✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सहप्रवासी

व
विनायक प्रभू यांनी
गुरुवार, 05/23/2013 - 18:20  ·  लेख
लेख
अर्धवट झोपेत होतो. त्रिशंकू अवस्था. पण जी काही ग्लानी होती ती झटकन इवॅपोरेट झाली. When sun beats down, the water gets evaporated and we get salt...बाजुच्या सीटवरील ताई मांडीवरच्या छोट्या अभिमन्यु ला सायन्स शिकवत होत्या. मला आता पुढील सहप्रवासाची लक्षणे लगेच लक्षात आली. कंसक्टर ने मुलाच्या वयाची विचारपुस केली. वय वर्षे पावणे दोन ही माहीती मिळाल्यावर मी फ्रीझ झालो. दोन मिनिटातच मागणी पुढे आली. "माला भुक लागली" ताईंनी बिस्किटचा पुडा काढला. त्यात चित्रविचित्र आकाराची बिस्कीटे होती. "मी आर्यन मॅन खाणार" पाच मिनिटात सर्व सुपर हिरो़ संपले "आता मी १०० मीटर खेळणार". मी दटावणार होत पण कंडक्टरनी पुढाकार घेतला. पण चिरंजिव काही बधेनात. परिस्थिती ताब्यात घेण्याकरता मी पापण्ञा वर केल्या. छोटू लगेच सुतासारखा सरळ. पण फक्त पाचच मिनिटे. "आबांना मिश्या नाही" ते आबा नाहीत. त्यांना को पॅसेंजर म्हणायचे..ताई. "को पॅसेंजर मंजे काय" one who travels with us is a co passenger.. ताई "पॅसेंजर म्हंजे काय" one who travels from one place to other.. ताई. मी एक दिर्घ श्वास घेतला आनी मनातल्या मनात स्वतः ला समजावले 'प्रतिक्रिया द्यायची नाही' "आबा तुम्ही कुठे जाताय"? चेंबुर ला "कशाला"? अरे ऑफिसला. तुझे बाबा जातात ना तसा. "माझे बाबा कि नै ऑफिसला जात नाहीत. फॅक्टरीला जातात" हो का. कुठे आहे तुमची फॅक्टरी. "महाडला". केमीकल फॅक्टरी आहे असे सांग आबांना.. ताईंचे प्रॉम्प्टींग. पन्नास वर्कर कामाला असतात म्हणावे.. कौतुक ओसंडुन जात होते. अरे वा. मग तु कुठे मुंबईला आज्जी कडे का? छोटू क्षणभर थांबला. "बाबांना की नै मम्मा आवडत नाही. बाबांनी आणखीन सुंदर नविन मम्मा आणलीये. माला टॉइज पाठवतात आणि मम्माला मनी. बाबा महाडला, मी आणि मम्मा ठाण्याला". ताईंचा चेहेरा अगदी निर्विकार होता.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
20062 वाचन

💬 प्रतिसाद (69)

प्रतिक्रिया

छोटेखानी प्रसंग आवडला.

गणपा
Mon, 05/27/2013 - 20:54 नवीन
छोटेखानी प्रसंग आवडला. काही मंडळी उगाच किस काढत बसतात राव. ती को-प्रवासी, प्रसंगाचा नायक आणि मास्तर निवांत घरी जाऊन झोपले असतील एव्हाना आणि आपली मंडळी इथे रवंथ करीत बसली आहेत. =))
  • Log in or register to post comments

+१

मी-सौरभ
Tue, 05/28/2013 - 23:29 नवीन
अगदी हेच म्हणायच होतं.... गंपाशेट तुमच्या प्रतिक्रिया किती आधार असतात मला +१ टंकायला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

वय पावणे दोन वर्षे (१८ महिने)

बंडा मामा
Tue, 05/28/2013 - 00:02 नवीन
वय पावणे दोन वर्षे (१८ महिने) ? इथल्या कुणी लहान मुले बघीतली नाहीयेत का? ह्या वयात मुलांना सर्वसाधारणपणे १२ शब्द येतात. पूर्ण वाक्ये म्हणता येत नाहीत. एखाद दोन शब्द जोडून जसे की 'खाऊ दे' वगैरे प्राथमिक वाक्ये म्हणता येतात. वरील कथेतला मुलगा खरंच पावणेदोन वर्षाचा असेल तर सदर कथा ही १००% काल्पनिक आहे.
  • Log in or register to post comments

अभिमन्यू.

