✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सौदि अरेबियातली बर्फवृष्टी...

ड
डॉ सुहास म्हात्रे यांनी
Wed, 06/26/2013 - 17:15  ·  लेख
लेख
अगोदर आपण सौदि अरेबियातले वाळूचे वादळ बघितले... ते जरी भयानक असले तरी अनाकलनीय नव्हते. ते बर्‍याच जणाना आवडले असे दिसले. म्हणून आता एक धक्का अजून द्यावा म्हणतो... ही पहा सौदि अरेबियातली बर्फवृष्टी...  .  .  .  .  .  दर वर्षी नाही, पण गेल्या सात वर्षांत चारदा तरी सौदी अरेबियाच्या उत्तर भागात बर्फवृष्टी झाली आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
भूगोल
छायाचित्रण

प्रतिक्रिया द्या
42506 वाचन

💬 प्रतिसाद (38)

प्रतिक्रिया

कलजुग है कलजुग

भावना कल्लोळ
Wed, 06/26/2013 - 17:59 नवीन
कलजुग है कलजुग
  • Log in or register to post comments

च्यायला...कसं काय??? मुख्य

बॅटमॅन
Wed, 06/26/2013 - 18:02 नवीन
च्यायला...कसं काय??? मुख्य प्रश्न असा की सौदीच्या कुठल्या भागात बर्फवृष्टी होते? डोंगरबिंगर कुठे आहेत?
  • Log in or register to post comments

आयमाय स्वारी. उत्तर भाग असे

बॅटमॅन
Wed, 06/26/2013 - 18:06 नवीन
आयमाय स्वारी. उत्तर भाग असे लिहिलेय ते बघायचे राहून गेले. हां तर उत्तर भागात बर्फ पडतो तर इस्राएलमध्येही पडतो का? सिनाय वगैरे भागात पडतो की कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सौदिच्या उत्तरेला असलेल्या

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 06/26/2013 - 21:18 नवीन
सौदिच्या उत्तरेला असलेल्या जॉर्डन आणि इझ्राइलच्या डोंगराळ भागात दरवर्षी बर्फवृष्टी होते असे ऐकून आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

माहितीकरिता धन्यवाद

बॅटमॅन
Wed, 06/26/2013 - 21:47 नवीन
माहितीकरिता धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

अवघडच दिसतय प्रकरण..

सौंदाळा
Wed, 06/26/2013 - 18:10 नवीन
अवघडच दिसतय प्रकरण.. असो. एक्का काका मुडात आले परत :):)
  • Log in or register to post comments

कमालच आहे

दिपक.कुवेत
Wed, 06/26/2013 - 18:14 नवीन
च्यायला ईथे कुवेत मधे नुसतच धुळिचं वादळ येत पण बर्फ काय दॄष्टिस पडत नाहि. थंडित क्वचीत गारा पडतात.
  • Log in or register to post comments

निसर्गाचा चमत्कार. दुसरे काय!

प्रचेतस
Wed, 06/26/2013 - 18:14 नवीन
निसर्गाचा चमत्कार. दुसरे काय!!!!!!!!
  • Log in or register to post comments

व्वा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 06/26/2013 - 18:18 नवीन
सौदी म्हणजे नुसतं वाळवंटच, असे समजत होतो. धन्यवाद. येऊ द्या अजून अशीच माहिती. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

खरंय

काकाकाकू
Wed, 06/26/2013 - 21:01 नवीन
पूर झाला. धुळीचं वाळवंट ऐकलं तरी होतं. पण गोट्यांएव्हढे दगड नी त्याचं एकंदरीत स्वरूप एव्हढं भयंकर असतं हे काहि माहित नव्हतं. आणि ते कमी म्हणून आता बर्फ!! सात वर्षात चारदा म्हणजे काहि दुर्मिळ नव्हे. विशेषतः सौदिमधे. आता पुढे काय? एक्कोजीराव, "सौदि अरेबियात एक चारशे वर्ष जुनं कपिलेश्वराचं मंदिर आहे त्याचे फोटो" वगैरे तत्सम काहि लिहिलंत तरी आश्चर्य नाहि वाटणार :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सौदि अरेबियात एक चारशे वर्ष

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 06/26/2013 - 21:31 नवीन
सौदि अरेबियात एक चारशे वर्ष जुनं कपिलेश्वराचं मंदिर आहे त्याचे फोटो" वगैरे तत्सम काहि लिहिलंत तरी आश्चर्य नाहि वाटणार दक्षिणेत एक मैदान सालेह म्हणून जागा आहे. तेथे बर्‍यापैकी सुस्थितीत असलेली इस्लामपूर्व (इसविसनापूर्वीच्या पहिल्या शतकातील) नाबातियन संस्कृतील काही थडगी (tombs) आहेत... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काकाकाकू

वरचे चित्र आंतरजालावरून साभार

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 06/26/2013 - 21:49 नवीन
वरचे चित्र आंतरजालावरून साभार घेतलेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

मुंबईत…

भाते
Wed, 06/26/2013 - 20:21 नवीन
च्यामायला, मुंबईत यापैकी काहीच होत नाही. ना वाळूचे वादळ ना बर्फवृष्टी!
  • Log in or register to post comments

दर पावसाळ्यात धो धो पाऊस पडून

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 06/27/2013 - 11:02 नवीन
दर पावसाळ्यात धो धो पाऊस पडून मुंबईचे व्हेनिस बनते ते काहीच नाही काय ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते

गाड्यांचा फोटो भारी आहे .

सस्नेह
Wed, 06/26/2013 - 21:05 नवीन
गाड्यांचा फोटो भारी आहे . वाळूचे फोटो यापेक्षा सुद्धा भारी वाटले.
  • Log in or register to post comments

चमत्कारच...

लाल टोपी
Wed, 06/26/2013 - 21:21 नवीन
अरेच्चा हे तर नवीनच प्रकरण आहे. असं काही घडलं आहे हे माहितच नव्हते. नविन माहिती बद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments

हेही नवीनच .

रेवती
गुरुवार, 06/27/2013 - 00:14 नवीन
हेही नवीनच .
  • Log in or register to post comments

हेच्यायला!

धमाल मुलगा
गुरुवार, 06/27/2013 - 00:47 नवीन
हे सौदी जरा खुळ्या डोस्क्याचंच दिसतंय. मरणाचं ऊन असलेलं वाळवंट काय, त्यात वाळूची वादळं काय अन बर्फवृष्टी काय! औघड है ब्वॉ! आता कळलं, अरबं अशी येड्यासारखी का वागतात ते. :D
  • Log in or register to post comments

+१

प्यारे१
गुरुवार, 06/27/2013 - 01:10 नवीन
+१ ह्या असल्या टापूत राहणार्‍या लोकांसाठीच (ऑडियन्ससाठी) विशिष्ट पुस्तकात काही आज्ञा/ आचाराच्या पद्धती/ काही पेश्शल सवलती दिल्या गेल्या असाव्यात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

झकास !

जॅक डनियल्स
गुरुवार, 06/27/2013 - 04:44 नवीन
झकास ! थंडी मध्ये सौदी लोकं स्वेटर कशी घालतात, याचा मी विचार करत होतो, फुल विनोदी दिसत असतील. माझ्या एका सौदी विद्यार्थ्यांला तुमचे फोटो दाखवले तर तो वेडाच झाला. त्याने मला एक अन एक अक्षर मला भाषांतर करायला लावले....कुठून दाखवले असे झाले...;)
  • Log in or register to post comments

काही माण्स भलती नशिबवान हो!

स्पंदना
गुरुवार, 06/27/2013 - 07:22 नवीन
काही माण्स भलती नशिबवान हो! इस्पिक एक्का त्यातलेच. सगळ भव्यदिव्य यांच्या नशिबी, अन आम्ही परड अन बाग यातच खुष! वाळुच वादळ पाहिलं, तिथे प्रतिसाद द्याय्चा राहुन गेला आता दोन्हीचा मिळ्युन एकत्र देते. अविश्वसनिय!! अचाट!
  • Log in or register to post comments

जिथे वाळूचे वादळ तिथेच

तुमचा अभिषेक
गुरुवार, 06/27/2013 - 10:12 नवीन
जिथे वाळूचे वादळ तिथेच बर्फवृष्टी का या दोन्ही प्रदेशांत खूप अंतर आहे?? पहिल्या काही फोटोंत वाटले पांढरी वाळू दाखवून तुम्ही आम्हाला फसवत आहात ;)
  • Log in or register to post comments

मी टाकलेल्या फोटोंतल्या

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 06/27/2013 - 10:50 नवीन
मी टाकलेल्या फोटोंतल्या वाळूच्या वादळाच्या आणि बर्फवृष्टीच्या जागांत साधारण ८०० किमी अंतर आहे. पण दक्षिण सौदितल्या (फोटोतल्या वाळूच्या वादळाच्या जागेपासून १००-१५० किमी दक्षिणेस) ताईफ या समुद्रसपाटीपेक्षा १८८० मीटर ऊंच असलेल्या डोंगरावरच्या शहरात अत्युच्च ४० अंश सेल्सियस व अतीनीच -१ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे. सरासरी तापमान उच्च ३५ अंश व नीच ८ अंश सेल्सियस असते. तेथे बहुतेक दर वर्षी थोडेसे तरी बर्फ पडते असे 'ऐकून' आहे. हे ठिकाण पृथ्वीगोलावर अक्षांश बघितले तर अहमदाबाद आणि मुंबईच्यामधे येते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुमचा अभिषेक

फोटो मस्तच ......!

रुमानी
गुरुवार, 06/27/2013 - 10:46 नवीन
हे असे काही अस्ते महितच नव्हते....! :)
  • Log in or register to post comments

आपल्या देशात

चौकटराजा
गुरुवार, 06/27/2013 - 16:13 नवीन
आपल्या देशात राजस्थानात काही ठिकाणी बर्फ पडते असे ऐकून आहे. ती दोन ठिकाणे म्हण्जे माउंट अबू व गुरूशिखर ( प भारतातील सरवोच्च जागा )
  • Log in or register to post comments

नखी तलाव

राही
गुरुवार, 06/27/2013 - 17:11 नवीन
आबूशिखरावरच्या नखी(नाक्की) तलावात पृष्ठभागावर पाव सेन्टिमीटर जाडीचा बर्फाचा पातळ थर पाहिला आहे. हिवाळ्यात राजस्थानात काही ठिकाणी काही वेळा शून्याखाली तीन अंश से. इतके तापमान असते. पण प्रत्येक वेळी बर्फवृष्टी किंवा पाणी गोठणे होतेच असे नाही. बर्फवृष्टी बहुधा होत नाही. सीमेवरच्या वाळवंटात (साम वगैरे) कडाक्याची थंडी असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

सल्तनत ऑफ ओमान मधे मस्कतपासून

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 06/27/2013 - 17:38 नवीन
सल्तनत ऑफ ओमान मधे मस्कतपासून १५० किमी वर जबल अख्दर (हरित पर्वत) नावाची पर्वतराजी आहे त्यांतील जबल शेख नावाच्या मुख्य गावांत बर्‍याचदा हिवाळ्यात चारचाकीच्या काचांवर रात्री पडलेल्या दवाचे सकाळपर्यंत बर्फ झालेले असते. तेथील हवामान वर्षभर थंड / खूप थंड असते आणि तेथे थंड प्रदेशातील फळांच्या (सफरचंद, पीच, प्लम, द्राक्षे, ई) व केशराच्या बागा आहेत. प्रसिद्ध मस्कती डाळिंबे तेथेच पिकतात... एका प्रजातीचे डाळींब एक ते दीड किलो वजन भरेल इतके मोठे असू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

एक दीड किलोचे डाळिंब?????????

बॅटमॅन
गुरुवार, 06/27/2013 - 17:51 नवीन
एक दीड किलोचे डाळिंब????????? :O अगायायाया डाळिंब आहे की कलिंगडाची सुधारित आवृत्ती =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

मग उगाच का पेशवाईच्या

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 06/27/2013 - 18:37 नवीन
मग उगाच का पेशवाईच्या मेजवानीत मस्कती डाळींबे खास समजली जात असत (असे कुठेतरी वाचलेले आठवते)? ही डाळींबे चविला एकदम मस्त व मउ बियांची असतात, खाताना बिया दाताखाली अजिबात कचकचत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

लै भारी

बॅटमॅन
गुरुवार, 06/27/2013 - 18:56 नवीन
अरबस्तान एकूणच सुरस आणि चमत्कारिक आहे हे मात्र नक्की!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

वा

राही
Sun, 06/30/2013 - 17:00 नवीन
अलीफ डाळिंब वा(ह) डाळिंब ! (डाळिंबाला अनार फारसीमध्ये म्हणतात की अरबीमध्यी? की दोन्हीमध्ये? की दोन्हीमध्ये आणखी वेगळाच शब्द आहे?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

लै भारी!

पैसा
गुरुवार, 06/27/2013 - 18:41 नवीन
सुरस आणि चमत्कारिक!!
  • Log in or register to post comments

आता काय काय पहावं लागणार आहे

भडकमकर मास्तर
Sun, 06/30/2013 - 17:27 नवीन
आता काय काय पहावं लागणार आहे ... !!! मस्त फोटो
  • Log in or register to post comments

फोटो

स्वाती दिनेश
Sun, 06/30/2013 - 17:57 नवीन
माहिती व फोटो आवडले, स्वाती
  • Log in or register to post comments

फोटो

स्वाती दिनेश
Sun, 06/30/2013 - 17:57 नवीन
माहिती व फोटो आवडले, स्वाती
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 07/01/2013 - 17:16 नवीन
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आणि वाचकांचे आभार !
  • Log in or register to post comments

इथे सुद्धा फोटो दिसत नाहीयेत

जयवी
Fri, 08/30/2013 - 17:10 नवीन
इथे सुद्धा फोटो दिसत नाहीयेत :(
  • Log in or register to post comments

फटू दिसू लागले

मालोजीराव
गुरुवार, 09/05/2013 - 17:34 नवीन
युरोपियन देश वाटला असता विदौट टायटल
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा