Skip to main content

हे विहगांनो

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 01/07/2013 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
हे विहगांनो चला घेउनी मेघांपलिकडल्या द्वारी खेळ मनस्वी शतरंगांचे फेर धराया गाभारी उणे पुराणे जग वाटे हे कल्प नवा रुजवू देही फुलवू या स्वप्नांचा चोळा दूर करू विवरे सारी रंग बघू प्रमदेचे आणि तृप्त फिरू रत माघारी पुन्हा एकदा तोच शहारा उमलवुनी मन दरबारी ........................अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1075
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

पहिलीच ओळ 'हे विहगांनो चला घेउनी मेघांपलिकडल्या द्वारी' फार आवडली

रंग बघू प्रमदेचे आणि तृप्त फिरू रत माघारी पुन्हा एकदा तोच शहारा उमलवुनी मन दरबारी
व्वाह!! टिपीकल अज्ञात!!