Skip to main content

प्रतिबिंब

लेखक निनाव यांनी बुधवार, 03/07/2013 01:47 या दिवशी प्रकाशित केले.

तळ्यात डोकावतांना
दिसत होते प्रतिबिंब ।
काही होते माझे , अन काही माझे पण
तुला समजावून सांगण्याचे वेडे हट्ट
अन तुला गमाविल्याचे कारण….
सर्वकाही …

का मिटावे तू पान असे
अलगद पुसावी झोप

पडताच थेंब मग
खेळ उथळ तरंगांचे
मन मात्र ओले
शोधण्यात प्रतिबिम्ब.….

कधी माझे , अन कधी माझे पण …!

लेखनविषय:

वाचने 1438
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया