करता येतो अशा नेत्यांनाही आपण 'समजून' घेत आहोतच की.
महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने पळविणे, सराफांची दुकाने फोडणे, बलात्कार करणे, चॉपरच्या धाकाने वाटमारी करणे, खंडण्या वसूल करणे, खोट्या नोटा छापणे वगैरे वगैर व्यवसायात भारतात फार मोठ्या संख्येने कांही नागरीक गुंतलेले आहेत. त्यांना कारावासात टाकून त्यांच्या रोजीरोटीला काढून घेण्याचा सरकारला काय अधिकार? अशा नागरीकांवर त्यांचे कुटुंबिय अवलंबून असतात. त्यांची संख्या तर कित्येक लाखांच्या घरात आहे. एकाला एक न्याय आणि दूसर्याला दूसरा न्याय असता कामा नये असे सन्मानिय न्यायाधिश साहेबांनी म्हंटले आहे. मग बार बालांना नाचण्याची (आणि त्या आडून 'इतर' धंदे करण्याची) परवानगी द्यायची आणि इतरांना पकडून पकडून तुरूंगात डांबायचे असे वेगवेगळे न्याय का असावेत?
अंगी इतर कांही कौशल्य नसल्याने आणि फक्त नाचता येते म्हणून त्यांना ह्या व्यवसायात राहू द्यावे त्यांच्यावर अन्याय करू नये, बंदीमुळे कित्येक बारबालांना सरकारने देहविक्रयास भाग पाडले असाही दावा केला जातो आहे. डान्सबार अस्तित्वात नव्हते तेंव्हा अकुशल स्त्रिया काय करायच्या? किती टक्के स्त्रिया देहविक्रय करायच्या? डान्सबार मधे नाचायला मिळाले तर किती वेश्या देहविक्रय सोडून डान्सबार मध्ये नाचण्याचा सन्मानिय मार्ग स्विकारतील? डान्सबार मधे जे अंगविक्षेप चालतात त्याला 'डान्स' म्हणावे का? 'येथे बार मध्ये नाचण्याचे प्रशिक्षण दिले जाईल' असे फलक लावून नाच शिकविण्याचे क्लासेस कोणी चालू केले तर सरकार परवानगी देणार का?
नागरीकांवर खुप खुप अन्याय होतो आहे. ह्या अन्यायाला लवकरच कोणीतरी समाजसेवी संस्थेने वाचा फोडली पाहिजे.
त्यांना कारावासात टाकून
In reply to अन्याय. by प्रभाकर पेठकर
सहमत
डान्सबार चालू करण्यासाठी कोणतही स्पष्टीकरण पटत नाही
तरन्नुमची कथा
तरन्नुमची कथा
छान झाले
डांस बार चालू झाले ते छान झाले. राजकारण्यांनी आमच्या अध्ध्पतना ची काळजी करु नये. ( जमले तर स्वता किती शेणात आहेत ते बघावे ).
आता पहिला कोणता बार चालू होतो ( ऑफिशियली ) ते बघु
प्रसादराव
In reply to छान झाले by प्रसाद१९७१
सांगा कधी 'बसायचे' ? ;)
शिर्षकच चुकलंय देवा...
'पुन्हा चालू' ह्याला काही अर्थच नाहीये.बंदी होती ती ऑफिशिअली डान्सबार चालवायला. सुरुवातीच्या काळात थोडी पडझड झाली खरी, पण पुन्हा नव्या जोमानं ह्या भानगडी 'तेरी भी चूप, मेरी भी चूप' न्यायानं चालू झाल्या होत्याच की.
बाकी, योग्य-अयोग्य, नैतिक अनैतिक वगैरे वाचतो आहेच.
जाताजाता - बेकायदेशीररित्या राहणार्या बांग्लादेशींची पुन्हा ऑफिशिअली सोय होणार तर!
+१
In reply to शिर्षकच चुकलंय देवा... by धमाल मुलगा
आमच्या एम एच १४ वाल्या गुंठामंत्री मित्राने वाटसअप्प वर दिलेली प्रतिक्रिया
बेरोजगार को आराम,भुके को अनाज,प्यासे को पानी
टुटे दिल को फिर मिलेगा प्यार…मुबारक हो आपको फिर से डान्स बार !
है शाब्बास!
In reply to +१ by मालोजीराव
आमच्या पाहण्यात असेच एक श्रीमान होते. आज्यानं-बापानं दाताच्या कण्या करुन सांगितलं पण ऐकलं नाही...घाटाखाली जाऊन परत आल्यावर घरात घेतलं नाही तर साहेब दुपारपर्यंत पजेरोत झोपायचे एसी लाऊन.
हल्ली पैसा संपल्यामुळं एका मित्राच्या सिक्युरिटी गार्ड्स पुरवण्याच्या एजन्सीमध्ये म्यानिजर म्हणून काम करतात म्हणे.
सरकारचं "मोरल पोलिसिंग " सुप्रीम कोर्टाला मान्य नाही ……
सरकारचं "मोरल पोलिसिंग " सुप्रीम कोर्टाला मान्य नाही ……
हायवे बार...
आता हायवे लगतचे दारू आणि बिअर बार बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हायवेवरील अपघातांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. हायवे लगतच्या सर्व बार आणि बिअर बार्सचे सरकारी परवाने रद्द करण्यात येणार आहेत. अभिनंदन.
निर्णय चांगलाच- पण अंमलबजावणी
In reply to हायवे बार... by प्रभाकर पेठकर
निर्णय चांगलाच- पण अंमलबजावणी कशी अन कितपत होते ते पाहणे मस्ट आहे.
+१
In reply to निर्णय चांगलाच- पण अंमलबजावणी by बॅटमॅन
दारुविक्रीचे परवाने नसलेल्या ढाब्यांवर कित्येक वर्षांपासून दारुविक्री होती, तिला चाप लावणं होत नाही, आहे त्यांचे परवाने रद्द करुन फारतर हप्ते मिळण्याच्या हाटेलांच्या संख्येत वाढ होईल इतकंच. हायवे वरची दारुविक्री तर घंटा काय बंद होत नसते.
थोडा स्पष्टच बोलतो माफी असावी
In reply to +१ by धमाल मुलगा
थोडा स्पष्टच बोलतो माफी असावी, पण दारूविक्री,डान्स बार (मयखाना) , वैशाव्यवसाय हे जगातील सर्वात जुने व्यवसाय आहेत… कारणं माहित नाहीत पण गेल्या हजारो वर्षात बर्याच जणांनी प्रयत्न केले पण याला कोणीही बंद पाडू शकले नाही, आणि पाडू शकणार हि नाही असं वाटतंय…याला फक्त ब्रेक लागू शकतो.आबांनी लावलेला हा ७ वर्षांचा ब्रेक होता म्हणता येईल. त्या सात वर्षांसाठी आबांचे आभार !
हो. नोटीसा आल्या आहेत. पण
In reply to हायवे बार... by प्रभाकर पेठकर
हो. नोटीसा आल्या आहेत. पण पन्चाहत्तर मीटर अंतर पुढे काय? जी गावे हायवे वरच वसलेली आहेत तेथे कस्से करावे? ड्रायवर लोकानी जवळ दारु बाळगलि तर काय करणार? गावातली दारु चढत नाही काय? खूप जेवण करून सुस्ती येते म्हणून हायवे वरची होटेल पण बंद करावीत.
काय फायदा या निर्णयाचा...
In reply to हो. नोटीसा आल्या आहेत. पण by अभ्या..
आता हायवे सोडून शेता-गावात दारु मिळेल आणि पुन्हा रोडला लागायचे, इतकेच या निर्णयाचा अर्थ. मोठमोठी हॉटेल्स जी हायवेवर होती आता तिथे चोरुन लपून दारु मिळेल आणि शेता-गावात सर्व माल ठेवाला लागेल. शासनाला सर्वात मोठा महसुल इथे मिळतो तो शासन कशाला बुडवेल ?
-दिलीप बिरुटे
शोषण
माझ्या मते शोषणाचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि माझ्या दृष्टीने तो एकमेव महत्त्वाचा मुद्दा आहे.
देहविक्रय करायला परवानगी असावी का ? असावी. त्या प्रक्रियेत सामील झालेल्या कुणाचंही शोषण होत नसेल तर.
पुरुषांनी आपापल्या लैंगिकतेला वाट करून द्यावी का ? करावी. त्या प्रक्रियेत सामील झालेल्या कुणाचंही शोषण होत नसेल तर.
पुरुषांनी दौलतजादा करावा का ? करावा. त्या प्रक्रियेत सामील झालेल्या कुणाचंही शोषण होत नसेल तर.
लोकांनी एडस सकट रोगराईचा धोका पत्करावा का ? जरूर. त्या प्रक्रियेत सामील झालेल्या कुणाचंही शोषण होत नसेल तर.
थोडक्यात सार्या प्रश्नांच्या उत्तरामागचं "कॅव्हिआट" एकच आहे : त्या प्रक्रियेत सामील झालेल्या कुणाचंही शोषण होत नसेल तर.
आणि मी जे ऐकतो/वाचतो/पाहातो, मला जे समजतं ते असं की देहविक्रयाच्या व्यवसायाचा मूलाधार आहे शोषण, अल्पवयीनांचं, समाजातल्या दुर्बल घटकांचं. शोषणाचा मुद्दा बाजूला काढा. डान्स बार थांबतील. देहविक्रयाची उच्च आर्थिक वर्तुळातली प्रकरणं वगळतां बाकीची यंत्रणा थांबेल. देहविक्रयाच्या - फ्लेश मार्केटचा - पाया आहे शोषण.
या कारणामुळे डान्सबारवरची बंदी उठणं ही घटना मला दुर्दैवी परिस्थितीत "दुष्काळात तेरावा महिना" आहे अशी वाटते. डान्सबारशी संलग्न असणार्या लोकांच्या काम करण्याच्या हक्कापेक्षा शोषण होत असलेल्या घटकांच्या मानवाधिकाराचं रक्षण करणं ही माझ्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे. उच्च-सर्वोच्च न्यायालय , एकंदर शासनयंत्रणा, समाजातल्या अनेकांची विचारसरणी असा विचार करत नाही याचा मला खेद आहे.
डान्सबार ही शोषणाचीच जागा आहे
In reply to शोषण by मुक्तसुनीत
डान्सबार ही शोषणाचीच जागा आहे का ? माझं मत नाही. अन्य ठिकाणीही स्त्रीयांचे शोषण हा मुद्दा असेलच. समजा डान्सबार ही शोषणाची जागा असेल तर स्त्रीयांनी / तरुणींनी तिथे जावेच का ? जाऊ नये. अनेक स्त्रीया/ तरुणी तिथे भूलथापींना बळी पडून तिथे जात असतील आणि त्यांचे लैंगिक, आर्थिक, शोषण होत असेल तेव्हा त्यांच्या सूटकेचा मार्गच नाही का ? तर सुटकेचा मार्ग आहे.
दोन हजार पाचच्या नंतर डांस बार बंद झाले आणि या तरुणी / स्त्रीया कमी वेळात अधिक पैसा मिळतो म्हणून अन्य काम करायला तयार झाल्या असतील असं काही मला वाटत नाही.
डांसबार बंद झाल्यानंतर दोन हजार पाच दरम्यान आम्हा काही मित्रांना मुरुड जंजी-याला जायचं होतं. रात्री उशीर झाला म्हणुन लॉज शोधत होतो. ठाणे शहरातील एका मध्यवर्ती ठिकाणचे लॉजवर गेलो तर मालक जागाच नाही म्हणाला. पहिला मजला, दुसरा मजला, आणि तिसरा मजला या बारवर जाणार्या मुलींनी गच्च भरुन गेला होता. चार पाचशे मुली अक्षरक्षा कोंबलेल्या कोंबड्याप्रमाणे बसलेल्या होत्या. काम उरले नाही. काम करायची लाज वाटते. त्या पेक्षा त्यांनी काही सोपे मार्ग निवडले होते. असो.
-दिलीप बिरुटे
हा हा हा
In reply to डान्सबार ही शोषणाचीच जागा आहे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कत्तलखाना ही प्राणीहत्येची जागा आहे का ? माझं मत नाही. अन्य ठिकाणीही प्राण्यांची हत्या हा मुद्दा असेलच. समजा कत्तलखाना ही प्राणीहत्येची जागा असेल तर प्राण्यांनी / प्राणिणींनी तिथे जावेच का ? जाऊ नये. अनेक प्राणी / प्राणिणी तिथे चुचकारण्याला बळी पडून तिथे जात असतील आणि त्यांची शारिरीक मानसिक लेखनिक हत्या होत असेल तेव्हा त्यांच्या सूटकेचा मार्गच नाही का ? तर सुटकेचा मार्ग आहे.
जर का कधी कत्तलखाने बंद झाले आणि हे प्राणी/प्राणिणी कमी वेळात अधिक जगायला मिळतं म्हणून आणखी श्वास टाकायला तयार झाले असतील असं काही मला वाटत नाही.
एवढच लिहायचं होतं तर....
In reply to हा हा हा by मुक्तसुनीत
प्रतिसाद नसता लिहिला तरी चालले असते,असे वाटले
-दिलीप बिरुटे
इलाज नाही...
In reply to एवढच लिहायचं होतं तर.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
"इलाज नाही मिस्टर नेने, इलाज नाही "
- कोलटकर ;-)
मुक्तसुनीत यांच्याशी पूर्णपणे
In reply to इलाज नाही... by मुक्तसुनीत
मुक्तसुनीत यांच्याशी पूर्णपणे सहमत !
डान्सबार ही शोषणाचीच जागा आहे का ? माझं मत नाही.
ही शोषणाचीच जागा आहे,फरक इतकाच आहे की रांड बाजारा पेक्षा इथे कमी वेळेत जास्त पैसा कमवता येतो,आणि शुकशुक करुन गिर्हाईकाला बोलवण्या पेक्षा ठुमके लावुन काम लवकर होतं...
रांड बाजारात स्वतःची वासना शमवण्यासाठी जाणारा वर्ग आणि डान्सबार मधे जाणारा वर्ग यात थोडासाच फरक करता येईल असे मला वाटते... दोन्ही वर्गाची भूक तितकीच ! फक्त इथे सामान्य घरातला कर्ता पुरुष वर्ग आणि हरामचा कमवलेला पैसा उडवणारा वर्ग दोन्ही येतो.समाजासाठी हे नक्कीच धोका दायक आहे... डान्सबारचा नाद सामान्य व्यक्तीलाही लागु शकतो... पण रांडबाजारचा नाद लागणे तसे जरासे कठीणच.
अवांतर :---
माझ्या मित्रांच्या डान्सबारमधे काही वार्या झाल्या होत्या...त्यांनी मलाही अनेकवेळा आग्रह केला होता... अरे एकदा तरी जन्नत बघ ! आयुष्यात एकदा तरी अशी मजा बघ, पाहिजे तर तुझा खर्च आम्ही करतो पण तू चलच... अशी विविध प्रलोभने त्यांनी मला दिली होती...पण मी कधी त्या मार्गाला वळलो नाही, व तशी इच्छाही कधी व्यक्त केली नाही.पण त्यांची नंतर झालेली अवस्था मी पाहिली आहे...छोटासा मोह देखील तुम्हाला किती त्रास दायक ठरु शकतो हे मी पाहिले आहे.
बाणा....
In reply to मुक्तसुनीत यांच्याशी पूर्णपणे by मदनबाण
बाणा, डान्सबार ही एकच जागा स्त्रीयांची शोषणाची आहे का ? आणि सर्वात जास्त शोषण इथेच होते काय ? समजा एका बार मधे १०० मुली आहेत तर जवळ जवळ ८० मुलींचे लैंगिक, आर्थिक, आणि शारिरीक छळ हा होतच असेल तर मी म्हणालो असतो की होय इथे (सर्वात जास्त) स्त्रीयांचे शोषण होतेच. पण, तसे काही दिसत नाही. अशा काही बातम्या वाचनात आल्या नाही. आणि सरासरीने असे शोषण होत असेल तर मग म्हणता आले असते की डान्स बार शोषणाच्याच जागा आहेत. आणि तसा काही विदा असेल तर दाखवा ... शोषणाबद्दल काही विदा मिळाला असता तर चर्चा करता आली असती.
डान्सबार मधे जाणार्यांचे शोषण होते काय ? वाटल्यास अशी चर्चा करा. काही अधिक उणे हाताला लागेल, असे वाटते.
-दिलीप बिरुटे
+१
In reply to बाणा.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वर्षा काळे तर उलट म्हणत होत्या डान्स बर बंद झाल्यामुळे त्यांचे शोषण होत आहे कारण बर्याच जणी देह विक्रयाकडे वळल्या आहेत.
डान्सबार ही एकच जागा
In reply to बाणा.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डान्सबार ही एकच जागा स्त्रीयांची शोषणाची आहे का ?
शोषणाच्या अनेक जागांपैकी एक सोपी आणि सहज पोहचता येईल अशी जागा आहे.
बार मधे १०० मुली आहेत तर जवळ जवळ ८० मुलींचे लैंगिक, आर्थिक, आणि शारिरीक छळ हा होतच असेल तर मी म्हणालो असतो की होय इथे (सर्वात जास्त) स्त्रीयांचे शोषण होतेच. पण, तसे काही दिसत नाही.
कॄपया खालचे व्हिडीयो पहावा :--- डान्सबार / लेडीजबार, ऑर्केस्ट्रा बार आणि जितके प्रकार असतील ते सर्व पीक अप पाँइट्स म्हणुन उपयोगात आणले जातात.
विदा तर माझ्याकडे नाही पण १दुवा देतो... बघा त्याच्यातुन काही उपयुक्त माहिती मिळते का ते...
https://alturl.com/g73pm
दुव्याची वाट पाहतोय.
In reply to डान्सबार ही एकच जागा by मदनबाण
>>>शोषणाच्या अनेक जागांपैकी एक सोपी आणि सहज पोहचता येईल अशी जागा आहे.
अनेक आभार....!
आज फेसबुकवर एक लेख वाचायला बारच्या मुलींना कशी कमाई होते..वगैरे... मुलींना विविध आमिषे दाखवल्या जातात. लैगिंक छळ , शारिरीक छळ होतो, हे मान्यच नाही असे कृपया समजू नका. स्त्रीयांच्या शोषनाला डान्स बारच जवाबदार आहे, हा मुद्दा मला तितकासा मान्य नाही. इतकेच.
-दिलीप बिरुटे
ग्यानबाची मेख
In reply to मुक्तसुनीत यांच्याशी पूर्णपणे by मदनबाण
डान्स बार बंदिमागचे मुख्य कारण हेच होते.
मुंबईत डान्स बार बंद होते का?
मुंबईत डान्स बार बंद होते का??
नव्हते
In reply to मुंबईत डान्स बार बंद होते का? by निखिल देशपांडे
मुंबैत डान्सबार कधीच बंद झाले नव्हते ...
१००% सहमत
In reply to नव्हते by प्रसाद गोडबोले
१००% सहमत
कौतुक
बहुतेक आघाडीच्या मराठी वृत्तपत्रांनी "छमछम पुन्हा चालू" इत्यादि डान्सबारची जाहिरात वाटावी अशा हेडलाईन छापून आपल्या सामाजिक जबाबदारीची परत एकदा झलक दाखवली आहे.
आमच्या सारख्या पामराचे आहे त्या नोकरीत शोषण होते ते कोणाला दिसत
आमच्या सारख्या पामराचे आहे त्या नोकरीत शोषण होते ते कोणाला दिसत नाही का? :-(
शेवटी उपजीविके साठी प्रत्येक जण काहीतरी करत च असतो. कोणी कारखान्यात, ऑफिस मधे काम केले काय किंवा डांसबार मधे नाचले काय? जबरदस्ती नसेल तर काहीच फरक नाही.
डान्सबार मधे मुलींना ८ तास उभे रहावे लागते म्हणुन कोणीतरी तक्रार केल्याची वाचले. सामान्य कामगार, गवंडी , बिगारी ८ तास उभेच असतात. त्यांचे कष्ट दिसत नाहीत का?