मागच्या दोन महिन्यांपासुन सरकारी खात्यांमधील भ्रष्टाचाराचा एकदम वाईट अनुभव घेतोय्,त्यातही पोलिस खात्याची हरामखोरी सहन करण्याजोजी नाहीये. सर्व कागपत्रांचीपुर्तता करुनही फक्त पैसे न दिल्याने पुणे जिल्ह्यातील एका पोलिस स्टेशन मध्ये मागचे २ महिने माझी फाइल धुळ खात पडुन आहे.तेथिल इनचार्ज ला विचारयला गेल.तर अत्यंत उर्मट भाषेत उत्तरे मिळतात.शेवटी माहितीच्या अधिकाराचा बडगा उगारल्याव,बघु ,वेळ मिळाला की सही करतो अश्या प्रकारे सांगन्यात आले. २ वर्षापुर्वी देखिल हिच अवस्था होती, कुठलीही सरकारी फाइल क्लियर करतानी आजपर्यंत वरिष्ठ पातळीवर कधी फारशी अडचण आली नाही परंतु स्थानिक पोलिस स्टेशनला मात्र नेहमी कुत्र्याचे शेपुट वाकडे ते वाकडेच्,आपले पोलिस प्रशासन कधी बदलणार आहे देवास ठाउक......
वाचने
6793
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
ओळख वापरा की डॉक्टर, एखाद्या
अशक्य.
एल बी टी हा अत्यावश्यक कर आहे
In reply to अशक्य. by प्रभाकर पेठकर
ओळखीचा प्रश्न नाही....
रेकॉर्डिंग वाला मोबाईल घेवून
नाय बॉ !
पराभाउ.वाइच समजुन घ्या....
खीक
In reply to पराभाउ.वाइच समजुन घ्या.... by बाबा पाटील
परा,तुला विषय माहित नसताना पन काड्या करायची सवय आहे का रे ?
हा हा हा
In reply to परा,तुला विषय माहित नसताना पन काड्या करायची सवय आहे का रे ? by बाबा पाटील
(No subject)
In reply to परा,तुला विषय माहित नसताना पन काड्या करायची सवय आहे का रे ? by बाबा पाटील
आणि हो,
ती कधीच क्लियर झालीय.
कधीच क्लियर झाली ??
टाईम ट्रॅव्हल>
In reply to कधीच क्लियर झाली ?? by परिकथेतील राजकुमार
हम्म्म
In reply to टाईम ट्रॅव्हल> by कवितानागेश
माझ्याबद्दल आदर दाखवण्याचा
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
प्रश्न चर्चेला घेण्याचा मुळ उद्देश एव्हदाच होता.
जरा सविस्तर लिहा बाबासाहेब..
In reply to प्रश्न चर्चेला घेण्याचा मुळ उद्देश एव्हदाच होता. by बाबा पाटील
विषय असा होता की....
सहमत
काय अपेक्षित आहे?
+१००!
In reply to काय अपेक्षित आहे? by उपास
.
वा !! हे अशा विचारांचे लोकं
In reply to . by आशु जोग
पाकिस्तानच्या "उपहासातून"
In reply to वा !! हे अशा विचारांचे लोकं by शिल्पा ब
मला डॉक्टर म्हणुन विशेष ट्रिटमेंट अपेक्षित नव्हती...
परंतु येथे मी शेवटपर्यंत
परंतु येथे मी शेवटपर्यंत पाठपुरवठा केला.त्यासाठी वेळ खर्च केला,येण्याजाण्याचा, गाडीच्या डिझेलचा आणी फोन चा खर्च त्या प्राण्याने मागितलेल्या रकमेइतकाच झाला.याबाबत जरा असा विचार करून बघा: दोन्ही पर्यायांत पैशाचा एकूण खर्च तेवढाच झाला. मात्र या दोन पर्यायांचे दूरगामी परिणाम एकमेका विरुद्ध होतात, ते असे: पर्याय १) शेवटपर्यंत पाठपुरवठा केला पण लाच दिली नाही: हा पर्याय सगळ्यांनीच (किंवा कमीतकमी बहुतेक लोकांनी) वापरला तर काही काळाने का होईना पण लाच मागणे कमी होईल. म्हणजे आज केलेली योग्य कृती जरी त्रासदायक आहे तरी भविष्यात होणार्या भ्रष्टाचाराला (आणि त्याला मदत करण्यामुळे आपल्याला वाटणार्या शरमेला) कमी करण्यात आपला हातभार लागेल. नव्हे तसे करणे प्रत्येक सुजाण नागरिकाचे कर्तव्यच आहे. पर्याय २) मागितलेली रक्कम (लाच) लगेच दिली: या पर्यायात आपण आपला त्रास तात्पुरता कमी करतो पण अशा दर प्रसंगामागे आपण लाच मागणार्याची लाच मागण्याची इच्छा वाढवत असतो आणि त्याची भीड कमी करत असतो. म्हणजे आपण भविष्यात होणार्या भ्रष्टाचाराला (आणि त्याला मदत करण्यामुळे आपल्याला वाटणार्या शरमेला) वाढ करण्यात हातभार लावत असतो. थोडक्यात... दूरगामी परिणाम पाहिले तर दुसरी कृती आपल्याला पैसे आणि मनस्ताप या दोन्ही प्रकारे जास्त महाग पडते. शिवाय आपण आपल्या पुढच्या पिढीकरता एक अधिकाधिक सडलेली भ्रष्ट व्यवस्था मागे सोडण्यास सक्रिय हातभार लावत असतो, हे वेगळेच. सहज आणि भरपूर पैसे मिळावे ही गोष्ट मानवी मनात नैसर्गिक (हार्डवायर्ड) आहे. त्यामुळे जेथे भ्रष्टाचाराचे प्रमाण खूप कमी आहे त्या देशातही भ्रष्टाचार करण्याची इच्छा असणार्या माणसांची संख्या कमी नाही पण लाच देणार्यांची आणि लाचेविरुद्ध योग्य दाद मागणार्यांची संख्या लक्षणीय रितीने जास्त आहे. जेथे "मतदारांच्या मनात भ्रष्टाचाराबद्दल तिरस्कार आहे आणि त्याविरुद्ध ते आवाज उठवायला घाबरत नाहीत" तेथे राजकीय नेतृत्वाला मते मिळविण्याकरता का होईना पण भ्रष्टाचार विरोधी कारवाई करणे भागच पडते. काही दशके असे झाले की मग भ्रष्टाचार न करणे ही त्या समाजाची सवय बनते... आणि खूप काळ लागलेल्या सवयीविरुध्द्द वागणे कठीण बनते. म्हणजे त्यासंबद्धीचे कायदे पाळणे ही एक सवय बनते. सध्याच्या भ्रष्टाचारमुक्त आणि कायद्याचे राज्य असलेल्या देशांच्या यादीत वरचे स्थान असलेल्या देशांचा पूर्वेतिहास पाहिला तर हेच दिसते..
असबंद्ध.......!
मुतालिक साहेब,.... तुम्हाला जुलाब झाले आहेत का ?
In reply to असबंद्ध.......! by सुधीर मुतालीक
.
पाठबंधारे खात्यात एकही स्वच्छ अधिकारी नाहीहे अगदीच जनरल विधान आहे. एसीबीच्या महासंचालकांनी केलेले असले तरी इतरांची विधाने उधृत करताना तारतम्य बाळगायला हवे. महाराष्ट्राचे पाटबंधारे खाते इतर राज्यांपेक्षा अतिशय प्रगत आहे. माधवराव चितळे, विद्यानंद रानडे, श्रीपाद लेले, श्रीकांत हुद्दार असे अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय तज्ञ या खात्याने दिले. कोयना धरणासारखे प्रकल्प या खात्याने निर्माण केले आणि आपल्याला प्यायला मिळणारे पाणी, आपल्या शेताला मिळणारे पाणी या स्वानुभावावरून आपण आपले मत बनवू शकतो. आज दगडफेकच करायची ठरवली असेल तर आमचा नाइलाज आहे...