✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वारी......

व
विजुभाऊ यांनी
Mon, 07/08/2013 - 00:10  ·  लेख
लेख
दर आशाढी कार्तिकी एकादशी ला पंढरपूर ला वारी निघते. लाखो लोक वारीत सामील होतात. आषाढी वारीला जायचे म्हणजे खरेतर शेतात पेरणीचा हंगाम ऐन बहरात असतो. नुकतीच पेरणी झालेली असएत व्हायची असते अशातच शेतकरी कामेधामे सोडून वारीला जातात. त्यांच्यासाठी वारी हा एक विरंगुळा असतो. पण त्यामुळे कामे रखडतात / शासन यंत्रणेवर अवास्तव ताण येतो. कारण नसताना शासन यंत्रणेला सुरक्षा यंत्रणेला राबवले जाते. लोकांचाही वेळ वाया जातो. खरेतर हिंदु धर्मात वारी देव दर्शन या वैयक्तीक गोष्टी मानलेल्या आहेत. धार्मीक भावनांचे सामुदायीक प्रदर्शन करून ज्यांच्या त्या गोष्टीशी सम्बन्ध नाही अशा जनतेस वेठीस धरण्याचे प्रकार बहुतेक सर्वच धर्मात वाढीस लागलेले आहेत. गणपती उत्सव हा देखील त्यापैकीच एक. मूळ उद्देश बाजूस राहील आणि भलतेच रूप घेवून उत्सव खंडणी बहाद्दूर / व्यापारी कंपन्या यांच्यासाठी एक मोठी पर्वणी बनला आहे.जनजागृती हा उत्सवांचा उद्देश कधीच मागे पडला आहे. आपण एखादी गोष्ट त्याचा उपयोग सम्पल्यानंतर ती त्याज्य ठरवतो तसे हे उत्सव देखील आता त्याज्य करायला हवेत. त्यातून निर्माण झालेल्या अनाठायी प्रथा सम्पवायला हव्यात. तुम्हाला काय वाटतय. ( मांजराच्या गळ्यात घंटा कोण बाम्धणार ???? )
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
51585 वाचन

💬 प्रतिसाद (170)

प्रतिक्रिया

माशी नाकावर बसते म्हणून नाक

बॅटमॅन
Tue, 07/09/2013 - 11:58 नवीन
माशी नाकावर बसते म्हणून नाक कापाल का?
बाकी काही असो उपमा आवडल्या गेली आहे. एकदम पर्फेक्ट =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

एकाच वेळी जास्त लोक कमीत कमी

बाळ सप्रे
Tue, 07/09/2013 - 13:08 नवीन
एकाच वेळी जास्त लोक कमीत कमी जागेत जास्त वेळ राहिली की घाण ही होणारच. सर्वांना इतक्या सोयी पुरवणे practically impossible आहे.. पेठकर काकांचा हिशेब पाहून अंदाज येइलच.. मग ती वारी असो, हज असो, महापरीनिर्वाणदिन असो की कुंभमेळा असो.. त्या त्या देशातील स्वच्छ्तेच्या सवयींप्रमाणे थोड्या कमी जास्त प्रमाणात पण घाण ही होणारच.. त्यावर उपाय एवढाच.. Top down approach म्हणजे गर्दी टाळणे, bottom up approach व्यक्तिगत पातळीवर स्वच्छतेची पातळी वाढवणे.. एखादा मनुष्य/ समाज आपल्या स्वच्छतेच्या सवयी इतक्या लगेच बदलु शकत नाही.. त्यामुळे पहिला उपाय त्यातल्या त्यात सोयीस्कर.. यात अस्वच्छता मान्य करुन नुसतच सरकारी यंत्रणेकडून स्वच्छतेची अपेक्षा करणं आणि यंत्रणेला दोष देणं आणि आपण मात्र घाण करत राहणं पटत नाही.. वारकरी/वारीचे गोडवे गाणारे लोक यांच्याकडून याबाबतीत काही उस्फुर्त प्रयत्न झाले तर नक्कीच स्वागतार्ह आहे..
  • Log in or register to post comments

@ गिरीजा तै..... तुमच्या

विजुभाऊ
Tue, 07/09/2013 - 17:31 नवीन
@ गिरीजा तै..... तुमच्या उत्तराची वाट पहात आहे. किंवा इतर कोणी मला हिंदू धर्म ( रुढी/रीती वगळून) म्हणजे काय या बद्दल माहिती देईल का. हो उगाच कोणी रूढी म्हनजे धर्म नव्हे असे म्हणायला नको
  • Log in or register to post comments

विजुभौ, यु टु ??

अर्धवटराव
Wed, 07/10/2013 - 21:27 नवीन
अहो, मिपावर नवखे आहात कि काय. आयला... पेण्टागॉनमधे बसुन विचारताय कि गल्फवॉरबद्दल माहिती कुठे मिळेल ते. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

ईजुभौ

अनिरुद्ध प
Tue, 07/09/2013 - 19:33 नवीन
आपण वारिला केव्हा गेला होता? कुठून आणि कसे म्हणजे कुठ्ल्या पालखी/दिन्डि बरोबर गेल होतात ते तर सान्गा.
  • Log in or register to post comments

