पाऊस
लेखनविषय:
आज पहाटे लाजत मुरकत,
बरसून गेला पाउस नवथर
तहानलेल्या धरतीला या
स्पर्शून गेली एक खुळी सर
मातीवरती हलकी नक्षी,
पानांवरती रंग ओलसर
मिटलेल्या पंखात अजूनही
नाजूक ओली हळवी थरथर
पागोळ्यांचे पैंजण छुन छुन,
टपटपणार्या ओल्या वेली
हिरवाईची खूण जागवीत
पाऊस येई सोनपावली
मेघ अजूनही विस्कटलेले,
चंद्रकोर ही ओली अजुनी
अन्कुरातले स्वप्न फुलविते
हसरी गंधित मोहक अवनी
वाचने
2276
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
छान
येलकम अगेन. लै दिवसानी
मस्त!
अनुभूती
मस्त
सुरेख लिहिलेस फुलवा.
छान!
सुंदर...
फारच सुंदर आहे रचना. सलग ३-४
खूप आवडली कविता.
सुंदर
किती छान! लयदार ओळी.
In reply to किती छान! लयदार ओळी. by स्पंदना
असेच म्हणतो. लय अन शब्दयोजना
आवड्ली
खूप आवडली