Skip to main content

युग

लेखक drsunilahirrao यांनी शुक्रवार, 21/06/2013 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
मी हे लिहून काढतो मग ते लिहितो ,मग आणखीन ते .. त्या त्या क्षणाचे , वर्षांचे ,जन्मान्मांचे संदर्भ ! कधी कधी शब्द फारच पोचट वाटू लागतात , मग मी कागद चुरगाळून फेकून देतो असेलही कदाचित त्या चुरगाळून गेलेल्या ओळींत एखादा निखाऱ्यासारखा जळजळीत शब्द, मनाचा एखादा कापून काढलेला तुकडा एखादा वाळवंटासारखा तप्त अश्रू आणि तुझ्या आठवणीत वाहून गेलेले कदाचित एखादे युग .. !
लेखनविषय:

वाचने 1310
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

आणि तुझ्या आठवणीत वाहून गेलेले कदाचित एखादे युग .. ! -- ek dum bhannaat!