साहित्यः
चिकन विंग्स - १०-१२
आले-लसुण - बारीक चिरुन १-१ चमचा
सोया सॉस - २ चमचे
व्हिनेगर - १ चमचा
रेड चिली सॉस - २ चमचे
काळि मिरी पावडर - १ चमचा
स्विट अँड स्पायसी रेड चिली सॉस - २ चमचे
टोमॅटो सॉस - १ चमचा
ब्राउन शुगर - १ चमचा
तिळ - १ चमचा
Red chilly flakes - १/२ चमचा
तेल - १ चमचा
कांद्याची पात सजावटीसाठी
मिठ चवीनुसार
कृती:
१. चिकन विंग्सचे ३ तुकडेकरुन एका बाऊल मधे काढुन घ्यावेत.
२. त्यात बारिक चिरलेले आले-लसुण, काळि मिरी पावडर, व्हिनेगर, १ चमचा सोया सॉस, १ चमचा रेड चिली सॉस, १/२
चमचा तेल व चवीनुसार मिठ टाकुन निट मिक्स करुन घ्यावे. हे चिकन १-२ तास marinate करुन ठेवावे.
३. ओव्ह्न २२० degree celcius ला preheat करुन घ्यावा.
४. बेकिंग ट्रेला सिल्व्हर फॉइल लावुन घ्यावे. त्याला वरतुन तेलाचा हात लावुन घ्यावा आणि त्यात marinate
केलेले चिकन विंग्स ठेवावेत.
५. हे विंग्स १५-२० मिनिटे ओव्हन मधे बेक करुन घ्यावेत. १० मिनिटांनी ते एकदा पलटावेत.
६. १५-२० मिनिटांत विंग्स शिजले असतील.
७. आता एका दुसर्या पातेल्यात, टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस, स्विट अँड स्पायसी रेड चिली सॉस, ब्राऊन शुगर,
सोया सॉस, red chilly flakes हे सर्व एकत्र करावे. त्यात २ चमचे पाणी टाकावे. ह्या सॉसला चांगली उकळी
आली की त्यात तयार झालेले चिकन विंग्स टाकावेत.
८. त्यात वरतुन तिळ व कांद्याची पात टाकुन निट मिक्स करावे.
९. गरमा-गरम स्विट अँड स्पायसी चिकन विंग्स खाण्यासाठी तयार आहेत.

वाचने
7077
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रतिम.
भारी आलेत फोटू. शाकाहारींनी
भारी आलेत फोटू.
लै भारी!
सुरण, आरवी मोठे मश्रूम.
In reply to लै भारी! by पैसा
हो आणि बेबीकॉर्न पण मस्त
In reply to सुरण, आरवी मोठे मश्रूम. by प्रभाकर पेठकर
व्वा व्वा.... मस्तच !!!
छान आलेत फोटो
मस्तचं
फोटो मस्त !
फोटो मस्त !
नाहि गं.. चिकन मंच्युरियन
In reply to फोटो मस्त ! by सस्नेह
आहाहा..भूकेतीत पाकृ.
पाककृती झकास आहे. बाकी
अर्वी टाकून करण्यात येईल.
अरे हो.. अरवी हा पण ऑप्श्न
In reply to अर्वी टाकून करण्यात येईल. by त्रिवेणी
च्यामारी, हे बघायचं राहुनच
सगळ्यांचे धन्यवाद