✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

महाराज

स
संजय क्षीरसागर यांनी
गुरुवार, 04/25/2013 - 07:28  ·  लेख
लेख
श्री निसर्गदत्त महाराज या औलीयाची तुम्हाला ओळख व्हावी म्हणून हा लेख. एक अत्यंत सामान्य माणूस सुद्धा सिद्ध होऊ शकतो याचा दाखला म्हणजे महाराज. आपल्याला त्यांच्या जीवनात डोकावण्याच कारण नाही. ते सामन्याहून सामान्य होते, त्यांची शैक्षणिक, आर्थिक किंवा कौटुंबिक स्थिती फारशी आशादायक नव्हती इतकी माहिती पुरेशी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते मराठी होते. त्यांनी स्वतः तपासलेलं आणि त्यांच्या सिद्धत्वाची अपूर्व झलक दाखवणारं एकमेव पुस्तक म्हणजे 'सुखसंवाद'. साधकांच्या विविध प्रश्नांना समोरासमोर दिलेल्या उत्तरांच ते संकलन आहे. महाराज महाराज कोणत्या साधनेनं सिद्धत्वाला पोहोचले हे जाणणं उपयोगी आहे. शांत बसून 'मी आहे' या जाणिवेवर स्थिर राहणं ही एकमेव साधना त्यांना बोधाप्रत घेऊन गेली. त्यांच्या शब्दात :'मी आहे' या शुद्ध असण्यावर मन एकाग्र करणे आणि त्यातच राहाणे ही गुरूंची सूचना मी पाळली. केवळ 'मी आहे' ही जाणिव मनात धरून मी तासंतास बसत असे. लवकरच शांती, आनंद आणि सखोल सर्वव्यापी प्रेम ही माझी सहजस्थिती बनली. त्या स्थितीत मी, माझे गुरू, माझे रोजचे जीवन आणि सभोवतालचे जग सारे अदृश्य झाले. केवळ शांती आणि अथांग मौन उरले.(सुखसंवाद - ५१) 'जागणे, झोपणे आणि परत जागणे सतत चालू असते पण हा अवस्था पालट मला घडत नाही. त्या अवस्था फक्त घडतात एवढेच. मला केव्हाच काही घडत नाही. काहीतरी अपरिवर्तनीय, गतिहीन, स्थिर, सुमेरूवत, खडकासारखे अभेद्य आहे. घनदाट सच्चिदानंद स्वरूप आहे. मी त्या वेगळा कधीच नसतो. कोणताही छळ किंवा आपत्ती मला स्वरूपापासून विचलित करू शकणार नाही. ही अवस्था संपूर्ण स्थिर आणि कायमची आहे. मी काही केले तरी ती सुमेरूवत स्थिर असते. एकदा तुम्हाला सत्यस्वरूपाची प्रचिती आली की तुम्ही त्यात स्थिर होता'. (सुखसंवाद -४२) या गृहस्थाचा आत्मविश्वास कमाल आहे आणि त्यांचे शब्द प्रत्येक साधकाला अपरिमित दिलासा आहेत. ते म्हणतात : 'मी आहे' हा साधा भाव सर्वात उत्तम. त्यावर धीमेपणानं स्थिर राहा. येथे धीमेपणा हा सुज्ञपणा आहे. अपयशाचा विचार करू नका. या कार्यात अपयश येऊच शकत नाही'. (सुखसंवाद - ५१) 'मी तुम्हाला परत सांगतो, तुम्ही सर्वव्यापी, सर्वातीत, सदवस्तू आहात - त्याप्रमाणे वागा. विचार, भावना, कृती ऐक्याने होऊ द्या. मग मी जे म्हणतो त्याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला येईल. प्रयत्नाची गरज नाही. विश्वास ठेवा आणि त्याप्रमाणे वागा'. (सुखसंवाद - ५१) 'मी सध्या चौऱ्याहत्तर वर्षांचा आहे तरी मी चौऱ्याहत्तर वर्षांपूर्वीचे अर्भक आहे. मला स्पष्ट जाणवते की सर्व बदल होऊनही मी ते मूल आहे. माझ्या गुरूंनी मला सांगितले, "आत्ता देखील जे मूल तू आहेस तेच तुझे स्वरूप आहे. 'मी हे आहे' किंवा 'मी ते आहे' अशा कल्पनेमुळे बिघडण्यापूर्वी 'मी आहे' हे जेथे अजून शुद्ध आहे, अशा शुद्ध असण्याच्या स्थितीत मागे जा". तुमचे ओझे तुमच्या खोट्या तद्रूपतेमुळे आहे. त्याचा त्याग करा'. (सुखसंवाद - ५१) _______________________________ रोजच्या जगण्यातल्या प्रश्नांची उत्तरं सिद्ध कशी देतो, तो कसं जगतो हे सुखसंवादाच्या निमित्तानं आपल्याला कळू शकतं. आगदी आपल्यातलामाणूस आपल्याला सांगतोय असे हे संवाद आहेत. कोणताही सिद्ध तीन गोष्टी साधत असतो : एक, तुम्हीच सत्य आहात हे तुम्हाला सांगणं; दोन, आपण सत्य नाही असं वाटण्याला तुमच्या ज्या धारणा कारणीभूत आहेत त्या दूर करणं आणि तीन, सत्य आणि आपण यांची स्वतःच्या प्रतिभेनं सांगड घालून देणं! सत्य जरी एक असलं आणि अनेकांनी ते अनेक प्रकारे सांगितलं असलं तरी ज्या सिद्धाशी आपलं ट्युनिंग जमतं तो आपल्याला भावतो. 'स्व'चा गौरव महाराज कसा करतात ते पाहा : प्रथमच तुम्ही जाणले पाहिजे की प्रत्येक गोष्टीचा, तुमचा स्वतःचा देखील पुरावा तुम्हीच आहात. तुमचे अस्तित्व कोणी सिद्ध करू शकत नाही कारण त्याच्या अस्तित्वाला प्रथम तुम्हीच बळकटी आणली पाहिजे. तुमच्या असण्याबद्दल आणि जाणण्याबद्दल तुम्ही कोणाचे देणे लागत नाही. तुमच्या लक्षात असू द्या की तुम्ही संपूर्णपणे स्वयंसिद्ध आहात. तुम्ही कोठून येत नाही किंवा कोठे जात नाही. तुम्ही कालातीत असणे आहात, जाणिव आहात. (सुखसंवाद - ३७) सिद्धत्वाच्या स्थितीचं ते किती साधेपणानं वर्णन करतात ते पाहण्यासारखं आहे : 'मी जगाशी एकरूप आहे तरीही त्यापलिकडे आहे असे जाणल्यामुळे मी सर्व भीती आणि इच्छा यापासून मोकळा झालो. मोकळा व्हावे असे मी बुद्धिने ठरवले नाही. मला असे अढळले की मी अनपेक्षितपणे, विनासायास मोकळा आहे. तेंव्हापासूनच इच्छा आणि भिती यांचापासूनची ही मोकळीक टिकून आहे. आणखी मला असे अढळले की मी प्रयत्न करण्याची जरूरी नाही. विचारामागोमाग घटना विनाविलंब आणि अविरोधपणे घडते. विचार स्वयंपूर्ण होतात. सर्व गोष्टी योग्य रितीने आणि सहजपणे जमून जातात. मुख्य बदल मनात झाला. मन गतिहीन, मौन झाले. ते जलद प्रतिसाद देते पण प्रतिसादाला चिरस्थायी करू पाहात नाही. स्वयंस्फूर्ती हीच जीवनपद्धती झाली. खरे नैसर्गिक झाले आणि नैसर्गिक खरे झाले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अपरंपार स्नेह, दुर्बोध आणि शांत सर्वप्रकाश, सर्वव्यापी प्रेम, स्वयंसिद्ध झाले आणि त्यामुळे सर्व चित्तवेधक, सुंदर, अर्थपूर्ण आणि प्रेम करण्याजोगे बनले. (सुखसंवाद - ५७) _______________________________ अहंकार या सर्वात मोठ्या गैरसमजाबद्दल महाराज काय सांगतात ते अफलातून आहे : 'अमकातमका मी ही कल्पनाच फोल असल्यामुळे ती सातत्य चाहते. आपले नित्यस्वरूप मात्र असतेच त्याला सातत्याची गरज नाही. पण ' मी अमकातमका ' असे मानल्यामुळे ती भावना घट्ट टिकवून ठेवण्यासाठी आपण ती वागवेल तसे वागतो. तिच्या मर्जीशिवाय कुठलाही व्यवहार तिला कबूल नसतो. क्षणोक्षणी ती वेगळे रूप घेते आणि आपला व्यवहार नित्य, अखंडीतपणे चालूच ठेवते. ही अनर्थकारी परंपरा कायमची थांबवण्यासाठी मी अमकातमका ही कल्पना एकदाच कायमची सोडणे हाच एक रामबाण उपाय आहे. देह आणि देहाचे नांव याचा अंगीकार केला नाही, ती कल्पना सांडली तर स्वच्छ आपण, केवळ ज्ञान तेच शिल्लक राहते. अमूकतमूक म्हणून जाण नव्हे तर केवळ ज्ञान.' (सुखसंवाद - ६३) _________________________________ मला वाटतं, न्यूनगंड हा अहंकाराचा सर्वात गहन पैलू आहे. मानवी अस्वास्थ्याचं ते मूळ कारण आहे. महाराज किती सहजपणे त्याचं निराकरण करतात ते पाहण्यासारखं आहे : साधकानं विचारलंय ' मी काय शिकावे बरे? ' महाराज उत्तरतात : ' निश्चिंतपणे जगणे. ह्यासाठी तुम्ही जाणले पाहिजे की तुमचे स्वरूप अजिंक्य, निर्भय आणि सदाविजयी आहे. एकदा तुम्ही निश्चितपणे जाणले की आपल्या कल्पनेखेरिज कोणीच आपल्याला त्रास देऊ शकत नाही, मग तुम्ही आपल्या इच्छा, भिती, पूर्वधारणा याकडे दुर्लक्ष करता आणि केवळ सत्याने जीवन जगता' (सुखसंवाद - २९) _____________________ कुणालाही स्वत:प्रत आणतील अशी त्यांची ही वक्तव्यं अफलातून आहेत : 'शाश्वताला जाणणे म्हणजे शाश्वत होणे, संपूर्ण होणे, विश्वातील सर्वासहित विश्वरूप होणे. प्रत्येक घटना ही संपूर्णाचा परिणाम आणि व्यक्तता असते आणि संपूर्णाशी तिचा मूलभूत मेळ असतो. संपूर्णाचा सर्व प्रतिसाद योग्य, प्रयत्नरहित आणि तात्कालिक असतो. ' (सुखसंवाद - १७) 'आपल्या असण्याबद्दल पूर्णपणे जागृत राहा म्हणजे तुम्ही जाणिवपूर्वक आनंदात राहाल. तुम्ही आपले मन जे तुम्ही जे नाही त्याकडे लावता त्यामुळे तुम्ही सुस्थितीची, खुशालीची जाणिव गमावून बसता.' (सुखसंवाद - २५) ' स्वतःला जाणायचे आहे असे तुम्ही म्हणता. तुम्ही स्वतःच आहात, तुम्ही जे आहात त्या वेगळे तुम्ही असूच शकत नाही. जाणणे असण्याहून वेगळे असते काय? स्वतःची व्याख्या आणि स्वतःचे वर्णन करण्याचा प्रयत्न केल्याखेरीज तुम्ही स्वतःच्या असण्यानेच स्वतःला जाणू शकता. (सुखसंवाद - ९९) ____________________________________ साधकाला निश्चित दिशा देणारं त्यांचं हे उत्तर उद्धृत करून लेख संपन्न करतो. एका साधकानं विचारलंय : 'अध्यात्मिक प्रगतीची लक्षणं कोणती? ' आणि महाराज अत्यंत सहजपणे सांगतात : ' निश्चिंतपणा, आराम, आनंदाची जाणिव, अंतर्यामी सखोल शांती आणि बाहेर भरपूर उत्साह!' (सुखसंवाद - ८९) (लेख मनोगतवर पूर्वप्रकाशित)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धर्म
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
30783 वाचन

💬 प्रतिसाद (107)

प्रतिक्रिया

का बरं?

राजेश घासकडवी
Sat, 04/27/2013 - 23:30 नवीन
जे विचारायचंय ते लगेच, आता, इथेच विचारा.
कशानेच काहीही फरक पडत नसेल, आणि कधीही काहीही होत असेल, तर हा आग्रह का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

कशानेच काहीही फरक पडत नसेल, आणि कधीही काहीही होत असेल,

संजय क्षीरसागर
Sun, 04/28/2013 - 11:05 नवीन
तर हा आग्रह का?
अशी विचारणार्‍याची चित्तदशा असेल तर त्याचं जीवन निष्प्रश्ण झालंय. ही इज रेडी फॉर एनीथिंग अँड नथींग अफेक्टस हिम. ते स्वरूपात स्थिर झालेल्याचं लक्षण आहे. पण त्यांना चर्चा करायची आहे म्हणजे ही नीडस सम क्लॅरिफिकेशन. अशा परिस्थितीत व्हाय नॉट नाऊ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

हा प्रश्न त्यांच्याविषयी

राजेश घासकडवी
Sun, 04/28/2013 - 18:34 नवीन
हा प्रश्न त्यांच्याविषयी नव्हता. त्यांनी म्हटलं की सावकाश बोलू. घाई तुम्हीच करत आहात. मुद्दा असा, की तुम्ही त्या स्वरूपात स्थिर झाला नाही आहात. जे घडतंय त्याचा तुमच्यावर परिणाम होतो. म्हणूनच महाराजांच्या तत्वज्ञानाप्रमाणे तुम्ही स्वतःचा 'मी अमुक आहे' पासून तुमची मुक्ती झालेली नाही असं सांगायचं होतं. 'मी जगाला शहाणं करून सोडणारा आहे' अशी तुमची स्व-प्रतिमा तुमच्या प्रतिसादातल्या घाईवरून दिसली. तेवढीच दाखवून द्यायची होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

अर्थ तुमचा आहे

संजय क्षीरसागर
Sun, 04/28/2013 - 22:24 नवीन
मी त्यांना प्रामाणिकपणे `लगेच विचारा म्हटलं' कारण सत्य आता, इथे आहे, `नंतर' नाही. तप्तरतेचा अर्थ अहंकार होत नाही. माझ्या लेखनाची संपूर्ण जवाबदारी मी घेतो त्यामुळे इथले प्रश्न इथेच विचारले जावेत इतकीच अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

अहंकार नाही, आत्मप्रतिमा

राजेश घासकडवी
Sun, 04/28/2013 - 23:22 नवीन
अहंकाराचा प्रश्नच येत नाही. स्वतःची प्रतिमा बाळगण्याबद्दलच हे सगळं आहे. महाराज म्हणतात की सगळ्याच स्वप्रतिमा टाळा. नुसते असा. आता तुम्ही 'स्वतःच्या लेखनाची जबाबदारी घेणारा' ही प्रतिमाही बाळगून आहातच की. जगाकडून किंवा इतरांकडून अपेक्षाही आहेत. म्हणजे तुम्ही त्या आदर्श अवस्थेला पोचलेला नाहीत आणि शिवाय आपण पोचलेलो नाही याची जाणीव तुम्हाला नाही. अनेक तत्वज्ञ 'इच्छा सोडा, म्हणजे तुमचं भलं होईल' असं अनेकांना ठणकावून सांगतात. लोकं मानाही डोलवतात. पण त्या सांगणाऱ्याने आपली सांगण्याची इच्छा सोडलेली नाही हे त्यांच्या लक्षात येत नाही. 'स्वतःला जगण्याचं अंतिम ज्ञान झालंय' ही आत्मप्रतिमाही सोडलेली नाही. ही विसंगती दाखवायची होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

