Skip to main content

कविच्या आत ...

लेखक अलोककुमार यांनी गुरुवार, 23/05/2013 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
कवीच्या आत कधी उतरतांना सहजच दिसेल तुम्हाला आत ऊन सावलीचा होणारा खेळ तो मात्र शांत, हे सार बघतांना धुक्याच्या अवजड भिंती आपल्या कल्पकतेने तोडून थेट प्रकाशाकडे झेपावत दिसेलच तो संवाद साधतांना मानवी आरश्या समोर राहून उभं नित्याचंच ते मंद मंद हसणं दिवा प्रकाशाच्या भित्तीछाया दिसेल कदाचित त्यांच्याशी बोलतांना कोणाच्या मुद्द्यांशी लोळण घेत विचारांच्या पुंजक्यांशी भाडतांना सळसळणारे जीवनं धमन्यांतून वाहत दिसेल नावीन्याचा प्रवास करतांना
लेखनविषय:

वाचने 1309
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

छान रचना. थोडी विस्कळीत वाटली, कां मलाच कळली नाही?

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

'मिका' च्या आंत डोकावून पाहिलं पाहिजे एकदा!

In reply to by तिमा

हा हा हा

:)

कवीच्या आत कधी उतरतांना सहजच दिसेल तुम्हाला आत ऊन सावलीचा होणारा खेळ तो मात्र शांत, हे सार बघतांना
शांत ? अहो वात आणतात चारोळ्या / साहोळ्या आणी आठोळ्या टाकून !