सहप्रवासी
अर्धवट झोपेत होतो. त्रिशंकू अवस्था.
पण जी काही ग्लानी होती ती झटकन इवॅपोरेट झाली.
When sun beats down, the water gets evaporated and we get salt...बाजुच्या सीटवरील ताई मांडीवरच्या छोट्या अभिमन्यु ला सायन्स शिकवत होत्या.
मला आता पुढील सहप्रवासाची लक्षणे लगेच लक्षात आली.
कंसक्टर ने मुलाच्या वयाची विचारपुस केली.
वय वर्षे पावणे दोन ही माहीती मिळाल्यावर मी फ्रीझ झालो.
दोन मिनिटातच मागणी पुढे आली.
"माला भुक लागली"
ताईंनी बिस्किटचा पुडा काढला.
त्यात चित्रविचित्र आकाराची बिस्कीटे होती.
"मी आर्यन मॅन खाणार" पाच मिनिटात सर्व सुपर हिरो़ संपले
"आता मी १०० मीटर खेळणार".
मी दटावणार होत पण कंडक्टरनी पुढाकार घेतला.
पण चिरंजिव काही बधेनात.
परिस्थिती ताब्यात घेण्याकरता मी पापण्ञा वर केल्या.
छोटू लगेच सुतासारखा सरळ.
पण फक्त पाचच मिनिटे.
"आबांना मिश्या नाही"
ते आबा नाहीत. त्यांना को पॅसेंजर म्हणायचे..ताई.
"को पॅसेंजर मंजे काय"
one who travels with us is a co passenger.. ताई
"पॅसेंजर म्हंजे काय"
one who travels from one place to other.. ताई.
मी एक दिर्घ श्वास घेतला आनी मनातल्या मनात स्वतः ला समजावले 'प्रतिक्रिया द्यायची नाही'
"आबा तुम्ही कुठे जाताय"?
चेंबुर ला
"कशाला"?
अरे ऑफिसला. तुझे बाबा जातात ना तसा.
"माझे बाबा कि नै ऑफिसला जात नाहीत. फॅक्टरीला जातात"
हो का. कुठे आहे तुमची फॅक्टरी.
"महाडला".
केमीकल फॅक्टरी आहे असे सांग आबांना.. ताईंचे प्रॉम्प्टींग.
पन्नास वर्कर कामाला असतात म्हणावे.. कौतुक ओसंडुन जात होते.
अरे वा. मग तु कुठे मुंबईला आज्जी कडे का?
छोटू क्षणभर थांबला.
"बाबांना की नै मम्मा आवडत नाही. बाबांनी आणखीन सुंदर नविन मम्मा आणलीये. माला टॉइज पाठवतात आणि मम्माला मनी. बाबा महाडला, मी आणि मम्मा ठाण्याला".
ताईंचा चेहेरा अगदी निर्विकार होता.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
लहान मुले निष्पाप असतात......
चांगलाच
खीक!
बाबांनी आणखीन सुंदर नविन मम्मा आणलीये.
खास शैलीतला खास लेख.
खरं सांगू?
तरी त्याच्या मम्मीला बाबांचं
=))
अनेक शक्यतांचा विचार करायला
निर्विकार..
लहान मुलांना अनेक गोष्टी
खाजगी
राग
मुलाबरोबर त्याची आई होती का
"टंकाळा" शब्द प्रचंड आवडला
लै भारी !
अश्या वेळी त्या नायिकेला कसे
वर नमूद केलेल्या कारणांमुळेच
सर...वेल्कम.
ताईंचा चेहेरा अगदी निर्विकार होता.
ते आबा नाहीत. त्यांना को
काय चुकले?
आई असली तरी प्रवासात तिने
+१
माणसाला एकदा चष्मा लागला की जाता जात नाही ब्वा
कोण प्रभू सर का? हा. आलो आलो.
कशाला सुचायला हवं?
एक काम करुया.
बैलाला कळेल तर शप्पथ!
अपवाद
तुम्ही लेखनातली चूक मान्य केली आहे त्यामुळे विषय संपला
इतरांना भोचक चवकशा कशाला?
पन्नास वर्कर कामाला असतात
व्यक्ती पत्नी आहे हे गृहीत धरुन?
गृहितक.
गृहितक?
लहान मुलं पटकन बोलून जातात हो
प्रश्न लहान मुलांच्या `मी' चा नाहीये
एखादी उघड गोष्ट अमान्य
एखादी उघड गोष्ट अमान्य करण्यातकाय उघड गोष्ट आहे..? "मला" पण कळूदे, संपूर्ण लेख वाचूनही "माझ्या" वाचण्यात काही गफलत होते आहे का.. **************** आमची येष्टी...???? आता मास्तरांनी रिंगणात प्रवेश घेतला. (पुलंच्या म्हैस मधून साभार!)अभिनंदन!
चवकशी भोचक असणं हा मात्र
पहिला नमस्कार गुर्जींना.
विनायकराव लिखाण आणि निरीक्षण
आई
सार,
धन्यवाद मास्तर
मास्तर........
प्रवास
असंही शक्य आहे.
हम्म!