✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सरकारी नोकर

B — Bhagwanta Wayal, Sun, 07/07/2013 - 19:57
वेळेवर येईना कधी कामाला कधी मधी पगाराला सर्वात आधी तो सरकारी नोकर॥१॥ फाईल्स टाकी ऐसपैस काम करी सावकास टेबलाखालुन घेई पैस तो सरकारी नोकर॥२॥ पैसे घेऊन काम न करी पार्टीला बोलवी घरी नेहमीच अपेक्षा धरी तो सरकारी नोकर॥३॥ जेवण करून झाकी डोळे कधी चार वाजताच पळे घरी जाऊन नुसता लोळे तो सरकारी नोकर॥४॥ वाटेल तेंव्हा घेई रजा खाऊनपिऊन करी मजा म्हणे साहेब आहे माझा तो सरकारी नोकर॥५॥ काम चुकार एक नंबर काम थोडे बोले फार टाकी दुसर्‍यावरी भार तो सरकारी नोकरी६॥ साहेबांची हाजी हाजी सह-कार्‍यांची नाराजी रोज बातमी सांगे ताजी तो सरकारी नोकर॥७॥ युनियनचा पदाअधिकारी काम कधीच नाही करी वाटेल तेंव्हा जाई घरी तो सरकारी नोकर॥८॥ --बी.डी.वायळ

प्रतिक्रिया द्या
1843 वाचन

💬 प्रतिसाद (7)

हिय्य्या......मस्स्स्त..

पक पक पक
Mon, 07/08/2013 - 08:38 नवीन
हिय्य्या......मस्स्स्त.. :)
  • Log in or register to post comments

फार म्हणजे फारच अतिशयोक्ती होते आहे.

किसन शिंदे
Mon, 07/08/2013 - 08:47 नवीन
कैच्याकै.. सगळेच सरकारी नोकर असे नसतात कै.
  • Log in or register to post comments

बहुतेक असेच असतात पण; असे

Bhagwanta Wayal
Tue, 07/09/2013 - 16:32 नवीन
बहुतेक असेच असतात पण; असे नसणर्‍यांसाठी क्षमा. प्रतिक्रियेबद्दल मनापासुन आभार..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

lihit raha. pu.le.shu.

निनाव
Mon, 07/08/2013 - 19:56 नवीन
lihit raha. pu.le.shu.
  • Log in or register to post comments

अ‍ॅप्ट ! नेमकं ! छान लिहिलंय!

वेल्लाभट
Tue, 07/09/2013 - 08:44 नवीन
अ‍ॅप्ट ! नेमकं ! छान लिहिलंय!
  • Log in or register to post comments

सरकारी नोकर महिमास्त्रोत्र.

गंगाधर मुटे
Tue, 07/09/2013 - 12:50 नवीन
सरकारी नोकर महिमास्त्रोत्र. अफलातून. :)
  • Log in or register to post comments

कविता वाचल्याबद्दल तसेच

Bhagwanta Wayal
Tue, 07/09/2013 - 16:36 नवीन
कविता वाचल्याबद्दल तसेच प्रतिक्रिया दिल्याबद्दल सर्वांचेच आभार..!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा