उंदीर मांजराचा खाऊ
उंदीर मांजराचा खाऊ
एकदा थंडी वाजते म्हणून
एका माऊने केली गाऊ
तेथला उंदीर मनात म्हणाला
आता गुपचूप खाऊ खाऊ
खाऊ होता माऊसमोर
धीर केला उंदराने
हळूच गेला चालत चालत
मांजरीकडे पाहीले त्याने
खाऊचा वास त्याने घेतला
सुटले पाणी तोंडाला
खाऊ न द्यायचा कोणाला
विचार त्याच्या मनातला
डोळे मिटून सताड पडली
अंग चोरून मनी
मिटक्या मारीत खायचा खाऊ
उंदराने स्वप्न पाहीले मनी
होती निसरडी घराची फरशी
तीवरून त्याचा पाय सरकला
आवाजाने माऊ जागी झाली
आयता खाऊ तिला मिळाला
- पाभे
मस्त.
सुरेख बालगीत.
हे हे
मत्त मत्त!
@होती निसरडी घराची फरशी
सतत
(अन मला वाटलेच होते की
मस्त बालगीत!
बालगीत मस्त लिहलंय हो पाभे.
मला खूप खूप आवललं गानं !
+१
सुंदर ! सुंदर आहे काव्य. सोपं
छान बालगीत.
मस्त
ओके. अस घडलं तर.
दफोराव कविता लयं आवडली बघा.