स्वप्रतिमा आणि अहंकार दोन्ही एकच

संजय क्षीरसागर
Mon, 04/29/2013 - 11:26 नवीन
आपल्या अहंकाराविषयी कल्पना गमतीशिर आहेत. आता मी उत्तरं दिलं तर तुम्ही म्हणणार माझ्यावर परिणाम झाला आणि नाही दिलं तर अर्थ काढणार, तुमच्या निष्कर्शाला माझ्याकडे उत्तर नाही! सत्य गवसलेला देहात आहे तोपर्यंत त्याची व्यक्ती वैशिष्ठ्य राहणारच. महाराज भर प्रवचनात विड्या ओढायचे. ज्याचं लक्ष विडीकडे आहे तो म्हणेल, साधी विडी सोडता येत नाही आणि स्वतःला सिद्ध म्हणवतात. आणि जो सत्य शोधतोय त्याचं लक्ष वक्तव्याकडे असेल. फरक महाराजांना पडत नाही, बघणारा वंचित राहतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

???

सामान्य वाचक
Mon, 04/29/2013 - 11:48 नवीन
माझ्या सध्या प्रतिसादावर इतका भडीमार पाहून माझी चर्चा करायची इच्छा संपली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

पुढचा भाग कधी..?

मोदक
Mon, 04/29/2013 - 11:51 नवीन
पुढचा भाग कधी..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

बरं बुवा, तुमचंच खरं.

राजेश घासकडवी
Tue, 04/30/2013 - 03:12 नवीन
अहंकार हा शब्द मी वापरला नव्हता, तो तुम्हीच माझ्या तोंडी भरत आहात. मी मला काय म्हणायचं ते स्पष्ट केलं, तुम्ही लेबलं लावत बसायचं तर बसा. उत्तर दिलं तरी पंचाइत आणि नाही दिलं तरी पंचाइत, यातूनच हा प्रश्न अनुत्तरणीय आहे हे लक्षात येत नाही का? तेवढं कबुल केल्याबद्दल धन्यवाद. माझा मुद्दा असा आहे की कसलीच इच्छा न करता 'निव्वळ असणं' हे केवळ कोमातल्या व्यक्तीला शक्य आहे. असो. ही चर्चा माझ्याकडून थांबवावी म्हणतो. तुमचं चालू द्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

हा प्रश्न अनुत्तरणीय आहे हे लक्षात येत नाही का?

संजय क्षीरसागर
Tue, 04/30/2013 - 10:39 नवीन
उत्तर खाली दिलंय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

वाचतोय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 04/28/2013 - 11:49 नवीन
लेख आणि प्रतिसाद वाचतोय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

इथे ग्लिफ आणि प्यारेची जुगलबंदी झालीये त्याविषयी थोडं लिहीतो

संजय क्षीरसागर
Sun, 04/28/2013 - 15:15 नवीन
सर्वात महत्त्वाच म्हणजे या प्रतिसादाचा त्या दोघांशी काहीएक संबंध नाही. तर त्यांनी मांडलेल्या अध्यात्मिक विचारप्रणालीशी आहे. आणि हा प्रतिसाद त्याच स्पिरिटनं वाचला जावा. कुणी सत्य शोधावं, कसं शोधावं किंवा शोधू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी फक्त माझं आकलन मांडतोय. त्यांच्या विचारांचा प्रतिवाद करत नाही. ग्लीफनं म्हटलंय :
सर्वप्रथम, मी साधक नाही. प्रयोग तर अजिबात करत नाही. किम्बहुना जर का या धाग्यावरील माझे प्रतिसाद आपण खरोखरच वाचले असतील तर मुळातच माझा "डिफॉल्ट स्टेट" वगैरे वगैरे गाठण्यासाठी आपण प्रयत्न(जागे वा झोपलेले असताना) करावयाचे असतात या संकल्पनेवरच मुळात विश्वास नाही/विरोध आहे
`बाय डिफॉल्ट' हे सत्याविषयी माझं आकलन आहे. आजपर्यंत अध्यात्मात हा शब्द वापरला गेलेला नाही. याचं कारण म्हणजे हा शब्द तितकासा प्रचलित नव्हता आणि दुसरं म्हणजे कंप्युटरमुळे आज तो लोकांना जितका चटकन समजू शकेल तसा पूर्वी समजण्याची शक्यता नव्हती. तर मुद्दा असाये : सत्य ही मिळवण्याची गोष्ट नाही, ती स्थिती आहे. त्यामुळे कोणतीही क्रिया किंवा साधना तुम्हाला सत्याप्रत नेऊ शकत नाही. थोडक्यात थांबणं, तुम्ही चालण्यातनं जाणू शकणार नाही. त्यामुळे भक्तीमार्ग तंत्रमार्ग, योगसाधना, ध्यानधारणा, परिक्रमा किंवा कशानंही सत्याचं आकलन अशक्य आहे... इथे जरा विस्तार आवश्यक आहे. सत्य ही स्थिती बाय डिफॉल्ट आहे. म्हणजे कोणताही सिद्ध येवो, जावो; तुम्ही साधना करा किंवा करू नका, पृथ्वी फिरो किंवा थांबो, दिवस असो की रात्र, इथे काय की चंद्रावर सत्य असेलच. सत्य सर्व आकार अंतर्बाह्य व्यापून आहे. त्यामुळे मुळात आपणही सत्यच आहोत. आपण स्वतःला व्यक्ती समजतो म्हणून स्थितीचा उलगडा होत नाही इतकंच. साधना सत्यप्राप्तीसाठी नाही कारण सत्य तर ऑलरेडी आहेच. साधना आपण व्यक्ती आहोत या भ्रमातून मुक्त होण्यासाठी आहे. ज्या क्षणी आपण व्यक्ती नाही हा उलगडा होतो त्याच क्षणी आपण सत्य आहोत हा उलगडा होतो. त्यामुळे साधना करावी किंवा नाही हा खरा प्रश्न नसून साध्य काय आहे हा आहे. जर कुणी देव भेटेल, प्रसन्न होईल, त्याची कृपा आपत्ती दूर करेल अशा हेतूनं साधना करेल तर तो स्वतःला भ्रमात नेतोय कारण देव ही त्याचीच कल्पना आहे. त्यामुळे साधना तुमचा व्यक्तीमत्वाचा भ्रम दूर करते का हा खरा सवाल आहे. प्यारेनं दुसरी बाजू मांडलीये :
प्रयत्न, साधना, धारणा अथवा कुठलीही कृती ह्या सगळ्या सहकारी साधना आहेत. सगुणाचेनि आधारे, निर्गुण पाविजे निर्धारे असा विचार आहे. मी ध्यान करतो ही देखील कृत्रिम साधना आहे, पण इथे ह्या सगळ्याची गरज आहे. लक्षावधी लोकांमध्ये एखादाच रमण महर्षी असतो ज्यांना काहीही न करता म्हणजे (काहीही न करण्याची 'कृती' करुन) ज्ञान झालं. इथं लक्षात घ्यायला हवं की सिद्धावस्था म्हणजे आत्यंतिक शांतीची, सुखाची नि आनंदाची स्थिती ही अशीच मिळत नसते, ती कमवावी लागते मात्र त्या साठीच्या आधीच्या साधना कराव्याच लागतात. न करता अशी स्थिती येत असेल तर त्याला आत्ता न दिसणारं मात्र पूर्वी कधीतरी केलेलं पूर्वसंचित फळाला येण्याची वेळ यावी लागते.
हा लूप आहे. पहिली गोष्ट, सर्व स्मृती मेंदू व्यतिरिक्त कुठेही नाही आणि माणूस गेल्यावर ती हार्डडिस्क संपूर्ण फॉरमॅट होते. त्यामुळे पूर्वजन्म, त्याचं सुकृत वगैरे निव्वळ कल्पना आहेत त्यांना काही एक आधार नाही. दुसरी गोष्ट, रमणांना साधना न करता उलगडा झाला म्हणजे त्यांनी मागल्या जन्मी साधना केली होती असं नाही. त्याचा अर्थ फक्त इतकाच की त्यांचा व्यक्तिमत्वाचा भ्रम साधना न करता दूर झाला. ही वॉज अ‍ॅन एक्सेप्शन आणि अगेन, एक्सेप्शन प्रूव्हज द रूल. सिद्धत्वानंतर बुद्धाला साधक म्हणाले : तुम्ही अपूर्व आहात, अशी घटना करोडोत एखादी घडते. त्यावर बुद्ध म्हणाला, मी अपूर्व नाही, इतकी साधी, सोपी, सतत समोर असलेली गोष्ट तुम्हाला कशी दिसत नाही याचं मला आश्चर्य आहे.
  • Log in or register to post comments

हो माऊली. चूक पदरात घ्या.

प्यारे१
Sun, 04/28/2013 - 19:03 नवीन
हो माऊली. चूक पदरात घ्या. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

माव्लि लै मुडी हैत.

अग्निकोल्हा
Sun, 04/28/2013 - 22:06 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

इथे संजय क्षीरसागर आणि अत्रुप्त आत्माची कडाक्याची जुगलबंदी झाली

अग्निकोल्हा
Sun, 04/28/2013 - 17:45 नवीन
इथे संजय क्षीरसागर आणि अत्रुप्त आत्माची कडाक्याची जुगलबंदी झालीये त्याविषयी थोडं... सर्वात महत्त्वाच म्हणजे या प्रतिसादाचा त्या दोघांशी काहीएक संबंध नाही. तर त्यांनी मांडलेल्या विचारप्रणालीशी आहे. आणि हा प्रतिसाद त्याच स्पिरिटनं वाचला जावा. कुणी सत्य शोधावं, कसं शोधावं किंवा शोधू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी फक्त माझं आकलन मांडतोय. त्यांच्या विचारांचा प्रतिवाद करत नाही. अत्रुप्त आत्मानं म्हटलंय :
अग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गा.................
हा आत्मा आहे, तो स्थल काल शरीर याला बांधला गेलेला नाही मुक्तआहेच पण तरीही अत्रुप्त म्हणुन वावरतो ? आता हे कसे ठरणार ? तर लॅक ऑफ क्लॅरीटी. ति त्याच क्ष्णी येते जेव्हां अग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गा होते. संजय क्षीरसागरनं म्हटलंय :
जे लिहीलय तो माझा अनुभव आहे. नुसते उतारे कॉपी-पेस्ट केलेले नाहीत. माझा आयडी केव्हाही ब्लॉक होऊ शकतो. तो अजून चालू कसाये हेच आश्चर्य आहे. आणि मजा म्हणजे इतक्या अनिश्चिततेत मी शांतपणे लिहीतोय. वॉट एल्स कॅन बी अ प्रूफ ऑफ द स्टेट दॅट आय एम टॉकिंग अबाऊट? यू मे लूज अ लव्हली अपरच्युनिटी दॅट हॅज कम योर वे, अँड दॅट टू जस्ट फॉर फ्री.
इथे प्रश्न आयडी ब्लॉक व्हायचा नसुन अग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गाग्गा का म्हटले नाही हा येतो. लहानपणी गोश्टी वाचली होती गौतम बुध्द अन वाल्या कोळीची. बुध्दाला त्याने बोल लावले पण बुध्द मात्र शांतच बघुन त्याने प्रश्न केला की मी इतके डिवचुनही आपण शांत कसे ? बुध्दांनी फार सहज म्हटल तु मला एखादि गोश्ट देउ केलित अन मी ती घेतली नाही तर ती कोणाकडे बरे राहिल ? वाल्या म्हणाला माझ्याकडेच............. बिंगो. नेमकी हीच तर गंमत आहे... आज जिथे तिथे देणारे उगवलेत... समोरच्याला ते हवय का नको याचा विचारकराणारे अजिबात नाहीत अन हिच खरी "मी" (शाना) आहेची साधना होय. सर्व सत्य अवतरते. झकास क्लॅरीटी निर्माण करता येते मग जागे असा वा झोपलेले. लॉगीन असा वा गंडलेले... एकदा हा उलगडा झाला की प्रतिसाद लिहायला पुन्हा कशाचीच गरज उरता नाही. उचलला हात फोडला किबोर्डवर बस इतकच... एकदा तुम्ही निश्चितपणे जाणले की आपल्या कल्पनेखेरिज कोणीच इतरांना त्रास देऊ शकत नाही, मग तुम्ही आपल्या इच्छा, भिती, पूर्वधारणा याकडे दुर्लक्ष करता आणि केवळ याच सत्याने छळायला सुरुवात करता...
  • Log in or register to post comments

ग्लिफ, प्रश्न तुम्ही विचारले आहेत

संजय क्षीरसागर
Sun, 04/28/2013 - 22:57 नवीन
प्रतिसादात बुद्धाची जी गोष्ट तुम्ही सांगताय तो संदर्भ वेगळा आहे. बुद्धानं ते अपशब्दांबद्दल म्हटलं होतं की मी घेतलेच नाहीत तर देणार्‍याकडे राहतील. स्वतःच्या निरूपणाविषयी नाही. आणि इथे अपशब्दांचा प्रश्नच नाही. तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी उत्तर दिलं. तुम्ही ते घ्या किंवा सोडून द्या, यात छळण्याचा किंवा अहंकाराचा प्रश्न कुठे येतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

मला (मिपावरील)

jaypal
Sun, 04/28/2013 - 19:05 नवीन
पाषवी षक्तिंना वश करायच आहे. अघोरी उपासना असली तरी चालेल. कुणी मदत करील का? मदत.....
  • Log in or register to post comments

ग्लिफ यांची मतं चक्क

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 04/28/2013 - 22:14 नवीन
ग्लिफ यांची मतं चक्क पटन्यासारखी आहेत म्हणजे वाचक म्हणून प्रतिसाद आवडले. (डोक्यावर परिणाम झाला आहे का वगैरे असे व्यक्तिगत रोखाचे प्रतिसाद सोडले तर) दाद द्यावे असे प्रतिसाद. धन्स -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

-

अमोल केळकर
Mon, 04/29/2013 - 10:46 नवीन
छान माहिती :) अमोल केळकर
  • Log in or register to post comments

लेख मस्तच अहे. खुप आवडला..

रितुश्री
Mon, 04/29/2013 - 12:04 नवीन
"'अमकातमका मी ही कल्पनाच फोल असल्यामुळे ती सातत्य चाहते. आपले नित्यस्वरूप मात्र असतेच त्याला सातत्याची गरज नाही. पण ' मी अमकातमका ' असे मानल्यामुळे ती भावना घट्ट टिकवून ठेवण्यासाठी आपण ती वागवेल तसे वागतो. तिच्या मर्जीशिवाय कुठलाही व्यवहार तिला कबूल नसतो. क्षणोक्षणी ती वेगळे रूप घेते आणि आपला व्यवहार नित्य, अखंडीतपणे चालूच ठेवते. ही अनर्थकारी परंपरा कायमची थांबवण्यासाठी मी अमकातमका ही कल्पना एकदाच कायमची सोडणे हाच एक रामबाण उपाय आहे. " "आपल्या असण्याबद्दल पूर्णपणे जागृत राहा म्हणजे तुम्ही जाणिवपूर्वक आनंदात राहाल. तुम्ही आपले मन जे तुम्ही जे नाही त्याकडे लावता त्यामुळे तुम्ही सुस्थितीची, खुशालीची जाणिव गमावून बसता."" हे एकदमं खरे .... मनाला पटते... पण ऱोजच्या जीवनात असे वागणे केवळ अशक्य होते.... :(
  • Log in or register to post comments

महाराज भर प्रवचनात विड्या

अग्निकोल्हा
Mon, 04/29/2013 - 12:49 नवीन
महाराज भर प्रवचनात विड्या ओढायचे. ज्याचं लक्ष विडीकडे आहे तो म्हणेल, साधी विडी सोडता येत नाही आणि स्वतःला सिद्ध म्हणवतात. आणि जो सत्य शोधतोय त्याचं लक्ष वक्तव्याकडे असेल. फरक महाराजांना पडत नाही, बघणारा वंचित राहतो.
एका एणारायचा घरातला हा खरोखर घडलेला किस्स्सा, सालाबादापर्माने त्याची आइ ५ महिन्याचा विसा मंजुर होउन उसगावात नातवाला भेटायला आली. नातवाचा समवयस्क मित्र (१२-१४ वय साधारण) अधुन मधुन घरी असायचा जेव्हां यांची कसलीशी धार्मीक पोथी का काही पुस्तक वगैरे वाचनही चालु असायच. आपल्या मित्राची ग्रॅनी असं रोज एकच पुस्तक सारख काय वाचत असते याचे त्या छोटा गोर्‍याला फार फार कुतुहल. एकदा शेवटी त्याने ते पुस्तक मागितलं बघायला. यांनीही फार प्रेमान दिलं... आत काय लिहलय समजायचा प्रश्नच न्हवता पण कव्हर बघुनच पोराला फेफरं आलं. त्या नंतर तो मुलगा परत कधिही घरामधे खेळायला आला नाही... ३-४ आठवड्यात एणारायला ही बाब लक्षात आलि जेव्हां त्या उसगावमधील पोराचा बाप याला वाटेत भेटला... याने सहज विचारला तुमचा डेनीस द मेनिस आजकाल आमच्या चिंटुकडे येत नाही खेळायला ? बोलावे की नको या संभ्रमात असतानाच तो बोलुन गेला डेनीस द मेनिस म्हणतो चिंटुज ग्रॅनी इज रिडींग सेक्सी बूक. आय सॉ अ नेकेड मॅन ऑन कव्हर पेज, हु अल्सो स्मोक पॉट/ युजिंग नार्कोटिक्स ? हे ऐकुन एणाराय सटपटला, श्रध्दास्थानाची काहिशी विटंबना बघुन सात्विक संतापाने खाडकन बोलुन गेला ओ..... जरा तोंड सांभळुन बोला... अहो असं काय म्हणताय ? ते फार मोठ्ठे संत आहेत आमचे. आणी त्यांची अवस्था फार फार वरची आहे.. त्यांना या गोष्टीने काही फरक पडत नसतो म्हणून ते असे असतात. राहिला प्रश्न नग्नतेचा तर त्याला नग्नता न्हवे विरक्ती म्हणतात. सन्यासी माणुस असाच असावा. उसगावचा माणुस थोडासा आवाक्, पण लगेच सावरुन म्हणाला ठीक आहे, क्षमा करा मला व माझ्या मुलालाही. ते छोटसं पोरगंच आहे. वास्तव काय हे समजायला नक्किच चुकलं असणार. पण भावना दुखवल्या जाणार नसतिल मला फक्त इतकच विचारायच आहे तुमचे महाराज खरोखर इतके मोठे, ऑलरेडी पोचलेलेच व महान व्यक्तिमत्व आहे. सर्व अ‍ॅकॉम्प्लिश/सर्टीफाय झालेलं आहे. की ति व्यक्ती फसवा अतिसामान्य साधक अथवा केवळ अध्यात्मात वर जाण्यासाठी धडपडणारा/ प्रयत्नवादी जिव न्हवे... तर मग त्यांना समाज कसा उरफाटा आहे याची जाणीव नाही काय ? समाजात किमान चारचौघामधे असताना सभ्यतेच्या, सुसंस्काराच्या चार गोश्टी स्वतःहोउन पाळणं ही जास्त महत्वाची शिकवण ठरत नाही काय ? त्यांची राहणी वागणुक सवयी यांचे अतिसामान्य अज्ञानी मानवांच्या मनावर विचारांवर कृतिंवर घडणारे परिणाम समजु शकत नाहीत काय ? हे सर्व शिष्टाचाराच्या सभ्यतेच्या सुसंस्कारांच्या प्रथा मोडणार्‍या का असाव्यात की तो असामान्य ठरण्याचा प्रमुख नियमच आहे ? जर त्यांना असेच रहायच असेल तर एकांतवासात त्यांनी जरुर हवं तस रहावं, वागाव, बोलावं, जे पायजे ते करावं. पण जेव्हां चारचौघे भलेही स्वतः होउन दर्शनाला/त्रास द्यायला समोर येतात किमान तेव्हां तरी त्यांच्या समोर सुसंस्कारीत सामान्य वर्तणुकच ठेवणं हे समाजासाठी जास्त प्रशस्तच्व त्यांच्यासारख्या पोचलेल्या व्यक्तिला अतिशय सामान्य गोश्ट नाही का ? की सन्यासी असण हे सन्यासी दिसण्यापेक्षा कमी महत्वाच असतं ? यावर एणारायकडे खरतर उत्तरच न्हवत.. तरीही तो बोलुन गेला "इट्स काँप्लिकेटेड, यु वोंट अंडरस्टँड".
  • Log in or register to post comments

चर्चा

अवतार
Mon, 04/29/2013 - 15:12 नवीन
जे सत्य मुळात चर्चा करून गवसणारच नाही त्यासाठी इतकी चर्चा कशाला? तार्किक चर्चांनी अध्यात्माविषयी जाणता येईल पण स्वत:च्या जाणिवेत खोलवर उतरण्यासाठी धैर्य लागते. ते धैर्य कसे मिळवायचे हे साधकाला समजावतो तो खरा गुरु. पण त्याकरता साधकाचा गुरुवर विश्वास असावा लागतो. तो विश्वास तर्कशुद्ध स्पष्टीकरण देऊन निर्माण होत नाही. गुरु-शिष्य हे देखील एक नाते असते. कोणतेही नाते हे भावनांच्या ओलाव्याशिवाय टिकत नाही. तो भावनांचा ओलावा जर शिष्यापर्यंत पोचला नाही तर शिष्याला अध्यात्माचे ज्ञान मिळेल पण अनुभूती मिळणार नाही.
  • Log in or register to post comments

अवतार-दा-तुस्सी ग्रेट हो... :)

अत्रुप्त आत्मा
Wed, 05/01/2013 - 14:50 नवीन
आध्यात्माचा जीवनवादी/व्यावहारिक अर्थ सांगणारा प्रतिसादImage removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवतार

गुरू आणि शिष्य

संजय क्षीरसागर
Wed, 05/01/2013 - 23:15 नवीन
तार्किक चर्चांनी अध्यात्माविषयी जाणता येईल पण स्वत:च्या जाणिवेत खोलवर उतरण्यासाठी धैर्य लागते. ते धैर्य कसे मिळवायचे हे साधकाला समजावतो तो खरा गुरु.
स्वतःच्या जीवनातली उद्विग्नता सत्यशोधनासाठी पुरेसा प्रेरक आहे. अनेक ज्ञानीजनांना मृत्यूची अनिवार्यता अमृताचा शोध घेण्यासाठी कारण ठरली आहे. जाणिवेत उतरण्यासाठी धैर्य लागत नाही, जीवनाची सुरूवात आणि शेवट असा समग्र प्रवास सुस्पष्टपणे दिसण्याची गरज आहे.
पण त्याकरता साधकाचा गुरुवर विश्वास असावा लागतो. तो विश्वास तर्कशुद्ध स्पष्टीकरण देऊन निर्माण होत नाही. गुरु-शिष्य हे देखील एक नाते असते. कोणतेही नाते हे भावनांच्या ओलाव्याशिवाय टिकत नाही. तो भावनांचा ओलावा जर शिष्यापर्यंत पोचला नाही तर शिष्याला अध्यात्माचे ज्ञान मिळेल पण अनुभूती मिळणार नाही.
सुरूवात साधक करतो. मग गुरू असला नसला काही फरक पडत नाही. बर्‍याच वेळा ग्रंथच गुरू ठरतात. आपल्याला सत्य गवसलं की नाही हा अंतीम निर्णय देखील शिष्याचा असतो. स्वतःच्या जीवनात आलेली शांती, कोणत्याही साधनेची अनावश्यकता आणि सरते शेवटी (केला असेल तर त्या) गुरूपासून देखील मुक्ती (त्याच्या विषयी कृतज्ञता राहतेच) ही सत्य गवसल्याची लक्षणं आहेत.
जे सत्य मुळात चर्चा करून गवसणारच नाही त्यासाठी इतकी चर्चा कशाला?
व्यक्तिमत्वाचा निरास हा उद्देश आहे. सत्य तर आपण आहोतच. एकावेळी, एका क्षणात, इतक्या लोकांशी संवाद साधता येणारं इंटरनेट सारखं उत्तम माध्यम (आणि ते ही टू-वे) असल्यावर चर्चेसाठी यापेक्षा उत्तम पर्याय नाही. मला तर तो ग्रंथापेक्षाही लाइव्ह वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवतार

अंतिम सत्य

अवतार
गुरुवार, 05/02/2013 - 20:08 नवीन
अंतिम सत्याची जाणीव होणे म्हणजे आपल्या "स्व" ला निराकार जाणीवेत विलीन करणे. ह्यासाठी जीवनाचा शेवट नुसताच सुस्पष्टपणे दिसून भागत नाही. तो तर सर्वांनाच दिसत असतो. त्यापलीकडे जे अज्ञात विश्व आहे त्याला सामोरे जाण्यासाठी धैर्य लागतेच. कोणतीही गोष्ट जाणणे म्हणजे त्या गोष्टीला आपल्या इंद्रियांच्या कक्षेत आणणे. अंतिम सत्य हे इंद्रियांच्या माध्यमातून जाणता येउच शकत नाही. त्यासाठी निराकाराच्या सागरात खोलवर बुडी मारावी लागते. पण ती क्रिया स्वेच्छेने घडायला हवी. "स्व" चे निराकारात विलीनीकरण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण त्यासाठी निव्वळ चर्चा किंवा ग्रंथ हे पुरेसे ठरत नाहीत. चर्चा आणि ग्रंथ यांचा मुख्य उद्देश वैचारिक आदानप्रदान हा असतो. ते तुम्हाला सागराची दिशा दाखवू शकतात पण त्यात विलीन होण्याची प्रेरणा देऊ शकत नाहीत. "स्व" चा अडथळा दूर करून ती प्रेरणा कशी जागृत करायची हे ज्ञान शुद्ध चैतन्याचा प्रकट आविष्कार असलेल्या व्यक्तीकडूनच मिळू शकते. ती व्यक्ती म्हणजेच गुरु. "शब्देविण संवादू" कसा साधायचा हे शब्दांच्या माध्यमातून सांगता येत नाही. त्यासाठी गुरु आणि साधकाच्या मनांच्या तारा जुळायला हव्यात. मग षड्ज सापडायला वेळ लागत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

प्रतिसाद आवडला

सुधीर
गुरुवार, 05/02/2013 - 22:05 नवीन
"गुरुविण अनुभव कैसा कळे" खरं असेल तुमचं म्हणणं कदाचित पण गुरु ही "व्यक्ती" असणंच महत्त्वाचं आहे का? आजकालच्या जगात गुरु वगैरे शोधणं कठीण वाटतं, म्हणून आपली एक शंका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवतार

अंतिम सत्याची जाणीव होणे म्हणजे

संजय क्षीरसागर
Fri, 05/03/2013 - 00:49 नवीन
आपल्या "स्व" ला निराकार जाणीवेत विलीन करणे.
बरोबर!
अंतिम सत्य हे इंद्रियांच्या माध्यमातून जाणता येउच शकत नाही
एकदम बरोबर!
"स्व" चे निराकारात विलीनीकरण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण त्यासाठी निव्वळ चर्चा किंवा ग्रंथ हे पुरेसे ठरत नाहीत. चर्चा आणि ग्रंथ यांचा मुख्य उद्देश वैचारिक आदानप्रदान हा असतो. ते तुम्हाला सागराची दिशा दाखवू शकतात पण त्यात विलीन होण्याची प्रेरणा देऊ शकत नाहीत.
का?
"स्व" चा अडथळा दूर करून ती प्रेरणा कशी जागृत करायची हे ज्ञान शुद्ध चैतन्याचा प्रकट आविष्कार असलेल्या व्यक्तीकडूनच मिळू शकते. ती व्यक्ती म्हणजेच गुरु.
गुरू कोण हे कोण ठरवणार? शिष्यच.
"शब्देविण संवादू" कसा साधायचा हे शब्दांच्या माध्यमातून सांगता येत नाही. त्यासाठी गुरु आणि साधकाच्या मनांच्या तारा जुळायला हव्यात. मग षड्ज सापडायला वेळ लागत नाही.
कोण कुणाशी संवाद साधतो? मौन शिकून कसं येईल? स्व शिष्यानंच निर्माण केलाय आणि त्यालाच त्याचं निरसन करायचंय. शिष्य जोपर्यंत त्याच्या अनुभवानं सत्य गवसल्याची घोषणा करत नाही तोपर्यंत गुरूनं शिष्याच्या सिद्धत्वाची घोषणा केली तरी तिचा काही उपयोग नाही. गुरू उपयोगी असू शकतो पण असायलाच हवा असं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवतार

"बर्‍याच वेळा ग्रंथच गुरू ठरतात"

सुधीर
गुरुवार, 05/02/2013 - 22:10 नवीन
सध्या तरी हाच अनुभव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

माझा मुद्दा असा आहे की कसलीच इच्छा न करता 'निव्वळ असणं' हे

संजय क्षीरसागर
Tue, 04/30/2013 - 10:38 नवीन
केवळ कोमातल्या व्यक्तीला शक्य आहे
निव्वळ असणं हे स्थिरत्वं आहे. तो डेड-लॉक नाही. सत्याकडे तुम्ही या अँगलनं पाहा : शांतता आहे. ते `निव्वळ असणं' आहे. शांतता आपण नाकरू शकत नाही. ती ध्वनीचा स्त्रोत आहे. ध्वनीची निर्मिती, स्थिती आणि लय शांततेमुळेच शक्य आहे. आणि तरीही `शांतता कुठे आहे?' हे कधीही दर्शवता येणार नाही कारण ती स्थिती आहे, अभिव्यक्ती नाही. याही पुढे जाऊन, शांतताच सार्वभौम आहे. तिचं प्रकट रूप ध्वनी आहे आणि ध्वनीचं अप्रकट रूप शांतता आहे. ती एकसंध अनिर्मित स्थितीच सारं चराचर अंतरबाह्य व्यापून आहे. ज्याला शांतता हा सत्याचा पैलू गवसला तो शांततेशी एकरूप होतो, शांत होतो. याचा अर्थ तो बोलायचा बंद होतो किंवा कोमात जातो असा नाही. खरं तर त्याच्याच बोलण्यातून सत्याची अभिव्यक्ती होते. म्हणून तर सिद्धाचे शब्द महत्त्वाचे आहेत. सूज्ञाचं सारं लक्ष सिद्ध काय सांगतोय याकडे आहे, तो वागणूकीचा उहापोह करत नाही.
  • Log in or register to post comments

क्षीरसागर साहेब

Dhananjay Borgaonkar
Tue, 04/30/2013 - 10:42 नवीन
तुमच्या महाराजांची ओळख आवडली. यावेळी आमचेच महाराज तेवढे महान हा आग्रह धरला नाहीत हे सगळ्यात जास्त आवडल हे मनापासुन नमुद करतो. बाकी चर्चा चालुदेत.
  • Log in or register to post comments

या मनःपूर्वक प्रतिसादाबद्दल

संजय क्षीरसागर
Tue, 04/30/2013 - 12:14 नवीन
आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar

हे आध्यात्मिक लोक स्वतः

चेतन माने
Tue, 04/30/2013 - 12:33 नवीन
हे आध्यात्मिक लोक स्वतः उमजलेलं दुसर्याला पटवायच्या भानगडीत का पडतात ??? तुम्हाला कोणी सांगितल हे सगळ्यांना पटवून द्याच म्हणून!! माझ्या मते आध्यात्माच्या बाबतीत माणसाने स्वार्थी राहायला हवं उगाच दुसर्याला पटवायच्या नादात आपल्या डोक्याचा भुगा कश्यापायी!! (अशावेळी मला एकच ओळ आठवते - "तुझे आहे तुझपाशी !"
  • Log in or register to post comments

मस्त प्रश्न आहे

संजय क्षीरसागर
Tue, 04/30/2013 - 12:57 नवीन
हे आध्यात्मिक लोक स्वतः उमजलेलं दुसर्याला पटवायच्या भानगडीत का पडतात ???
एखादा उत्तर ध्रुवावर जाऊन आलेला इथे प्रवासवर्णन का टाकतो? एखादी पाककृती इथे का सांगितली जाते? कविता का प्रकाशित कराविशी वाटते? कारण प्रत्येकाला त्याचा आनंद शेअर करायचा असतो.
तुम्हाला कोणी सांगितल हे सगळ्यांना पटवून द्याच म्हणून!!
माझ्यावर जबरदस्ती कुठे आहे? एकेका सिद्धाला इथे मांडतांना मला आनंद आहे.
माझ्या मते आध्यात्माच्या बाबतीत माणसाने स्वार्थी राहायला हवं उगाच दुसर्याला पटवायच्या नादात आपल्या डोक्याचा भुगा कश्यापायी!!
आपल्याला स्वच्छंद गवसावा अशी प्रत्येकाची आंतरिक इच्छा असते. ज्यांना समजेल असं वाटतं त्यांना उत्तरं द्यायची, नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. डोक्याला ताप अजिबात नाही.
अशावेळी मला एकच ओळ आठवते - "तुझे आहे तुझपाशी !"
तेच तर सांगतोय, तुझ्यापाशी कशाला? तुम्हीच सत्य आहात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन माने

अगदी अगदी !!

चेतन माने
Tue, 04/30/2013 - 13:24 नवीन
अगदी अगदी !! मी माझ्या आसपास असणार्या लोकांबद्दल बोलत होतो, सगळेच आपल्यासारखे समझदार कुठे आहेत. आनंद वाटणे(शेअर करणे) चांगली गोष्ट आहे, ज्याला तो अनुभवासा वाटेल तो नक्कीच अनुभवेल ज्याला नाही वाटत त्याला राहूदे तसच .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

आमचा बेंबट्या झालाय. गुरुदेव

बाळ सप्रे
Tue, 04/30/2013 - 13:27 नवीन
आमचा बेंबट्या झालाय. गुरुदेव म्हणाले "He is the you in the I of the you. In which you in the I and I in the you are the you in the you." वाचून हाय आणि लो दोन्ही ब्लडप्रेशर एकदम सुरु !!
  • Log in or register to post comments

पुलंनी अध्यात्मिक फ्रस्ट्रेशनच सुरेख वर्णन केलंय

संजय क्षीरसागर
Tue, 04/30/2013 - 13:41 नवीन
द्राक्षंही नाहीत आणि रूद्राक्षही नाही! पण याला दुसरी बाजूही आहे. ज्याला द्राक्षांची मजा घेतांना रूद्राक्ष सापडलं त्याचं जगणं सार्थक झालं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

पण याला दुसरी बाजूही आहे.

अग्निकोल्हा
Tue, 04/30/2013 - 14:50 नवीन
पण याला दुसरी बाजूही आहे.
हम्म मंजे पुलंना फक्त एकच बाजु कळली म्हणायच की ?
ज्याला द्राक्षांची मजा घेतांना रूद्राक्ष सापडलं त्याचं जगणं सार्थक झालं!
ओह यु मीन फ्रॉम सेक्स टु एनलाइट्मेंट का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

पुलंना आनंदाचं सूत्र गवसलं होतं

संजय क्षीरसागर
Tue, 04/30/2013 - 15:29 नवीन
सत्य गवसलेला आनंदी होतो आणि आनंदी माणसाला सत्य गवसण्याची शक्यता सर्वात जास्त असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

तिव्र सहमत.

अग्निकोल्हा
Tue, 04/30/2013 - 16:13 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

सत्य आधी गवसते की आनंद..?

मोदक
Wed, 05/01/2013 - 00:51 नवीन
सत्य आधी गवसते की आनंद..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

प्रत्येक जण आनंदच शोधतोय

संजय क्षीरसागर
Wed, 05/01/2013 - 13:37 नवीन
फक्त त्याला वाटतंय की तो काही तरी (मनासारखं) घडण्यावर आहे, काही तरी मिळण्यावर आहे. मग ते काहीही असो; हवी तशी प्रेमिका, नुसत्या व्याजावर गुजराण होईल इतकी संपत्ती, नोकरी सोडून स्वतःचा व्यावसाय, सध्याची बदलून दुसरी पत्नी (किंवा पती), आहे त्या पेक्षा प्रशस्त जागा, किंवा तत्सम काहीही. मनासारखं घडल्यावर आनंद होतोच. पण काही वेळ जरा बरं वाटलं की लगेच नवा उपक्रम खुणावायला लागतो. मग आपल्याला वाटतं की आयुष्य असंच आहे. एकानंतर एक गोष्ट साधत आनंद मिळवायचा आहे. एक गोष्ट आपल्याला कधीही लक्षात येत नाही की आनंद म्हणजे खुद्द आपणच आहोत. आपल्या आनंदाला मनाजोगती घडलेली घटना कारण नव्हती. काही काळ जाणिव फिरून स्वतःप्रत आली होती आणि आपण स्वतःशी एकरूप झालो होतो. प्रेमिकेच्या सहवासात जगाचा विसर पडला याचा अर्थ ते नाहीसं झालं नव्हतं, जाणिवेच्या क्षेत्रात काहीही राहिलं नव्हतं. प्रेमिका सुद्धा नव्हती. आपण (काही काळ) स्वरूपात स्थिर झालो, निराकार झालो. आपल्या शून्य स्थितीशी कनेक्ट झालो. पुलंनी म्हटलंय : जन्म आणि मरणाच्या चिमटीत सापडलेल्या या आयुष्यात दोन घटका हसण्याशिवाय आपल्या हातात दुसरं आहे तरी काय ? (हसवणूक). पुलं स्वतःशी कनेक्ट व्हायला विनोदाचा आधार घेतात. स्वतः आनंदी होतात आणि इतरांना आनंदी करतात. सिद्ध कोणत्याही आधाराशिवाय स्वतःशी एकरूप झालेला असतो. त्याचा मूड कायम लाईट असतो. सभोवतालची परिस्थिती काहीही असो, घटना मनाजोगत्या घडो, न घडो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

प्रतिसाद पटला! धन्यवाद.

मोदक
Wed, 05/01/2013 - 23:53 नवीन
प्रतिसाद पटला! धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

हे नाहि कळलं

अर्धवटराव
गुरुवार, 05/02/2013 - 00:18 नवीन
>>प्रेमिकेच्या सहवासात जगाचा विसर पडला याचा अर्थ ते नाहीसं झालं नव्हतं, जाणिवेच्या क्षेत्रात काहीही राहिलं नव्हतं. -- म्हणजे काय? प्रेमिकेच्या सहवासात उर्वरीत जग नव्हतं, पण प्रेमिका तर होतीच. प्रेमिकेत उर्वरीत जग डिसॉल्व्ह झालं, असं काहिसं होतय का? आपण म्हणजे जीवन. जाणीव म्हणजे चेंडु. मन म्हणजे अनेक भोकं असलेलं छत. आपण चेंडु वर फेकतो. काहि वेळेला तो छताच्या भोकातुन आरपार निघुन जातो. जिथे भोक नाहि तिथुन, छताला लागुन आपल्याकडे परत येतो. वर मांडलेल्या मॉडेल सारखं काहि म्हणताय का तुम्ही? अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

स्वरूप म्हणजे निव्वळ उपस्थिती, जस्ट अ प्रेझंस

संजय क्षीरसागर
गुरुवार, 05/02/2013 - 08:35 नवीन
ती उपस्थिती एकल आहे. तिला शुद्ध जाणिव म्हटलंय. शुद्धचा अर्थ जाणिव आहे पण जाणिवेत काहीही नाही. आपल्याला नेहमी कशाची तरी जाणिव होते. जोपर्यंत प्रियकराला प्रेमिकेची जाणिव आहे आणि प्रेमिकेला प्रियकराची आहे तोपर्यंत जाणिव ओरियंटेड आहे. खरं तर प्रेमिका आहे म्हणून प्रियकर आहे. शुद्ध जाणिवेत कुणीही नाही. दोघंही एक झालेत. जगतांना आपल्याला द्वैतात जगावं लागतं, जाणिव सतत कशाकडे तरी वेधलेली असते. आणि मेंदूनं आपण जाणिवेचं डिकोडींग करत जगत असतो. ते अनिवार्य आहे. पण त्यामुळे स्वतःची जाणिव होत नाही. जाणिव स्वतःकडे परत येत नाही. एखाद्या निवांत क्षणी महाराजांची वक्तव्य, तुमच्या सर्व धारणा बाजूला ठेवून वाचा. मग त्यांच्या या वक्तव्याची तुम्हाला प्रचिती येईलः
त्या स्थितीत मी, माझे गुरू, माझे रोजचे जीवन आणि सभोवतालचे जग सारे अदृश्य झाले. केवळ शांती आणि अथांग मौन उरले.
एकदा तुम्हाला जाणिवेचं शुद्ध स्वरूप कळलं की स्व गवसला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

>>>>आपल्याला नेहमी कशाची तरी

प्यारे१
गुरुवार, 05/02/2013 - 20:18 नवीन
>>>>आपल्याला नेहमी कशाची तरी जाणिव होते. जोपर्यंत प्रियकराला प्रेमिकेची जाणिव आहे आणि प्रेमिकेला प्रियकराची आहे तोपर्यंत जाणिव ओरियंटेड आहे. खरं तर प्रेमिका आहे म्हणून प्रियकर आहे. शुद्ध जाणिवेत कुणीही नाही. दोघंही एक झालेत. अरे तो कबीरदासजींचा दोहा कुणाला माहिती आहे का? प्रेमगली इतनी सांकरी .... >>>>केवळ शांती आणि अथांग मौन उरले. का होत नाहीये अजून????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

या धाग्यावर आता केवळ मौन आणि

कवितानागेश
Tue, 06/18/2013 - 16:21 नवीन
या धाग्यावर आता केवळ मौन आणि शांती हेच उरणार आहेत बरं! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

पुढील भागाच्या प्रतिक्षेत!

मोदक
Tue, 05/14/2013 - 00:54 नवीन
पुढील भागाच्या प्रतिक्षेत!
  • Log in or register to post comments

शून्य स्थितीशी कनेक्ट व्हा

आजानुकर्ण
Tue, 05/14/2013 - 02:02 नवीन
पुढे काय होणार याची प्रतीक्षा कशाला? शून्य स्थितीशी कनेक्ट व्हा. हा लेख हाच एक आनंद आहे. मग पुढच्या लेखात आणखी आनंद मिळेल याची अपेक्षा ठेवून आताचा आनंद कशासाठी घालवायचा. मुळात शांतता हे सत्य आहे, त्यामुळे न लिहिता राहिलेली शांतता चांगली नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

निसर्गदत्त महाराजांविषयी ओशोने उधळलेली मुक्ताफळे

Dhananjay Borgaonkar
Fri, 06/14/2013 - 16:34 नवीन
मला अनुवाद करायचा कंटाळा आला आहे, म्हणुन च्योपी पेस्त करत आहे. OSHO says: There was a man in Bombay, Nisargadatta Maharaj. Nobody knew this big name; he was known to the masses as "Beedie Baba" because he was continuously smoking beedies. You can find in every village such kinds of beedie babas. I think India has seven hundred thousand villages and each village must have at least one; more is possible. And Amrito wrote a few days ago to me, because another young Dutchman became very much involved with Beedie Baba... The man seems to be very sincere, but the trouble is that the people who come from the West have a very childlike heart, very trusting, and they are unaware that in India spirituality is just a routine. Everybody talks about great things and their lives are as ugly as possible. When Beedie Baba said that he would speak only to this young Dutchman, naturally his ego must have felt tremendously vast. The crowd that surrounded Beedie Baba was also of the same quality... rickshaw wallahs waiting for their passengers, sitting by the side of Beedie Baba. And when he said he would not speak to anybody unless it was this Dutchman... So he spoke to the Dutchman, who has now compiled books on Beedie Baba. Now in India it is almost parrot-like, but to the Westerner it seems to be a tremendous revelation -- when Beedie Baba said, "Aham brahmasmi; I am God, I am that" the young Dutchman immediately wrote a book: I AM THAT! Because for the West, spirituality is a foreign affair, just as for the East, science is a foreign affair. Even the poorest beggar knows more about metaphysics, about great ideologies... And when the Western man comes -- he may be well educated but his education is of science, his education is of logic, his education makes him a great intellectual. But in the heart he remains very naive. Then any Beedie Baba, any idiot can make a great impact on him. This Dutch man lived for months together with Beedie Baba. He does not mention his well-known name, Beedie Baba; he mentions only his legal name, Nisargadatta Maharaj. He has written many books on Nisargadatta Maharaj; he has made Nisargadatta famous all over the world. I have looked through those books -- sheer nonsense. Ref: http://nisargadatta.org/pages/ridiculous_comment_by_osho.html
  • Log in or register to post comments

जगात तीन प्रकारचे लोक आहेत...

संजय क्षीरसागर
Fri, 06/14/2013 - 23:43 नवीन
सिद्ध, साधक आणि अध्यात्मविहीन. अर्थात, सर्वांना अध्यात्मात रस असण्याची गरज नाही. आता मजा अशी आहे, सिद्धाला त्याच्याविषयी कुणीही काहीही म्हटलं तरी फरक पडत नाही. थोडक्यात ओशो काय म्हणाले यानं महाराजांना फरक पडत नाही (किंवा द अदर वे); ...ते दोघंही सिद्धच राहतात. आणि आता तर ते दोघंही नाहीत त्यामुळे प्रश्नच मिटला. साधक नेहमी सिद्ध काय सांगतोय आणि आपल्याला ते सत्याप्रती कसं नेईल हे बघतो. त्याची नजर स्वत:च्या जीवनात पडणार्‍या फरकावर असते. अध्यात्मविहीन लोकांचं एकच ठळक वैशिष्ठ्य असतं, त्यांना फक्त गॉसिपमधे इंटरेस्ट असतो, ‘कोण कुणाविषयी काय म्हणाला’. यामुळे होतं असं की सिद्ध तर सिद्ध असतातच, साधक सत्याप्रत पोहोचण्याची संभावना निर्माण होते, पण हे लोक लटकत राहतात; धड इकडे ना तिकडे. कारण त्यांना अध्यात्मात रसच नसतो, त्यांचा इंटरेस्ट असतो फक्त गॉसिपमधे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा