लहानपणी एक दोन तीन चार शिकताना आकड्यांशी झालेली ओळख पुढे इतकी घट्ट होते की आपल्या रोजच्या जीवनात या आकड्यांशिवाय पानही हलत नाही....घड्याळातील आकडे, टिव्हि च्या रिमोट वरील आकडे, मोबाईल वर आकडे, पगाराचे तसेच बिलाचे आकडे....एक ना दोन (परत आकडेच)
अभिजितचं 'म्हणी मॅटर्स ' वाचलं आणि एकदम डोक्यात आलं - आपल्या भाषेत आकड्यांचेही कितीतरी वाक्प्रचार आणि म्हणी आहेत.
पुराण, धर्मग्रंथ, इतिहास, साहित्य , बोलीभाषा ,चालीरिती वगैरे मध्ये डोकावले तर आकड्यांचा शब्दांशी घातलेला मेळ दिसून येईल.
बर्याच आकड्यांना काही ना काही महत्व आहे आणि त्या गोष्टी त्या आकड्यांमध्येच बसतात. उदा. जेवायला नाही म्हणणार्याला आपण 'जरा दोन घास खा' असे म्हणू तिथे तीन घास , पाच घास असा शब्दप्रयोग वापरत नाहीत.
अगदी शून्यापासून सुरवात करता येईल.
शून्यातून विश्व निर्मिती
एकाक्षरी मंत्र - ओम
दोनाचे चार हात
तिन्ही त्रिकाळ , त्रिनेत्र, पळसाला पाने तीन, त्रिगुण,त्रिभुवन
चार्तूमास
पंचपात्र , पंचेंद्रिय
षटकार, षड्रिपू
साता समुद्रापार, सप्तनद्या , सात वार, साता जन्मी
साडेसाती
अष्टांग, 'अष्टपुत्र सौभाग्यवती भव', अष्टविनायक
नवरस, नव्याचे नऊ दिवस, नवग्रह, नवरत्ने
दशावतार, दशानन
११ प्रदक्षिणा
१२ राशी , बारमाही
तीन तेरा वाजणे
चौदावं रत्न
सोळा सोमवारचं व्रत
अठराविश्व दारिद्र्य
गणपतीला एकवीस मोदक, अर्थवशीर्शाची २१ आवर्तने.
गद्धे पंचविशी
सत्तावीस नक्षत्र
बत्तीशी , 'सिंहासन बत्तीशी '
३६ चा आकडा , पत्रिकेतील ३६ गूण
चाळिशी (चष्मा) लागणे
एकसष्ठी
विष्णुसहस्र नाम
अशा अजून काही आकड्यांमध्ये बसणार्या गोष्टी तुम्हाला माहित असल्यास जरूर लिहा.
वाचने
9640
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकसष्ठ-
एकुणसत्तर
In reply to एकसष्ठ- by गारंबीचा बापू
बापू तू
In reply to एकसष्ठ- by गारंबीचा बापू
सप्तपदी १२
अजून काही...
अजुन काही.....
ऐशी तिथे
तुझी शंभरी
शंभरी तरी
In reply to तुझी शंभरी by अवलिया
उलट
पंचामृत सप
>> छपन्न
In reply to पंचामृत सप by प्राजु
चातुर्वर्ण.....
In reply to पंचामृत सप by प्राजु
पळसाला
चांडाळ
In reply to पळसाला by यशोधरा
चाळीशी,
पंचखाद्य
अजुन काही...
बाराचं
अजून काही
वाईट आकडे
आकडेशास्त्री
शून्याची महती
सुंदर
In reply to शून्याची महती by श्रीकृष्ण सामंत
आणखी काही ..
तिथींचा महिमा
मस्तच!
In reply to तिथींचा महिमा by भास्कर केन्डे
>> नरक