गाकर हा माझा अत्यंत आवडता पदार्थ. आम्ही देशावरील मंडळी याला हारोळ्या म्हणतो.
जाडसर कणिक थोडे मोहन, थोडे जास्त मीठ आणि ओवा घालून भिजवायची. दहा मिनिटे कणिक मुरवायची आणि लाटून साधारण पुरीपेक्षा थोड्या मोठ्या पण चार मिलीमीटर जाडीचा गाकर लाटायचा. एकाबाजूने तव्यावर शेकायचा आणि दुसर्या बाजूने अर्धवट तव्यावरच शेकायचा. नंतर अग्निमध्ये (ग्यासच्या चुलीवर. खर्या चुली तर आता गावात पण नसतील..)मस्त खरपूस हि हारोळी भाजून घ्यायची. वरून भरपूर साजूक तूप टाकायचे आणि तोंड शेकत शेकत खायची. Alternatively तुम्ही हि बटर किंवा घरातल्या ताज्या लोण्याबरोबर पण खाऊ शकता. मला तर जरा ही जळालेलीच आवडते म्हणून फोटोतील पण जरा काळी दिसतेय. :)
धन्यवाद !!
वाचने
6735
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
आरोळ्या
धन्यवाद रमेशजी
आम्ही देशावरचे असूनही ह्याला
नक्की ?
In reply to आम्ही देशावरचे असूनही ह्याला by प्रचेतस
नाय हो.
In reply to नक्की ? by सचिन कुलकर्णी
लैच भारी.
धन्यवाद !!
In reply to लैच भारी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त!
बट्टी
In reply to मस्त! by पैसा
मस्त पाकृ आहे. करून पहायला
इंगित
In reply to मस्त पाकृ आहे. करून पहायला by रेवती
गाकर.
क्या बात है
In reply to गाकर. by प्रभाकर पेठकर