शेवटी कळले आयुष्य न उलघडणारे कोडे आहे........
लेखनविषय:
थोडे कोपरे खणून बघितले.
खोलीला उथळ मानून बघितले.
मनाला चपळ करून बघितले.
चपळतेला थोडा लगाम लावून बघितले.
चंद्राला भाऊ मानून बघितले .
नि पिंडाला चाहूल देऊन बघितले.
पण शेवटी कळले आयुष्य न उलघडणारे कोडे आहे........
स्वतःला थोडे शांत करून बघितले
रागाला थोडे प्रांत देऊन बघितले
निळ्या आकाशी भ्रमंत करून बघितले
पैसा बाळगून थोडे श्रीमंत होऊन बघितले
समईला वात देऊन बघितले
तर देवाला शाप देऊन बघितले
पण शेवटी कळले आयुष्य न उलघडणारे कोडे आहे........
बघताना स्वतःला शून्य देऊन बघितले
तर कोणाला पुण्य देऊन बघितले
स्वतःला थोडे दुस-यात ठेऊन बघितले
दुस-याला स्वतःच्यात घेऊन बघितले
गंगेतील पाणी थोडे चाटून बघितले
अस्थीला नदींऐवजी ओढ्यात टाकून बघितले
पण शेवटी कळले आयुष्य न उलघडणारे कोडे आहे........
रक्त थोडे विकूनही बघितले.
दुस-याचे रक्त चाखुनही बघितले.
स्वतःच्यात थोडे वाकून बघितले
दु:खात न्हाऊ माखुनही बघितले
बघता-बघता डोळे मिटूनही बघितले
सरणावर थोडे खेटूनही बघितले.
पण शेवटी कळले आयुष्य न उलघडणारेकोडे आहे........
वाचने
1643
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
१न्म
"उलगडणारे" असे हवे . बाकी
In reply to "उलगडणारे" असे हवे . बाकी by स्पा
सहमत.
मस्तच....
शेवटी कळले बायको न उलगडणारे कोडे आहे........
शेवटी कळले आयुष्य न उलघडणारे कोडे आहे.
छान लिहिलंय