मी वारीला गेलो नाही पण त्या

विजुभाऊ
Tue, 07/09/2013 - 21:09 नवीन
मी वारीला गेलो नाही पण त्या दरम्यान वारी निघालेल्या रस्त्याने जाण्याचा योग आला. त्यावेळेस रस्त्याचा संडास झालेला पाहिला. पालखी दिंडी या उद्योगात लोक फुकट वेळ घालवतात असे मला वाटते. शिवजयंती च्या दिवशी ठीकठीकाणाहून गडावरून वाजतगाजत शिवज्योती आणल्या जातात. आणि चौकाचौकात मांडल्या जातात. उपक्रम वाईट नाही. पण त्यातील किती कार्यकर्त्याना शिवाजी महाराजांची युद्धनिती अभ्यासलेली असते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

मी वारीला गेलो नाही पण त्या

सुहास..
Wed, 07/10/2013 - 13:36 नवीन
मी वारीला गेलो नाही पण त्या दरम्यान वारी निघालेल्या रस्त्याने जाण्याचा योग आला. त्यावेळेस रस्त्याचा संडास झालेला पाहिला. >>>> ग्रेट !! _/\_ वारी नसताना मुबंईत कित्येक रस्त्याचा संडास झालेला दाखवु तुम्हाला ? ...असो ....केवळ सात एक दिवसाच्या त्रासासाठी वारी बंद करणे ही थोडे टोकाचे वाटत नाही का ? ( मी दर वर्षी थोडे का असेना वारीत चालतो, दिघी ते फुलेनगर... मेंटल कॉर्नरच्या चौकात स्वागत स्टेज असतो...याचा एक फायदा असा ही आहे की कोणी चुकले-माकले तर अनॉउन्स करायला ....या वर्षी या रस्त्यादरम्यान १२ संशयित धरले होते, त्यातील दोन जण सराईत निघाले १० भुरटे ...फुलेनगर ला दरवर्षी मोफत जेवण असते मंडळाकडुन, अर्थात ते आमच्याच एका मंडळा कडुन नसते, मंडळाची सर्व पोरे येतात चालत, सांगायची गोष्ट अशी की जो कचरा या रस्त्यावर होतो, ती महापालिकेच्या कर्मचार्‍यांसह साफ करण्याची जबाबदारी विश्रांतवाडी आणि फुलेनगरची मंडळे उचलतात, मुद्दाम म्हणुन सांगतो त्यातील अर्ध्याच्या वर मंडळे ही जयभीम आहेत !! आता काय म्हणाल ? अर्थात पुर्ण वारीत मंडळाला हे अशकय आहे. आणि हे सर्वच ठिकाणी चालते. कुठे कमी तर कुठे जास्त. ) तुम्ही मला माहीत नाही कुठल्या रस्त्यावरून आणि कधी गेलात.....कदाचित " हडपसर " साईड असेल. तर मग मात्र ईतकेच सांगणे आहे की जरा तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा ही अभ्यास करा. वारी कितीही मोठी असली तरी सरकारी यंत्रणा राबतेच, पण ती सर्व ठिकाणी कितपत सोयी देवु शकते ? कश्या प्रकारे देवू शकते ? याचा ही थोडा अभ्यास ठेवावा. उगा काहीतरी लिहायचे आणि जाती-पातीतला तेढ पेटवायची हे किमान तुमच्या सारख्यांकडुन अजिबात अपेक्षित नव्हते विजुभाऊ !! बाकी धन्यवाद पालखी दिंडी या उद्योगात लोक फुकट वेळ घालवतात असे मला वाटते. >>> वैयक्तीक मत !! त्यामुळे नो कमेंट्स...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

सुहास दा याच्याशी सहमत. मी

त्रिवेणी
Wed, 07/10/2013 - 15:50 नवीन
सुहास दा याच्याशी सहमत. मी सुध्दा याच रोड्वर रहाते. काही वारकर्याचा स्वयपाकही होतो या रस्त्याच्या बाजुला. फक्त एक गोश्त खट्कते वारकर्याची ती म्ह्णजे भुक नसेल तरी खायला घेणे आणि अर्धे अन्न रस्त्यावर टाकून देणे. खरच वारी गेल्यावर सध्याकाळी ६.३० वाजता खुप स्वच्य होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

अनेक शतक एखादी प्रथा चालू आहे

पिंपातला उंदीर
Tue, 07/09/2013 - 19:47 नवीन
अनेक शतक एखादी प्रथा चालू आहे म्हणून त्यात सर्व गोष्टी आलबेल आहेत असे मानने योग्य ठरणार नाही. वारीत अनेक अनिष्ट गोष्टी घडतात आणि अनेक अनिष्ट प्रथा शिरल्या आहेत हे मान्य न करण्यात काही अर्थ नाही. वारीचे ते काही दिवस म्हणजे सर्वसामान्य वारकर्‍याला पिचून काढणार्‍या दैनंदिन प्रश्नापासुन दूर राहण्याची पण एक संधी असते असा तर्क वाद कुठेतरी वाचला होता (तातपुरता पलायन वाद?). या विषयावर कलाम नामा या साप्ताहिकाआने एक सुंदर स्टोरी केली आहे. मी अंक वाचला. ऑनलाइन अपलोड झाला आहे की नाही कल्पना नाही Image removed.
  • Log in or register to post comments

शारापोव्हाला जास्त लागलं तर

प्यारे१
Tue, 07/09/2013 - 21:07 नवीन
शारापोव्हाला जास्त लागलं तर नाही ना? 'नाजूक' दिसते हो खूप . दुपारच्या चहा बिस्कीटानंतर काही खाल्लेलं नाहीये मी. असाच उपास करावासा वाटतोय. काय बातमी काये नक्की? जरा सांगा बरं सविस्तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

http://kalamnaama.com

मोदक
Tue, 07/09/2013 - 23:49 नवीन
http://kalamnaama.com/wimbldonch-gavat-petal/ डिस्क्लेमर - वरचा आहे तोच एकमेव फोटो आहे बातमीमध्ये - आणखी फोटो नाहीयेत. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

वरचा आहे तोच एकमेव फोटो आहे

मालोजीराव
Wed, 07/10/2013 - 14:24 नवीन
वरचा आहे तोच एकमेव फोटो आहे बातमीमध्ये - आणखी फोटो नाहीयेत.
हो ना राव…आख्या मासिकात तेव्हडच बघणीय होतं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

अन किसनराव, शिर्षक देखील

पाषाणभेद
गुरुवार, 07/11/2013 - 04:05 नवीन
अन किसनराव, शिर्षक देखील चमत्कारीक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

कोण किसनराव?

मोदक
Fri, 07/12/2013 - 19:44 नवीन
कोण किसनराव? मालोजीचा डुआयडी आहे का..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

अरे विठ्ठला ! माझ्या

मदनबाण
Wed, 07/10/2013 - 11:57 नवीन
अरे विठ्ठला ! माझ्या कांदापोव्हाला काही जास्त गंभीर दुखापत तर झाली नाही ना ! ;) बाकी पोव्हीण पडली पण स्टाईल मधे हो ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

ही बघा लिंक कलमनामा

प्रकाश घाटपांडे
Tue, 07/09/2013 - 21:44 नवीन
ही बघा लिंक कलमनामा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

नेहमीचेच ट्यांण ट्यांण ट्यांण चालू

हुप्प्या
Wed, 07/10/2013 - 00:01 नवीन
संजय सोनवणी ह्या माणसाचे नेहमीचेच ट्यांण ट्याण ट्यांण वाचायचे असेल तर हा लेख वाचा. महाराष्ट्राची मूळ संस्कृती शैव होती पण वैदिक लोकांनी त्यात आपले देव कसे घुसडले, जुन्या काळच्या संताना कसले नॉलेजच कसे नव्हते, विठोबा हा खरा शिवच कसा आहे वगैरे वगैरे वगैरे नेहमीचेच ट्यांण ट्याण ट्यांण चालू. (पुलंच्या मधू मलुष्टेशी असणारे साम्य म्हणजे योगायोग समजा!) त्यात वारीतील गैरप्रकार ह्याविषयी फारच थोडे लिहिले आहे. असाच जर टाका अतीप्राचीन काळापर्यंत भिडवायचा म्हटला तर इस्लाम, मक्का मदिनेतील पूज्य स्थाने, ख्रिस्ती धर्मातील रुढी, ख्रिसमस वगैरे सगळ्या धार्मिक प्रकारांचे मूळ हे तिथल्या स्थानिक संस्कृतीत आहेत. तिथले पूर्वीचे धर्म ,त्यातील रुढी जो नवा धर्म त्याज्य मानतो पण गुपचूप त्यातल्या अनेक बिनबोभाट स्वीकारतो हे सगळीकडे होत आले आहे. त्याविरुद्ध इतकी बोंब का मारायची?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

सहमत आहे असं म्हणायला मला

आतिवास
Tue, 07/09/2013 - 22:57 नवीन
सहमत आहे असं म्हणायला मला आवडलं असतं; पण ... परवाच मला कुणीतरी म्हणत होतं की मराठी संकेतस्थळांवर लोक उगाच काहीबाही लेख आणि प्रतिसाद लिहित बसतात हा शक्तीचा अपव्यय आहे; देशात हजारो गावांत वीज नसताना केवळ करमणुकीसाठी इतका काळ इंटरनेट (आणि पर्यायाने वीज) वापरणं बंद करायला हवं .... त्या व्यक्तीशीही सहमत व्हायला मला आवडलं असतं; पण .....
  • Log in or register to post comments

हो का?

हुप्प्या
Wed, 07/10/2013 - 00:03 नवीन
मग लाखो लोक उपाशी आहेत म्हणून जेवण बंद, लाखो लोक बेकार आहेत म्हणून नोकरीधंदे बंद करून घरी बसा असेही करायचे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

मुद्दा एवढाच की तर्कच

आतिवास
Wed, 07/10/2013 - 09:03 नवीन
:-) मुद्दा एवढाच की तर्कच चालवायचा म्हटलं की अशी(ही)विधानं समोर येऊ शकतात. (बहुतेक माझ्या आधीच्या प्रतिसादातला उपरोध पुरेसा स्पष्ट झाला नाहीये ..)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

झालाय

यशोधरा
Wed, 07/10/2013 - 11:31 नवीन
झालाय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

मूळात वारीला लोक का जातात ?

विटेकर
Wed, 07/10/2013 - 13:09 नवीन
खरेतर सार्याच वारकर्यांना विठुमाऊलीचे दर्शन होत नाही. बरेच लोक कळसाला हात जोडून परत येतात. देवाच्या दर्शनाची ओढ जितकी खरी तितकीच आस असते सत्संगाची ही ! वारीबरोबर अनेक सत्पुरुषांचा आणि वैष्णवांचा सहवास मिळतो.. त्याची ही ओढ आहेच की! तुकाराम महाराज म्हणतात , न लगे मुक्ती आणि संपदा , संतसंग देई सदा ! मुक्तीपेक्षाही संतसंग महत्वाचा आहे. आणि या समाधनासाठी सार्या गैरसोयी पत्करून लोक येतात आणि पुढेही अनेक शतके येतील !! असले कितीही धागे निघाले तरीही... आणि गैरसोय तुम्हाला वाटते हो ! तो वैष्ण्व आत्मानंदात मस्त आहे !
  • Log in or register to post comments

फ्याशन ..

विटेकर
Wed, 07/10/2013 - 13:15 नवीन
फ्याशन आहे सध्या हिन्दूना नावं ठेवण्याची ! धागा काढ्णाराला काय हो , कंपनीच्या पैशाने फुकट इन्टर् नेट आहे , कळ बडवायला लागणार्या वेळाचा पगारही चालू आहे ( तसे ज्यांचे नाही त्यांना __/\__) .. मग टाका एक मताची पिन्क... डिवचा हिंदूना ,, त्यांना कोणी वाली नाही तेव्हा आपला सल्मान रश्दी अथवा तस्लइमा नसरीन होणार नाही नक्की .. ! विजयभौ.. साखरेची गोडी सांगून समजत नाही .. ती खावी लागते. एकदा वारीला या आणि मग पाडा जिल्ब्या ! असो.. तुम्हाला नाही कळ्णार ती. त्याला नशीब असावे लागते. ते उजाड्ण्याची वाट पहा .. तोपर्यण्त चालू द्या. मोठे व्हा ! असे म्हण्तो आणि थांबतो.
  • Log in or register to post comments

हिंदू धर्म म्हणजे नक्की काय सांगाल का?

विटेकर
Wed, 07/10/2013 - 14:20 नवीन
माझ्या मते ( मी हिंदू असल्याने माझेच मत बरोबर आहे असा माझा अजिबात आग्रह नाही ) खालील बाबी हिंदू धर्माची वैशिष्ट्ये म्हणून सांगता येतील. १. कर्माचा सिद्धांत २. पुनर्जन्म ३. अन्तिम सत्य एकच आहे . ( GOD IS ONE and not GOD ARE ONE ) या प्रत्येक मुद्द्याचा ऊहापोह करता येईल पण तो अनेक्वेळा येथे झाला आहे. हे सारे मुद्दे परस्परपूरक आणि एकमेकांत कमालीचे गुंतलेले आहेत. या वरील तीन बाबींना केन्द्रीभूत ठेऊन उभी राहीलेली सर्वंकष जीवन पद्धती म्हणजे हिंदू जीवन पद्धती ! म्हणजे Hinduness (and NOT Hinduism, Hindu is not"ism" , it's way of life) वरील तीन गोष्टी अनिवार्य तर पुढील काही गोष्टी पुष्टयर्थ: १. चार वेद २. चार पुरुषार्थ ३. चार आश्रम ४. चार वर्ण या आणि अशाच संलग्न बाबींवर हिंदू समाज बेतलेला आहे. त्यामध्ये कमालीची विविधता आणि टोकाची लवचिकता आहे. आणि म्हणोनच तो काळाच्या कसोटीवर ठामपणे उभा आहे. "युनान-ओ-मिस्र-ओ-रोमा सब मिल गये जहाँ से अब तक मगर है बांकी नामो-निशान हमारा" बाकी विस्तार करण्याची फार आवश्यकता नाही, आणि जरूरीप्रमाणे मिपांकर भर टाकतीलच.
  • Log in or register to post comments

धन्यवाद निदान काही बाबी तरी

विजुभाऊ
Wed, 07/10/2013 - 22:27 नवीन
धन्यवाद निदान काही बाबी तरी सांगितल्यात.
वरील तीन गोष्टी अनिवार्य तर पुढील काही गोष्टी पुष्टयर्थ: १. चार वेद २. चार पुरुषार्थ ३. चार आश्रम ४. चार वर्ण
चारही सोडा निदान एक तरी वेद अभ्यासणारे कितीजण आपल्या आसपास असतात ( प्रत्येक मुसलमान /ख्रिश्चन / शिख निदान आयुश्यात एकदा तरी कुरान्/बायबल्/गुरुबानी या ग्रंथाचा काही भाग तरी अभ्यासतात. असो. चार पुरुषार्थ ही नवी टर्म ऐकतोय. थोडे विस्ताराने सांगा की. वेगळा धागा टाका. खरेच जाणुन घ्यायला आवडेल. चार आश्रम. हे मान्य. पण काळानुसार यात बरेच बदल झालेत. चार वर्णः कर्मानुसार वर्ण हे मान्य असायला हरकत नाही. मात्र त्यातील कर्म हा घटक मुख्य असला तरच. पण हल्ली नव्या शिक्शण पद्धतीमुळॅ थोडे बदल होत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

वेदांचा अभ्यास ?

विटेकर
गुरुवार, 07/11/2013 - 09:56 नवीन
वेदांचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही . बहुतेक संतानी तो केलेला नाही. हिंदू मान्यतेप्रमाणे, मोक्ष मिळवणे हे नरदेहाचे ( स्त्री देहाचे पण! उगाच मारामारी नको) अंतिम ध्येय आहे. तोच ४ था आणि अंतिम पुरुषार्थ आहे. आणि त्यासाठी वेद अभ्यासण्याची अजिबात गरज नाही. ( आम्हां न कळे ज्ञान ..हा अभंग आथवावा) तुम्ही ही या घटा -पटा च्या भानगडीत पडूच नका. वेदांचे सार चार महावाक्यात सांगितळे आहे. mahaavakye त्याचे मला समजलेले सार असे की, सर्वांभूती एकच अंतरात्मा वास करत आहे आणि ही सारी मायिक सॄष्टी ही त्या परमात्म्याची लीला आहे. हे ध्यानात घेऊन केलेले व्यवहार त्या मोक्षाप्रत नेतात. ( म्हणजे नेत असावेत , मला अजून अनुभव यायचा आहे पण माझी तशी श्रद्धा आहे. तुमची असावी असा माझा आग्रह नाही ) धर्माच्या चौकतीत राहून अर्थ आणि कामाचा विवेकी उपभोग ( म्हणजे अभाव ही नव्हे आणि प्रभाव ही नव्हे ) मोक्षाप्रत नेतो असे धर्म शास्त्र सांगते. या चौकटीत राहण्यासाठी म्हणून चारी आश्रम (1. व्रह्मचर्य आश्रम 2. ग्रहस्थ आश्रम 3. वानप्रस्थ आश्रम 4. संन्यास आश्रम) आणि चार वर्ण ! कालौघात या मूलभूत संकल्पना जर विवेकाने अंगिकारल्या नाहीत तर केवळ कर्मकांडाच्या बजबजपुरीलाच धर्म म्हणले जाते, मूल संकल्पनेला मालीन्य येते, आणि मग सगळा गोंधळ होतो. ( हे ही भगवंताला माहीत आहे म्हणून तोच म्हणतो ..यदा यदा ही धर्मस्य.. आणि येथे धर्माला ग्लानि येते असे म्ह्तले आहे , धर्म कधीच "नाश " पावत नाही) धर्म शब्दाची व्याख्याच मुळी " जे धारण करतो ते" अशी असल्याने हा सारा आचरणाचा आणि अंगिकारण्याचा विषय आहे. चर्चेचा आणि अभ्यासाचा नाही.( अशी माझी धारणा आहे ( स्मायली ))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

काही मान्य काही अमान्य

मैत्र
गुरुवार, 07/11/2013 - 11:52 नवीन
बहुतेक जण वेदाभ्यास करत नाहीत इतकंच काय बहुतेकांना त्यात काय आहे याबद्दलही कल्पना नसते. पण इतरधर्मीय करतात तो बरेचदा अभ्यास नसून "पठण" असते. तुमच्या वाक्याचा अर्थ मुस्लिम, शीख, ख्रिश्चन धर्मीय प्रत्येक मनुष्य धर्मार्थाचा आणि वचनांचा अभ्यास करतो असा होईल. हे मान्य करणे अवघड आहे. चार पुरुषार्थ ही नवी टर्म ??? -- विजुभाऊ मी विटेकर काकांप्रमाणे तुम्हाला वेदसार सांगण्याइतका काही अभ्यास केलेला नाही पण चार पुरुषार्थ ही संज्ञा / संकल्पनाच नवी वाटते आहे तर त्यावर माहीतीशिवाय विधाने करणे तुम्हाला स्वतःला योग्य वाटते का? आता वारीचा प्रश्न - प्यारे यांचे किंवा सुहासचे उत्तर पटते. त्यावर सुधारणा करा, मार्ग काढा, लोकप्रबोधन करा हा दृष्टिकोन न ठेवता पुण्यात घाण होते आणि एक दिवस रहदारीची गैरसोय होते म्हणून वारीच बंद करा हा विधानाला आधार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

वारी -- इतर काही

मैत्र
गुरुवार, 07/11/2013 - 12:08 नवीन
पण याचा अर्थ स्वतः काही केल्याशिवाय या गोष्टी मांडूच नयेत असा अजिबात होत नाही. तुम्ही वारीत गेला नाहीत किंवा त्यात सोयी सुधारणा करण्यासाठी स्वतः काही आजवर केले नाही म्हणजे तुम्ही जे चूक आहे त्याला चूक म्हणू शकत नाही हे मुद्दे आधारहीन आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमचे मत मांडण्याचे तात्विक स्वातंत्र्य आहे (असे माझे मत आहे.) जिथपर्यंत तुम्हाला अनुभव आहे अस्वच्छतेचा / गैरसोयींचा / गवशा लोकांचा. वारी न समजता त्यात सहभागी न होता - वारी निरर्थक आहे आणि बंद करावी याला आधार नाही कारण त्यात तुम्हाला (मलाही) गम्य नाही / अनुभव नाही. वारीमुळे इतरांना होणार काही त्रास आणि वारीचे उद्दिष्ट / त्यातला आनंद या दोन वेगळ्या गोष्टि आहेत. गँगरिनच्या उदाहरणात तो अवयव निकामी झालेला असतो म्हणूनच काढला जातो. तुम्ही पूर्ण अवयव सडला आहे / निकामी आहे. त्यावर उपचार करून जखम / आजार बरा करून तो नीट उपयोगात आणावा अशा परिस्थितीच्या पलिकडे गेला आहे असं एकतर्फी विधान करताय. कोणाला काही आजार झाला तर त्या आजारावर उपाय करतात / दर वेळी अवयव काढून टाकणे हाच उपाय नाही केला जात. हाच काथ्याकूट वारीतून उद्भवणारे उपद्रव इथूनच सुरु करून ते कसे टाळता येतील आणि हीच चर्चा वारी सुधारण्यासाठी काय करता येईल अशी मांडली असती तर विषय भलतीकडे गेला नसता. (यात वैयक्तिक आरोप / शेरेबाजी नाहीत असं मला वाटतं.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

खल्लास प्रतिसाद! पूर्ण सहमत.

बॅटमॅन
गुरुवार, 07/11/2013 - 12:47 नवीन
खल्लास प्रतिसाद! पूर्ण सहमत. मलाही बहुतेक असेच काहीसे म्हणायचे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

विजुभाऊंची मतं काहीशी पटली.

प्यारे१
Wed, 07/10/2013 - 15:10 नवीन
विजुभाऊंची मतं काहीशी पटली. मात्र सरसकट वारी बंद करा हे म्हणणं चुकीचंच आहे. त्याबद्दल विजुभाउंचा तीव्र निषेध. मात्रः हिंदुत्वाचा अभिमान आपण बाळगत असू तर त्यात कालानुरुप होणारे, येणारे बदल स्वीकारले गेले पाहिजेत नि दोष काढले गेले पाहिजेत. कसं करता येईल हे सकारात्मकरित्या पाहिलं जाणं आवश्यक आहे. तुकाराम महाराजांच्या उक्तीनुसार (उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यानधारणाम तृतीया प्रतिमापूजा, तीर्थयात्रा अधमाधम) तीर्थयात्रा गौण साधनामध्ये गणली गेली असली तरी ती साधकाच्या दृष्टीने असल्यानं आधी साधक होणं अपेक्षित आहे. वारीचे उद्देश नेमके काय आहेत, असतात नि आज काय स्थिती आहे त्याचा उहापोह नक्कीच झाला पाहिजे. हिंदु धर्मामध्ये अधमात अधम व्यक्तीला सुधारण्याची संधी आहे. तशीच अत्यंत वरच्या दर्जाच्या साधक व्यक्तीला मोक्ष मिळवून देण्याची संधी देखील आहे. त्यामध्येच वारी हा एक अतिशय चांगला मार्ग मुख्यत्वे भक्तिमार्गाचा आधार घेणारांकरता आहे. वारी करण्याचा उद्देश सर्वांबरोबर भेदाभेद विसरुन चालणं व्हावं, १५ दिवस चार कपड्यात राहता, खाता यावं थोडक्यात आपण वेगळे कुणी आहोत हा अहंकार विसरुन, सर्व परिस्थितीत सम चित्त अवस्थेत राहता यावं हा आहे. वारीमध्ये वेगवेगळ्या स्तरावरच्या साधकां चं नि सामान्यानंचं देखील कौन्सिलिंग होतं. तकलादू नात्यांच्या युगात आजही वारीला एखादा आपल्या आईवडलांची काळजी वाहत नेतो तेव्हा ते नक्कीच कौतुकास्पद असतं. आज वारीचा इव्हेन्ट झालाय. 'वारीमध्ये मी' ही मानसिकता त्रास देते. त्यातून वारीला आज आलेली सूज काही अंशी त्रासदायक आहे हे देखील नक्की मात्र सूज उतरवण्यासाठी आवश्यक प्रयत्न होणं आवश्यक आहे. याबरोबर पूर्वापार चालत आलेला आत्यंतिक सहिष्णूता हा दोष आज आपल्यामध्ये शिरला आहे हे नक्कीच नि त्यातून मिळेल त्यात जमवून घ्या ही चुकीची मानसिकता निर्माण झालेली आहे. त्यातून घाण खपते, कचरा स्विकारला जातो इ.इ. गोष्टी घडतात. आपल्याकडं व्यवस्थापनाची नि विशेषतः कचरा व्यवस्थापनाची बोंब असतेच. त्यासाठी आवश्यक ती पावलं उचलली गेली पाहिजेत हे नक्कीच आहे. तरीही.... प्रत्येक गोष्टीच्या आपापल्या अधिक उण्या बाजू असतात त्यात अधिक बाजू जास्त असतील तर उण्याबाजू कमी करत करत अधिकांकडं आणखी चांगलं कसं होईल ह्याकडे लक्ष देणं जास्त सयुक्तिक.
  • Log in or register to post comments

वैयक्तिक चिखलफेक कशाकरीता?

प्रभाकर पेठकर
Wed, 07/10/2013 - 16:23 नवीन
मुद्द्यांचे खंडण करताना अनेकांना विजुभाऊंवर वैयक्तिक हल्ला करण्याचा मोह आवरलेला नाही. हे हिन्दू धर्मातल्या सहिष्णुतेचे लक्षण नाही. अनेक प्रतिसाद वाचताना वाईट वाटते. नेटवर धागा टाकताना, सलमान रश्दी किंवा तस्लिमा नसरिन सारखे फतव्यांना आपल्याला सामोरे जावे लागत नाही म्हणून 'काहीही' धागा काढणं, हिन्दू धर्माला दूषणे देणे असा धागाकर्त्याने फायदा घेतला आहे असे सुचविताना प्रतिसाद देतानाही कांही प्रतिसादकर्त्यांनी 'त्याच' सत्याचा फायदा घेतला आहे. हज यात्रेसाठी प्रत्येक देशातून किती भाविकांनी यावे ह्यावर नियंत्रण असते. कोणीही उठला आणि हज यात्रेला गेला असे होत नाही. माझ्या अल्पमाहिती नुसार सौदीतील काबा परिसरात फक्त ९९,९९९ माणसेच असतात तसेच पंढरीच्यावारीला, चैत्यभूमीच्या यात्रेला प्रत्येक शहरातून, खेड्यातून किती भाविकांनी सहभाग घ्यावा ह्यावर कांही नियंत्रण असावे का? असा विचार मनांत येतो. वरचा, प्यारे १ ह्यांचा प्रतिसाद १००% पटला नाही तरी ९०% पटतोच. एक संयमीत प्रतिसाद असेच म्हणावे लागेल.
  • Log in or register to post comments

+१

अर्धवटराव
Wed, 07/10/2013 - 21:38 नवीन
विवेकाला नाकं मुरडुन कुठलीच समस्या सुटणार नाहि. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

पेठकर काका. मी इथे नेहमीच

विजुभाऊ
Wed, 07/10/2013 - 22:35 नवीन
पेठकर काका. मी इथे नेहमीच संयमीत भाषेत प्रतिसाद देत असतो. कधीच कोणावर वैयक्तीक टीका करीत नाही. दुर्दैवाने इथे उत्तर देताना काही लोक तुमची बुद्धी कळली /बोलण्यात अर्थ नाही/ अकाउंटॅबिलिटी वगैरे बोलतात. आरशात पहा वगैरे बोलले....... असो. ज्याची त्याची मती. मला मी केलेल्या कोणत्याही विधानाबद्दल मुद्देसूद खंडन करता येते. इतरानी केलेली टीकादेखील मी स्वीकारतो. फतवा काढायचा असेल तरी हरकत नाही. नाहीतरी आदर्श पुरूष रामाने फतवा ( आदेश) काढून शंबुकाचा वध केला होताच की खालच्या जातीत जन्म होउन देखील वेद ऐकल्याबद्दल. असो..... अवांतर : धर्मातील सुधारणेबद्दल मी काय आराधना करावी म्हणजे त्याबद्दल बोलण्यास पात्र ठरेन. अतीअवांतरः विद्रोही तुकारामानी धर्माबद्दल जे अभंग लिहीले आहेत ते गिरीजा तै/बै/मावशी यानी अभ्यासले असतील अशी अपेक्षा करतो
  • Log in or register to post comments

अच्छा...

अर्धवटराव
गुरुवार, 07/11/2013 - 01:22 नवीन
म्हणजे विद्रोही तुकाराम या लेखप्रपंचाची गंगोत्री आहे होय... मग ठीक आहे. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

खारीचा वाटा.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 07/11/2013 - 01:55 नवीन
धर्मातील सुधारणेबद्दल मी काय आराधना करावी म्हणजे त्याबद्दल बोलण्यास पात्र ठरेन.
कुठल्याही कार्यात 'सिंहाचा वाटा' असतो तसाच 'खारीचाही' असतो. जे आणि जितके आपल्याला जमेल ते आणि तितके करीत राहावे. कांहीच न करण्यापेक्षा कांहीतरी पोटतिडीकीने केले आहे हेच महत्त्वाचे. खूप लांबच्या प्रवासाची सुरुवातही 'पहिले पाऊल' पुढे टाकण्यातून होत असते. असो. तुम्ही सूज्ञ आहात, हतोत्साहित होऊ नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

पेठ्कर काका...विजुभौ

विटेकर
गुरुवार, 07/11/2013 - 10:04 नवीन
भावना पोचल्या. मिपांवर केलेल्या चर्चा वैयक्तिक न घेण्याइतके प्रगल्भ आपण असायला हवे ना? नांव जरी विजुभौचे घेतले असले तरी माझा आक्षेप त्या आणि तशा प्रकारच्या प्रव्रुत्तीवर आहे. भले तरी देऊ कासेची लंगोटी.... I hope I am loud & clear ! ( smily )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

वा..वा..काय हुशारी आहे.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 07/11/2013 - 13:59 नवीन
मिपांवर केलेल्या चर्चा वैयक्तिक न घेण्याइतके प्रगल्भ आपण असायला हवे ना?
म्हणजे वैयक्तिक विधाने वैयक्तिक पातळीवर घेणार्‍यांची 'बुद्धी प्रगल्भ नाही' असे एक 'लेबल', आडून आडून, वैयक्तिकरित्या लावले की आपली प्रगल्भता अनायसे सिद्ध होते. व्वा....व्वा....आवडले. पण आम्ही अडाणी आणि अप्रगल्भ बुद्धीवालेच ठीक आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

काहीही....

विटेकर
गुरुवार, 07/11/2013 - 14:08 नवीन
You are free to draw any inferences the way you want !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

खरंच काहीही...

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 07/11/2013 - 14:33 नवीन
आपणांस आहे मरण! म्हणोन राखावें बरवेपण!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

पण आम्ही अडाणी आणि अप्रगल्भ बुद्धीवालेच ठीक आहोत.

अनिरुद्ध प
गुरुवार, 07/18/2013 - 16:03 नवीन
पेठकर काका, आपल्या विवेका बद्दल शतषा नमन प्रत्यक्षात आपण अतिप्रगल्भ बुद्धिचेच आहात असे मी समजतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

धाव पाव विठू आता....

कवितानागेश
गुरुवार, 07/11/2013 - 00:59 नवीन
धाव पाव विठू आता....
  • Log in or register to post comments

फारच अवखळ आणि अल्लड बुवा : )

पिंपातला उंदीर
Fri, 07/12/2013 - 21:54 नवीन
फारच अवखळ आणि अल्लड बुवा : )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

ओ बुवा,

कवितानागेश
Fri, 07/12/2013 - 23:59 नवीन
ओ बुवा, इथे तुम्हाला काय काय म्हणतायत बघा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर

का...य?...काय म्हणताsssssत???

अत्रुप्त आत्मा
Sat, 07/13/2013 - 02:19 नवीन
का...य?...काय म्हणताsssssत??? =)) पण तसं काहि फार वाइट्टं म्हणत नैय्येत!!! :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

विद्रोही तुकाराम

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 07/11/2013 - 02:13 नवीन
बाकी काही म्हणा वारी बद्दल ...पण हा काथ्याकुट वाचताना हा अभंग पुन्हा वाचनात आला भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥धृ॥ पौर्णिमेच्या चंद्राचे कोरे जीवन, तैसे माझे मन वाट पाही ॥१॥ दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहतसे वाटूली पंढरीसी ॥२॥ भुकेलिया बाळा अति शोक करी, वाट पाहे परी माऊलीची ॥३॥ तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावूनी श्रीमुख दावी देवा ॥४॥ दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पाहतसे वाटूली पंढरीसी .... डोळ्यात पाणी आणलंत तुकोबा ..... कधी भेट होईल आता ... देव जाणे :(
  • Log in or register to post comments

पौर्णिमेच्या चंद्राचे कोरे

प्यारे१
गुरुवार, 07/11/2013 - 04:40 नवीन
पौर्णिमेच्या चंद्राचे कोरे जीवन, तैसे माझे मन वाट पाही ॥१॥ 'पौर्णिमेच्या चंद्रा चकोरे जीवन' असं असावं. चकोर हा कल्पित पक्षी 'फक्त' पौर्णिमेचं चांदणं पिऊन जगतो असं मानलं जातं. उत्कट भक्तीतून पांडुरंग भेटीची तळमळ निर्माण होणारे तुकाराम महाराज काय अथवा 'देवाच्या सख्यत्वासाठी, पडाव्या जीवलगांच्या तुटी' म्हणणारे समर्थ काय.... नतमस्तक. बास्स्स्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

वारीला पासपोर्ट/ टोकन सारखे

पाषाणभेद
गुरुवार, 07/11/2013 - 04:12 नवीन
वारीला पासपोर्ट/ टोकन सारखे कागदपत्र लागू करावेत जेणे करून अश्रद्ध, अजाण, अहिंदू, अवैचारीक, अविवेकशील, अज्ञानी, अंतस्थः, अतिरेकी आदींना आपोआप आळा आणण्याचे काम होईल.
  • Log in or register to post comments

तर्कविसंगत

राही
गुरुवार, 07/11/2013 - 15:07 नवीन
चर्चेतली काही विधाने अगदीच तर्कविसंगत. ''हिंदुधर्मासाठी कोणी काय केले आहे म्हणून त्याने टीकेचा 'अधिकार' आपल्याकडे घ्यावा" हे म्हणजे तुम्ही अंडे घातले आहे का, घातले असेल तरच त्याचा आकार,रंग चव इ.वर टीका करा- इतपत बाळबोध. समीक्षकांनी टीका करू नये कारण त्यांनी कधी कथा-कादंबरी लिहिलेली नसते या विधानासारखेच. बाकी वारीतल्या सहभागी लोकांच्या संख्येवर मर्यादा असावी हे अगदी पटण्यासारखे. प्रत्येक दिंडीला माणसांचा कोटा ठरवून द्यावा. कुंभमेळ्यात गंगेच्या काठी विस्तृत जागा उपलब्ध असते म्हणून सुव्यवस्था राखतातरी येते. तशीच त्र्यंबकेश्वरी राखताना गोंधळ माजतो. पंढरपूरसारखे गाव एकावेळी लाखभर लोकांना सुव्यवस्थितपणे सोयी पुरवू शकेल. त्यानंतर चंद्रभागा प्रदूषणग्रस्त होईल आणि हे प्रदूषण पार उजनी, गाणगापूर, कृष्णेपर्यंत पोचेल. गाणगापूरला भीमा-अमरजा संगमाचे गढूळ पाणी पवित्र म्हणून विकले जाते. पंढरपूरयात्रेवेळी पाचसहा लाख लोकांचे सांडपाणी त्यात मिसळले जाते. आता उजनीमुळे कदाचित प्रदूषण कमी झाले असेल कारण उजनी आणि जायकवाडी धरणे क्वचितच ओसंडून वहातात त्यामुळे धरणाच्या वरल्या अंगाचे पाणी नदीच्या खालच्या प्रवाहात पोचतच नाही; हा मुद्दा सोडला तरी एवढ्या प्रचंड संख्येने माणसांनी एकत्र येणे हे आपत्तीला आमंत्रण आहे. त्यातून आपली देवळे कोंदट, प्रदक्षिणामार्ग अरुंद, बाहेरचे रस्ते अरुंद. टपर्‍यांनी भरलेले. जमाव बेशिस्त, सतत ढकलाढकली चाललेली. पुजारीवर्ग आपापापल्या यजमानांना सशुल्क सत्वर दर्शन घडवण्याच्या लगबगीत. एखादी भीषण दुर्घटना केव्हाही घडू शकेल अशी परिस्थिती. केवळ श्रद्धेच्या नावाखाली हे सर्व चालू रहावे काय? बर्‍याच वर्षांपूर्वी एकदा शिरडीच्या भक्तनिवासात स्वच्छतागृहाचा संपूर्ण मजला मैल्याने भरून ते ओघळ जिन्यावरून खालपर्यंत आलेले पाहिले तेव्हापासून तिथे जावेसे वाटलेले नाही. 'शास्त्राभ्यास नको,श्रुती पढू नको, तीर्थासि जाउ नको' यासारखी अनेक संतवचने आहेत. पण लक्षात कोण घेतो?
  • Log in or register to post comments

+१११११११

पिंपातला उंदीर
गुरुवार, 07/11/2013 - 17:47 नवीन
+१११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

त्यातून आपली देवळे कोंदट, प्रदक्षिणामार्ग अरुंद, बाहेरचे रस्ते अ

अनिरुद्ध प
गुरुवार, 07/11/2013 - 20:15 नवीन
सध्या दर्शना साठी चान्गली सोय आहे शेगाव तसेच तिरुपती च्या धर्तिवर्,याची नोन्द घ्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा