Skip to main content

दावणगिरी लोणी स्पंज डोसा

लेखक बाळ सप्रे यांनी गुरुवार, 20/06/2013 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
आज काल पुण्यात बर्‍याच ठिकाणी "दावणगिरी लोणी स्पंज डोसा" असे बोर्ड पहायला मिळतात. पण गंमत अशी की हे सर्व टपरी/गाडीवालेच असतात. एखाद्या चांगल्या होटेलमध्ये अजुनही हा प्रकार मेनुमध्ये मला दिसला नाहीये. पण डोसा मात्र असतो अफलातून. आणि टपरी/गाडीवर खाणे मला फारसं आवडत नाही, म्हणून घरी करुन बघायचा ठरला. आंतरजालावरून ३-४ ठिकाणी मिळालेल्या पाककृतींच्या आधारावर घरी करुन बघायचा घाट घातला. आणि आश्चर्य म्हणजे कुठेतरी वाचून केलेला हा प्रकार कधी नव्हे तो खूपच यशस्वी ठरला. इतका की मिपावर शेअर केल्याशिवाय राहवेना.. साहित्य- १/२ वाटी साबुदाणे १/२ वाटी उडिद डाळ १ वाटी जाडे पोहे ४ वाट्या तांदूळ १५-२० मेथीचे दाणे हे प्रमाण साधारण ३-४ जणांसाठी पुरेसे ठरते. कृती- हे सर्व कमित कमी ५ तास भिजत ठेवणे. नंतर मिक्सरमध्ये एकदम बाsssरीक वाटून घेणे. जराही रवाळ रहाता नये. त्यात एक छोटा चमचा खाण्याचा सोडा व मीठ घालून ढवळून उबदार जागेत रात्रभर ठेवणे. Batter डोसा करण्यापूर्वी यात थोडे पाणी घालून पातळ करुन घ्यावे. Batter 2 इतके पातळ की तव्यावर ओतल्यावर २-३mm जाड आपोआत पसरले जाईल. वरुन वाटीने पसरावे लागता नये. नाहीतर टेक्श्चर नीट येत नाही. डोसा तव्यावर घालताना तवा खूप तापलेला असु नये. अन्यथा डोसा नीट पसरत नाही. डोसा घातल्यावर लगेच गॅस मोठा करावा. Dosa1 डोसा सुकत आल्यावर वरुन लोणी घालावे. शक्यतो पांढरे लोणी वापरावे. Dosa2 वरील बाजू पूर्ण सुकल्यावर एकदाच डोसा उलटावा. मागील बाजूला असा रंग व टेक्श्चर दिसेल. Dosa3 लगेचच डोसा काढुन चटणी/सांबार याबरोबर सर्व्ह करावा. Dosa4 Dosa5

वाचने 95116
प्रतिक्रिया 100

प्रतिक्रिया

पाकृ वेगळीच आहे. मस्त एकदम! आणि फोटो सॉलिडच आलेत!

शेवटचा फोटो एकदम कातिल.

सोडा आधी घालायचे कारण काय? त्यामुळे तेल जास्त लागत नाही का? आणि मीठ पीठ आंबण्यापूर्वी घातल्यास ते नीट आंबत नाही, पण तुमचे डोसे तर झकास जमलेत!

In reply to by अनन्न्या

तेल अजिबात जास्त लागलं नाही.. मीठ आधी घातल्यास आंबत नाही हे माहित नव्हते.. मीठ आधी घालुनही कदाचित उन्हाळा असल्यामुळे चांगले आंबले असावे.. :-)

मस्त जमलाय दोसा !!!

रेसिपीबद्दल धन्यवाद. खूप दिवसांपासून हवी होती ही पा.कृ. फोटो छान आहेत. एकदम तोंपासु.

.मलाही हवी होती ही रेसिपी....धन्यवाद

रोचक पाकॄ. दावणगिरी दोसा अजून खाल्लेला नसल्याने बरीच उत्सुकता आहे. तपशीलवार वर्णनाबद्द्ल धन्यवाद.

झक्कास..

आणि टपरीवरच खावा लागतो सहमत. आता इतकी डिटेल पाककॄती मीळाल्यावर नक्कीच करुन बघणार. फोटॉ मस्तच. धन्यवाद. :)

मस्त दिसतोय डोसा. हाटेलातल्या गोष्टीबद्दल : एकदा एखाद्या चांगल्या हाटेलाचे किचन पहाच..दृष्टीआड सृष्टी !

मस्त ...! छानच दिस्तोय करुन बघ

मस्त ...! छानच दिस्तोय करुन बघते

यात साबुदाणा ही असतो हे माहित नव्हतं. साबुदाण्याबद्दलचा गैरसमज दुर झाला आहेच. ;) लगेच विकांताला करावे म्हणतो.

कर्णाटकात सेट डोसा मिळतो तो असाच दिसतो. सेमच प्रकरण म्हणायचं काय?

In reply to by लॉरी टांगटूंगकर

सेट डोसा बर्‍याच हॉटेलातदेखिल मिळतो. तो इतका स्पाँजी नसतो.. तो बराचसा उत्तप्प्यासारखा वाटतो..

ओक्के... म्हणजे याचे पीठ वेगळे असते तर. मागच्या आठवड्यात एका पारंपारीक डोसा करणार्‍या टपरीवाल्याला "दावणगिरी डोसे करून द्या" अशी मागणी केल्यावर त्याने "काय हे अज्ञान!" अशा नजरेने का पाहिले ते आता कळाले. ;-)

मस्त दिसतो आहे डोसा, स्वाती

मी हा डोसा पुण्यात खाल्ला होता आणि तेव्हापासून त्याच्या प्रेमात पडले होते :) काल अचानक बाळ सप्रेंची हि recipe मिळाली आणि आज लगेच करुन पाहिला. अप्रतिम चव आणि लुसलुशित texure! खूप धन्यवाद!

अत्ताच जेवान जालं...आनी ह्यो धागा उगडला..त्ये फोटू बगत...बगत...शेव्टाला आलू,आनी त्ये शेवटच फोटू बगून त्वांड खवळलं कि वो परत... !!! :)

आज हे दोसे केले होते. मऊ, लुसलुशीत वगैरे झाले पण फोटूतल्यासारखे दिसेनात म्हणून पुन्हा एकदा पाकृ वाचली तर पीठ आंबवताना त्यात सोडा घालायला विसरले हे लक्षात आले. आता पुढच्यावेळी ती पायरी न विसरता करीन.

In reply to by रेवती

एक लिहायचे राहिले.. रात्रभर उबदार जागेत राहिल्यावर पीठ दुप्पटीहून जास्त फुलुन येते.. पातेल्यात अर्ध्याहून अधिक जागा मोकळी ठेवावी.. नाहितर पीठ सांडते.. सोडा न घातल्याने कदाचित इतके फुलले नसेल पीठ..

In reply to by बाळ सप्रे

मटकी/मसूर/धान्ये जेव्हा भीजत घालते तेव्हाही असच अंधारं - ऊबदार वातावरण मिळण्यासाठी, ओव्हनमध्ये अन्डिस्टर्बड (व्यत्ययहीन) ठेऊन देते. कसले लवकर अन मोठे मोड येतात.

गेल्या आठवड्यात करुन पाह्यले. शन्वारी संध्याकाळी सातच्या दरम्यान सगळे जिन्नस भिजत घातले आणि रात्री अकरा साडेअकराच्या दरम्यान वाटून एकत्र करुन ठेवले. रैवारी नेमकं बाहेर जाणं ठरलं. सकाळी काही पीठ आलं नव्हतं म्हणून पातेल्याखाली परात ठेऊन घराबाहेर पडलो (आधी एकदा पातेलं असंच ठेवल्यामुळे पीठ वाया गेलं ते निराळं सबंध ओटा पुसावा लागला होता, तेव्हापासून कानाला खडा ;) ). दुपारी घर गाठेपर्यंत पीठ फुगून परातीत उतरलं होतं. सोडा न घालताही डोसे अप्रतिम झाले. फक्त एक काळजी घेतली ती म्हणजे डोसा तव्यावर टाकला की वाटीने पसरायचा नाही. पीठ नीट यावं म्हणून एका सौंदिंडियन मैत्रीणीने दिलेला सल्ला असा की तांदूळ, उडिद वैगरे ज्या पाण्यात भिजवतो तेच पाणी हे जिन्नस वाटताना लागलं तर वापरायचं. सगळं वाटून झालं की एकत्र करताना डाव वैगरे न वापरता हाताने कालवायचं. मला या प्रकाराने अपेक्षित रिझल्ट मिळालेला आहे.

In reply to by जातवेद

मी डोसे करते तेव्हा तवा हलवत, कलंडवत डोसे घालते. म्हणजे तवाच इकडे-तिकडे/वर-खाली करायचा.मग ते घन-द्रव जे काही पीठ आहे त्याला व्हेलॉसिटी मिळून ते पसरतं आपोआप.

In reply to by जातवेद

>>वाटीने नाही तर कसा पसरवायचा? हा डोसा करताना पिठाची कन्सिस्टन्सीच इतकी ठेवायची की डावाने मधोमध ओतलं की आपोआप पीठ गोलाकार पसरत जाईल. शुचिमामी म्हणते तसा तवा हलवलात तरी टेक्श्चर गंडेल. इतर वेळेस डोसे करताना खुश्शाल वाटीच्या बुडाने आतून बाहेर असं पीठ पसरवत न्यायचं. या डोशाला तसं केलंत तर डोसा हवा तसा स्पॉन्जी रादर स्पॉन्जीच होत नाही,असा अनुभव आहे.

डोसाचे पिठ दळताना त्यात शिजलेला भात मुठ्भर टाकल्यास पिठ छान फुगुन वर येते. सोडा अजिबात टाकावा लागत नाहि.

In reply to by पद्माकर टिल्लु

शिजलेला भात (अक्की) किंवा भिजलेले जाडे पोहे (अवलक्की) पण चालतात. दावणगिरी बेण्णे दोसा साबुदाणा घालून करतात माहित नव्हतं. आता करुन बघेन. दोश्याचं स्पाँजीपण अगदी तंतोतंत दिसतंय फोटोतून :)मस्त.

मी सोडा न घालताच केले होते.. फक्त एक काळ्जी घेतली कि तांदूळ, उडिद वैगरे ज्या पाण्यात भिजवले तेच पाणी हे जिन्नस वाटताना वापरले, चान्गले जमले होते

In reply to by स्मिता चौगुले

कुहुप चहान जमेलेलेले आहे. अव्द्ले. तसेच निर्निरल्याआ सह्बासदनेइ दिलेय्ला तीप्स पन कुह्कुप सोपया अहेत. बल स्र्पे- तुह्मे ग्रेत अहत. मधये एद्का याच थिकनी पेथन्कर ककानेई पन हेच रेशिपी तक्ली होतोती. तेअपन चहन च होते. बच्लर मुलन्सथि पन हे रेसिपि सुसय्ह अहे. मे नक्कि करुन बघेन. धय्नव्द. :) :( ;) ">>"

आजच केले होते डोसे. मस्त झाले. मजा आली खाताना. सोडा न घालता पण छान होतात फक्त उडिदाच्या डाळीचे प्रमाण वाढवायला लागते. (तांदूळाच्य निम्मी उडीदाची डाळ घ्यावी) पण वर दिलेलेच प्रमाण आणि सोडा घालूनही जरा वेगळे आणि मस्त झाले. आवडले. साबुदाण्याच्या सहभागाने डोसे वरून कुरकुरीत होतात असे निरिक्षण नोंदवितो.

"पाककृती/फोटो आवडले" याबरोबरच बर्‍याच जणांनी पाककृती करुनही बघितली आणि नंतर प्रतिसादही दिले .. सर्वांनाच धन्यवाद !!

नक्कि करुन बघिन आणि कळवीन. दोन शंका - १. डोसा घालत्यावर फक्त वरुन लोणी/बटर घालायचं का? आय मीन बाजुने नाहि ना? २. हे पीठ फ्रिज मधे ठेवल्यास प्रत्येक वेळी पण असेच सुटतील का तेव्हाच्या तेव्हा सगळे घालुन संपवावे लागतील?

In reply to by दिपक.कुवेत

फक्त वरुनच लोणी घालयच.. बटर स्प्रे वगैरे असेल तर उत्तम.. फ्रीजमध्ये २-३ टिकु शकत.. मी २ दिवस वापरलं.. दुसर्‍या दिवशीही तसेच डोसे झाले..

छान रेसिपी. मीपण करुन पाहिला. यात साबुदाणा घालायचे माहीत नव्हते. चिरमुरे घालूनही चांगला होतो असे ऐकले आहे.

In reply to by बाळ सप्रे

अहो काही गाडेवाले त्याला दक्षिण दावणगिरी लोणी स्पंज डोसा असे पण म्हणतात. मी मुद्दामहून म्हैसूरला जाताना दावणगिरी स्टेशनल उतरलो होतो.

आयला!! जंगली महाराज रस्त्यावरच्या एका जागच्या लोणी स्पंज अन एकंदरीतच पुण्यनगरीची आठवण ताजी झाली

आज करुन पाहिला,अप्रतिम झालेला...धन्यवाद संध्याकाळी उरलेल्या पिठात सोया,शेजवान,पिझा&पास्ता,चीलि असे घरात असलेले सगळे साॅस वापरुन जाडसर डोसा टाकुन लगेच त्यावर कांदा,टाॅमेटो, कोबी व हिरव्या मिरचीचं टाॅपिंग टाकुन भन्नाट वेगळाच पिझ्झा बनवला, मस्त झालेला :-)

आत्तपर्यन्त हा डोसा बाहेर च खाल्ला होता..इथे पाक्रु वाचल्यावर तीन चार वेळा घरी करुन पाहिला.. सर्वाना खुप आवड्ला!! पाक्रु दिल्याबद्दल धन्यवाद!!:-)

आजच केले होते हे डोसे, मस्तं झाले होते खूप आवडले :) मऊ, लुसलूशीत आणी स्पाँजी. पाकृसाठी धन्यवाद .

In reply to by सानिकास्वप्निल

आईच्यान्!!!!!!!!!!!!! काय कातिल फटू. चटणीची रंगसंगती तर थेट वॉटरकलर!!!!!!! डोसे तर जबरीच, अन सांबारही एकदम खंग्री!!!!! उद्याचं लंच आंध्रा मेशीत करायला लागतंय आता.

In reply to by बॅटमॅन

@ उद्याचं लंच आंध्रा मेशीत करायला लागतंय आता.>>> - १ मी अत्ताच चाल्लू..राश्ता पेठीत..मद्राशी मेसवर..येताव काय? :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

आंध्र अन मद्राशी मेस.. रास्ता पेठेत..? हाय रे हाय.. काय हे पुण्यपत्तनावर दाक्षिणात्य द्रविडांचं आक्रमण..!!