सात स्वरांतिल सूर वाहिले दूर राहिले काही
सुप्त काहिली झाले त्यातिल उलगडले नच काही
गुच्छ बांधले जपले मार्दव अंगिकारले देही
विस्कटलेले तळी झाकले वर्ज्य न केले तेही
श्वासांची स्पंदने गोमटी कधी विकल अवरोही
आरोहात कथा वचनांच्या व्यथा गूढ संदेही
विरघळल्या न जळाल्या समिधा दिशा पेटल्या दाही
दाह जाहले प्रतिमा अंकित प्रियकर त्यात विदेही
खेळ क्षणांचे दीर्घ वेदना कंड सुखावह तरिही
तलम ओंजळी एकांताच्या जळ करतळ निर्मोही
मेघ पापणीआड बिंब प्रतिबिंब स्वप्नवत पाही
जीवन लयमय ऋतू आगळा चिन्मय पवन सदाही
..............................अज्ञात
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1525
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
दुसरं कडवं अतिशय आवडलं.
दुसरं कडवं अतिशय आवडलं.
surekhach..
surekhach.... shubhechha!
सात स्वरांतिल सूर वाहिले दूर
सात स्वरांतिल सूर वाहिले दूर राहिले काहीयातच सर्व आले.
कविता आवडली हेवेसांनल
सुप्त- आत्मा -त्रुप्त
सुप्त- आत्मा -त्रुप्त
सर्वांचेच मनापासून आभार .....
सर्वांचेच मनापासून आभार .....:)
__/\__!!
__/\__!!