Skip to main content

गाकर (हारोळ्या)

लेखक सचिन कुलकर्णी यांनी रविवार, 30/06/2013 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
गाकर हा माझा अत्यंत आवडता पदार्थ. आम्ही देशावरील मंडळी याला हारोळ्या म्हणतो. जाडसर कणिक थोडे मोहन, थोडे जास्त मीठ आणि ओवा घालून भिजवायची. दहा मिनिटे कणिक मुरवायची आणि लाटून साधारण पुरीपेक्षा थोड्या मोठ्या पण चार मिलीमीटर जाडीचा गाकर लाटायचा. एकाबाजूने तव्यावर शेकायचा आणि दुसर्या बाजूने अर्धवट तव्यावरच शेकायचा. नंतर अग्निमध्ये (ग्यासच्या चुलीवर. खर्या चुली तर आता गावात पण नसतील..)मस्त खरपूस हि हारोळी भाजून घ्यायची. वरून भरपूर साजूक तूप टाकायचे आणि तोंड शेकत शेकत खायची. Alternatively तुम्ही हि बटर किंवा घरातल्या ताज्या लोण्याबरोबर पण खाऊ शकता. मला तर जरा ही जळालेलीच आवडते म्हणून फोटोतील पण जरा काळी दिसतेय. :) धन्यवाद !! a

वाचने 6735
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

आईकडून शिकलेले या पदार्थाचे नाव आरोळ्या असे आहे.

आम्ही हारोळ्या म्हणतो याला. भाषेची गंमत, दुसरे काय ?

In reply to by सचिन कुलकर्णी

नाय हो. मस्त लोणी लावलेली, खरपूस भाजलेला गाकर असताना वक्रोक्ती कशाला करेन ब्वा. आता उद्या गाकर खाणे आले.

फोटो भारी आलाय. -दिलीप बिरुटे

रोटीचा महाराष्ट्रीय अवतार दिसतोय!

In reply to by पैसा

पैसाताई, हा प्रकार जर राजस्थानी बट्टीच्या जवळपास जाणारा आहे.

In reply to by रेवती

धन्यवाद रेवतीताई. नक्की करून बघा. अत्यंत सोपी आहे हि पा. कृ. फक्त गव्हाचे पीठ जरा जाडसर/रवाळ घ्या म्हणजे नंबरी काम होते एकदम.

अगदी रवाळ नाही पण कोंडायुक्त गव्हाचे पीठ आहेच घरात. कोळशाचे निखारेही जमवता येतील. मग गाकर करायला वेळ कशा करीता? लगेच करून पाहीन. नक्कीच मस्त लागतील. मी ही देशावरचा पण आयुष्य मुंबईत गेले. मीही गाकर असेच नांव ऐकले आहे. आज पाककृती पाहिली. आता कृती.

In reply to by प्रभाकर पेठकर

वा काका, तुम्ही बनविणार म्हणजे एकदम जबर्या काम होणार .. सोबत पिठले/झुणका try करा.