प्रभाकर पेठकर
Tue, 05/28/2013 - 01:53 नवीन
बाजुच्या सीटवरील ताई मांडीवरच्या छोट्या अभिमन्यु ला सायन्स शिकवत होत्या.
लेखकाच्या वरील वाक्यावरही विचार व्हावा. अभिमन्यूने चक्रव्यूवाची रचना गर्भात असताना ऐकली (आणि आत्मसात) केली असे पुराणात म्हंटले आहे. त्यामुळे, आपला कथानायक वयाने लहान आहे, ह्याची जाण लेखकास आहे. आणि आईचे प्रयत्न, एवढ्यालहान वयातच, त्याला ज्ञानांमृत पाजण्याचे आहेत असे निरिक्षणही लेखकाने, अभिमन्यू नांव योजून, नोंदविले आहे. हल्लीच्या काळातही गर्भातील बालकाला संगीत ऐकविण्याचे वगैरे प्रयोग झाले आहेत.
  • Log in or register to post comments

नाही पटले.

बंडा मामा
Tue, 05/28/2013 - 02:28 नवीन
लेखकाने कथा काल्पनिक आहे असे कुठेही लिहिलेले नाही. दुसरे म्हणजे काल्पनिक असली तरी त्यात कन्विन्सिंग एलेमेंट असला पाहिजे. १८ -२० महिन्याचा काय दोन वर्षे पूर्ण झालेला मुलगाही वरील लेखात दिलेली वाक्ये बोलताना कुणाला दिसला असल्यास मी माझे प्रतिसाद बिनशर्त मागे घेईन. आजुबाजुस कुणी ह्या वयाचे बालक असल्यास प्रयोग करुन पाहणे. वर दिलेली वाक्ये म्हणता येणार्‍या बालकाचे वय किमान ३ वर्षे जवळपास हवे. (त्या मुलाचे नाव रजनीकांत होते असा खुलासा केल्यास सगळेच मुद्दे निकालात निघतील.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

वय हा महत्त्वाचा मुद्दा नाहीच.

प्रभाकर पेठकर
Tue, 05/28/2013 - 02:40 नवीन
वय वर्षे पावणे दोन ही माहीती मिळाल्यावर मी फ्रीझ झालो
ह्या वाक्यातही मुलाचे वय पावणे दोन वर्षे आहे हे ऐकून लेखकाला आश्चर्य वाटले. (म्हणजे लेखकाच्या मते मुलाचे वय पावणे दोन वर्षांपेक्षा जास्त असावे असे वाटले असणार) नाहीतर 'फ्रिझ' कशामुळे झाले? हा प्रश्न उद्भवतो. मुलाचे वय आईने सांगितले आहे. तिकिटाचे पैसे वाचविण्यासाठी मुलांचे वय चोरणे हे सर्वत्र दिसून येते. आया तर स्वतःचे वयही चोरतात. (तिकिटासाठी नाही, सर्वसामान्य प्रसंगी) असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा

पावणे दोन वर्षाचा मुलगा असुन

बंडा मामा
गुरुवार, 05/30/2013 - 02:49 नवीन
पावणे दोन वर्षाचा मुलगा असुन किती स्पष्ट बोलतो आहे ह्यामुळे ते फ्रिज झाले होते असे लेखनातुन मला तरी वाटते. आई वय चोरायसाठी खोटं बोलत आहे ह्यामुळे ते फ्रिज झाले असल्यास त्याचा ह्या कथेशी काहीही संबध दिसत नाही. तिकिटाचे पैसे चोरायला आई खोटे बोलते आहे ह्याचा लेखातल्या थीमशी काहीच संबध नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, त्या ताईंना पैशाची कमी नाही असे लेखातुन दिसते, त्यामुळे बसच्या तिकिटाचे पैसे वाचवायला ते खोटे बोलत असतील हे पटणारे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

कंसक्टर ने मुलाच्या वयाची

मोदक
Tue, 05/28/2013 - 02:44 नवीन
कंसक्टर ने मुलाच्या वयाची विचारपुस केली. वय वर्षे पावणे दोन ही माहीती मिळाल्यावर मी फ्रीझ झालो. ही वाक्ये वाचून मला असे वाटले होते की त्या ताईंनी मुलाचे अर्धे तिकीट वाचवण्याकरिता (आठवा - ३ ते १२ वर्षांमधील मुलास अर्धा आकार पडेल) मुद्दाम वय कमी सांगितले असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा

(आठवा - ३ ते १२ वर्षांमधील

बंडा मामा
गुरुवार, 05/30/2013 - 02:51 नवीन
(आठवा - ३ ते १२ वर्षांमधील मुलास अर्धा आकार पडेल) मुद्दाम वय कमी सांगितले असेल.
तसे असते तर त्या बाई पावणे तीन म्हणाल्या असत्या. पावणे दोन म्हणण्यात काहीच पॉइंट नाही. लेखातली ही विसंगतीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

याच लॉजीकने पावणेतीन

मोदक
गुरुवार, 05/30/2013 - 02:56 नवीन
याच लॉजीकने पावणेतीन म्हणण्यात तरी काय पॉईंट आहे.. त्यांनी अडीच म्हणायला हवे होते. ;-) या न्यायाने आपण तर्क लढवून काहीच साध्य करू शकणार नाही. तस्मात्.. माझ्याकडून चर्चेला पूर्णविराम. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बंडा मामा

वय वर्षे ३ च्या पुढे अर्धे

बंडा मामा
गुरुवार, 05/30/2013 - 05:21 नवीन
वय वर्षे ३ च्या पुढे अर्धे तिकिट लागत असल्यास आणि ते खोटे बोलुन वाचवायचे झाल्यास तीनच्या जवळात जवळचा नंबरच कुणीही सांगेल. मुलगा तीनच्या वर असताना पावणे दोन सांगणे हे सांगणे ह्यात काहीच हशील नाही, सोयीसाठी पावणे तीन हा नंबर जवळचा वाटतो. जितका कमी नंबर सांगाल तितका संशय येण्याची शक्यता अधिक असल्याने. तसेच कंडक्टरही तुम्ही सांगेल ते वय ग्राह्य धरण्यास बांधील नसतो. एका दांडगोबाचे १२च्या आत वय आहे असे सांगुनही, त्याच्या आकारमानाकडे पाहुन त्याला पूर्ण तिकिट घ्यायला लावलेला कंडक्टर मी पाहिला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

़कमाल

विनायक प्रभू
Tue, 05/28/2013 - 07:12 नवीन
़कमाल आहे मामा, कुठ ल्य्या जगात?
  • Log in or register to post comments

एकंदरीत लेखन गंडलेले दिसतेय

मराठी_माणूस
Tue, 05/28/2013 - 21:03 नवीन
एकंदरीत लेखन गंडलेले दिसतेय
  • Log in or register to post comments

इ तो बिलकुलही सो टके की बात

प्यारे१
Tue, 05/28/2013 - 23:40 नवीन
इ तो बिलकुलही सो टके की बात कही हय मराठी माणूस आपने. कौनो समझदारी हय ही नही ना इस लिखाईमें. बस्स कीबोर्ड पे पटका और लिख दिया कुछ भी. परभू सरजी, आपय भी रिटायर हो ही जावो अब्ब!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

