आज काल पुण्यात बर्याच ठिकाणी "दावणगिरी लोणी स्पंज डोसा" असे बोर्ड पहायला मिळतात. पण गंमत अशी की हे सर्व टपरी/गाडीवालेच असतात. एखाद्या चांगल्या होटेलमध्ये अजुनही हा प्रकार मेनुमध्ये मला दिसला नाहीये. पण डोसा मात्र असतो अफलातून. आणि टपरी/गाडीवर खाणे मला फारसं आवडत नाही, म्हणून घरी करुन बघायचा ठरला. आंतरजालावरून ३-४ ठिकाणी मिळालेल्या पाककृतींच्या आधारावर घरी करुन बघायचा घाट घातला. आणि आश्चर्य म्हणजे कुठेतरी वाचून केलेला हा प्रकार कधी नव्हे तो खूपच यशस्वी ठरला. इतका की मिपावर शेअर केल्याशिवाय राहवेना..
साहित्य-
१/२ वाटी साबुदाणे
१/२ वाटी उडिद डाळ
१ वाटी जाडे पोहे
४ वाट्या तांदूळ
१५-२० मेथीचे दाणे
हे प्रमाण साधारण ३-४ जणांसाठी पुरेसे ठरते.
कृती-
हे सर्व कमित कमी ५ तास भिजत ठेवणे.
नंतर मिक्सरमध्ये एकदम बाsssरीक वाटून घेणे. जराही रवाळ रहाता नये.
त्यात एक छोटा चमचा खाण्याचा सोडा व मीठ घालून ढवळून उबदार जागेत रात्रभर ठेवणे.
डोसा करण्यापूर्वी यात थोडे पाणी घालून पातळ करुन घ्यावे.
इतके पातळ की तव्यावर ओतल्यावर २-३mm जाड आपोआत पसरले जाईल. वरुन वाटीने पसरावे लागता नये. नाहीतर टेक्श्चर नीट येत नाही.
डोसा तव्यावर घालताना तवा खूप तापलेला असु नये. अन्यथा डोसा नीट पसरत नाही. डोसा घातल्यावर लगेच गॅस मोठा करावा.
डोसा सुकत आल्यावर वरुन लोणी घालावे. शक्यतो पांढरे लोणी वापरावे.
वरील बाजू पूर्ण सुकल्यावर एकदाच डोसा उलटावा. मागील बाजूला असा रंग व टेक्श्चर दिसेल.
लगेचच डोसा काढुन चटणी/सांबार याबरोबर सर्व्ह करावा.

वाचने
95116
प्रतिक्रिया
100
मिसळपाव
प्रतिक्रिया
जबरदस्त!
जबरदस्त दिसतो आहे तो शेवटचा
मस्त !
दावणगिरि... :प
ओह्ह्ह्ह... काय सही दिसतोय
मस्त!
तेल अजिबात जास्त लागलं नाही..
In reply to मस्त! by अनन्न्या
मस्तच.
छानच.
सहि आहे
मस्त जमले आहेत डोसे.
मस्त
मस्तच..
वाह
लगेच साबुदाणे आणते. अगदी भारी
अच्छा! असाही काही डोसा असतो
मस्त..
पाककृती आणि फोटो ... दोन्हीही
दावणगीरी डोसा खुप आवडतो..
शेवटच्या फोटोतला डोसा अगदी
मस्त दिसतोय डोसा.
मस्त ...!
मस्त ...!
झक्कास !
आह्हा!
सेट डोसा बर्याच हॉटेलातदेखिल
In reply to आह्हा! by लॉरी टांगटूंगकर
ओक्के... म्हणजे याचे पीठ
अरे वा..
भारीच !!
अप्रतिम!
अत्ताच जेवान जालं...आनी ह्यो
जबरी १ नंबर...सकाळी सकाळी
आज हे दोसे केले होते. मऊ,
एक लिहायचे राहिले..
In reply to आज हे दोसे केले होते. मऊ, by रेवती
हो. नंतर सोडा घातला आणि
In reply to एक लिहायचे राहिले.. by बाळ सप्रे
मटकी/मसूर/धान्ये जेव्हा भीजत
In reply to एक लिहायचे राहिले.. by बाळ सप्रे
शेवटचा फोटो एकदम जीवघेणा आलाय.
गेल्या आठवड्यात करुन पाह्यले.
अजून एक...
In reply to गेल्या आठवड्यात करुन पाह्यले. by सूड
वाटीने नाही तर कसा पसरवायचा?
In reply to गेल्या आठवड्यात करुन पाह्यले. by सूड
मी डोसे करते तेव्हा तवा हलवत,
In reply to वाटीने नाही तर कसा पसरवायचा? by जातवेद
म्हणजे चांगला नॉनस्टिक तवा
In reply to मी डोसे करते तेव्हा तवा हलवत, by शुचि
होय होय बरोबर!
In reply to म्हणजे चांगला नॉनस्टिक तवा by जातवेद
>>वाटीने नाही तर कसा पसरवायचा
In reply to वाटीने नाही तर कसा पसरवायचा? by जातवेद
डोसा
भात किंवा...
In reply to डोसा by पद्माकर टिल्लु
मी सोडा न घालताच केले होते..
कुहुप चहान जमेलेलेले आहे.
In reply to मी सोडा न घालताच केले होते.. by स्मिता चौगुले
दह्न्य झलो हे वह्चुन,
In reply to कुहुप चहान जमेलेलेले आहे. by बालगंधर्व
केले होते..... आवडले.
"पाककृती/फोटो आवडले" याबरोबरच
वाह....
फक्त वरुनच लोणी घालयच.. बटर
In reply to वाह.... by दिपक.कुवेत
करुन पाहिला.
छान रेसिपी. मीपण करुन पाहिला.
मला पण भारी आवडला होता हा
मीहि करून बघितला, छानच झाला.
दावणगिरी हे कर्नाटकातील एक
In reply to मीहि करून बघितला, छानच झाला. by अनिता ठाकूर
अहो काही गाडेवाले त्याला
In reply to दावणगिरी हे कर्नाटकातील एक by बाळ सप्रे
तंतोतंत कृती बरहुकूम करून
आयला!! जंगली महाराज
आज करुन पाहिला,अप्रतिम झालेला
सहि!!!
In reply to आज करुन पाहिला,अप्रतिम झालेला by जोशी 'ले'
sundar pakkruti. khupach
घरी करुन पाहिला
मस्तं झाला
आईच्यान्!!!!!!!!!!!!! काय
In reply to मस्तं झाला by सानिकास्वप्निल
@ उद्याचं लंच आंध्रा मेशीत
In reply to आईच्यान्!!!!!!!!!!!!! काय by बॅटमॅन
आंध्र अन मद्राशी मेस.. रास्ता
In reply to @ उद्याचं लंच आंध्रा मेशीत by अत्रुप्त आत्मा
लगेच धान्ये भिजत घालते.
In reply to मस्तं झाला by सानिकास्वप्निल