ट्यूब लाईट खाणे, केसाने ट्रक ओढणे वगैरे
लेखनविषय (Tags)
तस प्रकरण नवीन नाही. इतक्यात youtube वर विडीओ पहिला आणि विषय परत आठअला. आपण उस खात नाही तेव्हढ्या सहज पणे हा मनुष्य ट्यूब लाईट खातो हे बघा https://www.youtube.com/watch?v=vQXhpqkg8WY. आपण दाताने जिभेला चावले तर २-४ दिवस दुसर काही खाणे जमत नाही. आपल्याला फक्त नासलेले दुध पिले म्हणून फूड पोइझनिन्ग होते. पण हे असले अघोरी माणस कसे काय कोण जाणे काहीही करण्याची तयारी ठेवतात, या अवलीयांच्या पोटात काय लोखंड, अलुमिनियम वितळवणाऱ्या भटया असतात कि काय कोण जाणे? तस पाहिलं तर हे लोक काहीपण पचवण्याची ताकद ठेवतात. मागे एका एकदा वाचले होते एका माणसाने म्हणे अक्खे ट्रक चे चाक खाल्ले. बकासुरालाही लाज वाटावी अशी या मनुष्यांची भूक आणि पचन शक्ती कुठून तयार होते?
ह्या माणसांमध्ये नक्की काय दोष असतो? यातले सगळेच लोक गरीब असतात आणि भुकेसाठी करतात अस वाटत नाही. तर गिनीज बुक आणि तत्सम पारितोषिकासाठी हे प्रकार जास्त होताना दिसतात. AXN, स्टार या इंग्रजी वाहिन्या यांना खास वातावरण उपलब्ध करून देतात. जबरदस्त सेट, महागडे कॅमेरे, आणि गिनीज बुक चे सुटा-बुटातील रेकॉर्ड ठेवणारे, याच लोकांसारखी वेड लागलेली जनता यांना प्रोत्साहन द्यायला हि असते. मग हे लोक दाताने १००० टनाचे जहाज वाहून नेतात, कधी केसाने ट्रक ओढतात, अजस्त्र विमान स्वत:च्या शरिरावारून नेतात, साप, विंचू यात स्वत:ला फसवतात इ. आपल्याकडे असणारा कडक लक्ष्मी प्रकारही असाच. रेकॉर्ड करायचे ते करा पण स्वत:ला असला अघोरी त्रास का देता? ऑलिम्पिक मध्ये आपल्याकडे काय कमी गेम आहे? ते पाहणाऱ्या जनतेला तरी त्यातून काय मिळते कोण जाणे? बाकी आपल्याकडेही आता हे कार्यक्रम सुरु झाले आहेत. आणि गम्मत अशी कि परीक्षकांना सुद्धा हे पहावल्या जात नाही. आपली किरण खेर तर पदराआडून लपत बघते. तर मला पडलेले हे काही प्रश्न : • नेमके के कारण असावे असले प्रयोग करण्यामागे? • भौतिक शास्त्राच्या नियमाना बाजूला आव्हान देऊन हे कसे काय राक्षसी प्रयोग करू शकतात? • या प्रयोगानंतर या माणसांच्या शरीराचे काय हाल होतात? • या सर्वांची सुरुवात होते ती कशी? • असले काही प्रयोग करणे म्हणजे १-२ महिन्यात येणारे नव्हे. तर लोक १०-१० वर्ष सराव करून शिकतात(?). आपल्या आयुष्याची इतकी वर्षे हे असल्या कामात का घालवतात?
प्रतिक्रिया
मनोरंजन
जादुगार हौदीनी म्हणे छोटी
तलवार गिळणे
क्या बात है !
कौतुक असते लोकांना, आपल्याला
माझा अंधश्रद्धा निर्मुलन
अशक्य
अशा लोकांना दुसर्या दिवशी
"साप, विंचू यात स्वत:ला
फसवतात
याचा अर्थ..
चुकिबद्दल क्षमस्व
फसवतात च्या ऐवजी अडकवून घेतात - असे असावे असे वाटते.हो तसेच म्हणायचे होतेहे सर्व करुन सुद्धा जिवंत