आपल्यापैकी अनेकजण तेंव्हा पासून TV पहात आहेत जेंव्हा दूरदर्शन ही एकमेव वाहिनी होती. शनिवारी संध्याकाळी हिंदी सिनेमा पाहताना ज्या गोष्टीचा सगळ्यात जास्त राग यायचा ती म्हणजे टूथपेस्ट ची जाहिरात. मला राग येण्याचं कारण म्हणजे आयुर्वेदाचा मला अभिमान आहे आणि त्या जाहिरातीत म्हणायचे की "लवंग, कडुलिंबासारख्या सगळ्या जुन्या गोष्टी विसरा आणि वापरा कॅल्शियम युक्त नवीन XXXX. हे फार दिवस चाललं नाही कारण कॅल्शियम फॉर्म्युला कितीही चांगला असला तरी दाताला वरून घासून काही उपयोग होणार नाही; हे जिथे माझा बालबुद्धीलासुद्धा कळत होतं तिथे इतरांची काय कथा……
आयुर्वेदावर टीका करून काम होत नाही हे कळल्यावर जाहिरातदारांनी जुन्या दंतमंजनांच्या खरखरीतपणावर बोट ठेवलं. चष्म्याच्या काचेवर दंतमंजन घासून दातांवर होणाऱ्या चऱ्यान्चं प्रात्यक्षिक करून दाखवलं गेलं. त्यामुळे दात वाचवण्यासाठी "बारीक सफेद XXXX वापरण्याचा सल्ला दिला गेला. पण एवढं करून सुद्धा तडा गेला तो टूथपेस्टच्या विश्वासार्हतेलाच. हे होतं फर्स्ट जनरेशन म्हणजे 1G.
मग जमाना आला तो "श्वासातल्या दुर्गंधीचा" आणि सुरुवात झाली ती ‘जेल’वाल्या टूथपेस्ट ची. पांढऱ्या रंगाच्या आणि अपारदर्शक पेस्ट नंतर निळ्या व लाल सारख्या आकर्षक रंगातील पारदर्शक जेल्सवाल्या टूथपेस्ट आल्या. पण स्वरूप बदलल्यावर "श्वासातल्या दुर्गंधीचा" त्रास नक्की जातो का….? हे मात्र कोडंच राहिलं. त्रास जातो याचा पुरावा म्हणून जाहिरातीत जवळ येणाऱ्या मुली फक्त दाखवल्या गेल्या. या जेलच्या जोडीला झिग-झ्याग वाले, लवचिक मानवाले आणि टंग-क्लीनरवाले ब्रश आले. हे होते सेकंड जनरेशन अर्थात 2G. हा जमाना पण हळू हळू मागे पडला.
तिसऱ्या जनरेशनच्या सुरुवातीलाच शोध लागला तो दातांच्या फटींमध्ये लपून दातांना भोक पडणाऱ्या किटाणूंचा आणि अगम्य नावे असलेल्या मुलद्रव्यांचा……. या मुलद्रव्यांच्या कमतरतेमुळे म्हणे दात ठिसूळ होतात आणि मोडतात. त्यामुळे टूथपेस्ट मधून ती मुलद्रव्ये पुरविली गेली. लहान मुलांच्या स्वप्नात येतील असे भयानक दिसणारे किटाणू दातांच्या फटीत दिसू लागले (असेच दिसणारे किटाणू एका फिनेलच्या कंपनीने कमोडमध्येही दाखवले होते). त्यांची सफाई फक्त आमचीच पेस्ट करते असा दावा केला जात होता. पण ती टूथपेस्ट वापरून ना मुलांचे दात किडणे कमी झाले ना दातदुखी.
चौथे जनरेशन सुरू होता होता सुरुवातीला, जुन्याकाळी लोक मिठाने दात घासत असत ही नवी माहिती उजेडात आली. मग लगेच टूथपेस्ट मध्ये पण "नमक" आलं. आजोबा आपल्या नातावाला जुन्याकाळी त्यांचे दात मिठामुळे कसे मजबूत होते हे कवळी लावून सांगत होते. वॉश-बेसिन जवळ दात घासत उभा असलेला माणूस आह्ह्ह! असं जोरात ओरडतो आणि मग मागुन एक पत्राकारांसाराखी दिसणारी एक मुलगी आणि काही लोक “क्या आपकी टूथपेस्ट में नामक है?” म्हणत थेट बाथरूम मध्ये घुसतात आणि जी नाटकं करतात ते आपल्याला माहितीच आहेत. संपूर्ण जाहिरातभर तो दात दुखणारा माणूस घाबरलेलाच दिसत होत. मला नक्की माहित आहे की तो माणूस देवाचे आभार मानत असणार कारण त्याचं नशीब चांगलं होतं म्हणून तो कमोडवर बसून दात घासत नव्हता. या वेळेपर्यंत कॉर्पोरेट डिसीज नावाची नवीन शाखा मेडीकल जगामध्ये सुरु झाली होती. मीठ हृदयासाठी चांगले नाही हा शोध लागला होता. त्यामुळे सर्व टूथपेस्ट कंपन्यांना पेस्टमधले मीठ गुंडाळून ठेवावे लागले. पण मधुमेहासारख्या रोगांमुळे या कंपन्यांना दिलासा मिळाला आणि शुगर फ्री पेस्ट चा जन्म झाला जो अजून चालू आहे.
पण काल जे पाहिलं ते पाहून मी कोलमडायच्या बेतात होतो. जाहिरातीत, वेफर्स खाणाऱ्या एका मुलाला टूथपेस्ट कंपनीचा दातांचा डॉक्टर म्हणाला "दातांना अॅसिडीटी होते"……...
वाचने
11524
प्रतिक्रिया
66
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाचीव माहिती.
पेप्सी, कोकाकोला सारख्या कांही मिरमिरणार्या (फिझी) पेयां
त्यांची सफाई फक्त आमचीच पेस्ट
हा फरक टुथपेस्ट वापरण्यामुळे
In reply to त्यांची सफाई फक्त आमचीच पेस्ट by राजेश घासकडवी
हे ठीक आहे. पण मग बर्
In reply to हा फरक टुथपेस्ट वापरण्यामुळे by इस्पिक राजा
बाकी राजीव दीक्षित सुद्धा
In reply to हे ठीक आहे. पण मग बर् by नितिन थत्ते
प्रमाण 74% वरून 45% इतकं कमी झालेलं आहे
बाकी टूथ पेस्ट आणि अंघोळीचा
In reply to प्रमाण 74% वरून 45% इतकं कमी झालेलं आहे by चेतनकुलकर्णी_85
गुर्जी,
In reply to बाकी टूथ पेस्ट आणि अंघोळीचा by राजेश घासकडवी
जाहिरातीत जे सांगितलं जातं ते
In reply to गुर्जी, by सोत्रि
अहो साहेब _^ _
In reply to बाकी टूथ पेस्ट आणि अंघोळीचा by राजेश घासकडवी
टूथ पेस्ट आणि अंघोळीचा साबण
In reply to प्रमाण 74% वरून 45% इतकं कमी झालेलं आहे by चेतनकुलकर्णी_85
ओ विद्वान ! फ्लोरीन नव्हे
In reply to प्रमाण 74% वरून 45% इतकं कमी झालेलं आहे by चेतनकुलकर्णी_85
वेड्या सारखा हसतोय कधी पासुन.
In reply to ओ विद्वान ! फ्लोरीन नव्हे by शिल्पा ब
ओ विदुषी ! सांगितल्या बद्दल
In reply to ओ विद्वान ! फ्लोरीन नव्हे by शिल्पा ब
+१
(वज्रदंती अब्रेजन)
In reply to +१ by सोत्रि
सम्यक उत्तर
In reply to (वज्रदंती अब्रेजन) by सुबोध खरे
उचलली जीभ
In reply to सम्यक उत्तर by प्रसाद१९७१
चाचण्या घ्यायला हे वैद्य तयार
In reply to उचलली जीभ by कपिलमुनी
+११११
In reply to (वज्रदंती अब्रेजन) by सुबोध खरे
ते आधी कडुलिंबाची काडी चावणे
आपलं ते
In reply to ते आधी कडुलिंबाची काडी चावणे by बॅटमॅन
रोचक आहे. पर्व मध्ये असे
In reply to आपलं ते by तिमा
मी हाच उल्लेख मृत्यूंजयमध्ये*
In reply to रोचक आहे. पर्व मध्ये असे by बॅटमॅन
तुला राधेय म्हणायचे आहे का?
In reply to मी हाच उल्लेख मृत्यूंजयमध्ये* by मोदक
नाही हो..
In reply to तुला राधेय म्हणायचे आहे का? by मृत्युन्जय
+1
In reply to मी हाच उल्लेख मृत्यूंजयमध्ये* by मोदक
पर्व बरोबर आहे
In reply to रोचक आहे. पर्व मध्ये असे by बॅटमॅन
वाटत न्हाय
हाहाहा विसरून कसे चालेल? पण
In reply to वाटत न्हाय by अभ्या..
दुवा
In reply to हाहाहा विसरून कसे चालेल? पण by बॅटमॅन
हम्म बातमी रोचक आहे खरी!
In reply to दुवा by ऋषिकेश
भडकमकर मास्तरांनी यावर खरंतर
भडकमकर मास्तरांनी यावर खरंतर
In reply to भडकमकर मास्तरांनी यावर खरंतर by रेवती
वाह!
भारी लिवलंय
कोलगेट् व इतर ...
आमच्या आजीकडे कोलगेट पावडर
भाजलेल्या तंबाखूने (मिश्री)
तंबाखूची किक
In reply to भाजलेल्या तंबाखूने (मिश्री) by श्रीगुरुजी
>>> इप्को किंवा मिश्रीने दात
In reply to तंबाखूची किक by सुबोध खरे
सोडा आणि मीठ.
लेख विनाकारण हेटाळणीयुक्त
मुंबईतले उत्तर भारतीय हे आज
समजा दात घासणे बंदच केले तर ?
तुम्ही प्रयोग करुन आम्हाला
In reply to समजा दात घासणे बंदच केले तर ? by प्रसाद गोडबोले
दात घासणे बंदच केले तर ?
In reply to समजा दात घासणे बंदच केले तर ? by प्रसाद गोडबोले
एक शंका.. स्त्री आणि
अंघोळ न करता कसे रहावे याबाबत
कमाल आहे.
In reply to अंघोळ न करता कसे रहावे याबाबत by पाषाणभेद
हा हा हा काका खरच तुम्ही ८-८
In reply to कमाल आहे. by प्रभाकर पेठकर
नाईलाज.
In reply to हा हा हा काका खरच तुम्ही ८-८ by त्रिवेणी
माझे दात कितीही घासले,
ओडोमॉसमंजन...
In reply to माझे दात कितीही घासले, by त्रिवेणी
अगदी अगदी
In reply to ओडोमॉसमंजन... by प्रभाकर पेठकर
हा हा हा
In reply to अगदी अगदी by बॅटमॅन
अहो हा जोक नाही खरच अस घड्ल
In reply to हा हा हा by प्रसाद गोडबोले
स्वाती ठकार तुमच्या नातेवाईक
In reply to अहो हा जोक नाही खरच अस घड्ल by त्रिवेणी
हाहा..
In reply to स्वाती ठकार तुमच्या नातेवाईक by आदूबाळ
नाही हो त्या नाहीत माझ्या
In reply to स्वाती ठकार तुमच्या नातेवाईक by आदूबाळ
हा हा..
In reply to माझे दात कितीही घासले, by त्रिवेणी
माझे दात कितीही घासले,
In reply to माझे दात कितीही घासले, by त्रिवेणी
छान लिहिलंय
एक शंका
कदाचित.
In reply to एक शंका by सुनील