१८ -२० महिन्याचा काय दोन वर्षे पूर्ण झालेला मुलगाही

संजय क्षीरसागर
Wed, 05/29/2013 - 00:02 नवीन
वरील लेखात दिलेली वाक्ये बोलताना कुणाला दिसला असल्यास मी माझे प्रतिसाद बिनशर्त मागे घेईन
संपूर्ण सहमत. पुन्हा बायलिंग्विअल संभाषण कौशल्य आणि समज त्या वयाला अशक्य आहे. सगळ्यात भक्कम पुरावा म्हणजे
When sun beats down, the water gets evaporated and we get salt...बाजुच्या सीटवरील ताई मांडीवरच्या छोट्या अभिमन्यु ला सायन्स शिकवत होत्या
असा अभ्यासक्रम पावणे दोन वर्षाच्या मुलाला असणं शक्य नाही.
ताईंनी मुलाचे अर्धे तिकीट वाचवण्याकरिता (आठवा - ३ ते १२ वर्षांमधील मुलास अर्धा आकार पडेल) मुद्दाम वय कमी सांगितले असेल.
येस. बाई फ्रॉड असणार.
  • Log in or register to post comments

मला काय वाटते

इरसाल
गुरुवार, 05/30/2013 - 10:13 नवीन
छोटू लगेच सुतासारखा सरळ. पण फक्त पाचच मिनिटे. "अ‍ॅडमिनना अधिकार नाहीत" "त्यांना अ‍ॅडमिन नाही सल्लागार म्हणायचे इति ताई सल्लागार म्हणजे ? जे सल्ला देवुन मालकाला गार करतात ते ? मालक म्हणजे ? जे संस्थळ चालवतात ते ? मी एक दिर्घ श्वास घेतला आनी मनातल्या मनात स्वतःला समजावले ' खरचं एकही प्रतिक्रिया द्यायची नाही' अ‍ॅडमिन तुम्ही कुठे जाताय ? मराठी संस्थळावर. कशाला ? अरे तुझे बाबा जसे आंतर्जालावर जातात ना तसे ! "माझे बाबा कि नै आंतर्जालावर जात नाहीत. आंतर्जालच त्यांच्याकडे येते" हो का. कुठले आहे तुमचे आंतर्जाल. "मिपा". मराठी अतरंगी आणी मराठी अतिव्यक्तींची फॅक्टरी आहे असे सांग अ‍ॅडमिनना.. ताईंचे प्रॉम्प्टींग. चारशे-पाचशे सदस्य कायम पडिक असतात म्हणावे.. कौतुक ओसंडुन जात होते. अरे वा. मग तु कुठे मुंबईला कट्ट्यासाठी का? छोटू क्षणभर थांबला. "बाबांना की नै कट्टा/संपादक आवडत नाही. बाबांनी आणखीन सुंदर नविन संस्थळ उघडायचे ठरवलेय संपादकांशिवाय/मम्माशिवाय. मला खरडी पाठवतात आणि मम्माला व्यनी. बाबा मिपावर, मी आणि मम्मा ****". ताईंचा चेहेरा अगदी निर्विकार होता.
  • Log in or register to post comments

ही पण कथा आवडली...

मुक्त विहारि
Wed, 06/28/2017 - 21:43 नवीन
मस्त...
  • Log in or register to post comments

कथानायकाचा प्रवास चार

सतिश गावडे
गुरुवार, 06/29/2017 - 11:48 नवीन
कथानायकाचा प्रवास चार वर्षांपूर्वीच संपला. मात्र एका प्रतिसादकर्त्याचा "वैशिष्ठ्यपुर्ण सहप्रवास" अजूनही चालूच आहे. माझा हा प्रतिसाद ज्यांना कळला असेल त्यांनी पटकन लाईक करा पाहू. बघू किती लाईक मिळतात या पोस्टला.
  • Log in or register to post comments

+ १

मुक्त विहारि
गुरुवार, 06/29/2017 - 19:07 नवीन
आम्ह्ला सगळ्या विषयातले सगळे कळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा