इराण्याची हॉटेलं ..........
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
कालच दादर टीटी ला होतो. पाहतो तर काय , तिथल्या [पुणे बस-स्थानकासमोरचं] इराण्याच्या जागेवर चक्क वामन-हरी-पेठे आले. एका कोप~यातलं मराठी उद्योजक [निरुद्योजक] मन सुखावलं-उगाचच. की मराठी माणूस सुद्धा टेक-ओव्हर वगैरे करू शकतो ई.ई. पण विषय तो नाही. त्या-निमित्तानी आठवली - नामषेश होत जाणारी इराणी हॉटेल्स ![वा.ह.पेठेंचं आम्हांस कौतूकच आहे - उगाच त्यांचा राग कशाला ? - आमचं डिप्लोम्याटिक सहिष्णू मन]
तो पानी कम....
ती केक-पेस्ट्~या भरभरून समोर येणारी ट्रॉली...
"जो मंगताय वो लेलो" म्हणणारा उस्मान किंवा मामू.
ब्रेड बटर, ब्रून-मस्का [केडल रोडचा इराणी त्याला चक्क 'बरूण-मसका' असं म्हणायचा], असं असलं तरी त्याची लज्जत कद्धीच कमी झाली नाही.
मेट्रो च्या मागे - एक इराणी होता, त्याच्याकडे मिळणारं भलं मोठ्ठं आमलेट
अल्टी-पल्टी, डबल हाफ फ्राय असले प्रकार - ती आमलेटं प्रचंड तेलकट असली तरी इराण्याकडेच खावीत.
आणी इराण्याच्या हाटिलातला यु.एस.पी. ठरेल असा तो ... चहा .. वा व्वा, क्या बात हैं !
अनेक अफवा असायच्या - त्याच्याबद्दल. त्यात म्हणे ते लोकं अंडं घालतात, असेलही कदाचित.
एंपायर च्या बाजूचा आहे कि नाही कुणास ठाऊक.
पुण्यातही हीच कथा आहे . सनराइज , नाज्,ही गेली. एन सी आर [जंगली महाराज समोर] हे कळकट्ट स्वरूपात आहे. कर्वे रस्त्यावर पेरेडाइज आहे, पण सो-सो च. त्यात इराणी पण नाहीच.डेक्कनचं लकी पण गेलं
फक्त गुडलक तेवढं दिस्तंय. पण त्यातला मेनू ? तिथे सग्गळं मिळतं ....पोळी भाजी, पंजाबी,पाव-भाजी इ.इ.
एकदा पुडिंग मागवलं- अरेरे ... बोललं नाही तर बरं
एनी वे, ती इराण्यांची मज्जा के.एफ.सी. , डॉमिनोज , बरिस्तात कुठे !
प्रतिक्रिया
संध्याकाळी मेरवान गाठलेच
शप्पथ ! मेरवान कसा विसरलो,
मुम्बईत
विषय मस्त, पण लेख थोडक्यात
मलाही वाटलं बरं का सौंदाळा,
आमाले ते इराणी चाय लै अवडते !
चांदणी चौकात
बंजारा हॉटेल शेजारी
मी कधीही अशा ठिकाणी गेले
इराण्यांची हॉटेलं आणि त्यातले
मुंबई-पुण्यातच आहेत बहुतेक
FYI
मी पण नाही ग गेले कधी.
वेगळा...खानदानी, अस्सल अनुभव
एंपायर च्या बाजूचा आहे कि
पुण्यात असाल रेवती, तर गुडलक
सहीच..
चला , प्रत्यक्ष नाही तरी
परवाच मी ऑर्कुटवर इराणी
परवा?
इराण्याचा क्लासच वेगळा..
डेक्कनचं लकी पण गेलं
गुडलक आहे की!
@पुणे महानगरपालिकेसमोरही एक
नका हो वर्णन करू.
(No subject)
काय सांगता! मस्त!
कुठे, कुठे? नक्की खाणाखुणा
तसं के.इ.एम. समोर पण आहेच, पण
इराणी उपहारगृह् संस्कृती.
चर्च्गेटचा "स्टेडियम" अजूनही
मराठी माणसाने टेक-ओव्हर
लाइक-ड !
कयानीच्या समोरचा
व्वा व्वा विसोबा....
Liked.. : - )
मारामारी
तशी मुंबईतली ... शं.वि.हिं.हॉ
मारामारी अन केटी ही
केटी
केटी मंजे फक्त दुदातला चा.
छान !
अरे अजुन कुणीच वहुमनचं नाव
अरे हो, हे राहिलंच,
तीनचार वर्षांपूर्वी
कररेक्ट... अशीच तर नांवं येत
शिवाजि पार्कातल लाईट ओफ भारत
लाईट ऑफ भारत शिवाजी पार्क
हेच ते "बरूण-मस्का" वालं....
शनिवार चा बेत शक्यतो गुडलक
Pagination