Skip to main content

श्राद्ध

लेखक drsunilahirrao यांनी रविवार, 07/07/2013 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
...आता एक घाव दोन तुकडे केल्यावर, आपापल्या वाट्याचा रक्तबंबाळ तुकडा जगापासुन लपवणे आलेच ! सोबत ठिबकणाऱ्या आठवांचा ओला हुंदका आतल्याआत पोसणे आलेच.. य़ापेक्षा जपली असतीस नात्याची अडखळती धडधड, दिले असतेस थोडे श्वास , फुंकला असतास थोडा प्राण ! अगदिच वटवृक्ष झाला नसता, खुरटेच ऱाहिले असते झाड ...तरिही ,ते फक्त तुझे नि माझे ! ... आता य़ा कलेवऱाचे दरक्षणी श्राद्ध करणे आलेच...! डॉ. सुनील अहिरऱाव
लेखनविषय:

वाचने 1763
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

डॉक्टरसाहेब, छान कविता. आशय भावला. -दिलीप बिरुटे