Skip to main content

चारोळ्यांचा चखणा

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 15/09/2008 06:34 या दिवशी प्रकाशित केले.
प्यायला बसला पंपू, वर चारोळ्यांचा चखणा चारोळ्यांचा चखणा, मारतो काजूंचाही बोखणा काजूच्या बोखण्यातच मानली फ़ेणीची झींग झींग नकोच फ़ेणीची, मस्त होती कढी वीथ हींग सारी शब्दांची भेंडोळी, अन वृत्तांची खांडोळी कधी अर्थाची होळी, अपुरी यमकांची खेळी शोधून फ़सलेल्या ओळी अगम्य गम्याची जाळी टाकली आज संस्थळी आयतीच तयार चारोळी आधी होता कादंबरीकार त्याची लांबण खपेना लिहील्या लघुकथा चार तरी वाचक मिळेना पाडल्या कविता वजनदार त्याही फ़ुकटात विकेना केल्या चारोळ्या तय्यार लोक म्हणे एकोळ्या द्याना! डॉक्टर बघा ताप आला चांगले औषध द्या मला तुम्ही घेउ नका टेन्शन देतो तापाचे इन्जेक्शन काय राव करता थट्टा? डॉक्टराच्या पेशाला बट्टा! तुम्ही तापाचे इन्जेक्शन? मच्छरांचे हे रोजचे फ़ंक्शन! घसा बंडुचा सुकला खोकून खोकून म्हणे कफ़ सिरप घ्या चमचाभरुन म्हणे बंडु कफ़ सिरप घेऊ कशाला? काढुद्या बाहेर जो आधीच छातीत जमला, . याराबरोबर पकडले बायकोला नवऱ्याने घटस्पोट मागीतला म्हणे नवरा फ़सवले तू मला घरात घेतला दुसरा दादला फ़सवलेत तुम्हीच आम्हाला म्हणे आठवडा लागेल परतायला एकाच दिवसात परत आला? सांगा कुणी फ़सवले कुणाला? आई बाबूला काम सांगते डोक्याचे तेल घेउन ये. कुणाचे डोके, कसले तेल? बाबूला लागत नाही मेळ गाढवा आण तेल केसाचे नीट सांग केसाचे की डोक्याचे? आण गधड्या खोबऱ्याचे आई, गधडे खोबरे कुठे शोधायचे?
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3541
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

चखणा आवडला.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

एकदम चविष्ट. :-)

हा हा हा !! मस्त आहे चखणा !! ( काय राव फक्त चखणाच व्हय ? बाकी? ) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

चखणा फारच मस्त आहे.

अगदी योग्य शब्दांत चारोळी निर्मितीचं वर्णन केलं आहे :D (र ला र आणि ट ला ट जोडून चारोळी पाडणारा), सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

In reply to by फटू

खुशाल र ला र जोडा लावा ट ला ट चा घोडा पण का ला लावून का च्या जटा बोचवलात फटदिशी काळजांत काटा!

In reply to by अरुण मनोहर

तुमच्या खरडवहीतील फोटोकडे पाहून मी तुम्हाला काका म्हटलं होतं... माझा खरडवहीतील फोटो पाहा... मी तुमच्यापेक्षा खुपच लहान आहे... बास... केवळ हे आणि हेच कारण होतं तुम्हाला काका म्हणण्यामागे... असो, नकळत का होईना मी तुमच्या भावना दुखावल्याबद्द्ल मी तुमची माफी मागतो... आपलाच, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...