पावसाची चाहूल आली आणि जमीनीतल्या उधईला पंख फुटले. सोहळा झाला पण कळा अवकळा झाली. ..........
कोण चाहुली उलगडले गड
अंधारातिल वेणा अवघड
वारुळातले फुटले घट अन
प्रकाशात पडझडली झुंबड
क्षणभंगुर भिरभिर भर अंगण
उडे पाकळी पर तिज आंदण
नभईर्षेचे सोस सकस पण
जड झाले पंखांचे जोखड
बळ खळले गळले विरघळले
स्वप्नखळे वाटेतच विरले
सुटली जागा जाग जागली
विद्ध कलेवर पाठी उरले
........................अज्ञात
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1811
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान.
अहाहा...! सुंदर..
(पण उधई म्हणजे वाळवी तिला पंख कसे फुटेल. पंख फुटणारे ते वेगळे मुंगळे)
-दिलीप बिरुटे
डॉक वाळवीलाही पंख फुटतात.
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डॉक वाळवीलाही पंख फुटतात.
(चित्र जालावरुन साभार)
धन्स गंपा..
In reply to डॉक वाळवीलाही पंख फुटतात. by गणपा
माहितीपूर्ण चित्र डकवल्याबद्दल आभार. पण, लाकडं कुजवणारे पिवळे धमक असतात तीच जर उधई असेल तिला पंख फुटलेले मी पाहिलेले नाही.
पण आता उधई म्हणजे वाळवीच असते किंवा नसते याबद्दल जर कोणी माहिती सांगितली तर समजून घ्यायला आवडेल.
-दिलीप बिरुटे
वाह! फारच छान.
वाह! फारच छान.
हं!
हं!
फारच छान.
बाकी प्राडॉ उठुन सत्यात का शिरले ब्वा? कविता वेंजॉय माडी सर!
सुरेख कविता.
सुरेख कविता.